Skip to main content

केतकी पिवळी पडली - लेखक स. तं. कुडचेडकर भाग - १

"केतकी, अग ऐ केतकी,"
"आत्ता काय कराव या पोरीच, सकाळचे आठ वाजले तरी अजून हिचा उठायचा पत्ता नाही!"
"केतके कार्टे उठतेस कि नाहि!" अशी लांब लचक आरोळीच तिच्या आईने दिली.
केतकी रागातच उठली. "आई आहे कि सासू कुणास ठाऊक" अस म्हणून केतकी आंघोळ करायला गेली.
केतकी म्हणजे आपल्या शंकर राव आणि सुमन वाहिनीची धाकटी मुलगी. त्यांचा मोठा मुलगा विजय कामानिमित्त बंगलोरला होता. तर केतकी आपल एम. बीए च शिक्षण पूर्ण करून घरीच आराम करीत होती. तीला काही काम करायचं नव्हत अस नव्हे पण त्याला अजून थोडा वेळ आहे असे ती म्हणे. थोडे दिवस आराम करून आपण बाबांच्या शिपिंग कंपनीत काम करणार आहोत अस तीन तिच्या परीक्षा चालू असतानाच जाहीर केल होत.
खर तर केतकीची आपण आराम करीत आहोत हि थापच होती. ती आराम करीत नसून आपल्या दुखी मनाला समजावीत असत. तिच्या एम. बि.ए. च्या परीक्षा चालू होण्यापूर्वी तिच्या प्रियकराने तिला एकांतात भेटावयास बोलाविले होते. आणि यापुढे आपल्या दोघांचे हे नाते निभावण्यास आपण असमर्थ आहोत असे सांगितले. हे ऐकून केतकीला खूप राग आला. तीच स्त्री मन खळवळून उठलं. तिला खात्री होती कि तिच्या प्रेमाच्या मध्ये कोणीतरी तिसरच आलय. तिने तस आपल्या प्रियकराला विचारलही. त्याने मान खाली घालून आपण आपल्या चाळीतल्याच एका मुलाच्या प्रेमात पडलो आहोत असे सांगिले. ते एकूण 'केतकी पिवळीच पडली'. आणि आपण पुन्हा कध्धी कध्धी प्रेम करायचं नाही अस ठरवूनच परीक्षेला बसली.
पण आपण जे ठरवू ते तसच्या तस थोडीच होत. ती त्याला विसरण्याचा खूप प्रयत्न करूनही त्याला विसरू शकत नव्हती. तेव्हा ती स्वतःला म्हणे, "केतकी विसर त्याला, विसर. कायमच विसर!"
पण हाय !! ती त्या विसरूच शकत नव्हती.
याचा तिला खूपच मनस्ताप होत होता. आपण अशा माणसाला विसरू शकत नाही ज्याला त्याच माझ्यावरच प्रेम म्हणजे त्याच्या आयुष्यातील मोठी चूक वाटते.
"नाही नाही केतकी, तू त्याला विसरायलाच हव. त्याला विसरायचा प्रयास तू करायलाच हवा." ती सतत आपल्या मनाला समजावत राही. तुझ्या कडे काही कमी प्रतिभा (Talent) नाही. त्याच्या जोरावर तू जगातील कुठचेही सुख मिळवू शकशील. त्यासाठी तुला त्याला विसरायचा प्रयास करायला हवा. शेवटी प्रयास हा प्रतिभेचा प्राण वायू आहे हेच खर. पूर्ण प्रयत्नानीशी त्याला विसरू म्हणजे आपण एक नवीन आयुष्य सुरु करु.

Node read time
2 minutes
2 minutes

अरविंद कोल्हटकर Thu, 30/05/2013 - 18:39

हा एक कोठूनतरी घेतलेला छोटा तुकडा येथे दाखविण्यामागे धागाकर्त्याचा काय हेतु आहे ह्यावर काहीतरी लिहिले तर अधिक डोळसपणे त्याचे वाचन करता येईल.

On a lighter note त्याने मान खाली घालून आपण आपल्या चाळीतल्याच एका मुलाच्या प्रेमात पडलो आहोत असे सांगितले>. हे जर असेच असले तर मग केतकी कडयावरून कोसळता कोसळता वाचली असे म्हणावयास हवे. तिने 'आपल्या दु:खी मनाला समजावत' बसण्याऐवजी वेळीच वाचविल्याबद्दल ईश्वराचे आभार मानावेत आणि पुढल्या कामास लागावे!

बॅटमॅन Thu, 30/05/2013 - 18:51

In reply to by अरविंद कोल्हटकर

पुलंच्या व्यक्ती आणि वल्ली या प्रसिद्ध कथासंग्रहातील "सखाराम गटणे" या धमाल प्रकरणातला हा उल्लेख आहे. गटणेला दिसेल ते पुस्तक वाचण्याची आवड असते त्यामुळे कुठल्याही पुस्तकातील उतारे तो फेकत असतो. "केतकी पिवळी पडली" बाय स.त.कुडचेडकर हे एक कल्पित उदाहरण कोपर्‍याकापर्‍यातल्या फालतू पुस्तकासाठी घेतले आहे. त्या पुस्तकाच्या जवळपास अज्ञात लेखकाचाही उल्लेख तो "ख्यातनाम" असा करत असतो तेव्हा मजा येते वाचायला एकदम.

संदर्भ.

आधारभूत परिच्छेद खालीलप्रमाणे.


मला त्याला ओरडून सांगावेसे वाटले, "मुला---अरे माणसासारखा बोल की रे. तुझ्या जिभेला हे छापील वळण कुठल्या गाढवानं लावलं? प्रतीभासाधनाची कसली डोंबलाची वेळ?... "पण ह्यातले काहीही मी म्हटले नाही. गटण्याच्या डोळ्यांत छप्पन्न संशाची व्याकुळता साठली होती. बोलताना त्याचे डोळे असे काही होत, त्याच्या कपाळावरच्या आणि गळ्याच्या शिरा अशा काही विचित्रपणे ताणल्या जात, की असल्या आविर्भावात त्या मुलाने एखाद्या शिव्या दिल्या तरी देखील त्या घेणा-याला ह्या देणा-याची दया आली असती. एथे तर त्याच्या जिभेवर साक्षात सरस्वतीने मराठी भाषेचा 'क्लास' उघडला होता."

हे पाहा, पुढल्या आठवड्यात एखाद्या संध्याकाळी या."

"निश्चित वार सांगू शकाल का आपण? नाही सांगितला तरी चालेल. मी रोज येत जाईन. प्रयास हा प्रतीभेच्या प्राणवायू आहे असं कुडचेडकरांनी म्हटलचं आहे."

"कुणी?"

"स.तं. कुडचेडकर ---'केतकी पिवळी पडली' चे ख्यातनाम लेखक."

"अस्सं!" कुडचेडकर नावाचा मराठीत कुणी साहित्यिक आहे, याचा मला पत्ताही नव्हता. आणि गटण्याला त्याच्या 'केतकी पिवळी पडली' (हे नाटक होते, कादंबरी होती की आणखी काय होते देव जाणे) पुस्तकातली वाक्ये पाठ होती.ह्या गटण्याची केस अगदीच हाताबाहेर गेली होती.

बाकी केतकीच्या पिवळ्या पडण्याचे वर्णन उत्तमच-मात्र ते अजून हलकेफुलके केले असते तर अजून मजा आली असती.

३_१४ विक्षिप्त अदिती Fri, 31/05/2013 - 00:48

थोडा मोठा भाग चालला असता.
दुसरी थोडी अधिक गंभीर अपेक्षा आहे. गटण्याला ज्या प्रकारचं लेखन आवडू शकतं, तसं दवणीय (दयनीय) लेखन पण तरीही वाचताना बुद्धिमान वाचकाला कंटाळा येणार नाही असं काही लिखाण या नावाखाली आवडेल.

ऋता Fri, 31/05/2013 - 15:39

केतकी हे पात्र पाहून पुढे तिला कावीळ होते की काय वाटलं. पण एकूण निराशा झाली वाचून. कल्पना मुळात चांगली आहे..पण थोडी आणखीन चांगल्या तर्‍हेने हाताळायला हवी.
३_१४ विक्षिप्त अदितीशी सहमत.

'न'वी बाजू Sun, 02/06/2013 - 10:22

In reply to by ऋता

कल्पना मुळात चांगली आहे..

अगदी!

कल्पना चांगली आहे, परंतु प्रतिभेचा प्राणवायू अंमळ कमी पडला, असे अतिशय नम्रपणे सुचवावेसे वाटते.

ॲमी Fri, 31/05/2013 - 16:32

कल्पना मुळात चांगली आहे..>> +१
३_१४ विक्षिप्त अदितीशी सहमत.>> +१
पण 'दवणीय + बुद्धिमान वाचकाला कंटाळा येणार नाही' असं लिहणे अवघड आहे.

'न'वी बाजू Fri, 31/05/2013 - 16:39

In reply to by ॲमी

पण 'दवणीय + बुद्धिमान वाचकाला कंटाळा येणार नाही' असं लिहणे अवघड आहे.

'दवणीय' + 'बुद्धिमान वाचकाला कंटाळा येणार नाही असं' हा वदतोव्याघातः नाही काय?

ॲमी Fri, 31/05/2013 - 17:16

In reply to by 'न'वी बाजू

तशी अपेक्षा अदितीने केली आहे...
so bad it's good असं लिहता येउ शकेल वाटतयं मला. पण फार प्रयत्न करावे लागतील, वेळ द्यावा लागेल.

............सा… Fri, 31/05/2013 - 22:46

दवण्यांचे लेखन वाचले नाहीये. किंबहुना त्याबद्दल निंदेचा अथवा तक्रारीचा सूरच ऐकला आहे. एकदा वाचायला हवे. मला आवडेलही :प

............सा… Sat, 01/06/2013 - 03:26

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

अति गोग्गोड अन नाटकी आहे. पहीले २ पाहीले. तिसर्‍यात अर्ध्यावर "पाषाणच मिळाला ना?" या वाक्यावर तातडीने हात उजव्या बाजूच्या लाल फुलीवर गेला.

बाप रे!!! इतकं गोड अन नाटकी :(

३_१४ विक्षिप्त अदिती Sat, 01/06/2013 - 04:45

In reply to by ............सा…

हा प्रतिसाद सारीका आणि अपरिमेय अशा दोघांसाठी आहे.

तुम्ही दोघांनीही हे ऐकलं आणि त्याची माहिती दिलीत याबद्दल आभारी आहे. मी इयत्ता नववीत असताना कुठल्याशा पारितोषिक वितरण समारंभात दवणेंचं भाषण ऐकलं. घरी येऊन त्यातल्या एक-दोन वाक्यांचा अर्थ विचारला. आईने इकडेतिकडे पाहिलं आणि म्हणाली, "जा तुझं संस्कृतचं पुस्तक घेऊन ये. आपण पुढच्या धड्याचं भाषांतर पाहू या."

अपरिमेय Sat, 01/06/2013 - 06:04

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

मला तर नववीत असताना दवणेंच्या हस्ते कोणतेतरी बक्षीस मिळाले होते. काय ती रम्य आठवण!
अर्थात, तेव्हा त्यांच्या बोलण्यातला बाष्कळपणा तितकासा जाणवला नव्हता.

'न'वी बाजू Sat, 01/06/2013 - 05:52

In reply to by ............सा…

अति गोग्गोड अन नाटकी आहे. पहीले २ पाहीले. तिसर्‍यात अर्ध्यावर "पाषाणच मिळाला ना?" या वाक्यावर तातडीने हात उजव्या बाजूच्या लाल फुलीवर गेला.

पॉइंट वेल टेकन.

बाकी, हा मनुष्य चिलमीत घालून जे काही ओढतो, ते माला पण पाहिजेऽऽऽऽऽऽऽ!!!!!! वँऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽ!!!!!! ":(("

अपरिमेय Sat, 01/06/2013 - 03:38

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

ही विचारमौक्तिके ऐकुन कान तृप्त झाले.

ॲमी Sat, 01/06/2013 - 06:15

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

छ्या! एक मिनीटभरच पाहीला पहीला विडीओ... तेवढा पुरेसा आहे :-(
हातवारे, चेहर्यावरचे भाव, आवाज, बोलण्याची पद्धत... अजुन थोडा वेळ पाहीलं, तर आपणदेखील तसेच करायला लागणार, असं भ्या वाटलं :-(
@सारीका, दवणे हे नावच मला काही महीन्यांपुर्वी कळलं. तेव्हा माहीती सांगणार्याने 'अरे ये PSPO नै जानता म्हणलेलं' =))

'न'वी बाजू Sun, 02/06/2013 - 10:38

In reply to by बॅटमॅन

माहितीबद्दल धन्यवाद. (PSPO खरोखरच माहीत नव्हता.)

नंदन Sun, 02/06/2013 - 12:27

In reply to by 'न'वी बाजू

पाषाणाची बोधकथा ऐकून खुद्द त्या पाषाणासही दगडावर डोकं आपटून जीव द्यावासा वाटेल. एकंदरीत ती तुपाळ सात्विकता, चेहर्‍यावरचा 'प्राण्या, रामकथारस पी' छापाचा स्युडो-आत्मविश्वास इ. पाहून दवणे हे मराठी साहित्यातले रामदेवबाबा किंवा तत्सम बापू असावेत, असं वाटून गेलं.

बाकी PSPO ची व्याख्या Pathetically Saccharine (is the) Praveen's Ouevre अशी बदलली तर त्याला ओरिएंट कुंपणीही आब्जेक्षण घेणार नाही, याची खात्री वाटते.

१. पहा नाथा कामत

'न'वी बाजू Sun, 02/06/2013 - 21:19

In reply to by नंदन

चेहर्‍यावरचा 'प्राण्या, रामकथारस पी' छापाचा स्युडो-आत्मविश्वास इ. पाहून

... 'पिढी चुकला' म्हणा की!

(बाकी, 'the Praveen' या ठिकाणी योग्यच म्हणायला पाहिजे. यासारखा दुसरा होणे नाही - किमानपक्षी, अशी आशा करू या.)


तळटीपा:
साधारणतः आमच्या पिढीच्या दोनएक पिढ्यांअगोदरच्या पिढीतला एखादा कीर्तनकार अथवा हरदास म्हणून खपून गेला असता. (समोर बसून वाती वळायला उत्तम.) नाहीतर, एखादा 'हरितात्या'१अ म्हणून.
१अ पण मग तो प्रति-हरितात्या१ब झाला असता, ओरिजनल नव्हे. म्हणजे अ-दवणीय.
१ब त्या काळात झेरॉक्स बहुधा नसल्याने 'झेरॉक्स हरितात्या' बहुधा म्हणता येणार नाही. 'फोटोस्टॅट हरितात्या' म्हणता यावे किंवा कसे, यावर ज्यूरीतील सभ्य गृहस्थ अजूनही बाहेर आहेत. मात्र, गेला बाजार 'सायक्लोस्टाइल हरितात्या' म्हणावयास कोणासही प्रत्यवाय नसावा.१क
१क तेही नाही जमले, तर मग 'कार्बन' अजरामर आहेच.
एक प्रवीण आहे तो पुरे आहे. प्रतिप्रवीण२अ होऊ लागले तर मात्र कठीण आहे.
२अ बाकी, प्रवीणच्या प्रति-प्रती बर्‍याच निघाल्या, तर मग कालौघात त्यातली एखादी तरी झेरॉक्स हरवेलच. तरीसुद्धा माणसे काळजी करणार नाहीत. म्हणतील, "हरवू द्या हरवली तर झेरॉक्स! ओरिजिनल आम्ही लॉकरमध्ये२ब ठेवलीय."
२ब प्रवीणला लॉकरमध्ये ठेवण्याची संकल्पना मोहक आहे. ज्याने कोणी शोधली, त्या ओरिजनल२क व्यक्तीस सलाम.
२क ती ओरिजिनल व्यक्ती म्हणजे दस्तुरखुद्द प्रवीण तर नव्हे? म्हणजे, 'तुझे आहे तुजपाशी, परि तू जागा विसरलाशी'?

'न'वी बाजू Sun, 02/06/2013 - 19:12

In reply to by नंदन

पाषाणाची बोधकथा ऐकून खुद्द त्या पाषाणासही दगडावर डोकं आपटून जीव द्यावासा वाटेल.

नेमका कोणता फुटेल, ग्यारंटी नाही.

मन Thu, 24/10/2013 - 14:37

ह्या निमित्तानं दवण्यांचे तूनळी दुवे मिळाले,. हे ही छान.