Skip to main content

Souls at 2 PM

सेन्योरा,
तेवत ठेव उघडा दिवा
इंद्रियांचा गुंता घेऊन,
सडत चाललेल्या देहाला
पहा आरसे लावून,
तेव्हा फुलपाखरांचे थवे
जातील रेडलाईटमधून.

एंटोनिओ,
तुझा स्पर्श तुझाच असतो
माझा स्पर्शही तुझाच असतो
तुझी किडत जाणारी पेशी तरी
जगता येईल मला?
हा सल मोकळा ठेऊन मी
आत लपवलाय फुलपाखरांचा थवा.

विशेषांक प्रकार

अनंत ढवळे Tue, 20/11/2012 - 19:21

सिनेमा - सेक्स आणि कवीचे विचार यांची कमालीची गुंतागुंत झालेली दिसते आहे ...कविता आवडली