रोमन इतिहासास..

मध्यंतरी इटलीला जाऊन दांते, मेकीयाव्हेली, मायकेल अज्नेलो, गलिलिओ ह्यांची टोंब्ज आणि त्यांची कला-ज्ञानसाधना 'याची देही..' बघून आलो. वसंत बापटांचं मायकेल अन्जेलोपनिषद इथे अष्टसात्त्विक भाव जागृत होऊन अनुभवलं ! अलौकिक..!! रोममध्ये भटकताना रोमन साम्राज्याचा व ज्युलियस सीझरचा इतिहास पुलंच्या 'हरीतात्यां'च्या डोळ्याने प्रत्यक्ष पाहिला...!

प्रबोधनाच्या देशात जाऊन आल्यावर मर्यादा झिडकारून देण्याचं बळ मिळावं इतकं स्थानमाहात्म्य इथे आजही आहे.. असो..!

त्यानिमित्ताने काही स्फुरलं..ते लिहिलंय..:
----------------------------------

हे भग्न खांब कलथले; उलथली मूर्ती,
भग्नशा भिंतितून साक्ष जुन्याची पुरती,
या साक्षींच्या शाहिरा गवसले काय..?
इतिहासासम वर्तमान घडतो हाय...!

तो शूर रणांगणि खुर्दा पाडुन गेला,
अन् क्रूर शत्रुचा मुर्दा पाडुन गेला,
एकछत्र तो स्थिर सत्ता देण्या जाई,
मित्रांनी ही त्या जिते ठेवले नाही...!

हा भव्य असा इतिहास सांगुनी जाई,
मम चरित्र लिहिण्या रक्ताची हो शाई,
ते वाच-वाचुनी जबरदस्त जरि पगडा;
आकंठ माखुनी समाज तरि ही उघडा...!

ह्या भव्य-भग्न मूर्तीची हुरहुर आहे,
संचित माझेही अफाट हे जरि आहे;
शुष्कशी प्रेरणा मिळते मुर्दाडांना;
मातीतिल पायाचे परि भान न त्यांना...!

विद्वान थोर इतिहासी झाले गेले,
मर्द वीर ते काळाने रिचवुन नेले,
विद्वान-सभा अन् युद्ध जिंकणाऱ्यांनो,
पोवाडे तुमचे जातिल; विरुनी गेले...!

इतिहास चित्र-शिल्पांची का हो गर्दी?
इतिहास-पुरुष की रक्त-रंजनी दर्दी..?
जिंकिले ह्यास मारले, कापले म्हणतो,
नी पश्चात्तापे, मूक वेदने कण्हतो...!

इतिहास असा; तर धर्म तसा सत्शील;
मूल्ये-नीती-ज्ञानाचा मिशीस पीळ;
"ते ज्ञान मुक्ती देते" म्हणती पण हाय,
वास्तवात दंभाने मातवून जाय...!

हा भव्य देव-प्रासाद; घुमटही भव्य,
मानवता शिकवी मूर्ती निर्जिव दिव्य,
भरल्या पोटी येथे करुणेचा बोध;
अस्मानापलिकडच्याचा कुठला शोध...!

ती भव्य देवळे; रेखिव-चित्रित भिंती,
रेशमी झिरझिरी वस्त्रे; मिणमिण पणती,
त्या पुढे क्रुसावर देवपुत्र ना दिसतो,
तो खिन्न; दुरून झगमग डोळ्यांना हसतो...!

ओरपली त्याची करूणा भक्त-जनांनी,
समृद्ध जाहले आणिक तृप्त मनांनी,
"ना नको करू करुणा पुन्हा ना वेड्या!",
सांगाया येती तुजला तुझिया खेड्या...!

तू व्यर्थ फुकाचा क्रुसावरी चढलास,
अन् व्यर्थ दयेने गरिबांच्या रडलास,
"एकटा दरिद्री रोड काय करणार..?"
ही..हीच समीक्षा तव चरित्र सहणार...!

का घडली येथे थोर-चरित्रे दिव्य ?
का सर्वस्पर्शि इतिहास घडावा भव्य..?
नाही येथे ह्याचा हो लेखा-जोखा,
चिरफाड्या विद्वानांचा येथे धोका...!

हे असेच सगळे युगायुगी घडणार,
पाण्याने भरले घट रितेच होणार..
निर्मळ जे मिळते पाणी; पिउनी जावे,
विश्वास्तव जितुके शक्य त्यातुनी द्यावे...!

field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

अरविंद कोल्हटकरांची रोमची ही मालिका आठवली:
पाँपे - एक धावता दौरा. , सिस्टीन चॅपेल., ऑस्टिया अँटिका

लिओनार्दोची कबर इटलीत नाही का?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

या उत्तम लिंक्ससाठी धन्यवाद!! Smile
लिओनार्दोचे टोम्ब फ्रान्समध्ये आहे. खालील विकी-दुव्यावर टिचकी मारा! Smile
http://en.wikipedia.org/wiki/Ch%C3%A2teau_d'Amboise

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

किंबहुना सर्वसुखी| आंतरजाली फेसबूकी||
संस्थळी कीपॅड ठोकी| अखंडित||

कविता आवडली. शेलीच्या "ओझायमिंडियस" ची आठवण करून देणारी आहे अंमळ.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

किंबहुना कशाला अखंड सर्वसुखी म्हणा .कविता झकास . 'रोमन हॉलडि' सिनेमाची आठवण करून दिलीत .

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

धमालच! आमच्या लिओनार्डोच्या गावी जायला जमले का नाही? (http://en.wikipedia.org/wiki/Vinci,_Italy) आमच्या अल्बर्टला रिलेटिव्हीटीची कल्पना इथेच सुचली बरं का!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-Nile

आपली कविता आवडली. आपली प्रतिभा भलतीच प्रखर आहे. पन एक गोश्ट आप्ल्या निदरेशनास आनु इच्चितो ति अशि की रोम आनि आस्पास जे भु चुम्बकिय क्शेत्र आहे त्यामुळे तुम्हाला हि कल्पना सुचली असावी. नाहि तर इतके छान काव्य वैदिकान्स सुचने शक्य नाहि. बाकि माहिति माज्या "माझे बडवतो मिच ढोल्ताशे" या ब्लोग वर शास्त्रिय रित्या स्पश्ट केलेलि आढळेल. तरिहि हेमन्तजी आपणास शुभेच्छा! अशेच काव्य करित रहा.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

नावरे आवरीता!