Skip to main content

अभिवाचन - बरेच काही उगवून आलेले

लेखक - नंदन
अभिवाचन - ऋषिकेश

0
Your rating: None

Comment viewing options

Select your preferred way to display the comments and click "Save settings" to activate your changes.

अभिनव उपक्रम लेख वाचले आहेत,

अभिनव उपक्रम

लेख वाचले आहेत, आता ऐकते.

हे राष्ट्रं देवतांचे ... हे राष्ट्रं प्रेषितांचे |
आचंद्रसूर्य नांदो ... स्वातंत्र्य भारताचे ||

वा! स्पष्ट उच्चार. भरपूर

वा! स्पष्ट उच्चार. भरपूर कविता, उपमा ऐकायला मिळाल्या. नंदन व ऋषीकेश यांचे कौतुक.

चांगला प्रयत्न

चांगला प्रयत्न आहे.

शीर्षकावरून काहीच अंदाज येत नाहिये की काय ऐकायला मिळणार आहे. नंदन यांनी लिहिलेल्याचं वाचन असा समज झाला; त्यांनीच लिहिलेलं ऐकवलं पण त्यातला बराचसा भाग अनेक प्रसिद्ध कवि लेखकांनीच लिहिलेला होता. नंदन यांनी ते सर्व या स्वरूपात एकत्र मांडलं. थोडी दिशाभूल झाल्यासारखं वाटलं.
ऐकायला लागल्यावर सुरुवातीला पुढे काय ऐकायला मिळणार आहे याची थोडक्यात प्रस्तावना आवडली असती.

हे सर्व ऐकताना, ते सर्व लिहिलेलं पाहायची सोय होऊ शकल्यास अजून मजा आली असती असं वाटलं.
पहिल्या भागात एक खूपच मोठ वाक्य आहे...ज्यात ज्ञानेश्वरांपासून,....संदिप खरे येईपर्यंत ते कुठे सुरु झालं होतं ते विसरायला झालं.त्यामुळे समोर लिहिलेला मजकूर असता तर लक्षात ठेवायला मदत झाली असती.

आभार!

सुचना योग्यच आहे. नंदन याने लिहिलेला मुळ लेख दोन भागात आहे तो पुढील दुव्यांवर वाचता येईलः
भाग १
भाग २

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

धन्यवाद

दुव्यातला भाग २ एम पी थ्रीतल्या पहिल्या भागाशी जुळतो आहे.
कवितांची निवड आवडली. काही पहिल्यांदाच ऐकल्या/वाचल्या.

आभार! खरंतर हा प्रयोग मी

आभार! खरंतर हा प्रयोग मी पहिल्यांदाच केला.
कशाचे अभिवाचन करायचे हा एक मोठा पेच होता. अत्रे, मिरासदार यांच्या एकेक कथा डोक्यात होत्या पण प्रताधिकाराचा प्रश्न येईल अश्या विचाराने तो वोचार रद्द केला.

मग आपल्याच मित्रमंडळींपैकी कोणीतरी लिहिलेलं वाचायचे ठरवले. तेव्हा विनाविलंब हाच लेख डोक्यात आला.
नंदननेही आनंदाने परवानगी दिली.

अवांतरः याच नावाचा धामणस्करांचा कवितासंग्रहसुद्धा अतिशय वाचनीय आहे.

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!