नैतिकतेचा ब्रह्मघोटाळा

नैतिक पेचप्रसंग उभे करणारे काही प्रसंग जालावर डॉ खरे ह्यांच्या मिसळपावावरील लिखाणात वाचले. पदवीदरम्यान असलेल्या principles of ethics and cyber laws ह्या विषयाची मग आठवण झाली. त्यात चित्रविचित्र किस्से, निर्णयक्षमतेची कसोटी पाहणारे प्रश्न असत. त्यातली आमची उत्तरे व्यक्तिसापेक्ष बदलत. आम्ही उत्तरे काहीही दिली तरी चालत; पण योग्य ते जस्टिफिकेशन आम्हाला देता येते आहे की नाही; हे पाहिले जात.(वाद विवाद स्पर्धेप्रमाणे; कुठलीही बाजू मांडा; बक्षीस मिळू शकेल; पण तुमचा त्यातला अभ्यास दिसायला हवा.)
.
त्यासंदर्भात टेक्स्टबुक बाह्य वाचन करताना पडलेला प्रश्न. "ग्रामर्थं कुटुंबम् त्यजेत् | राष्ट्रार्थम् ग्रामम् त्यजेत ||" असे म्हणे चाणक्य म्हणून गेलाय. हे इतकं सोपं आहे का? कुटुंब आणि गाव हे दुसर्‍याचं असेल तर निर्णय घेणं तेवढं त्रासदायक नाही वाटणार हो. पण तुमच्याच गावातील एक कुटुंब गावाच्या भल्यासाठी बळी दिलं जातय तेव्हा तुम्ही समर्थन देणार का? "हो" म्हणत असाल तर लागलिच दुसरा प्रश्न :- ठीक. देउया त्यांचा बळी. पुढचा बळी तुमच्या कुटुंबाचा. आता चालेल? (झक मारुन ह्यालाही " हो " म्हणायची वेळ येते.) समजा "नाही" म्हणालात तर "सर्वांनीच असे केले तर आख्खे गाव बुडेल. सारेच नष्ट होइल" असा धाक घातला जातो.
मग? मग काय करावे?
आपल्या पूर्वजांनी ह्यामुळेच स्वखुशीने बळी जाणार्‍यांचा हुतात्मा/शहीद म्हणून गौरवीकरण केलय ते ह्यामुळेच का काय? कुणी स्वतःहून इतरांच्या भल्यासाठी बळी जात असेल तर कोण कशाला नाही म्हणेल.
पण मूळ प्रश्न राहतोच "बळी कुणी जायचं?" ???
.
सामान्य किंवा संसारी म्हणवल्या जाणर्‍यांनी ह्याच्यावर सोप्पं उत्तर शोधलय "शिवाजी/भगतसिंग शेजार्‍याच्या घरात व्हावा" आम्ही त्याचे स्तवन करु.स्तुतीगायन करु. चिंताच नाही.
.
डॉक्टर असताना येणारी नैतिक -कायदेशीर विचारांच्या झगड्याचं त्रांगडं खर्‍यांनी मांडलय. तसच हे त्रांगडं अधिक ठळक रूप घेउन येतं ते सैनिकी व्यवसायात. "ऑर्डर" हा तिथे अंतिम शब्द मानला जातो. त्यावेळी तुमच्या विवेकानं उलट कौल दिला तर काय करायचं? समजा एका झोपडीच्या आश्रयाने काही अतिरेकी लपले आहेत.त्यांना वेळिच आवरले नाही तर मोठी गोची अगदि राष्ट्रिय पातळीवर होणार आहे; त्यांना मारणे अत्यंत अगत्याचे आहे. तुम्ही सामान्य सैनिक आहात. आणि तुम्हाला तुमचा वरिष्ठ सरळ "फायर" अशी आज्ञा देतो. आता सरळ गोळ्यांच्या फैरी झडणं अपेक्षित आहे; पण इतक्यात तुम्हाला लक्षात येतं की झोपडित अतिरेक्यांशिवाय काही निरपराध बंधकही आहेत. झोपडिजवळून जाणारे काही जनसामान्यही आहेत; ज्यांना अजून ह्या प्रकरणाचा पत्ताच नाही. चालवाल बेछूट गोळी? आज्ञा पाळाल? की छोट्या कच्च्याबच्च्यांना पाहून पाघळून जाल? पाघळलात तर गैरवर्तनाचा ठपक येउ शकतो. आणि देशद्रोहाचाही ठपका येण्याची शक्यता आहे. "देशद्रोहाचा आरोप स्वीकाराल की निरपराधावर गोळ्या चालवण्याची हिंमत दाखवाल?"
पुन्हा वास्तवातल्या अडचणी वेगळयच.(पुरावे, स्वतःच्याच सहकार्‍यांचा रोष स्वीकारून त्याच दुनियेत राहणे हे कर्मकठीण. साइडलाइन होण्याची भीती.)
.
टिपिकल बंधक /होस्टेज ठेवल्या जाणार्‍या सीनमध्येही ही अशीच समस्या आडवी येते. पाच पन्नास जणांना बंधक केले गेलेले असते. त्याबदल्यात काही गुन्हेगारांच्या मुक्ततेची मागणी होते. हे गुन्हेगार शेकडो लोकांच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेले असू शकतात; किंवा सुटल्यावर तर नक्कीच ठरणार अशी खात्री असते.
आता? आता म्हणाल सोडा गुन्हेगारांना म्हणून? त्यांना सोडलं तर ते नंतर जे मुडदे पाडणार आहेत त्याचे जिम्मेदार कोण? एक उदाहरण :- १९९९ला भारतीय विमानचे अपहरण केल्यामुळे मौलाना मसूद अझहर ह्याला सोडावे लागले. त्याने नंतर जैश ए मोहम्मद आणि लश्कर ए तोयबा ह्या संघटनांना सुसूत्र करून भारतात आख्खे दशकभर बॉम्बस्फोटांचे, हिंसेचे सत्र सुरु केले. त्याला सोडले हे बरोबर केले का? त्याने नंतर ज्यांचा जीव घेतला; त्यांच्या मृत्यूला जबाबदार कोण? त्याला जिवंत सोडणारी व्यवस्था नाही का जबाबदार? समजा हे लोक मरतील म्हणून त्या मसूद अझरला सोडायचे नाही म्हणता मग? ठीक. पण त्याला सोडलं नाही तर विमानातले शंभरेक प्रवासी मरणार हे निश्चित. घ्याल त्यांच्या मृत्यूचं ओझं आपल्या भाळी?
.
होतं काय , की तात्विक चर्चा करायला सोपं पडतही असेल "तमक्यांनी त्याग करावा " वगैरे म्हणायला जमतही असेल . पण जेव्हा एखाद्याचा त्या त्याग कराव्या लागणार्‍या मंडळित समावेश केला की लागलिच त्याची मतंही बदलताना दिसतात्.सार्‍यांचीच नाहीत बदलत; पण मग मतं बदलणारी मंडळीही असतात. "त्याग आवश्यक आहे. तो इतरांनी माझ्यासाठी करणं त्याहून आवश्यक आहे. मला करावा न लागणं हे तर अत्यावश्यक आहे." अशी ती भूमिका.
.
असो. हा असा एक तिढा झाला. बंधक्-समस्या हा निव्वळ एक भाग आहे. अशा नैतिक - अनैतिकच्या निर्णयांना आव्हान देणारे कित्येक प्रसंग असू शकतात.
लष्करात असलात तरच हे धर्मसंकट येइल असं नाही. अगदि सामान्य माणसालाही अशा प्रसंगाला तोंड द्यावं लागू शकतं. "किती महिन्यांचा गर्भ झाला म्हणजे त्याच्या हत्येस सदोष मनुष्यवध(खून, हत्या) म्हणता येइल; किती महिन्यापर्यंत तो निव्वळ साधासाच गर्भपात ठरेल?" हा जगभर देशोदेशी वेगवेगळे नियम असलेला प्रश्नांचा प्रांत. "नक्की कोणत्या कारणासाठी गर्भाला मारणं क्षम्य आहे?" हा त्याच्याच जवळ जाणारा अजून एक प्रश्न. "मातेच्या जीवाल धोका असेल तर गर्भाला मारले तर चालेल" असे सर्वसाधारण उत्तर ऐकू येते. पण "मातेच्या जीवास धोका नाही, पण मातेला मूल नकोसे आहे, आणि चांगले वाढलेले आहे पोटात" अशा केसमध्ये काय करणार?
.
किंवा कुणी केलेल्या कृत्याबद्दल माफी मागत असेल तर? माफ करावे का? कुणी करावे? कुणाच्या वतीने करावे? नुसतेच माफ करावे की इस्लामिक देशांमध्ये करतात तसे काही "मोबदला"(ब्लड मनी) वा तत्सम प्रकार घेउन करावे? त्यास माफी म्हणावे की देवाणघेवाण? पण मग ती सरळसरळ "अमुक पैसे मोजा अन वाटेल त्याचा खून करा" किंवा "पुरेसे पैसे मोजा आणी वाटेल तो गुन्हा करा" असा प्रकार बनल्याचा कुणी आरोप केला तर? तो आरोप चुकीचा म्हणता येइल का?
मुळात "माफी" ही तुम्ही "चुकी"साठी करणार की "गुन्ह्या"साठी?
कोणत्या गुन्ह्याला कोणती/किती शिक्षा योग्य?
शिक्षेचे उद्दिष्ट गुन्हेगारास सुधरवणे, गुन्हेगारास समजापासून दूर ठेवणे, गुन्हेगारावर सूड घेणे ह्यापैकी नक्की काय असावे? की ह्यापेक्षाही काही वेगळे असावे?(ह्यावर जालावर गविंनी एक धागाही काढला होता.)
.
फाशी असावी की नसावी? असलीच तर ती rarest of rare केसमध्येच का असावी? गुनेह घडण्याच्या वारंवारितेचा संबंध शिक्षेशी लावावा की गुन्ह्याच्या तीव्रतेचा लावावा.(दिल्लीमध्ये ज्याप्रकारे हिडिस गुन्हा डिसेम्बर २०१२ मध्ये घडला तसे गुन्हा पुन्हा पुन्हा होउ लागले तर ते rarest of rare राहतील का? राहिले नाहित तर त्यास फाशी देउ नये का काय??) सज्ञान व्हायला एखाद दोन दिवसच बाकी असताना कुणी अतिभयानक(दिल्लीस्टाइल) गुन्हा केला तर निव्वळ "अठरा वर्षाला दोन दिवस कमी आहेत" असे म्हणून चक्क सोडून द्यावे का काय? तुमच्या आप्तांबाबतही असे गुन्हे घडले तर तुमची हीच भूमिका राहणार का?
.
ह्यासर्वांवर उपाय म्हणून एक मस्त ओळ ऐकली होती. golden rule for ethics ह्या नावाची. "जे तुम्ही स्वत्ळ्साठी निवडू इच्छित नाही, ते तुम्ही इतरांवर लादू नका." ह्या अर्थाची. "इतरांनी तुम्हाला जसे वगवावे असे अपेक्षित असेल, तसे तुम्ही इतरांना वागवा" असे तेव्हा म्हटले गेले. अब्राहम लिंकनचे ह्यात संदर्भात प्रसिद्ध वाक्य ऐकले आहे "मला स्वतःला कुणाचाही गुलाम होणे आवडणार नाही. म्हणून मीसुद्धा इतर कुणाला गुलाम करणार नाही."
.
वॉव. म्हणजे माझ्या गोंधळाचे शेवटी निराकरण झाले तर. मी सुटकेचा निश्वास टाकला. पन एवढ्यात कानावर प्रश्न आदळला " समजा हिंबोपा नावाच्या देवाला मी स्वत: बळी जाउन माझे भले होइल असे मानतो. तो मार्ग मी स्वतःसाठी निवडतो. माग मी इतरांनाही त्याची जबरदस्ती करु का? मरणोत्तर त्यांना स्वर्ग मिळावा म्हणून त्यांच्या भल्यासाठी त्यांना मी मारुन टाकू का " असे एखादा "झबोका" ह्या काल्पनिक धर्मातील धर्मवेडा म्हणाला तर? इथे तर तो स्वतःला जे चालेल तेच इतरांना लागू करतोय आता?
आता बसली का पुन्हा वाचा मनोबा? बोला ना. गप्प का?
.
हरकत नाही. ह्यावरही उत्तर मिळाले. "कुणीच कुणाला कसलीच जबरदस्ती करु नये. व्यक्तिस्वातंत्र्य हे सर्वोच्च मूल्य." हुर्रे. मनोबा आनंदले. शेवटी त्यांना उत्तर मिळाले. पण छट्.पुन्हा गोची झालिच. कारण हे मूल्य मनले तर "राजीखुशीने जे काही होते ते सर्व मान्य करावे" असा अर्थ होतो. वरवर हा फार सोपा वाटतो.
पण समजा वर उल्लेख केलेल्या "झबोका " धर्माच्या धर्मगुरुनी समजा एखाद्या धर्मानुयायाला "स्वतःचा हात कापून हिंबोपा नावाच्या देवाला अर्पण केल्यास देव कसा खुश होणार आहे" हे पटवून दिले आणि तो शहाणा "राजीखुशीने" आत्मघात करुन घ्यायला निघाला तर ? तर मानणार का "व्यक्तीस्वातंत्र्य " हे मूल्य सर्वोच्च?
गप्प का मनोबा? बोला. बोला काहीतरी.
गोंधळून चालणार नाही.
.
सर्वच कायदेशीर गोष्टी नैतिक असतीलच असे नाही. सर्वच नैतिक गोष्टी कायदेशीर असतील असेही नाही.
कधी काय करावे हा जो तो कधी कळत, कधी स्वतःच्याही नकळत ठरवून टाकत असतो.
कित्येकदा कायदेशीर वागण्याच्या नादात नैतिकता सोडल्याबद्दल टोचणी लागते.
तर कधी नैतिकता पाळण्याच्या नादात व्यवहारात तुफान नुकसान होते; कायदेशीर अडचणीही येउ शकतात. तेव्हा अडचणींनी माणूस फार वैतागतो. कित्येकदा नैतिकता पाळल्याबद्दल स्वतःवर चरफडतोसुद्धा.
.
ह्यातल्या बहुतांश प्रश्नांवर बहुतांश पब्लिक सोप्पा अल्गोरिदम वापरते "दृष्टीआड सृष्टी". फार विचार करायचा नाही. आपल्या पुढ्यात पडेल तेवढच पहायचं नि चालू लागायचं. व्यवहारात तेच आचरायला सोपं आहे; हे ही खरच.
उर्वरित प्रतिसादातून लिहीत जाइन. सध्या घाइत आहे.

--मनोबा

*
खर्‍यांच्या लिखाणाचा दुवा:-
http://www.misalpav.com/user/21410/authored

Taxonomy upgrade extras: 
field_vote: 
4.4
Your rating: None Average: 4.4 (5 votes)

>>डॉ खरे ह्यांच्या मिसळपावावरील लिखाणात वाचले. <<<

याचा दुवा देता आला तर पहावा. त्यामुळे तुमच्या लिखाणाचा नेमका संदर्भ ध्यानात येऊन त्यावर प्रतिक्रिया देता येईल.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

नो आयडियाज् बट इन थिंग्ज.

गोंधळ म्हणा गलबला म्हणा छान टिपलाय!

ह्यातल्या बहुतांश प्रश्नांवर बहुतांश पब्लिक सोप्पा अल्गोरिदम वापरते "दृष्टीआड सृष्टी". फार विचार करायचा नाही. आपल्या पुढ्यात पडेल तेवढच पहायचं नि चालू लागायचं. व्यवहारात तेच आचरायला सोपं आहे; हे ही खरच.

हे योग्यच! Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

+१

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

"सर्वच कायदेशीर गोष्टी नैतिक असतीलच असे नाही. सर्वच नैतिक गोष्टी कायदेशीर असतील असेही नाही.
कधी काय करावे हा जो तो कधी कळत, कधी स्वतःच्याही नकळत ठरवून टाकत असतो.
कित्येकदा कायदेशीर वागण्याच्या नादात नैतिकता सोडल्याबद्दल टोचणी लागते.
तर कधी नैतिकता पाळण्याच्या नादात व्यवहारात तुफान नुकसान होते; कायदेशीर अडचणीही येउ शकतात. तेव्हा अडचणींनी माणूस फार वैतागतो. कित्येकदा नैतिकता पाळल्याबद्दल स्वतःवर चरफडतोसुद्धा. "

व्यक्तिस्वातंत्र्य, नैतिकता, आणि कायदा सापेक्ष आहे ... एखाद्याचे व्यक्तिस्वातंत्र्य दुसर्‍यासाठी बेकायदेशीर अथवा अनैतिक ठरु शकते .. बर्‍याच वेळेस हा सारा गोंधळ सापेक्षता विसरल्यामुळे झालेला असु शकतो. अशाच वेळेस मग कधी कायदेशीर वागण्याच्या नादात नैतिकता सोडल्याबद्दल टोचणी लागते तर कधी नैतिकता पाळण्याच्या नादात व्यवहारात नुकसान होते. एकदा कायदेशीर वागायचे ठरवल्यावर नैतिकतेचा विचार करणे अथवा नैतिकता पाळण्याची ठरवल्यावर व्यवहार पहाणे अप्रस्तुत ठरु शकते ... तात्पर्य मनोबा तुमचे ऐकुन चालायचे ठरवले तरच या सगळ्यातुन निभाव लागेल असे दिस्ते ... तेव्हा आता काहीकाळ तरी ऐकावे आणि करावेही मनाचेच ...

बाकी लिखाण सुन्दर आहे ...
डॉ खरे ह्यांचे मिसळपावावरील लिखाण वाचतो आणि सविस्तर प्रतिक्रिया देतो ...

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

बाबा बर्वे
" समर्थाचिया सेवका वक्र पाहे
असा सर्व भूमंडळी कोण आहे ? "

आपल्या पूर्वजांनी ह्यामुळेच स्वखुशीने बळी जाणार्‍यांचा हुतात्मा/शहीद म्हणून गौरवीकरण केलय ते ह्यामुळेच का काय? कुणी स्वतःहून इतरांच्या भल्यासाठी बळी जात असेल तर कोण कशाला नाही म्हणेल.

या तर्कात मला फार अर्थ दिसत नाही. पूर्वजांनी हे असं ज्या परिस्थितीत केलं ती उरली नाही. पूर्वजांच्या काळात मनोबाला काहीही वाटलं तरी बोलण्याची संधी नव्हती, संधी मिळाली तरी श्रोते मिळतील याची खात्री नव्हती. आज मनोबाला संधी आहे, त्याच्या बोलण्याकडे लक्ष देऊन त्यावर चर्चा करणारे अ‍ॅक्टीव्ह श्रोतेही आहेत. चाणक्याची मूल्य त्याच्या काळात ठीक; त्याने मोठी गोष्ट केली म्हणून तो म्हणतो ती प्रत्येकच गोष्ट आजच्या काळात मान्य करायला पाहिजे असं काही नाही. त्या काळात ही कळप-मनोवृत्ती फायद्याची ठरली होती. आता टाकून द्यायला हरकत नाही.

स्टार-ट्रेक आणि तत्सम साय-फायमधे 'बोर्ग' ही जमात दाखवतात. त्यात सजीवांना याच कळप-मनोवृत्तीत सक्तीने जायला भाग पडून संपूर्ण कळपाच्या उद्धारासाठी बळी द्यायलाही मागेपुढे पहात नाहीत. एकदा कळपात येताना स्वातंत्र्य जातं म्हणून त्रास होईल, पण पुढे सगळी सुखं असतात असा त्यांचा प्रचारही असतो. प्रत्यक्षात धर्म, धर्मगुरू हे असेच 'बोर्ग' आणि 'बोर्ग-क्वीन' असतात. मेंढरं हाकणं आणि वेगळा रस्ता पकडू पहाणार्‍याचा छळ इतर मेंढरांकरवी करणं ही नेहेमीची मोडस ऑपरंडी. ही मेंढरं हाकणार्‍यांना नमवणारे ते हीरो; प्रत्यक्षातही आणि सायफायमधेही.

तर मानणार का "व्यक्तीस्वातंत्र्य " हे मूल्य सर्वोच्च?

यासाठी thought experiment करण्याची आवश्यकता नाही.
फ्रान्समधे सध्या अशी प्रत्यक्ष परिस्थिती आहे. स्वातंत्र्य, समता, बंधुता या मूल्यांवर प्रचंड विश्वास असणार्‍या फ्रेंचांनी अतिशय कष्टाने ही मूल्य मिळवली, जोपासली आहेत. त्याचाच एक भाग म्हणून धार्मिक श्रद्धांचं प्रदर्शन चारचौघात करण्यास मनाई आहे. (उदा: डोकं झाकणे, गळ्यात क्रूस लटकवणे, इ.) एकेकाळी फ्रान्समधे बहुसंख्य कॅथलिक आणि ५-७ टक्के प्रोटेस्टंट होते. आता मात्र आफ्रीकेतल्या माजी फ्रेंच वसाहतींमधून आलेले मुस्लिमही आहेत. या स्त्रियांना धर्मपालन करण्यासाठी, आपण होऊनच डोकं झाकायचं असतं. आता अडचण आली ना! सरकारी कर्मचारी स्त्रियांनी हिजाब, नकाब, चादोर वापरू नये अशा नियमामुळे स्त्रियांचं स्वातंत्र्य जपलं जातं; पण धर्मपालनाचं काय? अशा प्रकारच्या बातम्या परवाच्याच पेपरमधे पाहिल्या. दुवा (हफिंग्टन पोस्टमधेही अशा प्रकारची बातमी आहे, दुवा चटकन सापडला नाही.)

'स्कर्ट डे' नावाचा फ्रेंच चित्रपटही परवाच पाहिला, त्यात याच संदर्भात उहापोह आहे. जरूर पहा. (याबद्दल 'सध्या काय पाह्यलंत' मधे लिहायला पाहिजे.)

या गोष्टींना क्विक फिक्स नाही. 'स्कर्ट डे'मधली शिक्षिका बंदुकीच्या जोरावर उनाड मुलांना फ्रेंच मूल्य शिकवते किंवा फ्रान्समधे सरकार बहुमताच्या जोरावर ही मूल्य लादत आहे हे अशा परिस्थितीत क्विक फिक्स ठरतं. वर उल्लेख केलेल्या मेंढपाळांच्या मागे मेंढरं आपण होऊन जात असतील तर त्यांना शिक्षण देणं योग्य. स्वातंत्र्याची चव चाखण्याची जबाबदारी पेलण्याची ताकद एकदा मिळाली की कोणीच मेंढरू बनायला तयार होत नाही. हे व्हायला वेळ लागणार; तोपर्यंत स्त्रियांनी डोकं झाकायला हरकत नाही अशी स्वातंत्र्याचा संकोच करणारी भूमिका घेणं योग्य ठरतं. सर्वनाशापेक्षा थोडीशी किंमत नेहेमीच परवडते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

>>हे व्हायला वेळ लागणार; तोपर्यंत स्त्रियांनी डोकं झाकायला हरकत नाही अशी स्वातंत्र्याचा संकोच करणारी भूमिका घेणं योग्य ठरतं.

हे वाचून "कन्सिस्टन्सीची ऐशीतैशी" असा भास झाला.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

फ्रेंच उदारमतवाद्यांचीही हीच अडचण आहे म्हणे! म्हणून मग ते सूडो-सेक्यूलर ठरतात.

तुम्ही हिजाब, चादोर, नकाब वापरता म्हणजे तुम्ही पुरेसे फ्रेंच नाही (कारण त्यात लिंग-समानता नाही), असं उजवे लोक म्हणतात. चादोर, हिजाब, वापरणे हा धर्मपालनाचा त्यांनी स्वेच्छेने घेतलेला निर्णय आहे, असं उदारमतवादी म्हणतात. (आपल्याकडे "वंदे मातरम" म्हणण्याची मुस्लिम लोकांवर होणार्‍या सक्तीची इथे काही प्रमाणात तुलना होऊ शकेल.) फ्रेंचांना फार प्रिय असणार्‍या दोन मूल्यांमधला हा वाद आहे. त्यामुळे बलात्कार करणारे आणि बलात्कार-पीडीत व्यक्ती ही तुलना इथे संपूर्णतः गैरलागू आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

फ्रान्समध्ये व्यक्तिस्वातंत्र्याची जबरदस्ती करण्यात येते आहे!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

चेतन सुभाष गुगळे
भ्रमणध्वनी - ०९५५२०७७६१५
Electronic Mail Address :- chetangugale@gmail.com

प्बलिक म्हणते फार विचार कराल तर टिपिकल अतिविचार करुन घेण्याच्या दुर्गुणापायी स्वतःचाअ सर्वनाश केलेल्या हॅम्लेटसारखं अडचणीत याल.
to be or not to be हे फार करता येत नाही.झ्टकन काय ते करुन मोकळं व्हा.
आपल्या गोंधळलेल्या अर्जुनास सांभाळायला साक्षात गीतेचा कर्ता होता; तुम्हाला तसा कुणी मिळेलच ह्याची शाश्वती नाही.
पण मग स्वतःचा गोंधळलेला confused हॅम्लेट होणे टाळण्यासाठी सारासार विचार बाजूला सोडून वेळप्रसंगी धडाधड कृती करावी का?
तशी ती केली तर नंतर ऑथेल्लो सारखी जबरदस्त पश्चात्तापाची वेळ येणार नाही का? अविवेकी कृत्याचा परिणाम जन्मभर भोगावा लागेल की.
भारवि त्याबद्दल बोलतो ते हेचः-
(क्रियां सहसा न विदधीत, अविवेकः आपदां परम् पदम्, विमृश्यकारिणं हि गुणलुब्धाः सम्पदः स्वयम् एव वृणुते ।)

अभिवर्षति योनुपालयन्विधिबीजानि विवेकवारिणा ।
स सदा फलशालिनीं क्रियां शरदं लोक इव अधितिष्ठति ॥31॥
नक्की अर्थ दोन्हीचा ठाउक नाही, पण विचारपूर्वक कृती करावी असे त्याचे म्हणणे.
.
मूल्ये नक्की का हाएत? मूल्ये कशासाठी आहेत? ती आपल्यासठी आहेत की आपण त्यांच्यासाठी आहोत?
आपण त्यांच्यासाठी नसलो, तरी कशासाठी तरी असणारच ना. की केवळ एक पोकळ आशा घेउन राहायचं waiting for godot म्हणत?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

मूल्ये नक्की का हाएत? मूल्ये कशासाठी आहेत? ती आपल्यासठी आहेत की आपण त्यांच्यासाठी आहोत?
आपण त्यांच्यासाठी नसलो, तरी कशासाठी तरी असणारच ना. की केवळ एक पोकळ आशा घेउन राहायचं waiting for godot म्हणत?

अमुक एक काँप्लेक्सिटीचा प्याटर्न जीवनात सर्व ठिकाणी असलाच पाहिजे हा अट्टाहास का? इथे पोकळ आशा कसली? व्हाय द फस अबौट इट, व्हॉटेव्हर इट मे बी?

मनोबाचा इथे एकतर बेंबट्या तरी नैतर गटणे तरी झाल्यागत वाटतंय. योग्य पर्यायासाठी ४२० ला एसेमेस करा. शष्प बक्षीस मिळणार नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

अमुक एक काँप्लेक्सिटीचा प्याटर्न जीवनात सर्व ठिकाणी असलाच पाहिजे हा अट्टाहास का? इथे पोकळ आशा कसली? व्हाय द फस अबौट इट, व्हॉटेव्हर इट मे बी?

पॅटर्न्?समजले नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

आपल्यासाठी मूल्ये आहेत की आपण मूल्यांसाठी आहोत या प्रश्नाच्या स्पष्ट उत्तराची अपेक्षा करणे, शिवाय मानवी अस्तित्वाला काहीतरी प्रयोजन असलेच पाहिजे अशी अपेक्षा करणे म्हंजे जीवनात कार्यकारणभाव हा सर्व ठिकाणी असतोच असे मानणे होय. त्या कार्यकारणभावाच्या प्याटर्नला उद्देशून मी म्हणत होतो. तो इथे अस्तित्वात का असावा? जे अन्य प्रतलांवर पाहतो तेच इथेही दिसावे हा आग्रह अस्थानी वाटतो असे माझे म्हण्णे आहे. प्याटर्न का असावा आणि का असू नये या दोन्ही प्रश्नांना उत्तर नाही.

मूल्ये आणि मानवी जीवनाचा परस्परसंबंध म्हंजे बायडिरेक्शनल डिपेंडन्सी असते आणि डिपेंडन्सीची दिशा ही प्रसंगोपात ठरते इतके मला कळते.

मानवी जीवनाचे प्रयोजन काय? त्याहीपेक्षा पुढे जाऊन मानवी जीवनाला काहीएक प्रयोजन (मग ते काहीही असो) असले पाहिजे, हे गृहीतक आहे. व्यक्तिपरत्वे या प्रयोजनाची रिकामी जागा वेगवेगळ्या शब्दांनी/वाक्यांनी भरली जाते. पण एकच जनरलाईझ्ड प्रयोजन आहे का? असले तर कुणाच्या चष्म्यातून मानवी जीवनाकडे पाहिल्यावरचे प्रयोजन अपेक्षित आहे? माझ्या चष्म्यातून माझ्या जीवनाचे प्रयोजन पाहिले असता नोकरी-छोकरी-पैसा-कीर्ती असे दिसेल, कुणाला अजून काही दिसेल. पण मानवी जीवनात आपण भाग घेत असतो. ते जीवन जगत असल्यामुळे त्याबद्दल आपण पूर्ण तटस्थ कधी राहू शकत नाही, आपला सहभागही त्याला काही अंशी बदलतो (ज्याप्रमाणे खोक्यात लपलेल्या श्रॉडिंगरच्या मांजराला फक्त खोके उघडून पाहिल्यानेही ते मरते).

त्यामुळे मानवी जीवनाबद्दलचे मानवाचे मत हे स्थलकालाच्या मर्यादा ओलांडून गेले तरी ते मानवी जीवन फक्त बघणार्‍या आणि त्यात सहभागी न होणार्‍या पॅसिव्ह निरीक्षकाने केलेल्या नोंदीइतके तटस्थ असेल की नाही याची शंकाच आहे. अर्थात कैक वेळेस तितका तटस्थपणा असलेले लिखाणही वाचावयास मिळते म्हणा. त्यावरून तो कुणी पॅसिव्ह निरीक्षक काही अंदाज बांधत असेल तर ते कसे असतील याचा थोडासा अदमास आपण घेऊ शकतो.

पण तिथेही तीच रड आहे. तेवढ्या जण्रल लेव्हलवर गेले की प्रयोजनासारखे शब्दच रद्दबातल होतात असे वाटल्याखेरीज राहत नाही. असो.

(हा पूर्ण प्रतिसाद नशापाणी न करता लिहिलाय याची नोंद घेण्यात यावी. धन्यवाद.)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

सर्व वाचकांना धन्यवाद.
@मुक्तसुनीत :- दुवा लेखाच्या शेवटी आता जोडला आहे.
@ बबा बर्वे :- डॉ खरे ह्यांचं लिखाण वाचलत का? आता काय प्रतिक्रिया आहे?
@अदिती :- यप्स. बुरख्याबदलची अशा भूमिकेला कधी कधी थट्टेनं "स्वातंत्र्याची जबरदस्ती" असं म्हटलं जातं. Smile
@चेतन सुभाष गुगुळे :- दुवा हापिसातून उघडू शकत नाही.
@बॅटमन :- तुझा शेवटचा प्रतिसाद अजून एक दोनदा वाचल्यावरच काही टिप्पणी करता येइल; तोवर नाही.
अस्मिता,ऋषिकेश्,थत्ते व इतर सर्व वाचनमात्रांनाही धन्यवाद.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

मनोबा,
डॉ खरे ह्यांचं लिखाण वाचल .. पण त्यात कोठेच नैतिकतेचा घोटळा वाटला नाही. मी आधीच्या प्रतिक्रियेत म्हटल्याप्रमाणे नैतिकता आणि कायदा सापेक्ष आहे आणि तसाच असायला हवा. डॉ खरे ह्यांचे निर्णय हे त्या त्या परिस्थितीला अनुसरुन घेतलेले वाटले.

तुम्ही केलेल्या एखाद्या चुकीबद्द्ल तलवार घेउन तुम्हाला शोधत आलेल्या माणसासमोर जाण एकवेळ नैतिक असल तरी शहाणपणाच नक्किच असणार नाही. कायदा, नैतिकता अथवा अजुन कोणतही मुल्य हे सर्वोच्च आहे अस ठामपणे म्हणता येणार नाही. सारासार विचार करुनच हा निर्णय करावा लागेल. असा विचार करायचा मौका ए़खाद्या डॉक्टर, जज्ज, पोलिस अशा पदावरिल व्यक्तिना जास्त वेळा मिळेल. शेवटी समर्थानी विवेके क्रिया आपली पालटावी .. अती आदरे शुद्ध क्रिया धरावी ... जनी बोलण्यासारिखे चाल बापा असे म्हटलेच आहे ...

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

बाबा बर्वे
" समर्थाचिया सेवका वक्र पाहे
असा सर्व भूमंडळी कोण आहे ? "

खरे ह्यांनी काय काय केलं ते त्यांनी स्वच्छ सांगितलंय. त्यात आता पहिल्या नजरेत काही चूक वाटनारही नाही.
पण एक दोन वेळेस त्यांनी नियमाबाहेर काही काम केलय; अर्थातच माणुसकिच्या दृष्टीने.
पण ह्या सगळयत गडव्बड अशी होते की कुणी जर अशा सज्जन स्वभावाच्या व्यक्तीचा गैरफायदा घेतला तर?
नियम तोडून हे काम करताहेत ठीक आहे, पण समोरच्याला खरच त्याची गरज आहे, हे तत्क्षणी तिथे व्हेरिफाय करायची काहीही सोय नाही.
जर तुम्ही त्याची मदत केलित, आणि नंतर त्यानं गैरफायदा घेतल्याचं समजलं तर अत्यंत अपराधी भाव स्वतःच्या मनात येइल.
त्याहीपेक्षा महत्वाचं हे की एखादं IPC कलम सुद्धा नावावर लागण्याचा धोका आहे.
समजा तुम्ही तसं केलं नाही(नियमावर बोट ठेवलत, मदत केली नाहित) आणि नंतर व्यक्ती दगावली तर " आपण त्या व्यक्तीला वाचवू शकलो असतो" ही टोचणी लागून राहू शकते.
अशा केसेस मध्ये मला हा ब्रम्हघोटाळा वाटतो.
.
तुम्ही प्रतिसाद दिलात तेव्हा कार्यबाहुल्यामूळे मी उपप्रतिसाद देउ शकलो नाही. आणि मग ते काम मागे पडत गेले. आता जुने धागे चाळताना हा प्रतिसाद दिसला.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

सुवर्णनियम आणि व्यक्तिस्वातंत्र्य मानल्यानंतर मनोबांनी उपस्थित केलेली अडचण मला तितकीशी समजली नाही :

> "झबोका " धर्माच्या धर्मगुरुनी समजा एखाद्या धर्मानुयायाला "स्वतःचा हात कापून
> हिंबोपा नावाच्या देवाला अर्पण केल्यास देव कसा खुश होणार आहे" हे पटवून दिले
> आणि तो शहाणा "राजीखुशीने" आत्मघात करुन घ्यायला निघाला तर ?
येथे असे भासते की मनोबांच्या मते स्वयंस्पष्ट असे की "हा अत्मघात बळजबरीने रोखला पाहिजे".
अशी स्वयंस्पष्टता मला जाणवत नाही.

असे काही मार्ग दिसतो (माझी कल्पनाशक्ती) :
आत्मघात करणार्‍याने सबुरीने मनोबांचे ऐकून घेतले, तर त्या झबोका धर्मगुरूच्या विरोधात मनोबा त्याला पटवू शकतील. मात्र आत्मघात आताच सफल झाला तर पटवण्याकरिता मनोबांना अवसरच मिळणार नाही. हा अवसर मिळेपर्यंत आत्मघात थांबवावा इतपत जबरदस्ती मनोबा करू बघत आहेत. परंतु हेसुद्धा चालणार नाही, कारण मनोबांच्या मागे समजूत पटवणार्‍यांची ओळ उभी राहिली, आणि प्रत्येक जण "माझे ऐकेपर्यंत आत्मघात नको" अशी जबरदस्ती करू लागला, तर मर्यादा राहाणार नाही.
आणखी एक शक्यता आहे - आत्मघात करणार्‍याने मनोबांकडून कर्ज घेतले असेल, तर ते फेडेपर्यंत आत्मघात करण्यापासून मनोबा त्याला रोखू शकतात. समाजात राहाणार्‍या व्यक्तीचे समाजाला काही देणे आहे असे मानून आत्मघात बळजबरीने रोखता येईल - मला वाटते की पूर्वीच्या आत्मघातविरोधी तत्त्वाचा हाच नैतिक आधार होता.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

"जीव देणार्याला बळजबरीने रोखू नये" असे आपले म्हणणे आहे का?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

होय

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आत्महत्या हा दंडनीय अपराध का मानला जातो.
बलपूर्वक त्यापासून परावृत्त करण्याचे प्रयत्न का होतात? किंवा जीव देउ नये म्हणून समुपदेश का होते.
असे प्रयत्न आणि कायदे अनैतिक आहेत काय?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

आत्महत्या हा कायदेशीर गुन्हा आहे, त्यामुळे त्याला अपराध मानण्याकडे कल असतो.

शेवटी जसे खून, फाशी किंवा दयामरण हे दुसर्‍याचे जीव घेणेच झाले पण बघण्याचा दृष्टीकोन कायद्याच्या अनुशंगाने बदलतो (किंवा समाजमनाचे प्रतिबिंब कायद्यात पडते) तसेच आत्महत्या, हाराकिरी, समाधी, प्रायोपवेशन यात तत्वतः स्वतःचा जीव घेणेच असले तरी कायद्यात समाजमनाचे प्रतिबिंब (का उलट?) पडताना दिसते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

दयामरणात वेगळा दृष्टीकोनही येतो.
सहसा दयामरण हे "असाध्य" रोग असलेल्या आणि त्यातून बरे होण्याची शक्यता नसलेल्या रुग्णांच्याबाबत असते. "आज उपलब्ध असलेल्या" ज्ञान/तंत्रात हा रोग बरा करण्याची सोय नसते. पण असे ज्ञान/तंत्र भविष्यकाळात उपलब्ध होऊन ती व्यक्ती बरी होऊ शकते. ही शक्यता निकालात काढली जाऊ नये म्हणूनही दयामरण नको अशी विचारसरणी असेल. त्याच विचारसरणीने रुग्णास काही करून जिवंत ठेवावे असा वैद्यकीय क्षेत्रातला प्रघात असावा.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

दयामरण एक विशिष्ट केस झाली. धनंजय ह्यांच्या म्हणण्यात त्याचा खास, वेगळा, स्पेसिफिक उल्लेख नाही. खालील प्रतिसादात एखाद्याला आत्मघात करावयाचा असल्यास फारतर बोलून त्याचे मतपरिवर्तन करा (किंवा तेही करु नका); असे त्यांचे म्हणणे दिसते आहे.
(थोडक्यात ; जगण्याच्ची सक्ती कुणावर करु नका.)
मानवी जीवनाची पैशात किंमत काढणे हा एक मार्ग त्यांच्या प्रतिसादात दिसतो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

> मानवी जीवनाची पैशात किंमत काढणे हा एक मार्ग त्यांच्या प्रतिसादात दिसतो.
का बरे दिसतो? मानवी जीवनाची पैशात किंमत मी कुठे काढली आहे?

काहीतरी (चुकीचा पण सुसंदर्भ) गैरसमज असेल, तर "दुसर्‍याचे स्वातंत्र्य हिरावून जुलूम करायचा असेल, तर काही पैशाची किंमत काढली आहे" असा असू शकेल. तो गैरसमजही चुकीचाच आहे, म्हणा. "जर कोणाचे देणे असेल तर चुकवू नका" हे सामान्य तत्त्वच आहे. जुलुमाचीसुद्धा पैशात किंमत काढलेली नाही.

म्हणजे जर व्यक्ती परदेशी फरार होऊन जामीन बुडवत असेल, तर त्या व्यक्तीला फरार होण्यापासून आडवता येते. येथे मी "परदेशप्रवासाची किंमत काढली आहे" असा आरोप करता येईल काय? तर नाही. परदेशप्रवासाची किंमत विमानकंपनी किंवा जहाजकंपनी ठरवते. परदेशप्रवास किंवा आत्महत्या वगैरे फरारी होण्याच्या वेगवेगळ्या तर्‍हा "कर्ज बुडवू नका" तत्त्वासाठी आनुषंगिक आहेत. नि:संदर्भ नाहीत, पण मूलभूतही नाहीत.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

या कायद्यांबाबत किंवा समुपदेशाबाबत दोन शक्यता मी वर दिलेल्या आहेत (त्याच पुन्हा विशद करतो) :
(१) आत्महत्या करू बघणार्‍याचे समाजातील अन्य व्यक्तींना काही देणे/कर्ज बाकी आहे. उदाहरणार्थ आत्महत्येस सरसावणार्‍या व्यक्तीचे संगोपन समाजाने किंवा आईवडलांनी केलेले असते. आईवडलांना किंवा समाजाला ते कर्ज व्यक्तीकडून वसूल करायचे असेल. जीव दिल्यानंतर कर्ज बुडते. ती कर्जबुडवेगिरी रोखण्याचा प्रयत्न समाजाने करावा. प्रत्येक बाबतीत कर्जांचा लेखा करण्याऐवजी प्राचीन काळातल्या समाजाने "बहुतेक प्रसंगी कर्ज असते" असा आदमास केला असेल. मग "सर्व प्रसंगी आत्महत्या रोखाव्या" असा कायदा केला असू शकेल. परंतु (अ) मनुष्याचा सरासरी जीवनकाल वाढलेला आहे, बरेचदा बाळपणाच्या संगोपनाचे सामाजिक कर्ज भरलेले असू शकते (आ) आजकाल समाजात वकील/अकाउंटंट वगैरे पुष्कळ आहेत, त्यामुळे प्राचीन काळी जरी हिशोब करायची सोय नसेल, तरी आता सोय आहे. मात्र हिशोब करून उर्वरित कर्ज दाखवण्याची जबाबदारी स्वातंत्र्य-कमी-करणार्‍या समाजाची आहे, आत्महत्या करायला सरसावणार्‍या व्यक्तीची नव्हे.
(२) आत्महत्या करणार्‍या व्यक्तीबद्दल समुपदेशकाला (किंवा अन्य कुटुंबीयाला/मित्राला) आपुलकी वाटत असेल. आत्महत्येला सरसावणारा व्यक्ती जर फायदा तोट्यांबाबत अधिक काळजीपूर्वक विचार करेल, तर आत्महत्येच्या निर्णयापासून परावृत्त होईल, असे समुपदेशकाचे मत असू शकते. निर्णयाबाबत पुनर्विचार करायला वेळ आणि विचारचौकट मिळेल इतपत विलंब करायला समुपदेशक खटपट करू शकेल. परंतु विलंब करणे जाचक होऊ नये, ही काळजी घेतली पाहिजे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

समुपदेशनानंतरही व्यक्तीने जीवन संपविण्याचा निर्णय घेतला तर?
शिवाय संगोपनाचे उर्वरित कर्ज वगैरे अचूक काढता येणे शक्य/व्यवहार्य आहेत का ही एक शंका.
शिवाय ही कर्जे explicit असणार नाहित, implicit अध्याहृत अपेक्षा ह्याही "कर्जा"च्या व्याख्येत धरणार का?
पुन्हा त्रांगडे असे की ह्या अध्याहृत अपेक्षा प्रत्येकाच्या वेगळ्या . त्यात प्रमाणीकरण,standardisation नाही.
"जेव्हा ह्या गोष्टींची, माणूस इतरांना नक्की काय्/किती देणे लागतो ह्याची अचूक मोजदाद करता येइल; तेव्हा आत्महत्येसही बलपूर्वक थांबवू नये." हे म्हणत आहात का?
ह्यात मग जेव्हा-तेव्हा हा क्लॉज, प्रिकंडिशन येते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

बरोबर आहे.

> समुपदेशनानंतरही व्यक्तीने जीवन संपविण्याचा निर्णय घेतला तर?
या प्रश्न "र्‍हेटॉरिकल = अपेक्षित-प्रतिसाद-गर्भी" आहे काय? सामान्य प्रश्न असल्यास, उत्तर सोपे आहे - अखेरचा निर्णय "आत्महत्या असा घेतला, तर तो अखेरचा निर्णय आहे.
जर प्रश्नात अपेक्षित प्रतिसाद गर्भित असेल, तर या प्रश्नात अध्याहृत गृहीतक आहे, की जर व्यक्तीने अखेरचा निर्णय "आत्महत्या" असा घेतला, तर काहीतरी चुकते आहे. जर समुपदेशनानंतरसुद्धा व्यक्तीचा निर्णय एका दिशेचा अमान्य असेल, तर समुपदेशनाचा तरी आटापिटा कशाला?
(मला वाटते, की "बळजबरी केलीच पाहिजे" याबाबत तुम्ही निश्चित आहात. त्यामुळे तुम्ही नैतिकतेच्या द्विधेत पडलेला आहात. कारण नैतिकतेमुळे "बळजबरी करू नये" असेही तुम्हाला वाटते. या दोन परस्परविरोधी तत्त्वांपैकी एकतरी तत्त्व तुम्हाला सोडणे भाग आहे.)

> प्रमाणीकरण नाही.
प्रमाणीकरण नसूनसुद्धा काहीतरी ढोबळ हिशोब करून लोक काम चालवतातच की. पूर्वी कोणी म्हटले असते, की लग्नसंबंधात कोणी किती तन-मन-धन यांची गुंतवणूक केली आहे, त्याचा अचूक हिशोब लावणे अशक्य आहे. म्हणून हे बंधन सोडवणे नकोच, असे कोणी म्हणेल. परंतु तपशीलवार न लावता ढोबळ हिशोब लावून बंधन तोडता येते. जे-जे लोक त्यात गुंतलेले आहेत, त्यांनी ठरवावे, की हिशोब ढोबळ असला तरी पुरेसा आहे. आत्महत्या करायला सरसावणारा व्यक्ती या निर्णयात गुंतलेला आहे, हे नि:संशय. बाकी कोण किती गुंतले आहे? आत्महत्या करणार्‍यापेक्षा बाकीच्यांची गुंतवणूक पुष्कळदा कमीच.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

(मला वाटते, की "बळजबरी केलीच पाहिजे" याबाबत तुम्ही निश्चित आहात. त्यामुळे तुम्ही नैतिकतेच्या द्विधेत पडलेला आहात. कारण नैतिकतेमुळे "बळजबरी करू नये" असेही तुम्हाला वाटते. या दोन परस्परविरोधी तत्त्वांपैकी एकतरी तत्त्व तुम्हाला सोडणे भाग आहे.)

बळजबरी कुणाला कशाचीच करु नये असं वाटतं. पण कुणी जीवही देउ/घेउ नये असं वाटतं.
(गुन्हेगाराला शिक्षेची बळजबरी करण्यास ना नाही. त्याने गुन्हा करुन स्वतःचा स्वातंत्र्याचा हक्क तितक्या प्रमानात संपुष्टात आणलाय; अर्थात तो वेगळा मुद्दा.)

या दोन परस्परविरोधी तत्त्वांपैकी एकतरी तत्त्व तुम्हाला सोडणे भाग आहे.
हम्म. तसं दिसतय खरं.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

परवा पिच्चरला गेलो होतो. स्वच्छ आणि चांगल्या/व्यवस्थित वाटणार्‍या मल्टिप्लेक्सला जात असतो शक्यतो.
पॉश थेट्रात सर्वात स्वस्तातली तिकिट काढली. समोरुन दुसर्‍या तिसर्‍या रांगेतली होती.
मागचं थेटर तसं ऑल्मोस्ट रिकामं होतं. सोबतची व्यक्ती म्हणाली
"मागच्या रांगा रिकाम्याच आहेत आपण तिथे बसायचं का"
म्हटलं "पैसे समोरच्या रांगेचे भरलेत. मागे का/कसं बसायचं ?"
समोरुन प्रतिप्रश्न :- "आपण मागे बसलो तर नक्की कुणाचं आणि काय बिघडणार आहे ? काय हानी होणार आहे ? इतर कुनी तिथे बसलेलं असताना आपण त्याचा हक्क मारुन/ डावलून तिथे बसलो तर चूक असेल. पण ती सीट तशीही रिकामीच आहे. पिच्च्चर सुरु झाल्यानंतर तिथे कुणी येण्याची तशी शक्यताही नाही. मग तिकडे बसण्यात काय चूक ? आणि सुरु होउन गेल्यावर आपण तिथे बसलोच आणि नंतर कुणी आलच तर लागलिच आपण उठून इथे येउच शकतो की, किम्वा दुसर्‍अय सोयीस्कर सीटवर जाउ शकतोच की."

.
.
मी म्हटलं "ते करायचं नाही. कारण तिकिटाच्या काँट्रॅक्टमध्ये ते नाही."
.
.
तुमचं काय मत मंडळी ?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

डिपेण्ड्स सोबत कोण आहे, चित्रपट कोणता आहे, सोबतच्या व्यक्तीचे आणि आपले नाते काय आहे इत्याडी तपशीलावर उत्तर बदलेल ;).

सहसा नैतिकता की इतरांचे हक्क न डावलता होणारी सोय असा प्रश्न आला की मी सोयीला प्राधान्य देतो. पण हाही रूल नाही. मला त्यावेळी हवं तसं मी वागतो. स्वतःवर इतकी नैतिक/आर्थिक/सामाजिक वगैरे बंधने घालायला जात नाही!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

मग गर्भ लिंग निदान करुन हव्या त्या लिंगाचे अपत्य मिळवण्याचा हक्क का नाकरला जातो.
एखाद्या व्यक्तीनं मला अमुक लिंगाची संतती नको असं म्हटलं तर नक्की काय चूक आहे ?
तो इतरांच्या कोणत्या संपत्तीवर डल्ला मारतो आहे ?
किंवा इतरांनी कमावलेल्या कोणत्या वस्तू हिसकावतो आहे ?
तो फक्त स्वतःशी संबंधित बाबींबद्दल निर्णय घेतो आहे.
तो हक्क त्यास का नसावा?
.
.
खूपदा गर्बह्लिंगनिदानाविरोधात बोलताना गर्भपात किती वाईट आणी खुनशी आहे; हे सांगितलं जातं विविध जाहिरातीत.
ओके. मग " शक्यतो गर्भपात टाळावा" अशी तरी जाहिर सरकारी भूमिका हवी.
पण तिथे मात्र "स्त्रियांना गर्भपाताचा हक्क हवाच" अशी भूमिका घेतली अजते.
हा नक्की काय प्रकार आहे ?
.
.
.
समाजात लिंग संतुलन राखायची जिम्मेदारी एकट्या व्यक्तीवर तिच्या इच्छेविरुद्ध का लादली जाते ?
अशा वेगळ्या लिम्गाच्या व्यक्ती पुरवणार्‍यांबद्दल एक अत्य्म्त वाईट शब्द आहे.
समाज त्या व्यक्तीला तसं ट्रीट करतो आहे का ?
"भिन्न लिंगाची व्यक्ती पैदा करुन पुरवणारी व्यक्ती " म्हणून ?
हे वाईट नैय्ये का ?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ह्यावर चर्चा झाल्याचे आठवते मला मनोबा आणि गब्बर चा रोखठोक प्रतिसाद ही वाचल्याचे आठवते

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

अं!!!! असो.. तुला मागच्या सीटवर बसण्याचा नी गर्भलिंगचिकित्सेचा काय संबंध! तु ठिक आहेस ना मनोबा?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

मनोबा - तुला नक्की नैतिकता आड येत होती की असे उठुन जाऊन मागे बसायची लाज वाटत होती ( आजुबाजुचे काय म्हणतील वगैरे ), किंवा मागे जाऊन बसलो आणि त्या सीट वरचा माणुस आला तर उठायला लागेल आणि शरमिंदा होशील ह्याची भिती वाटत होती.

बर्‍याचे वेळेला आपण भिती, लाज, शरम, बुळेपणा ह्या गोष्टी नैतिकतेच्या नावा आड लपवतो. तुम्हाला हे सहजासहजी मान्य होणार नाही, पण असेच होते.

ही शरम, भिती किंवा सो कॉल्ड नैतिकता पण खुंटीला टांगायची की नाही हे होणारा फायदा किती ह्यावर ठरवते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ह्या केसमध्ये तसं काहीही नाहिये असं समजा. मला साध्या सरळ गोष्तॅए बोलायला आणि करायला तसा संकोच वाटत नाही.
आहे ते आहे. जमेल तितपत स्वच्छ थेट सरळ बोलतो; वागतो.
"फ्रिज /कार्/ मोठ्ठं फर्निचर/किचन ट्रॉली का घेत नाहिस" ह्यावर उगीच काहीतरी "कारपेक्षा मला बाइअक्च आवडते. बायकिम्गाची मजा काही औरच" वगैरे काही वाटत नसतानाही न सांगता साधं उत्तर देतो --
"परवडत नाही म्हणून"
.
.
आता संकोच उचलून फेकून दिलयची अजून किती उदाहरणं देउ ?
.
.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मलाही साध्या सरळ गोष्तॅए बोलायला आणि करायला तसा संकोच वआटत असलयचि कह्दि अआतह्वण नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

मनोबा, कार वगैरे न घेऊन तू काही लाज शरम वाटण्यासारखे करत नाहीयेस.
तु महागातली मागची तिकीट नाही काढता पुढची काढलीस हे तू सर्वांना सांगशील,
पण तू वर्णन केलेला प्रसंग वेगळा आहे.

पण तू मागे जाऊन बसलास आणि डोअर कीपरनी उठायला सांगीतले तर कीती लाज वाटेल ह्या भितीने तू आहे तिथेच बसतोस.

आणि मी म्हणले तसे ते वर्तन करुन काय डिफरंशियल फायदा मिळतो आहे तेही महत्वाचे.

तुला मागे जाऊन बसण्यामुळे फार काही फायदा वाटत नसणार. त्यामुळे तो होऊ शकणारा फायदा तुझ्या भितीला ओव्हरराईड करु शकला नाही.

आता हे उदाहरण बघ.

तू आणि तुझ्या सोबत्या कडे आरएसी तिकीटे आहेत आणि तुम्ही दोघे एकाच बाकावर शेअर करुन रात्रभर प्रवास करणार आहात. पण गाडीत बसल्यावर तुझ्या लक्षात आले की बाजुच्या सीट वरचा माणुस आलाच नाहीये तर तू रात्र तशीच अडचणीत काढशील का रिकाम्या बर्थ वर जाउन झोपशील?

कॅव्हिएट - तुझ्या बरोबर सोबतिण नसुन सोबती आहे, सोबतीण असेल तर गणित वेगळे असु शकेल.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

बर्‍याचे वेळेला आपण भिती, लाज, शरम, बुळेपणा ह्या गोष्टी नैतिकतेच्या नावा आड लपवतो.

ह्या वाक्यासाठी एक मार्मिक दिलाय. अगदी पटलं (आणि लोकांचे अनुभव पण घेतले आहेत ज्यांनी स्वतःच्या भितीला लपवण्यासाठी नैतिकतेची लेबलं लावलीत)

बादवे, माझा प्रश्न किंवा शंका अशी की, ही लाज्/भिती/शरम/बुळेपणा हे जर 'आपण जे करतोय ते अनैतिक आहे आणि लोकांनी तसं करताना आपल्याला पाहिलं आणि पकडले गेलो तर ते फार वाईट आहे' ह्या भावनेतून असेल तर नैतिकतेची अशी भिती(दहशत?) चांगलीच म्हणावी. काय वाटतं?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

देव, धर्म, पुढचा जन्म वगैरे कल्पना ह्या भिती दाखण्याच्या उद्देशातुन च निघाल्या असणार. नाहीतर नैतिकतेने का वागावे हा मुळ प्रश्न आहे. म्हणुन नाही वागलास तर पुढच्या जन्मी भोगशील वगैरे भित्या.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

नाहीतर नैतिकतेने का वागावे हा मुळ प्रश्न आहे.

काही नैतिकतेच्या कल्पना उत्क्रांतीतून हार्डवायर होऊ शकतात. रिचर्ड डॉकिन्सने 'सेल्फिश जीन'मध्ये परोपकारी भावना, आपल्यासारख्या इतरांना (समान टोळी, वंश इ.) न मारण्याची प्रबळ इच्छा, आपल्या जवळच्या नातलगांवर प्रेम करण्याची इच्छा, या व इतर नैतिकतेशी संबंधित असलेल्या गोष्टी उत्क्रांतीतून कशा टिकून राहू शकतात हे दाखवून दिलेलं आहे. इन्सेस्ट टॅबूलादेखील उत्क्रांतीचा आधार आहे.

थोडक्यात काही चांगल्या ऊर्मी हे आंतरिक आणि समाजाचं वेगवेगळ्या प्रकारे नियंत्रण हे बाह्य - अशा दोन्ही प्रकारच्या कारणांनी नैतिकता/समाजनियम पाळले जातात.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

>> बर्‍याचे वेळेला आपण भिती, लाज, शरम, बुळेपणा ह्या गोष्टी नैतिकतेच्या नावा आड लपवतो. <<

माझ्या मते पुष्कळदा हे उलट असतं. म्हणजे मनातल्या नैतिकतेच्या कल्पनांमुळे भीती / लाज / शरम वगैरे वाटते. ज्या व्यक्तीला त्या कृतीत काही अनैतिक आहे असं वाटतच नाही त्याला भीती / लाज / शरम वाटत नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

य्क्झॅक्ट्ली..

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

कामातुराणां न भयम न लज्जा| Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

प्रकाश घाटपांडे
http://faljyotishachikitsa.blogspot.in/