निर्वात पोकळी नि चिंतित वटवट

मी काय करतोय? मला काय करायचय? खरं तर मला काय करायचय ह्याचाशी तुम्हाला काय करायचय?
कर्महीन आणि निरुद्देश जीवन घालवणे हे विध्वंसक कार्यापेक्षा उत्तम नाही का? की जरासे विध्वंसक आणि रजो-तम गुणी झालेले चालेल पण कर्म करणे योग्य? कशासाठी काय केले पाहिजे?ही वेळ काय करायची आहे?
मी असा एका निर्वातात बसुन काय करतोय? एका रिकामटेकडेपणाने ही मनोपोकळी व्याप्त केली आहे का?
हे रिकामपण चांगले की वाइट? वाइट असेल तर कुणासाठी?
इतरांसाठी की माझ्याचसाठी? कुणी काहीच प्रतिसाद का देत नाही?
मी एकटाच तासनतास पुन्हा पुन्हा सगळ्यांना संपर्क तरी किती करु? सगळे का टाळताहेत?
काय झाले आहे? कुठे आहेत आई-बाबा?
माझी .....माझी -ही कुठाय? मी एकटाच अंधारात काय करतोय?
मी इथून कधी निघणार आहे? निघावेसे मला कधी वाटणार आहे? कुणामुळे वाटणार आहे?
मी संपलो तर ही पोकळी संपेल का?
मी पोकळी संपवु का? ती संपेल ह्याची शाश्वती काय?
मी संपलोय हे मला कसे कळणार?
चला मला कामाला पुन्हा लागायला हवे. निघतोय.तुम्हाला सगळ काही सांगितलेलच आहे. कामाला येइल.

--मनोबा

Taxonomy upgrade extras: 
field_vote: 
3
Your rating: None Average: 3 (1 vote)

हल्ली असं बरंच काही उसवून येताना दिसतंय. हा खरोखरच आधुनिकोत्तर शैलीत वगैरे लिहिण्याच्या प्रयत्नांचा एक भाग असेल तर ठीकच. नसेल तर मात्र थोडं तपासून घ्या. कोणी योगी वगैरे भेटला असेल तर जरा सावधच. तसे तुम्ही त्यातले वाटत नाही. विज्ञानात अशा स्थितींबाबत उत्तरे असतात म्हणे. तेव्हा तिकडे धाव घ्यावी. खरोखरच तशी काही स्थिती असेल तर जालावर लिहित बसू नका. इथं आपसूक तज्ज्ञ बरेच असतात. ते योग्यापासून ते फ्रॉईड, युंग यांच्यापर्यंत कसेही (विकी)पांडित्य दाखवतात. त्यातून उपकारकच सारे काही निघेल असे नसते. पुन्हा, या अशा अपरिष्कृत लेखनामुळे जालावरच्या काहींची 'विकेट'ही पडण्याची शक्यता.
दिलाय प्रतिसाद आता. जो एरवी दिला गेला असताच असे नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

प्रतिसादातून आपुलकी दिसली; त्याबद्दल मनःपूर्वक आभार.
आता हा धागा कधी लिहिला म्हणायचं नक्की ? तर जून २००९च्या आसपास; सुमारे चार वर्षापूर्वी लिहिलेलं आहे. आता होतय ते फक्त पुनःप्रकाशन.
ह्याशिवाय http://www.aisiakshare.com/node/1677(काय वाट्टेल ते....! : ) ) ह्या धाग्याबद्दल म्हणत असाल तर तो सुद्धा अडीच तीन वर्षापूर्वीच प्रकाशित झालेला आहे. त्यात खरेतर नर्मविनोदी विचित्र लिहिण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे. त्यात वैताग,त्रास असा नाही.
.
ह्याशिवाय राहिलं ते http://www.aisiakshare.com/node/1678 (जखम आणि खपली....) तर हो. डोक्याला शॉट्ट बसतो; वैताग येतो. पण तो डोक्यात ठेवण्यापेक्षा लिहून काढलेला बरा. पुन्हा नंतर कधीतरी तो त्रयस्थ नजरेने पाहता तरी येतो. ह्याशिवायही त्याचे एक कारण आहे; ते व्यनि करत आहे.
.
योगशास्त्र , अध्यात्म, ज्योतिष ह्याबद्दल माझं काहिच मत नाही. एक मोठ्ठं मौन.
.
पुन्हा, या अशा अपरिष्कृत लेखनामुळे जालावरच्या काहींची 'विकेट'ही पडण्याची शक्यता.
कळ्ळं नाय. सोप्या मराठित कुणी सांगेल का.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

डोक्याचे शॉट्ट लिहून काढायला माझी हरकत नाही. पण ते शॉट्ट अशा स्वरूपात प्रसिद्ध केले जाऊ नयेत, असे मला वाटते. अभिव्यक्ती स्वातंत्र्य असल्याने मी ती अट करू शकत नाही, इतकेच; अपेक्षा मात्र जरूर आहे.
अपरिष्कृत - या लेखनात तुकोबा आले. आता तुकोबांचं निरुपण पूर्ण करता येत नसेल तर आपल्या डोक्याला बसलेल्या शॉटचा संबंध तुकोबांशी वरकरणीसुद्धा जोडू नये, असे माझे मत. तुकोबा हे अनेकांचे अनेकार्थाने श्रद्धास्थान असते. काहींची श्रद्धा तुकोबांना गंध लावण्याचीही असते. अशांबाबत हमखास गडबड होते हे असे लेखन वाचले की.
ही तुमची कच्ची सामग्री आहे. कच्ची सामग्री टिपणवहीतच राहू द्यावी. प्रयोगाची जाहीर माहिती ही नेटकीच असावी.
तुम्हाला हे पटावे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मान्य.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

'तसे' काही नाही हे कळल्याने बरे वाटले.

बाकी डोक्याला शॉट्ट लागणे, पोकळी जाणवणे वगैरे गोष्टी आंतरजालावर अवाजवी वेळ घालवून भलभलत्या गोष्टी सिरियसली वाचण्याचे परिणाम असू शकतात असे नमूद करावेसे वाटते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

+११११११११११११.

पुन्हा, या अशा अपरिष्कृत लेखनामुळे जालावरच्या काहींची 'विकेट'ही पडण्याची शक्यता.

अशी उदाहरणे अपवादभूतांतही अपवादभूत असतात. पण जण्रल भावनेशी सहमत आहेच.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

यातुनच नवअध्यात्मवाद निर्माण होतो म्हणे.
हल्ली आम्हालाही असेच प्रश्न पडतात.चला आपापली उत्तरे शोधायच्या कामाला लागा!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

प्रकाश घाटपांडे
http://faljyotishachikitsa.blogspot.in/

तुकारामाला असं लिहावंसं का वाटलं असावं ते मला कळतंय, पण त्याचा खालच्या तुमच्या विचारांशी काय संबंध ते कळत नाही. संसारात न अडकल्यामुळे आपल्याला काहीतरी गवसलं असं तुकोबा म्हणताहेत. तुम्ही तर संसारात नको तितके अडकले आहात असं दिसतंय.

कर्महीन आणि निरुद्देश जीवन घालवणे हे विध्वंसक कार्यापेक्षा उत्तम नाही का?

तुकोबांचं आयुष्य कर्महीन आणि निरुद्देश होतं असं म्हणायचं आहे का?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

लेखन अ-अध्यात्मवादी आहे की कर्मयोग-वादी हे स्पष्ट होत नाही.
'पोकळी' हा शब्द विचारांशी संबंधित आहे की कर्माशी हेही निरसन व्हावे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ज्येष्ठांच्या सल्ल्यांवरून ह्या धाग्यावर लेखन मौन घेतले आहे. आभार.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars