वाटलंही नव्हतं तेव्हा....

वाटलंही नव्हतं तेव्हा
पाऊस इतकाही मनमोहक असेल
शाळेतल्या बाकांवर बसताना
वह्या भिजल्या जेव्हा

वाटलंही नव्हतं तेव्हा
वारा इतका सुसाटही असेल
उन्हाळ्या मध्ये हातांचा
पंखा झाला जेव्हा

वाटलेही होतं त्यापेक्षा
खूप छान होता पाऊस
तरूण वयात आल्यावर जेव्हा
पहिल्यांदा भिजवुन गेला

कळलंच नाही तेव्हा
काय होउन गेलं
पावसापूर्वीचा वारा
नकळत मन घेउन गेला.....

field_vote: 
3
Your rating: None Average: 3 (1 vote)

प्रतिक्रिया

नाजूक आणि वेगळ्या रचनेची कविता.. आवडली.

बाकी, ऐसी अक्षरेवर स्वागत!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!