आयडी आणि व्यक्ती

एका नाटकातलं दृश्य: एक सुंदर स्त्री आपला मेकप उतरवते आहे. चेहऱ्यावरचे रंग काढल्यावर आपल्याला दिसतं की तिच्या चेहऱ्यावर भाजल्याचे चट्टे आहेत. दाट केसांचा विग उतरवल्यावर तिचे केस अगदी तोकडे आणि रयाहीन दिसतात. पाच मिनिटांपूर्वी मी जिच्यावर भाळलो होतो ती आता कुरुप दिसायला लागली आहे.

नाटक संपल्यानंतरची पार्टी: नाटक करणारा चमू माझ्या ओळखीचा असल्याने मी त्यांना नाटकाचा प्रयोग चांगला झाल्याबद्दल अभिनंदन करायला जातो. इथे त्याच सुंदर/कुरुप स्त्रीचं काम करणारी तरुणी हजर. आता तिने मेकप उतरवला आहे. म्हणजे अर्थातच पार्टीसाठी नीटनेटकं दिसण्याइतपत वेगळा मेकअप आहेच. ती छान दिसते. कुरुप स्त्रीचा लवलेशही नाही. त्या पहिल्या सुंदर स्त्रीचा मादकपणा नाही. काहीसं घरगुती सौंदर्य.

नाटकाची पार्टी संपवून ती जेव्हा घरी जाते तेव्हा हाही मेकप उतरत असेल. तेव्हा तिचा चेहरा कसा दिसेल?

कांद्याची वरची साल सुकी म्हणून काढतो. आतला कांदा ताजा टवटवीत रहावा म्हणून ते संरक्षक कवच असतं. कधी कधी त्याआतलीही साल काहीशी सुकलेली असते. तीही आपण काढून टाकतो. आतला कांदा खरा कांदा. अशा साली उलगडत गेलं तर शेवटी कांदा राहील का?

आपलं व्यक्तिमत्व म्हणजे नक्की काय? कुठचे मुखवटे खरे? कुठचे त्वचेत इतके भिनलेले की वेगळे काढणं अशक्य? किती साली उलगडल्यानंतर खरा कांदा दिसतो?

आपल्याला मुखवट्यांची सवय असते. मुखवटे पहाण्याचीदेखील सवय असते. कधीकधी, मुखवट्याखालच्या चेहऱ्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करण्याचीही सवय असते. नाटक किंवा सिनेमा बघताना हे जाणवतं. मुहम्मद युसुफ खान नावाचा माणूस, दिलिप कुमार म्हणून माहीत असतो. हा एक थर. शक्ती या सिनेमात तो समोर येतो तो अश्विनी कुमार म्हणून. मिशी लावतो, खाकी वर्दी चढवतो, घरात बसून ब्रेकफास्ट टेबलावर आपल्या पोराशी बोलतो. हा दुसरा थर. त्या सिनेमात तो कर्तव्यदक्ष पोलिस अधिकारी आणि एक बाप असे दोन मुखवटे बाळगतो. ते एकमेकांशी जुळत नाहीत. किंबहुना त्याच्या मुलाला कायम पोलिसाचाच मुखवटा दिसल्याने त्यांच्यात वैर निर्माण होतं. यातूनच संघर्ष होतो. हा तिसरा थर. आपण खालच्या सगळ्याकडे दुर्लक्ष करून वरच्या मुखवट्यांकडे लक्ष देतो, म्हणूनच कथेत गुंगून जातो.

हे प्रश्न आंतरजालावर वावरताना जास्तच गहिरे होतात. खऱ्या जगात प्रकरण थोडं सोपं असतं. तिथेही मुखवटे बदलले जातातच. घरात घरच्यांशी वागताना एक रूप, जवळच्या मित्र-मैत्रिणींत मिसळताना आणखीन थोडा वेगळा आविष्कार, ऑफिसात काम करतानाचा शक्य तितका प्रोफेशनल चेहरा... आणि या सगळ्यांत एकातून दुसऱ्यात आपण लीलया शिरत असतो. ऑफिसमध्ये असताना घरनं मूल आजारी असल्याचा फोन आला की तेवढ्या वेळापुरती भूमिका बदलते. आजार फार गंभीर नसेल तर पुन्हा आपला मुखवटा ठीकठाक करून मीटिंगमध्ये सहज परततो. हे असलं तरी निदान दिसण्यापुरतं तरी एकच शरीर असतं, एकच चेहरा मीटिंगमध्ये आणि फोनवर असतो. माध्यमाची एकसंधता (कंटिन्युइटी) रहाते.

आंतरजालावर मात्र मुखवटा घालणं हे पराकोटीला जातं. नाटकासाठीचा साधा मेकप नसतो हा. या मुखवट्याआडचा चेहरा दिसण्याचीच गरज नसते. संपूर्णपणे नवीन व्यक्तिमत्व धारण करता येतं. लांडग्याला मेंढराचं कातडं पांघरून वावरता येतं. तसंच कांद्यावर आंब्याची साल घालूनही मिरवता येतं.

ही कल्पना थोडीशी भीतीदायक वाटते. आपण नक्की कोणाशी बोलतो आहोत हे आपल्याला माहीत नसतं. त्यामुळे संगणकपटलावर उमटणाऱ्या काळ्या पांढऱ्या चिह्नांतूनच आपल्याला दिसणाऱ्या व्यक्तिमत्वाचा आपण थांग घेत असतो. अर्थात खऱ्या जीवनातही हे काही अर्थाने लागू होतंच. डोळ्यांना दिसणारं, कानांना ऐकू येणारं यापलिकडे आपल्याला समोरच्याच्या मनाचा थांग लागण्यासाठी काही दुसरा मार्ग नसतो. तिथेही धोके होतातच. निदान तिथे आपल्याला अनेक वर्षांचा अनुभव तरी असतो. आंतरजालावर मात्र हे पहिल्यापासून शिकावं लागतं. खऱ्या जगात जायचं की नाही याबाबत पर्यायच नसतो. आंतरजालावर येणं ही आपली निवड असते त्यामुळे धोक्यांबद्दल दोष स्वतःलाच द्यावा लागतो.

पण त्याचबरोबर हे स्वातंत्र्य आल्हाददायकही ठरू शकतं. खऱ्या जगात आपली प्रतिमा बदलण्यात आपली प्रतिमाच कधीकधी आड येते. इथे तो प्रश्न नाही. नवी विटी नवं राज्य म्हणून आपण आपली प्रतिमा हवी तशी ठेवू शकतो. प्रत्यक्ष जीवनात तुम्ही बुजरे असाल तरी या जगात मनमोकळे गप्पिष्ट म्हणून मान्यता पावू शकता. तुम्ही खरोखरचे भडक माथ्याचे, ताडकन् बोलणारे असाल तरी इथे शांत सुस्वभावी म्हणून प्रतिमा निर्माण करू शकता. एखादा साधाभोळा, धार्मिक मनुष्य इथे वावरून मवाल्याची भूमिका निभावू शकतो. आपल्या व्यक्तिमत्वाचा अविकसित पैलू तुम्ही इथे पडताळून पाहू शकता. तुम्हाला खऱ्या जगात काही ना काही कारणाने ज्या गोष्टी करायला जमत नाहीत त्या इथे काही प्रमाणात करता येतात.

आणि शेवटी ही सगळी कुठल्यातरी पटलावर उमटणारी काळी पांढरी चिह्नं असल्याने कशानेच काहीच फरक पडत नाही. कोणालाच कसलीच दुखापत होत नाही. की हे तितकंसं खरं नाही...? आयडीचा मुखवटा आपल्या त्वचेत किती भिनतो?

इतरही प्रश्न आहेत. आयडी हा मुखवटा जर खरोखर त्वचेत भिनत असेल तर एका संस्थळावर एखाद्या व्यक्तीचा जो आयडी असेल, तोच आयडी दुसऱ्या संस्थळावर मिळायला हवा का? (मला एक उदाहरण असं माहीत आहे की एक व्यक्ती तीन संस्थळांवर एकच आयडी घेऊन वावरते. पण चौथ्या संस्थळावर मात्र त्या व्यक्तीचा आयडी आधीच घेतला गेला होता. त्यामुळे अनेकदा तिथे 'हा माझा आयडी नव्हे' असा खुलासा त्या व्यक्तीला द्यावा लागतो.) एखाद्या संस्थळाशी लॉयल्टी असणं म्हणजे काय? एखाद्या क्लबमध्ये जातो, तिथे आपले नेहमीचे मित्र भेटतात, चार घटका मजेत जातात. तितकंच आहे का? की त्याहीपलिकडे काही आहे?

Taxonomy upgrade extras: 
field_vote: 
4
Your rating: None Average: 4 (1 vote)

प्रत्येक संस्थळावर वेगळा आय डी असावा असे माझे मत आहे...
आणि ते स्वतःचेच पूर्ण नाव नसावे असेही वाटते.

असो..

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

प्रत्येकजण आपली इमेज बनवण्याचा आणि जपण्याचा प्रयत्न नक्कीच करत असतो आणि त्यात गैर काहीच नाही. शाळेत जाणाऱ्या एखाद्या उनाड मुलाने नातेवाईकांसमोर शहाणा, सभ्य, आज्ञाधारक मुलासारखं वागावं ( जे आई वडिलांना अपेक्षित असतं Smile ) तसाच काहीसा मामला आहे . माणसाला मुखवटे धारण करायला आवडतं. मनात कितीतरी गोष्टी असतात कि ज्या आपल्याला एक अबक व्यक्ती म्हणून करता येत नाहीत किंवा करायची मनाची तयारी नसते, तीच गोष्ट मुखवटा धारण करून मात्र सहजपणे करू शकतो. एखादा ऑफिस मधला कर्दनकाळ बॉस त्याच्या घरी प्रेमळ, मनमिळावू असू शकतो किंवा परिस्थिती उलट देखील असू शकते.

आंतरजालावर स्वतःची ओळख मुळ व्यक्तीमत्वापेक्षा वेगळी ठेवण्या मागे प्रत्येकाची वेगळी कारण देखील असतील. काहीजण उगीचच सलगी दाखवतात, नोकरी/ व्यवसायानिम्मित गळ्यात पडतात, मुलींना येणारे विचित्र अनुभव तर सार्वत्रिक आहेत. कधीही न पाहिलेल्या, कसलीही ओळख नसलेल्या व्यक्तींना सामोरं जाताना मुखवटा धारण केलेला नक्कीच चांगला. पलीकडची व्यक्ती कशी असेल, कशी वागेल याचा अंदाज दोन्ही माणसं घेतंच असतात.

राजेश ह्यांनी लेखात मांडलेला मुद्दा कि तोच आयडी दुसऱ्या संस्थळावर मिळायला हवा का? मला तरी वाटतं कि शक्य असेल आणि आवडत असेल तर एकंच आयडी वापरावा. जर समजा एखाद्याला स्वतःची ओळख आंतरजालीय कानफाट्या किंवा आंतरजालीय ज्ञानेश्वर अशीच ठेवायची असेल तर त्यात बिघडलं कुठे? जर तो आयडी दुसऱ्या ठिकाणी उपलब्ध नसेल तर त्याची गोची होईल, प्रत्येक ठिकाणी खुलासे करावे लागतील. फक्त याचा फटका संस्थळ आणि सभासद यांना होवू नये याची काळजी त्याने घ्यावी त्यातून निष्पन्न होणारे बरे वाईट परिणाम त्याने भोगावेत.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

तूमचा तिकडचा आयडी कोणता हो? Wink (ह. घेणे)

लेखातील आणि विरोचन यांच्या प्रतिसादील काही निरिक्षणे पटण्या सारखी आहेत. पण एकच व्यक्ती घरात आणी ऑफिसात जशी वेगळी व्यक्तीमत्त्वे एकाच नावाने बाळगू शकते तसेच एकाच आयडीने संस्थळानूसार वावरता येईलच. अर्थात, नवी नावं घेऊनही तेच राज्य चालवता येईल सूद्धा. नविन राज्य सूरू करवे का हा ज्याचा त्याचा प्रश्न.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-Nile

ओह आलं लक्षात Smile :). पेटली आमची टूब. ट्रायल बॉलला विकेट काढता काय आमची Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

हं... वाचलं, वाचतो आहेही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

लेखातले मुद्दे पटले

माझ्या मते संस्थळावर वेगवेगळे आयडीनाम (डुआयडी नव्हे) घेण हा व्यक्तीगत प्रश्न आहे

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

.

प्रत्येकाची आवड!! सगळीचकडे साली काढत बसायचं का?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

प्रत्येकाची आवड!! सगळीचकडे साली काढत बसायचं का?

छ्या... तुम्हाला पंक्चर करण्याची सुपारी दिलीय का कोणी? नाही ना? अहो, धागा त्यासाठीच तर काढलेला आहे. सालं सोलण्याचंच काम करायचं इथं. ट्यार्पी, ट्यार्पी. Wink
नायल्या, घे हा एक प्रतिसाद. दे श्रेणी, आचरट किंवा तत्सम काही तरी. Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सदरील आयडी आम्हाला परिचीत असलेल्या सेन्सिबल मोडकांचाच आहे काय? आम्हाला विपरीत शंका येऊन राह्यलीए! Blum 3

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-Nile

अच्रत, बव्लत!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

चेहऱ्यांच्या जगात देखील माणूस क्षणा-क्षणाला बदलतच असतो, समृद्ध होत असतो, पण हा बदल आणि ही समृद्धता सगळेच जाणतेपणी व्यक्त करू शकत नाहीत, स्वतःच तयार केलेल्या कोंदणातून बाहेर पडण्याचे धैर्य होत नाही, समाज काय म्हणेल ही भीती सतावते, अशा वेळी हा अंतरजाल त्या बंधनातून मुक्त होण्याचा मार्ग वाटतो, पण ती फसवी मुक्तता असते, तो एका कोंदणातून निघून दुसऱ्या कोंदणात अडकतो, त्याला जोपर्यंत हे कळत नाही की तो स्वतःच स्वतःला अडकवत असतो तोपर्यंत तो भूमिका बदलत राहणार आणि म्हणत राहणार "तो मी नव्हेच".

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

इतकं निगेटिव्हं कशापायी होऊन राह्यलात राव.. अरे यांना दोन आयडी द्या रे प्लीज! Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-Nile

Smile अजून काय काय देणार? Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

जे बाहेरच्या जगात चालते तेच येथे चालते.

बाहेरच्या जगात एखादा सहकर्मचारी प्रमोशनने तुमचा बॉस बनतो आणि त्याच्यात आणि इतर कर्मचार्‍यांत दरी निर्माण होते, हे ही मुखवटे बदलण्याचेच उदाहरण. ऑफिसमध्ये सिंहासारख्या डरकाळ्या फोडणारे बॉस घरात मांजरासारखे म्याव करत असावे असा अंदाज माझी एक मैत्रिण नेहमी मांडते.

मुखवटे घालून समोरासमोर वावरणार्‍या माणसांचे मुखवटे ओरबाडून काढणे हे जालावरील मुखवटे ओरबाडून काढण्यापेक्षा सोपे असते. निदान असा समज तरी दिसतो त्यामुळे जालावर मुखवटे अधिक आढळतात.

असो.

मराठी संकेतस्थळांवर माणसे तिच ती असतात. वेगळे मुखवटे म्हणजे खोडसाळपणाच असे वाटत नाही. निदान वेगळ्या मुखवट्यांनी माणसाची वेगळी बाजू समोर येत असेल तर मला तरी प्रत्यवाय नाही. त्यापेक्षा तेच ते लेख इथे आणि तिथे नकोसे वाटतात.

आयडी हा मुखवटा जर खरोखर त्वचेत भिनत असेल तर एका संस्थळावर एखाद्या व्यक्तीचा जो आयडी असेल, तोच आयडी दुसऱ्या संस्थळावर मिळायला हवा का?

हा केवळ मुखवटा स्वतःच्या त्वचेत भिनण्याचा प्रश्न नसून इतरांच्या मनात ठसण्याचाही आहे. उद्या, आमचे मित्र बिपिन कार्यक्रते हे सर्वद्वेष्टे अशी आयडी घेऊन वावरू लागले तर ते पटेल का? Wink ह. घ्या.

मला एक उदाहरण असं माहीत आहे की एक व्यक्ती तीन संस्थळांवर एकच आयडी घेऊन वावरते. पण चौथ्या संस्थळावर मात्र त्या व्यक्तीचा आयडी आधीच घेतला गेला होता. त्यामुळे अनेकदा तिथे 'हा माझा आयडी नव्हे' असा खुलासा त्या व्यक्तीला द्यावा लागतो.

मालक, किंचित गैरसमज होतो आहे पण राहू द्या. Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

राजेश घासकडवी (काही लोक घासकडबी असे लिहितात) हा आयडी माझा नाही.

खुलासा संपला.

बाकी चालु द्या...

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º©
Only Fairy Tales Have Happy Endings ...
आमची राज्ये :-
राज्य १
राज्य २

प्रतिसाद माहितीपूर्ण आहे. Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

हॅ हॅ हॅ.
माहितीपूर्ण प्रतिसाद हे पराचे वैशिष्ट्य होय.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ऐसी अक्षरे गिरवीन की....

मस्तच लेख गुर्जी.
टारेश जांभईकाढवी

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ऐसी अक्षरे गिरवीन की....

छान मुक्तक !

मला 'मधुबाला' आवडते. जरी पडद्यापुरता का होईना ती त्या नावाचा मुखवटा घालून आली असली तरी. तिचा खरा 'मुमताजबेगम' चा चेहरा मी ओळखू शकतो पण पडद्यावरून प्रत्यक्षात उतरलेली मुमताजबेगम मला मधुबाला इतकी भावू शकणार नाही कारण खर्‍या चेहर्‍यामागील जग मी पाहिलेले नसते. जालीय दुनियेत घेतलेल्या खर्‍याखोट्या नावासमवेत 'मुद्रा' देण्याची सोय असली तरी, आणि काहीजण देत असले तरी, त्या नावाच्या मुखवट्यापेक्षा त्या नावासोबत येत असलेले विचार आणि अभ्यास याकडे लक्ष देणे गरजेचे आहे.

लेखक लिहितात "तुम्ही खरोखरचे भडक माथ्याचे, ताडकन् बोलणारे असाल तरी इथे शांत सुस्वभावी म्हणून प्रतिमा निर्माण करू शकता." ~ खरंतर या विश्वाचा महत्वाचा उपयोग आहे तो हाच की तुम्ही इतरांच्या दृष्टीने त्रासदायक असलेला तुमचा स्वभाव इथे न उलगडता स्वतंत्र अस्तित्व निर्माण करू शकता. माझ्या नोकरीत 'साहित्य' आणि त्याच्या अनुषंगाने येणारे विचार 'Taboo' मानले जातात. परगावी ऑडिटला जाणे म्हणजे 'चैन' करायला [तीही सरकारी खर्चाने] जाणे असा सरळसरळ अर्थ असल्याने तिथे रात्रीच्या निवांतक्षणीही एखादी व्यक्ती पुस्तक घेऊन शांतपणे वाचत बसली आहे हे दातात अडकलेल्या शेंगदाण्याचा कुटाप्रमाणे सलते. थोडक्यात मी त्या युनिटला नको असणारी व्यक्ती आहे. पण म्हणून मी स्वतःला चिडका, भडक माथ्याचा बनू दिलेले नाही. फक्त अशा प्रवृत्तीच्या लोकापासून दूर राहून आपल्याला हवा तो मुखवटा घेऊन जालीय विश्वात वावरले की आनंद हा होणारच.

लेखकाच्या शंकेनुसार हा सुखावा देणारा एकच आयडी घेऊन जालीय दुनियेतील विविध बागेत जाऊन तिथेही रममाण होता येईल असे माझे वैयक्तिक मत, अनुभव आहे. मात्र ज्या व्यक्ती एकापेक्षा अनेक मुखवट्यांनी सफर करतात त्यांचीही काहीएक भूमिका असेल. मला त्याबाबत विचारण्याचा अधिकारही नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

चांगले लिहिलय Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आयडी तोच राहिला तरी प्रतिमा तशीच राहते असं नाही.

राजेश घासकडवी जेव्हा जालावर अवतरले तेव्हा त्यांची जी प्रतिमा (दृश्य नव्हे) माझ्या मनात उमटली होती ती (प्रत्यक्ष भेट कधीही झाली नसूनही) पुढेपुढे बदलत गेली.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

त्यांची जी प्रतिमा (दृश्य नव्हे) माझ्या मनात उमटली होती ती (प्रत्यक्ष भेट कधीही झाली नसूनही) पुढेपुढे बदलत गेली.

तुम्हाला 'रसातळाला गेली' असे म्हणायचे आहे का थत्ते चाचा ?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º©
Only Fairy Tales Have Happy Endings ...
आमची राज्ये :-
राज्य १
राज्य २

माणूस जसा बदलत जातो, जाऊ शकतो तसाच आयडीचा मुखडाही बदलत जाऊ शकतो. कदाचित ती होणारी उत्क्रांती हे 'हा आयडी आहे, तो स्वतःपेक्षा वेगळा दिसला तरी चालू शकेल' या हळुहळू होणाऱ्या जाणीवेतून होत असेल.

झाला अंक समाप्त एक! बदले ही भूमिका, वेष हा...
-मर्ढेकर

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

वेगवेगळे आयडी घेऊन वावरतांना सुरूवातीला इतरांची मजा पाहता येते. काही काळानंतर वेगवेगळ्या सदस्यनामांच्या प्रतिमा प्रत्यक्ष आयुष्यात असलेल्या व्यक्तिमत्त्वाशी कन्वर्ज होतात. अगदीच ठरवून अट्टाहासाने एखादी प्रतिमा जोपासायची असल्यास तसे करता येते पण त्यासाठी वावर कमी ठेवावा लागतो पण एकूणात तो महाकंटाळवाणा प्रकार आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

बराच अनुभव दिसतोय.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

होय. बराच अनुभव आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

चेतन सुभाष गुगळे
भ्रमणध्वनी - ०९५५२०७७६१५
Electronic Mail Address :- chetangugale@gmail.com

चांगले स्फुट आहे. (सामाजिक विश्लेषणपेक्षा थोडे ललितसाहित्याकडे झुकते आहे. हा दोष नव्हे.)

प्रत्यक्ष जीवनात तुम्ही बुजरे असाल तरी या जगात मनमोकळे गप्पिष्ट म्हणून मान्यता पावू शकता. तुम्ही खरोखरचे भडक माथ्याचे, ताडकन् बोलणारे असाल तरी इथे शांत सुस्वभावी म्हणून प्रतिमा निर्माण करू शकता. एखादा साधाभोळा, धार्मिक मनुष्य इथे वावरून मवाल्याची भूमिका निभावू शकतो.

याकरिता विलक्षण प्रतिभा लागेल, असे वाटते. प्रतिभा नसेल, किंवा कौशल्य नसेल त्या वेगळ्या प्रकारचा व्यक्ती कुठल्या प्रकारे वागतो, त्याबद्दलच्या गैरसमजाची नक्कल होईल.

आपल्या व्यक्तिमत्वाचा अविकसित पैलू तुम्ही इथे पडताळून पाहू शकता.

हेच होत असावे बहुधा.

शेवटच्या परिच्छेदातले प्रश्न गुंग करणारे आहेत.

- - -

दीर्घकालिक संवादामध्ये (आणि नात्यांमध्ये) संवादकांच्या आगल्या-मागल्या वक्तव्यांमध्ये (आणि व्यक्तीच्या कृतींमध्ये) काहीतरी सुसूत्रता असली तर बरे असते. कुठल्याही लहान काळात त्या संवादकांची बहुतेक मते जशीच्यातशी राहातात आणि थोडीच मते बदलतात. म्हणजे बदलही चालतो, फक्त सुसूत्रता छिन्नविच्छिन्न करणारा बदल संवादाला (किंवा नात्याला) मारक असतो. आयडी किंवा ओळखीची तेवढीच गरज. (म्हणजे खूपच गरज.)

खर्‍या आयुष्यात एका मांसपिंड-व्यक्तीशी दुसर्‍या मांसपिंड-व्यक्तीची एकच अकृत्रिम "डीफॉल्ट" ओळख असते. ही बाब सैद्धांतिक नसूनही फार म्हणजे फारच सोयीस्कर आहे. या अकृत्रिम ओळखीपेक्षा वेगळ्या ओळखी असू शकतात. (म्हणजे माझ्या सद्गुणी मित्राला मी स्टेजवर दुष्ट पात्र वठवताना बघू शकतोच.) पण कृत्रिम ओळख मानण्याच्या स्थितीला सुस्पष्ट चौकट असते. म्हणजे नट-मित्राने तोंडाला रंग फासणे, डॉक्टर-वैर्‍याने "व्यावसायिक नीतीची प्रतिज्ञा घेऊन" - पांढरा कोट चढवून - सल्ला देणे, वगैरे. चौकट दिली नाही, तर फार गैरसोय होते.
समजा मित्रांमित्रांत हा संवाद होतो :
क : मला फार गरज आहे. शंभर रुपये आताच्या आता देशील काय? (वाक्य १)
ख : देऊ शकतो. कधी परत करशील? (वाक्य २)
क : उद्या संध्याकाळी नक्की परत करेन. (वाक्य ३)
ख : हे घे पैसे. (वाक्य ४)
आता "क" मांसपिंड-व्यक्ती म्हणाला की वाक्य क्रमांक १ "मित्र" या मुखवट्याने बोलले आहे, पण वाक्य ३ "नट" या मुखवट्याने बोलले आहे, त्यामुळे पैसे तर घेईल, पण परत मात्र करणार नाही... तर तो संवाद आणि कृति-शृंखला फारच त्रासदायक होईल. म्हणून मुखवटा बदलताना सुस्पष्ट चौकट हवी.

- - -
(पहिला दृष्टांत हा केवळ दृष्टांत आहे, आणि समजलासुद्धा आहे. परंतु दृष्टांतापेक्षा अधिक, म्हणजे "आयडीशी कसे वागावे" यासाठी चाचणी मात्र नाही. जर त्या स्त्रीशी (म्हणजे त्या कालक्रमात सुसूत्र - कॉन्टिन्युइटी असलेल्या - मांसखंडाशी) प्रणय करायचा असेल, तर वेगवेगळ्या वेळी, वेगवेगळ्या मेकअपमध्ये, आणि बिनामेकअपमध्ये ती कशी दिसते त्याच्या विश्लेषणाला काही कृतिशीलता आहे. नाहीतर "ते तिथले क्षितिज सकाळी लाल दिसले, दुपारी निळे दिसले, आणि रात्री काळे दिसले - त्या क्षितिजाबद्दल काय विचार करावा ते कळेनासे झाले आहे!" असे थोडेच कोणी म्हणते.

- - -

एका मांसखंड-व्यक्तीने (अथवा एक मतदार-ओळखपत्र धारकाने) आंतरजालावर किती आयडी घ्यावे, त्याबद्दल मला सोयरसुतक नाही. मात्र कधीकधी त्या वेगवेगळ्या आयडी एकच व्यक्ती आहेत, कधीकधी वेगवेगळ्या हस्ती आहेत, हे लक्षात ठेवायच्या भानगडीत माझी त्रेधा उडायला नको - अशी माफक अपेक्षा आहे. म्हणजे संकेतस्थळ "क्ष" वरची चर्चा संकेतस्थळ "य"वरती व्यक्तिगत निरोप वा खरडवहीत चालवायची असेल, तर मग एक कुठलातरी मुखवटा मला दाखवा. असे म्हणायला नको : पण संकेतस्थळ "क्ष" वर संवाद करताना माझी मते वेगळीच आहेत, आणि "य" वर वेगळीच.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

लेख, विरोचन आणि धनंजय यांचे प्रतिसाद आवडले.

आपली जालीय ओळख तीच असावी जेणेकरून आपले मित्रमंडळ, आपल्या नावावरून आपलं लिखाण वाचणारे वा टाळणारे या सर्वांची सोय व्हावी हे पटण्यासारखं आहे. वेगवेगळ्या प्रकारचं लिखाण करण्यासाठी वेगळा आयडी वापरणं, (जुन्या जाणत्यांना उदाहरण देण्याची गरज नसावी), आपल्याच प्रतिमेचा कंटाळा येऊन वेगळा आयडी वापरणं हे प्रकारही सर्रास होतात. याच संदर्भात आणखी विचार करते आहे. आयडी बंद/ब्लॉक झाला असेल तर काय? कारवाई होईपर्यंत सामान्य/सन्मान्य वाटणारा आयडी अचानक अश्लाघ्य वागू शकतो; दुसर्‍या संस्थळावर जाऊन गरळ ओकलं जातं. एखाद्या संकेतस्थळावर दुष्ट समजला जाणारा दुसर्‍या संकेतस्थळाच्या आतल्या लोकांपैकी एक असेल तर तेच नाव धारण करणारा आयडी अचानक वर्तन बदलतो. अशा प्रकारांच्या बाबतीत नाव तेच रहातं, ज्या लोकांशी सुष्ट-दुष्ट व्यवहार होत असतात तेही तेच रहातात, पण वर्तन बदलतं. ऑफिसातला दुष्ट बॉस आपल्याला घरी बोलावतो तेव्हा अचानक आतिथ्यशील यजमान व्हावा तसंच काहीसं.

प्रत्यक्ष आयुष्यात दिसणार्‍या गोष्टी आंतरजालावरही थोड्या बहुत फरकाने तशाच दिसतात. नावात काय असतं? "राजेश घासकडवी" नावाचा माणूस "जॉन अब्राहम" असा आयडी घेऊन आला असता तरी काय फरक पडला असता? माझ्यासाठी बहुदा नाहीच. आयडीमागचा माणूस जसाजसा दिसायला लागतो तसं माझंही वर्तन बदलतंच की!

अवांतरः 'घासकडवी' हे आडनाव राजेशच्या आधी कधीच न ऐकल्यामुळे हे टोपणनावच असावं असं मला कॉमन ओळखीच्या लोकांबद्दल बोलणं होईपर्यंत वाटत होतं.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

अगदी नव्याने प्रदर्शित होऊ घातलेल्या संस्थळावरही तेच नेहेमीचे यशस्वी कलाकार पाहून बरे ही वाटले अन नाहीही.
बरे यासाठी, की इथे तरी जालीय वय सारखे होऊन त्याच त्या काथ्याकूटात बरोबरीने भाग घेता येईल.
नाही यासाठी की त्याच त्या पूर्वग्रहांचे गाठोडे 'तिकडून' इकडे येईल.
***
राहिला प्रश्न प्रस्तावाचा.
माणूस 'आयडी' का घेतो?
वेगवेगळी संस्थळे अगदी जालाच्या सुरुवातीच्या काळापासून 'आय्डी' बनविण्याची सुविधा का देतात?
अन आयडी मुखवटेच असतात का?
हे प्रश्न या अनुषंगाने उभे राहतात.

दैनंदिन जीवन जगतांना वेगवेगळे मुखवटे घालावेच लागतात. शिकत असतांनाच 'wearing the mantle of a healer' या शीर्षकाचे पुस्तक वाचनात आले होते. मुखवटा धारण करताना कोणत्या कसरती कराव्या लागतात याचं वर्णन त्यात होतं. पण त्याचवेळी हा मु़खवटा स्वखुशीने ओढवून घेतलेला आहे, तेंव्हा पेलावा कसा, या बद्दल मार्गदर्शन ही होते.
जीवनाच्या मंचावर वेगवेगळ्या भूमिका वठवितांना ते ते मुखवटे घालावे वा मेकअप करावा ही लागतो. तो मेकअप फारसा छान वठला नाही, तरी ती भूमिका अंगावर पडलेली / ओढवून घेतलेली असल्याने वठवावीच लागते. अन मग नंतर दुनिया त्याचं 'evaluation' ही करते. की अमुक एक चांगला/वाईट बॉस/बाप/टीम लीडर/ठकसेन इ.इ.इ. होता..

हे सगळं करताना कधी तरी कुठेतरी आत दडवुन ठेवलेला एक मी असतो. दुनियेच्या सगळ्या संदर्भांना झुगारून देऊन तो 'मी' कुठेतरी व्यक्त होण्याच्या प्रयत्नात असतो. अन मला तरी वाटतं, की नेटवरच्या अनामिकतेमागे हा तोच मी, आयडी च्या रूपाने व्यक्त होतो. त्यातही थोडे कॉनटेक्स्ट बेस्ड असतेच. पोर्न साईटवरचा आयडी अन अक्षरेसारख्या संस्थळावरचा आयडी एकाच माणसाचा असला तरी तिथेही दोन मूलभूत वेगळे मी असणारच की. (स्वतःच्या शयनगृहातली वागणूक मनुष्य सार्वजनिक ठिकाणी करेलच असे नाही)

अर्थात, आयडी ही व्यक्तिमत्वाची वरची साल/वरून दिलेला रंग नसून गाभा/बीज असते..

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-: आमचे येथे नट्स क्रॅक करून मिळतील :-

संस्थळाच्या धोरणांत चर्चेच्या अखेरीला चर्चाप्रस्तावकाने आढावा घ्यावा अशी अपेक्षा आहे. त्यानुसार काही ठळक मतांची नोंदणी करतो.

सर्वप्रथम विरोचन म्हणतात की माणसाला मुखवटे घालायला आवडतात. काही वेळा एखादी गोष्ट खऱ्या चेहऱ्याने करता येत नाही ती मुखवटा घातला तर करणं सोपं जातं. मुखवटा माणसाला चेहऱ्यापासून एका अर्थाने मुक्ती देतो. तसंच इतरांपासून मूळ चेहऱ्याचं रक्षणही करतो. आडकित्ता यांनी सर्व मुखवट्यांच्या आत दडलेला एक मी असतो असं म्हटलेलं आहे. संस्थळावरची अनामिकता ही या मीला बाहेर यायला मोकळिक व स्फूर्ती देते. मात्र याच मुद्द्याबाबत मी यांना ही मुक्तता फसवी असू शकते असंही वाटतं. एका मुखवट्यातून दुसऱ्यात अडकण्यासारखी.

अशोक पाटील व प्रियाली यांनी इतरांच्या मुखवट्याविषयी लिहिलं आहे. मधुबालाच्या मुखवट्यात जी मजा आहे ती प्रत्यक्ष चेहऱ्यात असेल का? प्रत्यक्ष जीवनात चेहऱ्याकडून असलेल्या अपेक्षा पूर्ण करता आल्या नाहीत तर काही जण मुखवटे चढवतात, काही त्या चेहऱ्याशी प्रामाणिक राहून जालावरचा मुखवटा स्वीकारतात. तसंच जर कोणी अनेक मुखवट्यांनी वावरत असेल तर तो ज्याचा त्याचा प्रश्न आहे.प्रियालींनी मुखवटे हे मूळ चेहेऱ्यापेक्षा फार वेगळे असणं कठीण जाईल, विशेषतः माहीत असलेल्या व्यक्तीचा मुखवटा वेगळाच असेल तर विचित्र वाटेल. हे चेहऱ्याची चेहऱ्याशी ओळख आणि मुखवट्याची मुखवट्याशी ओळख यातलं द्वंद्व.

धनंजय यांनी म्हटलं आहे की एकास एक नात्यामध्ये भौतिक विश्वात एकच शरीर, एकच चेहरा असल्यामुळे सोपं जातं. कारण कुठेही व्यवहार करताना नात्याची एकसंधता महत्त्वाची. जेव्हा संवादात एकदा खरं एकदा खोट, एकदा एक एकदा दुसरा मुखवटा येतो तेव्हा नातं दुभंगतं. अशी नाती निर्माण करण्याची गरज असते तेव्हाच आपल्याला चालू शकणाऱ्या मुखवट्यांसहित समोरची व्यक्ती स्वीकारता येईल का हा प्रश्न महत्त्वाचा होतो. याच विचारधारेने माझ्यासमोर एक मुखवटा धारण करणारा इतर किती का मुखवटे घालेना, माझा तो अनुभव जोपर्यंत दुभंगत नाही तोपर्यंत ठीक आहे.

३_१४ विक्षिप्त अदितींनी मुखवट्यांच्या प्रतिमेतील बदलांचा मूळ चेहऱ्याच्या वागणुकीत कसा बदल होतो यावर टिप्पणी केली आहे. चेहऱ्यांचं नातं आणि मुखवट्यांचं नातं हे समांतर प्रवास करतं. एका अर्थाने मुखवटे चेहऱ्यात भिनलेले असतात हे त्या अधोरेखित करतात.

चर्चेत भाग घेणाऱ्या सर्वांचेच आभार

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

लेख परत वाचला अन खूप आवडला.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

लेख नजरेतुन सुटला होता. धन्यवाद सारीका
डुआयडींचे मानसशास्त्र समजून घ्यायचे असेल तर डॉ.श्रीकांत जोशी यांचे मनोविकाराचा मागोवा हे पुस्तक जरुर वाचावे. एकूणच मानवी वर्तनाचा अभ्यास त्यात आहे. आयडी असो वा डुआयडी असो प्रत्येकामागे एक माणुसच आहे शेवटी.
आता जे डुआयडी आहेत त्यांना तसे का करावेसे वाटते? हे जाणुन घ्यायला आवडेल.मला तर हा प्रकार स्किझोफ्रेनिक वाटतो.डुआयडी घेउन त्रास देणे ही मानसिक विकृती आहे का? मला त्या मृगरुप घेउन कामेच्छा पुर्ण करण्याचा प्रयत्न करणार्‍या किंदम ऋषीची आठवण येते. ऋषी या प्रतिमेमुळे त्यांना त्यांच्या नैसर्गिक उर्मी व्यक्त करता येत नसाव्यात म्हणुन त्यांना असे मृगरुप घ्यावे लागले. डूआयडींचे तसेच काहीसे असावे.
काही वेळा मुखवटे हे संरक्षक कवच म्हणून मूळ चेहर्‍याचे संरक्षण करतात हे ही नसे थोडके.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

प्रकाश घाटपांडे
http://faljyotishachikitsa.blogspot.in/

शिकारी हे असणारच, आपण मेंढरु व्हायचं की नाही ते फक्त आपल्या हातात Smile
विविध अनुभव घेणे या मुखवट्यांमुळेच साध्य होत असावे. फक्त महाग अनुभव घ्यायला जायचं नाही. परवडतील असे घ्यायचे Smile हाकानाका!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

काही मुखवटे हे प्रायव्हसी जपण्यासाठी असू शकतात, ही १ शक्यता आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0