Skip to main content

शून्यस्पर्श

मिटलेल्या शरीरावर
फिरू द्यावा नांगर
भळाभळा सांडावी झिंग
आणि चंद्र असावा सहयात्री

असावीत त्याची पाळंमुळं
या लंबकांच्या देहात
विस्तव रंध्रकल्लोळात
ध्यानस्थ करुणा रत व्हावी

किल्मिषांचे रूतावे रंग
भग्नावे शून्यशिल्प,
या चंद्र समाधीवरती
चंद्रपुष्प मी व्हावे

विशेषांक प्रकार

हरवलेल्या जहाज… Wed, 20/03/2013 - 01:16

रात्री एकटं असताना, चंद्राच्या दर्शनाने, त्याच्या स्पिरीच्युअ‍ॅलिटीची जाणीव झालेलं द्विधा मन ती 'स्पिरीच्युअ‍ॅलिटी' स्वतःत सामावून घेऊ पहातेय. आपल्या मानवी अस्तित्वाबरोबर येणार्‍या सर्व इच्छा-आकांक्षा, प्रेरणा आणि द्विधा करणार्‍या इतर सगळ्या मानवी भावना त्यागून चंद्रसाक्षीने शुन्यत्व प्राप्त व्हावं अशी इच्छा यात आहे. एकप्रकारे हा ध्यानस्थ चंद्राबरोबर द्विधा मनाने केलेला शृंगार आहे.