Skip to main content

आँ?! हे काय हो तुकोबा?

अहो हे काय हो तुकोबा?
मी तर तुम्हाला संत तुकाराम म्हणुन ओळखतो. तुमचे विठ्ठल भक्तीचे ( क्वचित राम- कृष्ण ह्यांचा उल्लेख असलेले) आणि बर्‍याच वेळेस सामाजिक अंधश्रद्धेवर कोरडे ओढणारे , रोखठोक अभंग मी ऐकत आलोय.

पूर्वी हिंदु-मुस्लिम तत्वज्ञानाचा संगम कबीर म्हणा, गुरुनानक ह्यांच्या साहित्यात असल्याचं ऐकलं होतं.
ज्ञानदेवांचे समकालीन संत नामदेव हेसुद्धा महाराष्ट्रापासून थेट पंजाबपर्यंत जाउन आलेत; त्यांच्या कित्येक रचनांचा समावेश शिखांच्या "गुरु ग्रंथ साहिब " मध्ये आहे हेही ऐकलय. पण तुमच्या लिखाणात असं काही असल्याचं ऐकलं नव्हतं बुवा.
तुमच्या लिखाणात एकदम "अल्ला " हा शब्द दिसला आणि आश्चर्य वाटलं. त्याकाळातली हिंदी भाषा ही दिसली.
.
अहो खरचः- tukaram.com वर सापडलं हे मला:-

’’ अल्ला करे सो होय बाबा, करतार का सिरताज। गाऊ बछरे तिस चलावे यारी बाधो न सात ।।१।।
ख्याल मेरा साहेबका बाब हुवा करतार। व्हांटे आघे चढे पीठ आपे हुवा असवार।।२।।
जिकिर करो अल्लाकी बाबा, सबल्यां अंदर भेस। तुका जो नर बुझे सोहि भया दरवेस।।३।।’’
(-गाथा, मुसलमानी अभंग क्र. ३,९८३)

हे त्याच्या पुढचं एक बघा:-

’’तम भज्याय ते बुरा जिकीर तै करे। सीर काटे ऊर कुटे ताहां झडकरे।।१।।
ताहां एक तु ही ताहां एक तुही। ताहां एक तु ही रे बाबा हम तुम नही।।२।।
दिदार देखो भले नहीं किसे पछाने कोये। सचा नहीं पकड सके झुटा झुटे रोये।।३।।
किसे कहे मेरा किन्हे सात लिया भास। नही मेलो मिले जीवना झुटा किया नास।।४।।
सुनो भाई कैसा तो ही होय तैसा होय। बाट खाना अल्ला कहना एकबारां तो ही।।५।।
भला लिया भेक मुंढे अपना नफा देख। कहे तुका सो ही सखा हाक अल्ला एक।।६।।

शिवायः-

’’अल्ला देवे अल्ला दिलावे, अल्ला दारू अल्ला खिलावे।
अल्ला बिगर नही कोय, अल्ला करे सोही होय।।१।।
मर्द होये वो खडा फीर नामर्दकु नही धीर। आपने दिलकुं करना खुसी तीन दामकी क्या खुमासी।।२।।

"’’अबाल नाम अल्ला बडा लेते भुल न जाये। इलाम त्या कालजमुपरताही तुंब बजाये।।१।।
अल्ला एक तूं, नबी एक तूं। काटते सिर पावों हाते नहीं जीव डराये।।२।।
आगले देखो पिछे बुझो, आपे हजुर आये।।३।।"

--(चकित) मनोबा.
संदर्भः- http://www.tukaram.com
.
इतरत्र पूर्वप्रकाशित

बॅटमॅन Thu, 21/02/2013 - 17:29

ऐकलं होतं आधी पण परतेक्श पैल्यांदाच पाह्यलोय. धन्यवाद रे मणोबा. "झडकरे" सारखे काही शब्द मराठमोळेपणाची साक्ष पटवतात.

बाकी कधीकाळी सज्जनगडावर गेलो असताना "रामदासांची मुसुलमानी अष्टके" नामक पुस्तक दिसलं होतं, त्यात हिंदी-उर्दू छाप भाषेमध्ये भुजंगप्रयातातील श्लोक रचलेले पाहिले होते.

पण यामागचे मोटिव्हेशन काय असावे? रामदास अख्खा भारत फिरल्याचे परंपरेनुसार सांगितले जाते, तेव्हा त्यांनी असे काही रचणे जास्त लॉजिकल आहे सकृद्दर्शनी. पण हौ कम तुकोबा? कुणा सूफीचा प्रभाव असावा काय? एक जुने जाणीते इतिहासकार कै. मियाँ सिकंदरलाल अत्तार यांनी प्रसिद्ध केलेल्या काही मुस्लिम संत कवींनी मुहम्मद, फातिमा, हसन-हुसेन इ. चे वर्णन करताना हिंदू उपमा वापरल्या आहेत. त्याचप्रमाणे तुकोबांची मुस्लिम कवने हा त्या गंगाजमनी संस्कृतीचाच एक भाग होय.असो.

सागर Thu, 21/02/2013 - 19:30

माझ्यामते हे तुकोबांचे अभंग उर्दूत कोणीतरी रुपांतरीत केले असावेत.
कारण ही तुकोबांची भाषा नाही हे नक्की.

तुकाराम.कॉम या संकेतस्थळावर अनेक भाषांमध्ये बघता येते, त्यासाठी भाषेवर क्लिक करुन मगच पुढे जाता येते.
तेव्हा मराठी भाषेत जे अभंग आहेत तेच तुकोबांचे आहेत.

आणि मनोबाभाऊ वर तुम्ही दिलेले अभंग जर मराठी भाषेच्या दारातून (म्हणजे मराठीवर क्लिक करुन) दिसत असतील तर तो संकेतस्थळाचा तांत्रिक दोष असू शकतो. चुकून उर्दू रुपांतर मराठीत आले असण्याची शक्यता आहे.

बॅटमॅन Thu, 21/02/2013 - 20:45

In reply to by सागर

कारण ही तुकोबांची भाषा नाही हे नक्की.

असे नक्की कशाच्या आधारावर म्हणता?

भाषांतरे मीही पाहिली. तुम्ही म्हणता तसे दिसत नाही. भाषा पुरेशी जुनाट हिंदी वाटते आहे. "झडकरे" सारख्या मराठी शब्दांमुळे तर भाषांतराची शक्यता अजूनच धूसर आहे.

मुळात हिंदी अनुवादाच्या नावाखाली इतकेच दिसतेय.

हा दुवा.

त्यामुळे चुकून उर्दू भाषांतर मराठीमार्गे आले असावे हे बरोबर वाटत नाही.

सागर Fri, 22/02/2013 - 14:29

In reply to by बॅटमॅन

कारण ही तुकोबांची भाषा नाही हे नक्की.

असे नक्की कशाच्या आधारावर म्हणता?

बॅटमॅन भाऊ, तुकोबांचे बरेच अभंग मी वाचले व अभ्यासले आहेत.
वर धाग्यात दिलेले मात्र मी या आधी कधी पाहिले वा ऐकले नव्हते.

मी समग्र तुकाराम वाचले आहे असे म्हणत नाहिये. पण बर्‍यापैकी वाचले आहे.
त्या रचनांशी तुकाराम.कॉम वरील रचना तुलनात्मकरित्या मला पटली नाही.
अर्थात तुकोबांच्या हिंदी रचना (असतीलच तर) त्यांचा माझा अभ्यास नाही हे मात्र मान्य करतो.
अधिकृत (म्हणजे तुकोबांवर अभ्यास असणार्‍या व्यक्तींकडून वा संस्थेकडून) संकेतस्थळावर अशी रचना दिली गेली असेल तर ती तुकोबांनी केलेली असण्याचीच शक्यता जास्त आहे. असे असतानाही मला ती तुकोबांची रचना वाटली नाही. हा कदाचित मराठी भाषेच्या चष्म्यातून जास्त बघत असल्याचा परिणाम असावा.

तुकारामांवर 'तुकाराम दर्शन' हे सदानंद मोरे यांचे उत्कॄष्ट पुस्तक आहे. त्यात ही माहिती असावी. दुर्दैवाने हे पुस्तक बाजारात उपलब्ध नाहिये. पण ग्रंथालयांतून नक्की मिळेल. कोणी शोध घेऊन सांगितले तर फार बरे होईल.
अशा गोष्टींना आधार मिळाला तर सत्यदर्शन होण्याचाच फायदा आहे.

बॅटमॅन Fri, 22/02/2013 - 14:39

In reply to by सागर

ओके. एकाच कवीचे एकाच भाषेतील लेखन असेल तर तुम्ही म्हणता तशी तुलना करणे सोपे आहे, पण दोन भिन्न भाषांची तुलना कशी करणार, हा एक प्रश्न आहे. बर ते असो, तुलनात्मकरीत्या पटली नाही-असेलही, पण मला या रचनेचे नेहमीच्या त्यांच्या किंवा वारकरी संतांच्या विचारांशी साधर्म्य तरी दिसले.

अल्ला करे सो होय बाबा, करतार का सिरताज। गाऊ बछरे तिस चलावे यारी बाधो न सात ।।१।।

हे आणि "ठेविले अनंते तैसेहि रहावे" मध्ये फार काही फरक आहे असे वाटत नाही.


’अबाल नाम अल्ला बडा लेते भुल न जाये। इलाम त्या कालजमुपरताही तुंब बजाये।।१।।
अल्ला एक तूं, नबी एक तूं। काटते सिर पावों हाते नहीं जीव डराये।।२।।
आगले देखो पिछे बुझो, आपे हजुर आये।।३।।"

हे आणि भानुदासांचा

जैं आकाश वर पडों पाहे । ब्रह्मागोळ भंगा जाये । वडवानळ त्रिभुवन खाये । तरी तुझीच वाट पाहें गा विठोबा ॥१॥

हा अभंग यातही मूळ थीममध्ये साधर्म्य आहे.

पण असो. तुम्ही म्हणता त्याप्रमाणे माझाही अभ्यास नसल्याने माझे बोलणे हे वरवरच्या साधर्म्याबद्दलच आहे. जाणकारांकडून संदर्भाच्या प्रतीक्षेत.

सागर Fri, 22/02/2013 - 15:08

In reply to by बॅटमॅन

विचारांशी साधर्म्य आहे हीच लक्षणीय बाब आहे.
पण एकच व्यक्ती जेव्हा दोन भाषांत रचना करते तेव्हा रचनेचा एक पॅटर्न उमटतोच. तो यामध्ये दिसला नव्हता. म्हणून मला ती शंका आली होती. पण तुम्ही म्हणता तसे जाणकारांकडून माहितीच्या प्रतिक्षेत राहूयात :)

मेघना भुस्कुटे Thu, 21/02/2013 - 19:38

तुकारामांनी हिंदीतही रचना केल्या आहेत असं चंकुच्या 'तुकाराम'संदर्भातल्या मुलाखतींमध्ये वाचल्याचं आठवतं. नेमाड्यांच्या 'तुकाराम'मध्येही तसं आहे असं अंधुक आठवतं. संदर्भ पाहून नक्की सांगता येईल.

अतिशहाणा Thu, 21/02/2013 - 19:45

तुकारामांची गुरुपरंपरा मुस्लीम असल्याबाबत येथे काही वाचले होते. याच अर्थाचे इतर लेखन काही पुस्तकांतही वाचले होते. मात्र आता ती पुस्तके जवळ नसल्याने अधिक संदर्भ देता येत नाहीत :(
http://khattamitha.blogspot.com/2008/04/blog-post.html

मन Sun, 03/03/2013 - 08:58

सर्व वाचकांचे आभार.
@ऋ :- पुरवण्या किंवा खंडनं पुस्रेशी आली नाहितच की :(
.
@बॅटमन -सागर :- यप्स. बॅटमनचं पटतय. भाषिक तुलना करणे सोपे नाही. शिवाय तुकारामांचा दीर्घ प्रवास वगैरे झाल्याचे ऐकिवात नाही.
.
@मेघना :- संदर्भ वगैरे कधी पाहण्यात आला तर अवश्य इथं मांदावा. तेवढ्याच चार गोश्टी समजतील.
.
@ आजानुकर्ण :- खट्टामीठाचा मी ही पंखा आहे. सदर लेख पाहिलेला आहे.
अवांतर :- तिथे अजून काही भन्नाट लेख होते; गजानन महाराज वगैरेंबद्दल. ते गायबले असं दिसतय. :(