खंड

गोष्टींचे महत्त्व गोष्टींपुरतेच;
त्यापलीकडे राहून जातात
अवकाश, आणि गोष्टी निभावून नेण्यातली गंमत

ऋतूंच्या बदलत जाण्याची निरीक्षणे-मोठी मनोरम
शेवटी हे कथलाचे साचेच; पण
धातू वितळवून ओतणारा
आणि आकार बदलत जाताना पाहणारा,
थंड बेटांवरील निर्जन रात्रींत जागा राहणारा

दिवसांची शस्त्रे आणि रात्रींचे हिंसक जमाव
थोपवून धरणारा,
किल्ल्यांच्या भग्नावशेषांमधून
पलीकडच्या निळ्याशार समुद्रात डोकावणारा

साच्यांमधून गोठत जाणारी गावे, जनपदे, बेटे
बेटांना आणि द्वीपकल्पांना
सुनिश्चित करणार्‍या हद्दींमध्ये
सुखासीन पहुडलेल्या वसाहती
किल्ले आणि समुद्रांचे दोहन करून
जगणारे समुदाय

दिवस आणि रात्रींच्या कड्यांवर निश्चिंत उभ्या
समुदाय पोषक व्यवस्था

गोष्टींच्या दोन किनार्‍यांवर जिवंत आहेत दोघे;
मधल्या अवकाशात खंडव्यापी गोळाबेरीज पसरून असलेली

अनंत ढवळे

field_vote: 
3.5
Your rating: None Average: 3.5 (2 votes)

प्रतिक्रिया

कविता आवडली. एका मोठ्या मत्स्यालयाकडे पाहत असल्यासारखे वाटले.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

चित्रांचे तुकडे आवडले. रचनेतली लयही आवडली. गोष्टी, अवकाश, साचा, दिवस-रात्र नंतर साचा, दिवस-रात्र, गोष्टी, अवकाश आलेले आहेत. छंदाची बंधनं नसली तरी या लयीमुळे कवितेला एक आकार येतो.

पण कविता पार्स करायला थोडे कष्ट पडताहेत. साच्यातून धातू ओतणारा आणि त्या साच्यात गोठणारा हे दोघे गोष्टींच्या दोन किनाऱ्यांवर उभे आहेत, असा अर्थ लागला.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

गोष्टींचे महत्त्व गोष्टींपुरतेच;
त्यापलीकडे राहून जातात
अवकाश, आणि गोष्टी निभावून नेण्यातली गंमत

अगदी खरे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0