छायाचित्रण पाक्षिक-आव्हान १५ : प्रतिबिंब
पुढच्या पंधरवड्यासाठी विषय आहे : प्रतिबिंब.
.......गेल्या दोन आव्हानांना मिळालेला एकून प्रतिसाद पाहता, प्रोत्साहन देण्यासाठी, यावेळी थोडा सोपा विषय देत आहे.
मला वाटते, या विषयाचे काही स्पष्टीकरण/अपेक्षा द्यायची गरज नाही. कल्पनेला मोकळे सोडून जे गवसेल ते द्यावे. 
गेल्या आव्हानात, धनंजय यांनी दर आठवड्याला धागा वर आणणे आणि पाक्षिक आव्हानाचे मासिक आव्हान करणे, हे मुद्दे मांडले होते. यावेळी तरी दोन्हीची गरज भासणार नाही असे वाटते. गरज भासलीच, तर 'ऐसी..' च्या व्यपस्थापकांशी सल्ला मसलत करून आवश्यकतेनुसार बदल केले जातील.
------
स्पर्धेचे नियम पुढीलप्रमाणे आहेत:
१. केवळ स्वतःने काढलेले छायाचित्रच स्पर्धेच्या काळात स्पर्धेसाठी प्रकाशित करावे. मात्र स्पर्धा काळ संपल्यानंतर, निकाल घोषित झाल्यावर त्याविषयाशी संबंधित इतरांची, इतरत्र पाहिलेली चित्रे योग्य परवानगी घेऊन इथे टाकल्यास हरकत नाही किंवा स्पर्धाकाळात टाकलेले इतरांचे चित्र स्पर्धेसाठी धरले जाणार नाही.
२. एका सदस्याला जास्तीत जास्त ३ चित्रे स्पर्धेसाठी प्रकाशित करता येतील. जर/जी छायाचित्रे स्पर्धेसाठी नसतील तर प्रतिसादात ठळकपणे तसे नमूद करावे.
३. आव्हानाच्या विजेत्यास पुढील पाक्षिकात आव्हानदाता आणि परिक्षक व्हायची संधी मिळेल. अर्थात आधीच्या आव्हानाचा विजेता पुढील पाक्षिकाचा विषय ठरवेल आणि विजेता घोषित करेल. (मग तो विजेता त्यापुढील पाक्षिकाचा आव्हानदाता व निरीक्षक असे चालू राहील.)
४. एक स्पर्धा २ आठवडे चालेल. म्हणजे आज सुरू होणार्या स्पर्धेचा शेवट ३० जानेवारी रोजी भा.प्र.वे.नुसार रात्री १२:०० वाजता होईल . ३१ जानेवारीच्या गुरुवारी विजेता घोषित होईल व तो विजेता पुढील विषय देईल.
५. पाक्षिक आव्हानाच्या धाग्यावर प्रकाशित झालेल्या चित्रांच्या तंत्रावर शंका विचारण्यावर, निकोप टिपण्या करण्यावर बंदी नाही. मात्र हे आव्हान आहे हे लक्षात घेऊन जिंकण्यासाठी/हरवण्यासाठी उगाच एखाद्याला टीकेचे लक्ष्य करू नये अशी विनंती. याचा अर्थ तुम्हाला हव्या त्या चित्रांबद्दल मुक्त निकोप चर्चा करण्यास प्रोत्साहन देण्याचेच धोरण आहे.
६. आव्हानाचा विजेता घोषित करण्याचे पूर्ण अधिकार आव्हानदात्यांचे असतील. त्यासाठी त्याने ठराविकच निकष लावावेत असे बंधन नाही. त्याने आव्हान द्यावे व त्याचे आव्हान कोणी सर्वात उत्तम पेलले आहे ते ठरवावे इतके ते सोपे आहे. शक्यतो ३ क्रमांक जाहीर केले जातील.(मात्र पुढील पाक्षिकात फक्त प्रथम क्रमांकाचा वीरच आव्हानदाता असेल). आव्हानदात्याकडून काय आवडले हे सांगण्याचे बंधन नसले तरी अपेक्षा जरूर आहे.
७. आव्हानदात्याला प्रथम क्रमांकाचा एकच आव्हानवीर घोषित करणे बंधनकारक आहे.
८. आव्हानात स्पर्धेसाठी प्रकाशित चित्रे प्रताधिकाराच्या दृष्टीने निकोप असावीत अशी अपेक्षा आहे.
९. आव्हानदाता स्वतःची चित्रे प्रकाशित करू शकतो मात्र ती स्पर्धेत धरली जाणार नाहीत.
१०. कॅमेरा व भिंगांची माहिती देणे बंधनकारक. शक्य असल्यास इतर तांत्रिक तपशील द्यावेत.
सूचना : 'ऐसी अक्षरे' संकेतस्थळावर आपली चित्रे कशी प्रदर्शित करावीत, याबद्दल अधिक मार्गदर्शन या धाग्यावर आहे. त्याचा लाभ घ्यावा.
चित्रे या संकेतस्थळावर टाकताना, जर Width आणि Height (दोन्ही) दिली नाही तर ते फोटो इंटरनेट एक्सप्लोरर् (९) वर दिसत नाहीत. (पण फायरफॉक्सवर दिसतात.) यावर उपाय म्हणजे Width आणि Height दोन्ही द्यावेत किंवा त्यांचा उल्लेखच इमेज टॅगमधून वगळावा. कृपया याची नोंद घ्यावी.
मागचा धागा: विषय - युगांतर.
स्पर्धा का इतर?
बिंब... प्रतिबिंब
बिंब... प्रतिबिंब १
स्थळः नेहरु सेंटर, वरळी, मुंबई

Camera:Canon PowerShot SX10 IS
ISO:200
Exposure:1/100 sec
Aperture:5.0
Focal Length :80mm
बिंब... प्रतिबिंब २
स्थळः एट्रीया मौल, वरळी, मुंबई

Camera: Canon PowerShot SX10 IS
ISO: 200
Exposure: 1/80 sec
Aperture:	4.5
Focal Length: 29mm
चिंच नव्हे, चिनार
दाल सरोवर, श्रीनगर
नोव्हेंबर २००४

Camera Canon PowerShot A40
Exposure 0.002 sec (1/500)
Aperture f/2.8
Focal Length 5.4 mm
Exposure Bias 0 EV
Flash Auto, Did not fire
X-Resolution 180 dpi
Y-Resolution 180 dpi
Date and Time (Modified) 2004:11:11 03:00:40
YCbCr Positioning Centered
Related Image Width 1600
Related Image Height 1200
Date and Time (Original) 2004:11:11 03:00:40
Date and Time (Digitized) 2004:11:11 03:00:40 
राजस्थान मध्ये कुठेतरी...मे
राजस्थान मध्ये कुठेतरी...
मे २०११
ऑलिम्पस म्यू ८२० 
- Exif Specific
    Exposure Time = 1/125 sec  [0.008]
    F Number = 33/10    [3.300]
    Exposure Program = Normal program
    ISO Speed Ratings = 50
    Exposure Bias Value = 0
    Max. Aperture Value = 344/100
    Metering mode = Pattern
    Light Source = Unknown
    Flash = Flash did not fire, automatic mode
    Focal Length = 6.40 mm
    Color Space = sRGB
    X Dimension (Pixel) = 1958
    Y Dimension (Pixel) = 2448
    Rendered by Customer = Normal process
    Exposure Mode = Automatic exposure
    White Balance = Automatic white balance
    Digital Zoom Ratio = 0
    Scene Capture Type = Standard
    Gain Control = None
    Contrast = Normal
    Saturation = Normal
    Sharpness = Normal

काचेच्या रुंदीवर सूर्योदय
- Primary Image
    Manufacturer = Canon
    Model = Canon EOS 550D
   - Exif Specific
    Exposure Time = 1/20 sec  [0.050]
    F Number = 8
    ISO Speed Ratings = 100
    Exif Version = 0221
    Original Create Time = 2011:03:22 06:57:20
    Digitalization Time = 2011:03:22 06:57:20
    Shutter Speed Value = 35/8    [4.375]
    Aperture Value = 6
    Exposure Bias Value = 0
    X Dimension (Pixel) = 2788
    Y Dimension (Pixel) = 1215

दिवाळीपूर्वी...२०११
File Name	IMG_2785.JPG
Camera Model	Canon EOS 550D
Firmware	Firmware Version 1.0.8
Shooting Date/Time	10/23/2011 11:59:49 PM
Owner's Name
Shooting Mode	Manual Exposure
Tv( Shutter Speed )	1/30
Av( Aperture Value )	5.6
Metering Mode	Evaluative Metering
ISO Speed	1600
Auto ISO Speed	OFF
Lens	EF-S18-55mm f/3.5-5.6 IS
Focal Length	18.0 mm
Image Size	2992x2000

सोपा पेपर
पेपर सोपा निघालाय तर अटेम्ट करायला काही हरकत नाही. :)
यापुर्वी उल्लेख केल्याप्रमाणे विषयानुरूप सहभागात फरक नक्किच पडतो आहे.
तर, माझी  प्रथम तीन चित्र स्पर्धेसाठी ग्राह्य धरावित. (हा निर्णय खरचच अवघड असतो.)
१) व्हिक्टोरिया मेमोरियल 

Exif data
Camera 	Sony DSC-W80
Exposure 	0.2 sec (1/5)
Aperture 	f/2.8
Focal Length 	5.8 mm
ISO Speed 	400
Exposure Bias 	0 EV
Flash 	Off
२) दिवे

Exif data
Camera 	Sony DSC-W80
Exposure 	1
Aperture 	f/3.2
Focal Length 	6.6 mm
ISO Speed 	640
Exposure Bias 	0 EV
Flash 	Off, Did not fire
Camera 	Sony DSC-W80
Exposure 	0.001 sec (1/1000)
Aperture 	f/5.2
Focal Length 	17.4 mm
ISO Speed 	320
Exposure Bias 	0 EV
Flash 	On, Return not detected
४) नांगरलेली बोट

Exif data
Camera 	Sony DSC-W80
Exposure 	0.008 sec (1/125)
Aperture 	f/5.2
Focal Length 	17.4 mm
ISO Speed 	250
Exposure Bias 	0 EV
Flash 	Off, Did not fire
५) गवताची काडी

Camera 	Sony DSC-W80
Exposure 	0.003 sec (1/320)
Aperture 	f/5.2
Focal Length 	17.4 mm
ISO Speed 	320
Exposure Bias 	0 EV
Flash 	On, Return not detected
६) धुक्यातली सकाळ

Exif data
Camera 	Sony DSC-W80
Exposure 	0.167 sec (1/6)
Aperture 	f/5.2
Focal Length 	17.4 mm
ISO Speed 	400
Exposure Bias 	0 EV
Flash 	Off, Did not fire
५. पाक्षिक आव्हानाच्या धाग्यावर प्रकाशित झालेल्या चित्रांच्या तंत्रावर शंका विचारण्यावर, निकोप टिपण्या करण्यावर बंदी नाही
हे जास्त होताना दिसत नाही असे नमुद करावेसे वाटते.
३_१४ विक्षिप्त अदिती यांचे पुलाचे चित्र मला विशेष आवडले. सगळिकडे असणारया आकाशी रंगामुळे असावे कदचित.
"रंग" याचा "रंग" हा फोटो, येथे जास्त आकाश व जास्त पाणी  जर फ्रेममधे समाविष्ट केले असते तर त्या वनराईचा स्व:ताचा असा एक आकर (व त्याचे प्रतिबिम्बही) दिसले असते व फोटो अजुन खुलुन दिसला असत असा माझा कयास.
तसेच, सुनील यांचा दाल सरोवरच्या फोटोमधे जो दगडी बांध आहे तो थोडासा तिरका असल्याने जरसा रसभंग होतो आहे. जर फोटो काढतेवेळी अथवा काढल्यानतर जरासा फिरवुन घ्यायला हवा.
अशा छोट्या छोट्या गोष्टिंमुळे फोटोमधे बराच फरक पडलेला दिसू शकतो.
-रवि
फोटो समीक्षा
पाक्षिक आव्हानाच्या धाग्यावर प्रकाशित झालेल्या चित्रांच्या तंत्रावर शंका विचारण्यावर, निकोप टिपण्या करण्यावर बंदी नाही
हे जास्त होताना दिसत नाही असे नमुद करावेसे वाटते
सहमत. 
जाणकारांची चर्चा केल्या तर, आमच्यासारख्या हौशी फोटूग्राफरांच्या ज्ञानात भर पडेल.
सुनील यांचा दाल सरोवरच्या फोटोमधे जो दगडी बांध आहे तो थोडासा तिरका असल्याने जरसा रसभंग होतो आहे.
अरेच्चा, हे आजतागायत (८+ वर्षे) लक्षातच आले नव्हते!
ते दाल सरोवराच्या मध्ये असलेले चार चिनार नावाचे बेट आहे. आणि त्या बेटाकडे जाताना डगडगत्या होडक्यातून काढलेला तो फोटो आहे. म्हणून कदाचित असे झाले असावे. फोटोवर नंतर थोडी डागडूजी करायला हवी होती हे मात्र मान्य!
सुनील, फोटोवरिल प्रतिक्रिया
सुनील, फोटोवरिल प्रतिक्रिया सकारात्मकपने घेतल्याबद्दल धन्यवाद.
फोटो काढताना बरिच बंधने असु शकतात, जसे आपल्याकडिल कॅमेरा, हाताशी असलेला वेळ वगैरे.
परतू फोटो संगनकावर उतरवल्यावर किमान brightness,contracst  व crop या दोन गोष्टि वापरुन फोटोत काही सकारात्मक बदल दिसुन येतो आहे का ते पहायला हवे.
-रवी
छान/ब्लेक
To see a world in a grain of sand,
And a heaven in a wild flower.
Hold infinity in the palm of your hand,
And eternity in an hour.
या विल्यम ब्लेकच्या एका कवितेतल्या (ऑगरिज् ऑफ इनोसन्स) ओळी हे छायाचित्र पाहून आठवल्या. (केवळ तेवढंच चित्राचं कथानक नसलं तरी.)
ह् म् म् !
मला तर 'एम्. सी. एशर्' या महान चित्रकाराच्या पुढील 'दि पडल्' या चित्राची आठवण झाली.
खरे तर एशरची आणखीही काही चित्रे या विषयाच्या दृष्टीने अनुरूप आहेत. ती पुढीलप्रमाणे -
१. थ्री वर्ल्डस्
भूमी, आकाश, जल ही तीनही विश्वे एकमेकान्त सामावलेली...
----
२. स्फीअर्
----
३. थ्री स्फीअर्स्
अगदी बरोबर
माझ्या चित्रात एम सी एशरच्या याच (अमुक यांनी दिलेल्या पहिल्या) चित्राचे संदर्भसूत्र होते. (आंशिक उद्धरणच म्हणा ना.) चालता-चालता ते डबके मला दिसले, आणी बघताच एशरचे ते चित्र आठवले. आणि छायाचित्रात तशीच काहीशी रंगसंगती आणण्याचा मी प्रयत्न केला. मी त्या डबक्याची वेगवेगळ्या कोनातून, पोलरायझर फिरवून-फिरवून अनेक चित्रे कॅमेर्यात साठवली, माझ्या सवंगड्यांना कंटाळायुक्त मौज वाटली!
अर्थात एशरच्या चित्रातले कथानक खूप गुंतागुंतीचे आहे, आणि माझ्या डबक्यातील कथानक खूपच साधे आहे. (म्हणून उद्धरण आंशिक आहे, पूर्ण नाही.) तरी माझ्या मनातील संदर्भ अमुक यांना तंतोतंत आठवला, याबद्दल मला फार म्हणजे फारच आनंद वाटत आहे.
विनंती / सुचना
विनंतीपर सुचना 
धाग्यात उल्लेख केल्याप्रमाणे width="" height=""  अश्या प्रकारचे उल्लेख HTML कोडमधून माढून टाकावेत. तसेच अंक रोमन लिपित द्यावेत (वरील काहि चित्रात अंक 450 ऐवजी ४५० असे दिल्याने चित्र दिसत नव्हते) अन्यता काही बाऊझर्स-वर्जन्समध्ये छायाचित्रे दिसत नाहीत. 
वर दिलेल्या चित्रांपैकी धनंजय, प्रज्ञा यांच्या छायाचित्रांत योग्य ते बदल केले आहेत. अजून कोणती चित्रे दिसत नसल्यास कळवावे
निकाल
सर्वप्रथम, प्रत्यक्ष सहभागी झालेल्या (आणि केवळ डोक्यातल्या डोक्यात छायाचित्र काढलेल्या पण कॅमेर्यात बन्दिस्त न केलेल्या ;)) सर्व सदस्यान्ना  धन्यवाद !
सगळी चित्रे पाहून मजा आली पण मग परीक्षण-निकालाचे कामही कठीण होऊन बसले...
क्र. १ :
प्रथम क्रमाङ्कासाठी माझ्या मनात,
 ऋता (ऋ) याञ्चे 'प्रतिबिंबावर हल्ला',
 अजित विश्वनाथ भागवत (अविभा) याञ्चे 'राजस्थान मध्ये कुठेतरी...मे' आणि
 धनंजय (ध) याञ्चे 'प्रतिबिंब (सोयीसाठी 'नेफ्रतीती' म्हणू)'
यान्त चुरस होती.
ती अश्यासाठी की, उत्कृष्ट छायाचित्रासाठी अचूक वेळी, अचूक त्या स्थळी, समोर दिसणारे दृश्य जे क्षणार्धात बदलणार आहे, ते योग्य प्रकारे कॅमेर्यातून टिपणे, हे महत्त्वाचे ठरते. त्यात, त्याक्षणी उपस्थित असण्यातला योगायोग आणि मग कौशल्य या दोहोञ्चा अजब मिलाफ असतो आणि म्हणूनच अशी चित्रे पाहायला अधिक मजा येते.
स्थिर असलेल्या दृश्यान्त माण्डणी, कोन, छायाप्रकाश कमी-जास्त करायला, थोडक्यात, तान्त्रिक बाबीङ्कडे लक्ष द्यायला अधिक वेळ मिळतो.
पण वरील तीन चित्रान्त, क्षणाचा विलम्ब झाला असता तर हवा तो परिणाम साधला गेला नसता.
कथानकाच्या दृष्टीने ऋ आणि अविभा याञ्ची चित्रे खूप आवडली.
अविभा याञ्चे चित्र तान्त्रिक बाबतीत कमी पडले. माझ्या दृष्टीला (ध म्हणतात त्याप्रमाणे) चित्र कातरण्याची गरज भासली नाही पण उजेड अधिक वाटला. थोडे कमी भगभगीत असते तर अधिक प्रभाव पडला असता.
तान्त्रिक आणि कल्पनेच्या दृष्टीने ऋता आणि धनंजय याञ्ची दोन्ही खूप आवडली.
'नेफ्रतीती' चित्रात प्रकाश, रङ्ग आणि पोत या तिन्हीचे मिश्रण एका वेगळ्याच स्वप्नील प्रदेशात नेते. मुलीची नजर आणि नेफ्रतीतीचे प्रतिबिम्ब नेमके त्या रेषेत येणे हे फारच मस्त जुळले आहे. छायाचित्राकडून चित्राकडे नेणारा प्रयत्न !
पण तरीही, स्पष्ट कथानक असलेले, प्रचण्ड नाट्यमय, प्रतिबिम्ब या विषयाला थेट स्पर्श करणारे आणि एका विलक्षण गतिमान क्षणात प्रेक्षकाला खेचून नेणारे चित्र म्हणून ऋता याञ्च्याच चित्राची निवड कराविशी वाटली. साधारणतः गतिमान गोष्टीला, कॅमेर्यात हवे तितकेच गतिमान पकडणे हे कठीण असते. ते इथे अतिशय छान जमले आहे.
अभिनन्दन ऋता ! पुढील आव्हान तुम्ही द्यावे ही विनन्ती.
अविभा आणि ध यान्त अविभाना थोडे झुकते माप कारण चित्र पाहताच विषय अधिक चटकन ध्यानात येतो.
म्हणून -
क्र. १.१ - ऋता
क्र. १.२ - अजित विश्वनाथ भागवत
क्र. १.३ - धनंजय
----------------------
क्र. २ 
३_१४ विक्षिप्त अदिती याञ्चे 'पूल', रवि याञ्चे 'प्रतिबिंब जनु'
'पूल' -
या चित्रात काहितरी आकर्षक आहे पण काय आकर्षक आहे, हे अजूनही शब्दान्त माण्डता येत नाही. पण पाहताक्षणी खिळवून ठेवणारे, जरा थाम्बून एक एक भाग नीट पाहवा असे वाटायला लावणारे चित्र.
प्रतिबिम्बामुळे कमान पूर्णत्वास जाऊन तयार झालेला लम्बगोलाकार, एक सताड उघडा डोळाच आपल्याकडे पाहत आहे असा भास निर्माण करून गेला.
तान्त्रिक दृष्ट्या रवि याञ्च्या चित्रापेक्षा उजवे.
'प्रतिबिंब जनु' -
'लहान माझी बाहुली, मोठी तिची सावली' ची आठवण झाली. प्रतिबिम्बाचा एक वेगळा आविष्कार ! दोघीञ्चे कपडे, बाङ्गड्या, गजरे, केसाञ्ची ठेवण, भाङ्गरेषेतला शेन्दूर, इ. इ. गोष्टी एकीचेच दुसरी प्रतिबिम्ब असल्यासारखी. त्यातही धाकटी वयसुलभतेने कॅमेर्याला भिडस्त तर थोरलीचा (चार पावसाळे अधिक पाहिल्याने) तो स्वभाव गळून पडलेला.
थोडक्यात, बहुतेक सगळ्याञ्चेच आपल्या लहानपणचे आणि मोठेपणचे प्रतिबिम्ब !
क्र. २.१ - ३_१४ विक्षिप्त अदिती
क्र. २.२ - रवि
----------------------
क्र. ३
३.१ प्रज्ञा - 'Bare Trees' - वातावरणातला गोठलेपणा आणि निष्पर्ण काटक्याञ्चे आकार छान पकडले आहेत. पाण्यातली गडद होत जाणारी निळी झाक विशेष आवडली.
३.२ धनंजय - 'डबके' - कल्पक ! डबक्याच्या कडा कमी धूसर असत्या तर अधिक मजा आली असती, असे वाटले.
३.३ चिऊ - 'फुगे' : प्रतिबिम्बासाठीच खास टिपलेले असे चित्र.
३.४ रंग - 'रंग' : प्रतिबिम्बित रङ्ग खरोखरच सुन्दर आहेत. टिपण्याचा अवधी (एक्स्पोजर्) कमी आणि छाया-प्रकाशाचा विरोधाभास (कॉण्ट्रास्ट्) अधिक हवा होता. सम्पृक्तता (सॅच्युरेशन्) कमी हवे होते. मग चित्र अधिक खुलले असते.
इतर सर्व चित्रान्त उल्लेखनीय गोष्टी आहेत पण विस्तारभयाने आवरते घेतो. सर्वान्ना धन्यवाद !
---------
आता थोडे स्पर्धेविषयी -
स्पर्धा अधिकाधिक कल्पनान्ना सामावून घेणारी असावी आणि छायाचित्रण अधिकाधिक तान्त्रिक बाबतीत पुढे जावे यासाठी सर्वप्रथम सहभाग असणे महत्त्वाचे. गेल्या दोन आव्हानान्त ते (वेगवेगळ्या कारणाम्मुळे) जमू शकले नाही. धनंजय आणि ऋषिकेश याञ्च्या मूळ सूचनान्त थोडी भर घालून, एक-एक महिन्याच्या दोन स्पर्धा १५ दिवसाञ्च्या अन्तराने चालू कराव्यात असा प्रस्ताव आहे. बाकी नियम तेच राहतील.
उदा -
या आव्हानाच्या क्र. १.१ च्या विजेत्या ऋता या १ ते २७ फेब्रुवारी असे आव्हान देतील आणि क्र. १.२ चे अजित विश्वनाथ भागवत (किंवा क्र. २.१ च्या ३_१४ विक्षिप्त अदिती) हे १५ फेब्रुवारी ते १५ मार्च असे दुसरे आव्हान देतील.
या प्रकारच्या आव्हानचक्रामुळे विषयात वैविध्य येईल, सतत प्रोत्साहन मिळेल आणि कालावधी वाढल्याने सहभागही वाढेल अशी आशा.
याविषयीचा निर्णय साहजिकच व्यवस्थापकाञ्च्या हाती..
         






एकेकाळी या विषयाचं फार वेड
एकेकाळी या विषयाचं फार वेड लागलं होतं. विषय आवडला. लवकरच फोटोही चढवते.