विद्या पुण्य भाग्या सत्या अन्या

समजा काही विदा हवाय; त्यावर काम करायचय तर काय म्हणाल ?
"विद्यावर काम सुरु आहे"
समजा विद्या शिंदे हिची एखादी सर्जरी करायची असेल तर डॉक्टर काय म्हणेल ?
"विद्यावर सर्जरी सुरु आहे"
दोन्ही वाक्यात "विद्या" ह्या शब्दाचा उच्चार वेगळा.
सप्तमी विभक्ती प्रत्यय असला तरी किंवा स्त्रिलिंगी नाव असलं तरी किंवा एखाद्या पुरुष नामाचं लघुरूप असलं तरी तेच.
लिखाण तेच, उच्चार वेगळा.
बव्हंशी आपण संदर्भ पाहून उच्चार जाणून घेतो. पण देवनागरी शिवाय इतर लिप्यांमध्ये अशी अडचण येत नाही का? तिथे ती कशी सोडवली आहे?
.
"अनिकेत" ह्या नावाचं लघुरुप "अन्या" होउ शकतं. पण एखादी नवयौवना "तुला सोडून मी कुणा अन्या सोबत जाणार नाही" असं एखाद्या प्रियकरांस म्हणत असेल तर "अन्या" चा अर्थ काय घ्यावा?
.
१९९८च्या आसपास एक हिंसक ,खूनखराबा असलेला चित्रपट आला होता रामूचा. "सत्या" नावाचा. पण तो चित्रपट पहायला जाताना सर्वजण त्याचा उच्चार "सत्त्या" असाच करायचे उदा :- "सत्त्या लैच भारिय्.पहायला येणार का" वगैरे.
.
तीच गोष्ट "भाग्या" ह्या स्त्रीनामाची. "भाग्या लंगडी खेळते आहे" ह्यातील क्रियापदावरून कर्त्याच्या लिंगाचा अंदज येतो. भारतीय समाजमानसाला "भाग्या" ह्या नावाची कल्पना असल्याने "भाग्ग्या" च्या जवळ जाणारा उच्चारही निव्वळ वाक्य वाचून करता येतो. पण ज्यात कर्त्याचे लिंग समजत नाही, तिथे हा प्रश्न कसा सोडवावा?
"भाग्या पाचवीत आहे" ह्या वाक्यातेल भाग्या मागील वाक्यातील "भाग्या" (खरंतर "भाग्ग्या") नावाची चिमुरडीही असू शकते किंवा पाचवीतील "भाग्येश" च्या मित्रांनी त्याचे पाडलेले संबोधन "भाग्या" असेही असू शकेल.
.
तीच गोष्ट "दिव्या दिव्या दिपत्कार" ह्या ओळीतील. जसं ज्ञान "दिव्य" असतं आपण लिहित असलो तरी उच्चारण मात्र "ज्ञान दिव्व्य्य आहे" असं करतो, त्याच प्रमाणे "दिव्व्य्या" नावाच्या चिमुरडीला "हा बघ दिपत्कार" असे म्हणायचे असेल तरी लिहिताना लिहिले जाइल " दिव्या, दिव्या दीपत्कार" असेच. त्याचे प्रत्यक्ष उच्चारण "दिव्व्या दिव्व्या दीपत्कार" ह्याच्या जवळ जाणारे असणार.
तर उच्चारण आणि लेखन ह्यातली गफ़लत सोडवायचा मार्ग इतर लिप्यांमध्ये (लिप्प्यांमध्ये नव्हे) उपलब्ध आहे का?

--मनोबा

Taxonomy upgrade extras: 
field_vote: 
4
Your rating: None Average: 4 (1 vote)

हम्म रोचक Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

कुरुंदकरांच्या कुठल्यातरी पुस्तकात "पापपुण्ण्याच्या कल्पना" असं शहराच्या नावाशी गोंधळ होऊ नये म्हणून छापल्याचं पाहिलं आहे.

असो. आमच्या शाळेच्या संस्थेच्या नावाचा टारगट मुले विड्या प्रसारक मंडळ असा उच्चार करीत.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

ह्यावर उपक्रमवर चर्चा झाल्याचे स्मरते, धनंजयने त्यावर माहिती पुरविल्याचेही स्मरते/वाटते, पण दूवा उपलब्ध नाही. धनंजयच काही माहिती पुरवू शकतील.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

हा प्रश्न जण्रल देवनागरी लिपीशी संबंधित नसून मराठी भाषेच्या फोनॉलॉजीशी निगडित आहे. साधारणतः जोडाक्षरे म्हटली की त्यांच्या आधीचे अक्षर लघु असेल तर गुरुत्व पावते. साधारणतः सर्व जोडाक्षरे अशी आघातवालीच असतात. फक्त अंत्य अक्षर "य" असलेल्या जोडाक्षरांचा एक वर्ग वेगळा काढावा लागेल याबाबतीत, कारण तिथे आघातवाले आणि विना आघातवाले असे दोन्ही भाग पडतात. आता हे लिपीद्वारे दाखवायचे कसे? पण इथेही एक मजा आहे. त्या विना आघातवाल्या अंत्य अक्षर य असलेल्या जोडाक्षरांमध्ये य चा नुस्ता य असू शकत नाही. किंबहुना य च्या बाराखडीतले कुठलेच अक्षर असू शकत नाही एक "या" "ये" आणि "यो" वगळता, उदा. विद्यमान मध्ये द्य च्या उच्चारामुळे वि हे अक्षर गुरुत्व पावते. तसे ते "पव्या" मध्ये पावत नै. (पव्या=प्रवीण चा शॉर्ट फॉर्म) कोकणस्थांच्या बोलीत जात्ये उठत्ये वगैरे रूपे दिसतात. तिथेही "त्ये" मुळे आधीच्या लघु अक्षराचे गुरूत रूपांतर होत नै. दक्षिण महाराष्ट्रातील बहुजन बोलीत "त्यो तिकडं गेल्ता, ए मध्यो, तु कुटं चाल्लाइस"? अशी रूपे आढळतात. आता मध्यो या रूपात म हा आघाताने गुरू होत नै. मध्यो हे मध्याव् चे अजूनच संक्षिप्त रूप आहे. मध्याव् म्हंजे मधुकरचे कोल्लापुरी रेंडरिंग आहे. त्यो, ह्यो, त्ये, ह्ये अन त्या, ह्या ही सर्वाधिक प्रमाणात आढळणारी विना आघात जोडाक्षरे म्हणता यावीत. आता काही केसेसमध्ये वेगळे दाखवता येतेसुद्धा, उदा. कार्यानुभव आणि पार्‍याला. र्या मध्ये आधीच्या अक्षरावर जोर येतो, र्‍या मध्ये येत नै. त्यामुळे तत्वतः मागणी बरोबर आहे, पण अशी अक्षरे, अशा केसेस फार थोड्या आहेत. एखादा नुक्ताबिक्ता मारून किंवा दुसरे कैतरी चिन्ह वापरून हे सोडवता येईल.

खरेतर मराठीच्या उच्चारव्यवस्थेप्रमाणे देवनागरी लिपी नीट बदलली पाहिजे. हा जोडाक्षराचा मुद्दा तर लै पुढचा झाला. आधी च, ज, झ यांच्या प्रत्येकी २ वेगळ्या उच्चारांना वेगळे दाखवण्याची आपल्याकडे सोय नाही. हिंदीमध्ये मात्र नुक्ते मारून ज-ज़, फ-फ़, ड-ड़ , क-क़, ग-ग़ अशी व्यवस्थित सोय करून ठेवली आहे. आपण मात्र अंमळ गंडकेच हौत या बाबतीत.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

मला वाटते की मनुष्याच्या मुखातून बाहेर पडणारे सर्व प्रकारचे विविध ध्वनि आपल्याला काही मार्गाने लिपिबद्ध करता आले पाहिजेत अशा कल्पनेतून 'दिव्या' (दिव्या दिव्या दीपत्कार) आणि 'दिव्व्या' (मुलीचे नाव) ह्यामधील फरक कसा लिपीमध्ये पकडता येईल हा विचार निर्माण होतो. प्रत्यक्षात हा विचार अतिमहत्त्वाकांक्षी आहे. आपल्याला देवनागरीमध्ये दिसणारे स्वर, व्यंजने आणि जोडाक्षरे हे सर्व आपण तोंडाने जे आवाज काढू शकतो त्यांचा एक फार छोटा भाग अथवा सबसेट आहेत. आपण तोंडाने शीळ घालतो पण तो आवाज आपण लिपीत पकडू शकतो काय? नाही. नाटकातील एखादे स्फूर्तिदायक वाक्य ऐकले की प्रेक्षक - विशेषतः मागच्या रांगातील - पसंतीदर्शक किंवा 'पटले' ह्याचा दर्शक 'चॅकचॅक' असा आवाज काढतात. तो आपण लिपीत पकडू शकतो काय? तान्ही मुलॅ तोंडातून किती प्रकारचे आवाज काढतात आणि मोठी माणसे असेच किती आवाज करून त्यांना खेळवतात? ह्यांपैकी किती आवाजांना आपण देवनागरी - किंवा कोठल्याच - लिपीत पकडू शकतो?

आपल्या तोंडांतून बाहेर पडू शकणार्‍या अशा शेकडो आवाजांना आपण लिपिबद्ध न करता मोकळे ठेवण्यास तयार आहोत तर मग दिव्या आणि दिव्व्या ह्यांना लिपीत पकडायची आवश्यकता का भासावी? त्यांना आहे तसे राहू द्यावे आणि संदर्भावरून उच्च्चार करण्याची आपली सवय चालू ठेवावी. ह्या मार्गाने एकमेकांपासून फारच थोडा फरक असणार्‍या उच्चारांना लिपीत एकच खूण मिळते आणि हे सोल्यूशन फार इकॉनॉमिकल आहे. अशा सगळ्या उच्चारांना वेगवेगळ्या खुणा समजा आपण शोधून काढल्या तर अशा खुणांची संख्या अतोनात वाढून लिपि बोजड बनेल.

'कपट' ह्या शब्दात 'अ' ह्या स्वराचे तीन वेगवेगळे उच्चार त्यावर पडणार्‍या वजनानुसार जाणवतात. पहिला 'अ' - 'क'मधील - मध्यम लांबीचा आहे, दुसरा अधिक लांबीचा आहे आणि अखेरचा अगदी थोडया लांबीचा, जवळजवळ नाहीच असा आखूड आहे. हे तीन 'अ' वेगवेगळे दाखविण्यासाठी तीन खुणा निर्माण करण्यापेक्षा त्यांना एकच खूण -अ- ही ठेवून संदर्भाने शब्द ओळखून तीनहि 'अ'चे योग्य उच्चार आपण करतोच की. तसेच सर्वत्र करण्यात काय अडचण आहे?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

पहिल्या परिच्छेदामुळे स्टीफन फ्राय आणि ह्यू लॉरीचा Your name, sir? हा व्हीडीओ आठवला.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

देहबोली देखील शब्दात बद्ध करता येत नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

प्रकाश घाटपांडे
http://faljyotishachikitsa.blogspot.in/

हल्लीच एका बारशाच्या आधी 'सौम्या' आणि तत्सम नावं उच्चारांमधल्या डीजनरसीमुळे बाद ठरवण्यात आली होती.

कोल्हटकर म्हणताहेत तसे जर नवनवीन चिन्ह जर भाषेला बोजड बनवत जाण्याची शक्यता वाटते तर मग डबल जोडाक्षराने लिहावं (पुण्ण्य वगैरे सारखं)...म्हणजे उच्चारातला फरक लिहिलेल्यात दिसेल. मुळात तो फरक लिहिलेल्या शब्दात दिसावा असं मला वाटतं.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

च व ज बाबत असाच प्रश्न उदभवतो. मी पुण्याचा आहे असे उच्चारताना असलेला च आणी मी पुण्याची आहे असे उच्चारताना असलेला च यात फरक आहे.
जाधव मधील ज चा उच्चार व जाम वैताग आलाय मधील जा चा उच्चार. चमचा व चहा मधील च चा उच्चार.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

प्रकाश घाटपांडे
http://faljyotishachikitsa.blogspot.in/

बरीच नवी माहिती मिळाली.
@अरविंद कोल्हटकर :- सोयीसाठी, लिपी सोपी ठेवण्यासाठी ती आहे तशीच राहू द्यावी हे ठीकच. पण इतरत्रही, इतर भाषांत्/लिप्यांत ते तसेच होते का हे जाणून घ्यायचे होते. मध्ये लिहिताना सोय व्हावी म्हणून "भाषेतील र्‍हस्व दीर्घच काढून टाका" अशी एक चळवळ सुरु होती एका शुभानन गांगल. तुमचे म्हणणे त्याच्या जवळ जाणारे वाटले.लिहिताना सोय होइल हे ठीक. पण त्याऐवजी लिहिताना थोडे अधिक कष्ट पण वाचताना थोडी अधिक सोय झाली तरी चालेल की असे वाटून गेले.
.
बॅटमॅन आणि बाकी सर्वांनाही दिलेल्या माहितीबद्दल धन्यवाद.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

पण इतरत्रही, इतर भाषांत्/लिप्यांत ते तसेच होते का हे जाणून घ्यायचे होते.

अशा प्रकारचे निराघात उच्चार (पुण्याला जातोय मधला ण्या) किती भारतीय भाषांमध्ये आहेत याची कल्पना नाही, पण माझे काही कन्नड मित्र सोडले तर इतर अमराठी मित्रांना असे उच्चार तितके चांगले करता येत नाहीत. आमच्या वर्गातल्या अन्या (अनिल) ला बाकीची मुले ऐकून अन्न्या म्हणतात. 'जोष' चित्रपटात शाहरुख कुत्र्या ऐवजी जरा कुत्रिया च्या जवळ जाणारा उच्चार करतो. 'सिंघम'मध्येही गोट्या ला अनेक पात्रे गोटया किंवा गोटिया म्हणत आहेत असे वाटले होते. चुभुदेघे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

+१.

हिंदी आणि बंगाली भाषकांना असे उच्चार नीट करता येत नाहीत. तुलनेने कन्नडवाले बरेच बरे. बाकी हेराफेरीमध्ये परेश रावळ कुत्र्या हा उच्चार तसा ठीकठाक करतो असे वाट्टे. पण एकूणच असे उच्चार अन्य भारतीय भाषांत असतील की नाही याबद्दल शंकाच आहे. माझ्या काही भाषाशास्त्रज्ञ आणि अन्यभाषक जालमित्रांपाशी हा विषय काढतो आणि त्यांची मते शेअर करतो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

एक वाक्यः
"मस्तानीच्या लावण्याची कीर्ती बाजीरावाच्या कानावर आलीच होती..."

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

कुणीतरी "कहर" , "भन्नाट" अशी श्रेणी द्या रे ह्याला. (ह्याला म्हंजे प्रतिसादाला; आमच्या ननिदाला नै कै.
श्रेणी आणि फेणीचे दुष्परिणाम शिकवील नाय तर तो.)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars