तुम्ही जात मानता का?: एक सर्वेक्षण

मिसळपाववरील बढतीमध्ये आरक्षणावरील चर्चेत अनेकांनी जाती-पातींच्या निराकरण करण्यावर भर दिला आहे, जे स्तुत्य आहेच. यातून आपण जाती किती मानतो याबद्दल एक सर्वेक्षण करायचे मनात आले. त्यासाठी प्रतिसाद-गट म्हणून ऐसीअक्षरे आणि मिसळपाव.कॉम या दोन संस्थळांवरच्या सदस्यांमध्ये एकत्रितपणे हे सर्वेक्षण करत आहे.

या सर्वेक्षणात भाग घ्यायची इच्छा असेल तर पुढील नियम पाळावेतः
१. पुढे जे प्रश्न विचारले आहेत, त्यात तुम्हाला योग्य वाटणारा एकच पर्याय निवडायचा आहे. शक्य होईल तितके प्रामाणिक उत्तर द्यावे
२. 'इतर' हा पर्याय निवडल्यास समर्पक स्पष्टीकरण द्यावे
३. सर्वेक्षणातील प्रश्नांची उत्तरे व्यनीतून कळवायची आहेत. आपली उत्तरे प्रतिसादातून जाहिरपणे देऊ नयेत ही विनंती.
४. सर्वेक्षणाचा कालावधी एक आठवडा आहे. सदर सर्वेक्षण २५ डिसेंबर रोजी भाप्रवे रात्री १२:०० वाजता संपेल. त्यानंतर (मला Smile ) उपलब्ध वेळेनुसार निष्कर्ष जाहिर केले जातील.

ज्यांना सर्वेक्षणात भाग घ्यायची इच्छा नाही, त्यांनी हे प्रश्न स्वतःच्या मनाला विचारावेत आणि स्वतःपुरता काय तो आरसा धरावा. मात्र कृपया २५ डिसेंबरच्या आधी याप्रश्नांवर अशी जाहीर चर्चा करू नये ज्यामुळे लोकांना प्रामाणिक उत्तरे देणे कठीण जाईल किंवा त्यांच्या उत्तरांवर प्रभाव पडेल.

चला तर सुरू करूया! ज्यांना सर्वेक्षणात भाग घ्यायचा आहे त्यांनी यापुढील प्रश्नांची उत्तरे मला व्यनीतून कळवायची आहेत

सर्वेक्षणपूर्व समज: तुम्ही 'जात' अजिबात मानत नाही असे तुम्हाला वाटते का?
अ. होय
ब. नाही

बेटी व्यवहारः

१. तुम्ही विविहीत असल्यास तुम्ही आंतरजातीय विवाह केला आहे काय?
अ. होय
ब. नाही
क. गैरलागू (अविवाहीत)

२. तुम्ही अ. लग्नेच्छुक असल्यास ब. 'अरेन्ज्ड मॅरेज' असल्यास क. केवळ तुमच्या वैयक्तीक निर्णयावर लग्न ठरेल अशी मुभा असल्यास तुम्ही तुमच्या जातीबाहेरच्या जोडीदाराला प्राधान्य द्याल का?
अ. होय
ब. नाही
क. सांगता येत नाही
ड. गैरलागू (सध्या एका विवाहबंधनात आहे)
ई. जातीच्या तथाकथित उतरंडीवर आमच्यापेक्षा उच्च जात असेल तरच चालेल

३. तुम्ही अ. लग्नेच्छुक असल्यास ब. 'अरेन्ज्ड मॅरेज' असल्यास क. केवळ तुमच्या वैयक्तीक निर्णयावर लग्न ठरेल अशी मुभा असल्यास तुम्ही तुमच्या जातीबाहेरच्या जोडिदाराचा विचार कराल का?
अ. होय
ब. नाही
क. सांगता येत नाही
क. गैरलागू (सध्या एका विवाहबंधनात आहे)
ई. जातीच्या तथाकथित उतरंडीवर आमच्यापेक्षा उच्च जात असेल तरच चालेल

४. तुम्ही अ. लग्नेच्छुक असल्यास ब. 'अरेन्ज्ड मॅरेज' असल्यास क. तुमच्या कुटुंबाच्या एकत्रित निर्णयावर लग्न ठरेल अशी परिस्थिती असल्यास तुम्ही जातीबाहेरच्या जोडिदाराचा विचार कराल का?
अ. होय
ब. नाही
क. सांगता येत नाही
क. गैरलागू (सध्या एका विवाहबंधनात आहे)
ई. जातीच्या तथाकथित उतरंडीवर आमच्यापेक्षा उच्च जात असेल तरच चालेल

५. जर ३/४/५ प्रश्नांपैकी एकाचे उत्तर जातीबाहेरच्या जोडिदाराचा विचार करणार नाही / काही अटींसहीत करू असे असेल तर तसे का?
अ. रोजच्या व्यवहारातील सवयी प्रत्येक जातीत वेगळ्या असतात.
ब. खाण्याच्या सवयी जातीनुसार बदलतात.
क. आम्हाला शेवटी याच समाजात रहायचे आहे. आम्हाला काही प्रॉब्लेम नाही हो पण मग लोक आम्हाला बाजूला सारतील
ड. इतर
ई. गैरलागू

६. जर तुमच्या अपत्याने अ. स्वेच्छेने आंतरजातीय विवाह करायची इच्छा व्यक्त केली ब. अरेन्ज्ड मॅरेज करायचे असेल तर तुम्ही आंतरजातीय जोडीदार शोधायला परवानगी देऊन त्या प्रक्रियेत स्वतः सहभागी व्हाल का?
अ. होय, आनंदाने
ब. होय पण नाखुशीने
क. परवानगी देऊ पण स्वतः प्रक्रीयेत सहभागी होणार नाही
ड. नाही

७. सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानूसार दोघांपैकी एक जोडीदार अनुसुचित जाती किंवा जनजातींपैकी असेल तर अपत्यास आरक्षण मिळू शकते. या कारणास्तव तुम्ही स्वतः अनुसूचित जातीपैकी नसूनही जोडीदार अनुसुचित जाती किंवा जनजातींचा असला तर चालेल का?
अ. नाही
ब. सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाशी संबंध नाही, तसेही चालेल
क. असा जोडीदार शोधायला जाणार नाही पण या निकालामुळे आता मिळाला तर चालेल असे वाटते
ड. गैरलागू (स्वतः त्या जातीतला असल्याने)
ई. इतर

८. जातीच्या उतरंडीवर स्वतःच्या जातीपेक्षा वरच्या जातीचा जोडिदार चालेल का?
अ. होय
ब. नाही
क. गैरलागू (सध्या एका विवाहबंधनात आहे)

रोटी व्यवहार

९. तुम्ही घरी जेवण करायला एखादी व्यक्ती ठेवलीत तर त्या व्यक्तीची जात / धर्म विचारात घेता का?
अ. होय
ब. अजिबात नाही
क. जात नाही पण धर्म घेतो
ड. धर्म नाही पण जात घेतो

१०. जर प्र क्रं ९ चे उत्तर 'ब' नसेल तर, तसे का?
अ. हरेक जाती/धर्माशी निगडीत अशा माझ्या काही स्वच्छतेच्या कल्पना आहेत.
ब. काही जाती / धर्माच्या व्यक्ती सामिष भोजन करतात जे आमच्या घरी वर्ज्य आहे
क. माझ्या कुटुंबियांपैकी काहिंचा अजूनही जातींच्या उतरंडीवर / शिवाशिवीवर विश्वास आहे. त्यांची मने दुखवायची माझी इच्छा नाही
ड. जेवणातून 'संस्कार / विचार' झिरपतात असा माझा समज आहे
ई. इतर
फ. गैरलागू (प्र. ९ चे उत्तर ब)

११. हॉटेलात जाताना तुम्ही मालकाची जात बघता का?
अ. होय.
ब. नाही.
क. सहसा नाही.
ड. सहसा होय.

१२. तुम्ही तुमच्या लहान अपत्याला सांभाळायला एखाद्या पाळणाघरात ठेवत असाल किंवा एखाद्या व्यक्तीला तुमच्या घरी ठेवत असाल तर तुम्ही त्या व्यक्तीची जात/धर्म बघता का?
अ. होय
ब. अजिबात नाही
क. जात नाही पण धर्म घेतो
ड. धर्म नाही पण जात घेतो

१३. जर प्र क्रं १२ चे उत्तर 'ब' नसेल तर, तसे का?
अ. हरेक जाती/धर्माशी निगडीत अशा माझ्या काही स्वच्छतेच्या कल्पना आहेत.
ब. काही जाती / धर्माच्या व्यक्ती सामिष भोजन करतात जे आमच्या घरी वर्ज्य आहे. त्याव्यक्तीने माझ्या अपरोक्ष माझ्या अपत्याला तसे भोजन दिलेले मला चालणार नाही.
क. सतत सोबत असणार्‍या व्यक्तीकडून काही 'संस्कार / विचार' झिरपतात असा माझा समज आहे. मला इतर धर्माचे किंवा जातीचे विचार माझ्या अपत्यावर झालेले नको आहेत.
ई. इतर
फ. गैरलागू (प्र. ९ चे उत्तर ब)

इतर व्यवहार
१४. समजा तुमचे एखाद्या व्यक्तीशी भांडण झाले तर तुम्ही त्या व्यक्तीला जातीवरून हिणवता किंवा शिव्या देता का?
अ. होय, बहुतांश वेळा
ब. क्वचित पण होय
क. अजिबात नाही

१५. एखाद्या व्यक्तीची वर्तणूक खटकली किंवा तुमच्यापेक्षा वेगळी वाटली तर तुम्ही त्याचा संबंध (किमान मनातल्या मनात) त्या व्यक्तीच्या जातीशी लावता का?
अ. होय, बहुतांश वेळा
ब. क्वचित पण होय
क. अजिबात नाही

१६. जातींचा आणि आर्थिक परिस्थितीचा, शिक्षणाचा संबंध आहे असे तुम्ही मानता का?
अ. होय, बहुतांश वेळा
ब. क्वचित पण होय
क. अजिबात नाही

१७. जातींमुळे काही व्यक्तींना शिक्षणापासून, नोकर्‍यांपासून, बढतीपासून वंचीत रहावे लागते असे तुम्हाला वाटते का?
अ. होय, काही वेळा
ब. होय, अनेकदा
क. अजिबात नाही
ड. बढतीमध्ये नाही, बाकी होय
ई. शिक्षणात नाही, बाकी होय
फ. इतर

१८. आरसा: तुम्ही जात अजिबात मानत नाही असे तुम्हाला वाटते का?
अ. होय
ब. नाही

Taxonomy upgrade extras: 
field_vote: 
0
No votes yet

व्यनी केला आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

छान आहे प्रस्ताव. याचे क्वांटिफिकेशन तुम्ही कसे करणार हे पाहण्याची उत्सुकता आहे.

शुभेच्छा.

बादवे, सर्वेक्षणात भाग घेतला आहे... व्यनि केला.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सगळे असेच म्हणतो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

व्यनी केला आहे

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

पाठवला आहे

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

व्यनि केला आहे

पुढे उत्तम चर्चा होईल ही अपेक्षा व खात्रीही. Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

व्यनि केला आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

व्यनि केला आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

व्यनि केलाय.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

व्यनि केला आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-सविता
----------------------------
|| स्वतः मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही ||

जन्माधिष्ठीत असलेल्या जातीमुळे येणारी उच्चनिचता आपण मानता अथवा मानत नाही असे म्हणावयाचे आहे काय?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

प्रकाश घाटपांडे
http://faljyotishachikitsa.blogspot.in/

होय. थोडक्यात जातीचे तुमच्या आयुष्यात कितपत महत्त्व आहे असे काहिसे

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

ओके व्यनी केला आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

प्रकाश घाटपांडे
http://faljyotishachikitsa.blogspot.in/

व्यनि केला आहे. सर्वेक्षणाचा, दोन्ही संस्थळांवरच्या वेगवेगळा आणि एकत्र अश्या दोन्ही प्रकार, निकाल वाचण्याच्या प्रतिक्षेत.

माझ्यासारखे अनेक लोक जे दोन्ही संस्थळांवर वावरतात त्यांनी दोन्ही ठिकाणी मत देणे अपेक्षीत आहे का? की एका ठिकाणी पुरेसे आहे?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

==================================
इथे वेडं असण्याचे अनेक फायदे आहेत,
शहाण्यांसाठी जगण्याचे काटेकोर कायदे आहेत...

निकाल एकत्र असेल. अधिकाधिक विदा मिळावा म्हणून एकापेक्षा अधिक स्थळांवर धागा काढला आहे.
तेव्हा कोणत्याही एका ठिकाणी केलेला व्यनी पुरेसा आहे

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

व्यनि केला आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-अनामिक

एक प्रश्न राहिला आहे.

सरकारी/अनुदानित शाळेत असलेले शिक्षक आणि विद्यार्थी कोणत्या जातीचे असतात यावर पाल्यास त्या शाळेत घालण्याचा/न घालण्याचा निर्णय घ्याल का?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

प्रश्न रोचक आहेच. मी हा प्रश्न टाकता टाकता थांबलो:
काही कर्तृत्तवान व्यक्तींच्या नावे जेव्हा संस्था निघतात त्यांच्याकडे त्या व्यक्तीच्या कर्तृत्त्वाऐवजी ठरावीक जातीच्या मंडळाचा विचार डोक्यात येतो का? Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

या प्रश्नावलीचं विश्लेषण रोचक असेल असं वाटतं. पण प्रश्नावलीत त्रुटी वाटल्या.

उदा: माझ्या आईवडलांची पोटजात निरनिराळी. एकत्र कुटुंब जमा झालं की त्यावरून मजेमजेत चिक्कार वादावादी होत असे. अजूनही मैत्रीखात्यात, विनोदाने एकमेकांच्या जाती, पोटजातींचा "उद्धार" होतो. कोणाचं मासेखाऊपण, कोणाचा शाकाहार, कोणाचं नाकात बोलणं यावरून टिंगल होते. उच्चनीचता दाखवण्यापेक्षा आपसांतलं वेगळेपण आहे त्यावरून थोडे विनोद होतात. आता हे जाती मानणं आहे का? माझ्या मते होय. मग फक्त जाती मानण्यात (जोपर्यंत त्यात उच्चनीचता येत नाही तोपर्यंत) वाईट काय?
मराठीत प्रमाण भाषा ही सो कॉल्ड उच्चवर्णीयांची भाषा आहे. त्यामुळे ते उदाहरण बाजूला ठेवू. शिक्षित भारतीय इंग्लिश बोलतात. विविध प्रांतातल्या लोकांचे हेल वेगवेगळे असतात, अन्य देशांत इंग्लिश बोलतात त्यांचे हेल निरनिराळे असतात. अनेकदा विनोद निर्मितीसाठी त्याचा वापर केला जातो.

जन्मानुसार मिळणारी उच्चनीचता नष्ट करताना वेगवेगळ्या जातींचं जे वेगळेपण आहे, उदा: पाककृती, भाषा, इ. ते पूर्ण नष्ट होऊ नये असं वाटतं.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

प्रश्न असा आहे भाषा, आहारपद्धती या जातीशी निगडीत आहे असा सर्वसाधारण समज आहे; पण त्या गोष्टी हल्लीच्या काळात खरंच जातीशी निगडीत आहेत का?
प्रत्येकाची भाषा ही तुम्ही रहाता त्या वातावरणानूसार घडते. माझे कित्येक उच्चवर्णीय नसणारे मित्र अस्खलीत प्रमाण मराठी बोलतात तर कित्येक उच्चवर्णीय मित्र अप्रमाण / ग्रामीण मराठी बोलतात. विदर्भातले आणि कोकणातले एकाच जातीतले एकत्र आले तरी बोलीभाषा बदलेल. तेव्हा बोलीभाषा आणि जात यांचा थेट संबंध लावता येऊ नये - तरी तसा समज आहे, त्यातून निखळ विनोद निर्मिती होते/होऊ शकते वगैरे मान्य आहेच - पण मग त्या विनोदनिर्मितीसाठीसुद्धा जात आवश्यक असते का प्रांत+परिसर पुरेसा आहे?

जेव्हा जाती या व्यवसायाशी निगडीत असत तोपर्यंत त्यातील काही जाती या प्रदेशाशी, भुभागाशी निगडीत होत्या. त्यामुळे त्यांच्यात विशिष्ट आहारसंस्कृती रुजली. जसे कोळी किंवा आगरी समाज हा बहुतांश सागर किनार्‍यावर असे. मुख्य अन्न भात, मासे असल्याने मासे वापरून तयार करायच्या अन्नात बरेच प्रयोग करणे शक्य होते. कालौघात ती वैशिष्ट्ये त्या जातीची म्हणून टिकली/चिकटली हे कबूल. पण आताच्या माहितीयुगात एखादी चव, एखादी आहारपद्धत ही एकाच 'जातीची' मक्तेदारी राहिली आहे काय?

असो. सर्वेक्षणाला अपेक्षेपेक्षा खुप चांगला रिस्पॉन्स मिळत आहे. बाकी प्रकट चिंतन विश्लेषणासाठी राखून ठेवतो Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

>>उच्चनीचता दाखवण्यापेक्षा आपसांतलं वेगळेपण आहे त्यावरून थोडे विनोद होतात. आता हे जाती मानणं आहे का? माझ्या मते होय. मग फक्त जाती मानण्यात (जोपर्यंत त्यात उच्चनीचता येत नाही तोपर्यंत) वाईट काय?
मराठीत प्रमाण भाषा ही सो कॉल्ड उच्चवर्णीयांची भाषा आहे. त्यामुळे ते उदाहरण बाजूला ठेवू. शिक्षित भारतीय इंग्लिश बोलतात. विविध प्रांतातल्या लोकांचे हेल वेगवेगळे असतात, अन्य देशांत इंग्लिश बोलतात त्यांचे हेल निरनिराळे असतात. अनेकदा विनोद निर्मितीसाठी त्याचा वापर केला जातो. <<

प्रमाणभाषेहून वेगळ्या अशा स्थानिक बोलीभाषांचा विनोदनिर्मितीसाठी वापर होतो हेच काहींना उच्चनीचता मानणारं आणि म्हणून आक्षेपार्ह वाटतं. उदाहरणार्थ, हे पाहा.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

+१

याचे कारण "त्यांच्यात राहून भाषा बिघडते" असा विचार उच्चवर्गीय करतात.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

उच्चवर्गीय असा विचार करतात की उच्चवर्णीय? की दोघेही थोडेथोडे?
येथे वर्ग ही संकल्पना आर्थीक मानली आहे. वर्ण मात्र सामाजिक मानली आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

प्रमाणभाषेतील शैलीच्या विविधतेचा देखील विनोदनिर्मिती साठी उपयोग होतोच की. विविधता दाखवताना उच्चनीचतेचा होणारा भास कसा काय असिद्ध करायाचा?
न नळाचा लिवायचा की बाना तला न लिवायचा? हा प्रश्न बरच काही सांगून जातो. उच्चारताना आनि पानि लोनि पण लिहिताना मात्र आणी पाणी लोणी असा फरक करणारे आपल्याला सभोवती दिसतातच की!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

प्रकाश घाटपांडे
http://faljyotishachikitsa.blogspot.in/

'आनि पानि लोनि ' चे उदाहरण देऊन प्रकाश घाटपांडे यांनी ते जातीयवादी असल्याचे सिद्ध केलेले आहे असे नम्रपणे नमूद करतो. Wink
(मा. श्रामो यांण्णी (-ईनोद हो!) याची दखल घ्यावी.) ;);)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

एक किस्सा
टीव्हीवर स्त्री प्रश्नावर चर्चा होत होती. एक प्रसिद्ध पुरोगामी लेखिका **** त्यात सहभागी होती.विचार पुरोगामी होते पण भाषेत आनि पानि लोनि ची झाक होती. कार्यक्रम बघणार्‍या कुटुंबातली स्त्री म्हणाली," अच्छा ही असली **** आहे होय?" त्या लेखिकेच्या कादंबर्‍या तिने वाचल्या होत्या. पण लिखित व बोली भाषा यातील फरक या प्रसंगाने दृष्य झाला होता.
असो लिंक वरचा किशोर दरक यांचा लेख विचार करायला लावतो. विक्षिप्त आदितीचे ही मत विचार करायला लावते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

प्रकाश घाटपांडे
http://faljyotishachikitsa.blogspot.in/

कार्यक्रम बघणार्‍या कुटुंबातील त्या स्त्रीचा अंदाज सपशेल चुकला असे म्हणतो. काय आहे की 'आनि-पानि-लोनि' असे उच्चार करणारे सर्वच जण 'उच्चवर्णीय' (रीड - ब्राह्मण)नसतात हा एक गैरसमज आहे. आणि त्याचा व्यत्यासही चूक आहे.
सदर कार्यक्रमात भाग घेणारी प्रसिद्ध पुरोगामी लेखिका (कोण?-ते चांगले माहित आहे) त्या भाषेत बोलते याची कारणे अशी असू शकतात -
१. आपण उच्चवर्णीय असूनही पुरोगामी आहोत हे ठसवणे - याचे बरेच फायदे आहेत. २%-३% महाजन(भद्र-)लोकांचे प्रतिनिधी बहुजनांमध्ये फारसे लोकप्रिय होत नाहीत.
२. बालपण महाराष्ट्राच्या अविकसित भागात (पक्षी पुणेरी प्रभावाच्या बाहेर) गेल्याने सवयीचे उच्चार तसे होणे. - माझ्या पहाण्यात असे बरेच उच्च्वर्णीय लोक (विशेषतः स्त्रिया) आहेत ज्यांची भाषा तशी आपोआपच असते. मी लहानपणी तशीच भाषा बोलत असे. आनि दोस्तांच्यातबी कंदीकंदी तसंच बोलतो.
याउलट परवा (अगदी परवा रात्री) महाराष्ट्राच्या लेखा-कोषागार विभागातील अधिकारी श्री.शिलानाथ जाधव यांची मुलाखत सह्याद्री वाहिनीवर पाहिली. त्यांचे उच्चार आणि उच्चवर्णीय मराठी भाषेतील साहित्याचे ज्ञान हे कोणत्याही उच्चशिक्षित-उच्चवर्णीय मराठी माणसाच्या बरोबरीचे होते.

माझा मुद्दा असा की - तथाकथित ग्रामीण मराठी आणि तथाकथित पुणेरी मराठी बोलण्याचा मक्ता कुण्या एका विशिष्ट समाजघटकाने घेतला आहे असे मानण्याचे कारण नाही. उलट हल्लीच्या काळात हा भेद जास्त स्पष्ट होत चालला आहे. दोन्हीकडच्या समाजात मुद्दाम तसे बोलण्याची चढाओढ लागलेली आहे.पन्नास वर्षांपूर्वी निदान निम्नशहरी आणि गावपातळीवर हा भेद नगण्य होता.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

>उच्चारताना आनि पानि लोनि पण लिहिताना मात्र आणी पाणी लोणी असा फरक करणारे आपल्याला सभोवती दिसतातच की!

सहमत आहे. उच्चारताना भाशा, पुरुश, क्रिश्न म्हणणारे पण लिहिताना मात्र भाषा, पुरुष, कृष्ण असा फरक करणारे आपल्याला सभोवती दिसतातच की!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

'क्रिश्न' नाही. 'क्रिश्ण'.

उच्चारानुसारी 'शुद्ध'लेखनास एक वेळ हरकत नाही, पण निदान ते तरी नीट करायला शिका!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

क्रिश्ण नै क्रिष्ण Smile

उच्चारानुसारी 'शुद्ध'लेखनास एक वेळ हरकत नाही, पण निदान ते तरी नीट करायला शिका! (पळतो आता मार खाण्याअगोदर :P)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

'क्रिश्ण' अनेकदा ऐकलेला आहे. 'क्रिष्ण'ही ऐकलेला आहे, पण तो (निदान माझ्या ऐकण्यात तरी) त्या मानाने विरळा. आणि तसाही तो काहीसा 'प्रमाणभाषे'कडे झुकणारा झाला, म्हणूनही त्याची फारशी दखल घेतलेली नाही.

बाकी, 'क्रुश्ण' आणि 'क्रुष्ण' असेही पाठभेद ऐकलेले आहेत, पण ते त्याहूनही विरळा.

'क्रिश्न' ('शिश्न'शी यमक साधणारा) मात्र ऐकण्यात आलेला नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

हम्म..थोडका कन्फ्यूज्ड झालो. श्ण हा उच्चार ऐकल्यागत नै वाटत कधी. जिथे जिथे ण उच्चारला जातो, तिथे तिथे श ऐवजी ष च येतो आणि जोडाक्षरात खपून जातो असे माझे निरीक्षण आहे. पण सत्यासत्यतेच्या खात्रीसाठी कॉलिंग धनंजय!!!!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

दोन्ही उच्चार ऐकलेले आहेत. 'न'वी बाजू म्हणतात, त्या प्रमाणे असावे. प्रादेशिक भेद आणि उपसमाजातले प्रचलित भेद असावेत.

मूर्धन्य "ष" न-उच्चारणार्‍यांपैकीसुद्धा "श"चा उच्चार येणार्‍या मूर्धन्य "ण"मुळे थोडा बदलत असावा. बहुधा "ण"पुढे असताना "श"चा ताळूला स्पर्श कमी पसरट होतो. "क्रुश्चेव" आणि "क्रुश्ण" शब्दांतल्या "श" उच्चारांत थोडा फरक आहे. तो सदस्य बॅटमॅन यांच्या तिखट कानांना ऐकू येत असावा. म्हणून "क्रुश्ण" मध्ये नेहमीचा जीभ-पसरट श ऐकू येत नाही, असे त्यांना ठाम वाटत आहे. परंतु जीभ कमी-पसरट आहे, हा फरक असला, तरी जीभ वळून ("retroflex") मूर्धेकडे जात नाही, तो "ष" होत नाही.

मी स्वतः लहानपणी क्रुश्ण (पण कमी पसरट "श") उच्चारत असे, आणि मग पुण्यातल्या वास्तव्यानंतर "क्रुष्ण" असे उच्चारू लागलो. आजकाल "क्रुष्ण" असे अधिक उच्चारतो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ओह ओक्के, हे लक्षात आलं नव्हतं. मी पुन्हा ते उच्चार नीट ऐकीन. तुम्ही म्हणता तो "श" दंत्य नसून अल्व्हिओ-पॅलॅटल आहे हे आत्ता क्लिक झाले. नक्कीच शक्य आहे. हा "श" बंगाली "श" च्या जास्त जवळ जाणारा आहे. माझ्या बंगाली रूममेटच्या उच्चारांवरून लक्षात आलं. बहुत धन्यवाद Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

किशोर दरक यांचा लेख आवडला.
मराठी मालिकांमधली कल्पना, विचार, विनोद या सगळ्या बाजूंनी दारिद्र्य आहे. त्याचं उदाहरण देऊन भाषेतून उच्चनीचता आहे हे दाखवणं योग्य वाटत नाही. चर्चा करताना प्रतिपक्षातल्या सर्वात बावळट विचारांवर हल्ला केला की आपला मुद्दा पुढे ढकलता येतो, असं काहीसं तेवढ्याच एका मुद्द्यापुरतं वाटलं.
प्रत्यक्षात अनेक लोक प्रमाणभाषा सोडून अन्य भाषा बोलणार्‍यांना कमी लेखतात हा मुद्दा मान्य आहे.

पण उलट अनुभवही आलेला आहे. मूळ इंदौरी असणार्‍या एक कुटुंबाच्या घरी आम्ही गेलो होतो. त्यांची मुलगी पुण्यातच जन्माला आली, पुण्यातच इंग्लिश माध्यमाच्या शाळेत शिकते. मुलीच्या आईची तक्रार होती, "मुलीचं मराठी फारच पाणचट* आहे, पुणेरी, भटो मराठी बोलते ही मुलगी!"

*नक्की काय विशेषण वापरलं हे आठवत नाही. पण हे मराठी अजिबात सॉफिस्टीकेटेड नाही, अशी मुलीच्या आईची तक्रार होती.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

मुळात ज्याला प्रमाण मराठी भाषा म्हणतात, तसली भाषा बोलीभाषा म्हणून सदाशिव पेठेत (किवा व्यापक ४११०३०मध्ये) वापरली जाते, असे नेमके कोण म्हणतो?

हं, तसली भाषा ४११०३०कर संभाषणात वापरू शकतात, नाही असे नाही. पण असा वापर हा सहसा मुद्दाम / विनोद म्हणून / चमत्कृती म्हणून / उघडउघड दिखाऊ (मॉक-)भारदस्तपणा आणण्यासाठी जाणूनबुजून कृत्रिमरीत्या केला जातो, असा अनुभव आहे. अन्यथा, सदाशिव-नारायण-शनवाराची ही 'बोलीभाषा' खचितच नव्हे. (चालू - म्हणजे करंट - ४११०३०-वासीयांनी यावर प्रकाश पाडावा.)

(४११०३०मध्ये वाढलेला एक भूतपूर्व ४११०३०कर या नात्याने, खुद्द या प्रतिसादात वापरलेल्या भाषेच्या बर्‍यापैकी जवळपास जाणारी भाषा प्रस्तुत लेखक स्वतः संभाषणात वापरू शकतो, पूर्वी वापरलेलीही आहे. परंतु तरीही, प्रस्तुत लेखकाची ही 'बोलीभाषा' अथवा सामान्य वापराची भाषा नव्हे, किंवा प्रस्तुत लेखक ज्या ४११०३०च्या परिसरात वाढला, तेथीलसुद्धा ही सामान्य वापराची भाषा नव्हे, आणि 'बोलीभाषा' तर नव्हेच नव्हे, असे नम्र प्रतिपादन प्रस्तुत लेखक प्रांजळपणे करू इच्छितो.)

प्रस्तुत प्रश्नांकित भाषा ही बहुधा पु.लं.नी ज्याला 'सार्वजनिक पुणेरी बोलीचा नमुना' म्हटले आहे, त्यातील प्रकार म्हणता यावा. परंतु त्या क्षेत्री खाजगी संभाषणात तिचा वापर हा सामान्यतः चेष्टेच्या सुराखेरीज अन्यथा होत नाही, आणि एकाही ४११०३०कराची ती नैसर्गिक बोलीभाषा निघाल्यास प्रस्तुत लेखकास व्यक्तिशः आश्चर्याचा प्रचंड धक्का बसेल, असा प्रस्तुत लेखकाचा प्रामाणिक दावा आहे.

बाकी. दुवादत्त लेखाच्या लेखकानेही एवढे करून आपल्या लेखात प्रमाणभाषेस बर्‍यापैकी जवळ जाऊ पाहणारी भाषाच वापरलेली आहे, हे आवर्जून लक्षात घेण्यासारखे आहे. त्या लेखातील 'बोधनक्षमता', 'संवाद-संप्रेषण' वगैरे शब्द एकाही ४११०३०कराच्याच काय, पण एकाही ४११०३०कराच्या तीर्थरूपांच्यासुद्धा बोलीत सापडणे अशक्य आहे, अशी ग्वाही प्रस्तुत लेखक देऊ इच्छितो. (आणि तरीही, प्रस्तुत शब्द हे प्रमाणभाषेतील आहेत, आणि केवळ प्रमाणभाषेतच सापडावेत.) सबब, 'प्रमाणभाषा म्हणजे एका गटाने इतरांवर आपली भाषा बळजबरीने लादण्याचा केलेला छुपा अथवा उघड प्रयत्न' वगैरे दावे हे थोतांड आणि कांगावा-स्वरूपाचे आहेत, असे प्रस्तुत लेखकाचे म्हणणे आहे. 'प्रमाणभाषा म्हणजे एखादी भाषा बोलणार्‍या कोणत्याही गटास आपली वाटू शकणार नाही, अशी भाषा', असा प्रतिदावा प्रस्तुत लेखक करू इच्छितो.


शेवटी मराठी अभिजनाची धाव ही पु.लं.पर्यंतच असायची. चालायचेच. कारण, (पु.लं.नीच म्हटल्याप्रमाणे,) शेवटी आम्ही भटेंच, त्याला काय करणार?
(अतिअवांतर:) पुणे/पुणेरी संस्कृती, आणि त्यातही सदाशिवपेठ/४११०३० किंवा सदाशिवपेठी-/४११०३०-संस्कृती म्हणजे भटें/भटो-संस्कृती, असा एक सार्वत्रिक, लोकप्रिय आणि सोयिस्कर प्रचलित गैरसमज आहे. त्यात फारसे तथ्य नाही. म्हणजे, ४११०३०-पिनकोडास भटो संस्कृतीचा वारसा आहे, हे नाकारता येणार नाही, त्यात नाकारण्यासारखेही काही नाही, परंतु ही तेथील एकमेव संस्कृती नव्हे, एकमेव प्रचलित संस्कृतीही नव्हे आणि एकमेव प्रचलित पारंपरिक संस्कृती तर नव्हेच नव्हे. (आणि ४११०३०च्या बाहेरही पुण्यात बरेच काही आहे, हा दुसरा भाग. परंतु तो पूर्णपणे वेगळा मुद्दा आहे.) या इतरही संस्कृतींच्या सहअस्तित्वाकडे स्थानिक भटो-संस्कृतीचे जर दुर्लक्ष झाले असते, तरी ते एक वेळ समजण्यासारखे होते. (कारण शेवटी ती भटेंच. त्यांच्याकडून वेगळी अपेक्षा ती काय करणार?) परंतु पुण्याच्या म्हणा किंवा सदाशिवपेठेच्या म्हणा किंवा ४११०३०च्या म्हणा, सोयिस्कर क्यारिकेचरायझेशनकरिता उर्वरित महाराष्ट्रानेही या इतर संस्कृतींच्या ४११०३०मधील अस्तित्वाची (आणि त्यांच्याही पुणेरित्वाची) दखल घेतलेली दिसत नाही, हे रोचक आहे. हा उर्वरित महाराष्ट्राचा (क्यारिकेचरायझेशनार्थ) सोयिस्कर दृष्टिदोष म्हणावा, की उर्वरित महाराष्ट्राने ४११०३०मधील केवळ भटो संस्कृतीशी संपर्क ठेवला असावा आणि तेथील इतरही संस्कृतींची साधी दखलसुद्धा घेणे उर्वरित महाराष्ट्रास आवश्यक वाटले नसावे, काही कळत नाही. कारण काहीही असले, तरी ही उर्वरित महाराष्ट्राच्या दृष्टिकोनातील (आणि कदाचित मानसिकतेतील?) त्रुटी म्हणावी लागेल, असे वाटते. पण तेही एक असो.
  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

केवळ अभूतपूर्व... दहा हजार वर्षांत असा प्रतिसाद झाला नाही, होणे नाही...
प्रमाण भाषा, त्याविषयीचे दावे-प्रतिदावे, ४११०३० किंवा सदाशिव पेठेची संस्कृती, त्यातील खाचाखोचा... काय, काय म्हणून या प्रतिसादात असावे... शेलकी वाक्ये, मार्मीक निरिक्षणे, अत्यंत नेमक्या टिपण्या, विच्छेदन म्हणावे असे विश्लेषण, बिनतोड निष्कर्ष...
जे काही म्हणायचे ते अतिशयोक्ती अलंकारातच म्हणावे लागेल असा प्रतिसाद.
दंडवत देवा. स्वीकार करावा.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

प्रतिसादात तळटिपा कशा आणल्या?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

कळफलक वापरला.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

>>मुळात ज्याला प्रमाण मराठी भाषा म्हणतात, तसली भाषा बोलीभाषा म्हणून सदाशिव पेठेत (किवा व्यापक ४११०३०मध्ये) वापरली जाते, असे नेमके कोण म्हणतो?

हं, तसली भाषा ४११०३०कर संभाषणात वापरू शकतात, नाही असे नाही. पण असा वापर हा सहसा मुद्दाम / विनोद म्हणून / चमत्कृती म्हणून / उघडउघड दिखाऊ (मॉक-)भारदस्तपणा आणण्यासाठी जाणूनबुजून कृत्रिमरीत्या केला जातो, असा अनुभव आहे. अन्यथा, सदाशिव-नारायण-शनवाराची ही 'बोलीभाषा' खचितच नव्हे. (चालू - म्हणजे करंट - ४११०३०-वासीयांनी यावर प्रकाश पाडावा.)<<

ज्याला आज प्रमाण मराठी मानली जाते ती निव्वळ नजीकच्या काळातली सदाशिव पेठेतली किंवा पुणे-३० ची भाषा नसून ती कोंकणस्थी ब्राह्मणांची भाषा मानली जाते. पेशव्यांची सत्ता आली तेव्हा ती राजभाषा बनली आणि तेव्हापासून ती प्रमाण झाली असं भाषातज्ज्ञ सारखे म्हणत असतात. उदाहरणार्थ किशोर दरक यांच्या उपरोल्लेखित लेखातलं उद्धृत -

पेशव्यांच्या काळापासून पुण्यातल्या ब्राह्मणांचा वरचष्मा प्रस्थापित झाला अन् पेशवाईच्या विनाशानंतरदेखील महाराष्ट्राच्या याच भागातल्या ब्राम्हणांची भाषा ‘शुद्ध भाषा’ म्हणून शाळांमध्ये घुसली.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

पेशवा काळात कोंकणस्थांचा वरचष्मा वाढीस लागला असला तरी त्यांची भाषा तत्कालीन कागदपत्रांतून वेगळी अशी दिसत नै. कोंकणस्थांची बोली प्रमाण मानून सिलॅबस आखला तो ब्रिटिश काळात, इ..इ. पण मग पुणेरी कोंकणस्थांची बोली म्हटले असता ठीके, नौ, ऑफ ऑल पेठ्स, व्हाय सदाशिव पेठ इन पर्टिक्युलर? पुणेरी म्हंजे सदाशिवपेठी हे समीकरण मराठी वाङ्मयात जास्त दिसते, तसे का??

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

>>त्यांची भाषा तत्कालीन कागदपत्रांतून वेगळी अशी दिसत नै. <<

कोंकणस्थांची बोली भाषा होती. तिचा (तोवर) लेखीभाषेशी संबंध नव्हता. त्यामुळे ती तत्कालीन कागदपत्रांत दिसणार नाही. उदाहरणार्थ, संस्कृतप्रचुरता आणि सानुनासिकता ही तेव्हाच्या लेखी भाषेत नव्हती; उलट फार्शीचा प्रभाव लेखीभाषेत प्रचंड होता. जेव्हा 'प्रमाण मराठी कोणती?' असा प्रश्न आला तेव्हा कोंकणस्थ अभिजन होते म्हणून त्यांची बोली प्रमाण झाली, असा ह्या दाव्याचा अर्थ होतो.

>>पण मग पुणेरी कोंकणस्थांची बोली म्हटले असता ठीके, नौ, ऑफ ऑल पेठ्स, व्हाय सदाशिव पेठ इन पर्टिक्युलर? <<

कारण पुण्यातल्या ह्या भागात ब्राह्मणबाहुल्य होतं. पूर्वेकडच्या ब्राह्मणेतर वस्तीच्या पेठा आणि पश्चिमेकडच्या ब्राह्मणबहुल पेठा असा फरकही करता येईल. पश्चिमेकडच्या पेठांतदेखील नारायण-शनिवारपेक्षा सदाशिव पेठेत थोडी सधन वस्ती होती म्हणून ते अभिजन.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

कोंकणस्थांची बोली भाषा होती. तिचा (तोवर) लेखीभाषेशी संबंध नव्हता. त्यामुळे ती तत्कालीन कागदपत्रांत दिसणार नाही. उदाहरणार्थ, संस्कृतप्रचुरता आणि सानुनासिकता ही तेव्हाच्या लेखी भाषेत नव्हती; उलट फार्शीचा प्रभाव लेखीभाषेत प्रचंड होता. जेव्हा 'प्रमाण मराठी कोणती?' असा प्रश्न आला तेव्हा कोंकणस्थ अभिजन होते म्हणून त्यांची बोली प्रमाण झाली, असा ह्या दाव्याचा अर्थ होतो.

सहमत. फक्त अधोरेखित वाक्याशी किञ्चित असहमती. शिवकाळापुरते हे वाक्य खरे आहे, पण राज्यव्यवहारकोषानंतर फारसीचा प्रभाव बराच कमी झाला होता. असो, हा तसाही टँजेन्शिअल विषय आहे थोडासा.

कारण पुण्यातल्या ह्या भागात ब्राह्मणबाहुल्य होतं. पूर्वेकडच्या ब्राह्मणेतर वस्तीच्या पेठा आणि पश्चिमेकडच्या ब्राह्मणबहुल पेठा असा फरकही करता येईल. पश्चिमेकडच्या पेठांतदेखील नारायण-शनिवारपेक्षा सदाशिव पेठेत थोडी सधन वस्ती होती म्हणून ते अभिजन.

लॉजिकल , सबब सहमत.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

सर्व प्रतिसादकांचे आणि सर्वेक्षणात भाग घेणार्‍यांचे आभार.
ज्यांना या सर्वेक्षणात अजूनही भाग घ्यायची इच्छा आहे त्यांनी आज भाप्रवे रात्री १२ च्या आत आपली उत्तरे पाठवावीत.

यानंतर सर्व उत्तरांचा अभ्यास आणि वर्गीकरण करून निष्कर्ष इथे जाहिर करेन

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!