मृत्युचिन्ह

प्रिय मृत्यो,

नश्वर जगातल्या एकमेव खऱ्या मित्रा,
लोक तुला काय काय म्हणतात ....

आयुष्य थांबवतोस म्हणून पूर्णविराम .
पुनर्जन्माच्या संकल्पनेनुसार अर्धविराम ;
नंतर येणाऱ्या अनेक जन्मांतला एक संपला म्हणून स्वल्पविराम ,
पुढल्या जन्मास जोडणारा म्हणून संयोगचिन्ह -
अर्ध्यातूनच उठवलंस तर अपसारणचिन्ह ---
विशेष असलास तर 'एकेरी अवतरणात'
अतिविशेष असलास तर "दुहेरी"

जगातलं
न थांबलेलं आश्चर्य उद्बारचिन्ह !
अन न सुटणारं कोडं : प्रश्नचिन्ह ?

(पूर्वप्रकाशित)

field_vote: 
3.5
Your rating: None Average: 3.5 (4 votes)

प्रतिक्रिया

विरामचिन्हे शिकवण्याची अभिनव कल्पना आवडली. विसर्गचिन्ह राहिले आहे असे वाटतेः

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

!,.;?-!,.;?-!,.;?-!,.;?-!,.;?-!,.;?-!,.;?-

मृत्यू जवळ आलेला असा दाखवावा का? Wink

कविता आवडली

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

कविता आवडली.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

इतकी छान काव्यकल्पना तुम्हाला सुचली पण कागदावर मात्र फार गद्यगद्य झाले.
म्हणताना जरातरी लय हवी होती, असे वाटले.
शेवटी वाचणार्‍याला कुठेतरी स्पर्शून जाणे महत्त्वाचे. लयीमुळे बरेचदा ते अधिक परिणामकारक होऊ शकते, इतकेच.

Poetry is not the thing said, but the way of saying it हे मला पटते (हे खरे तर कुठल्याही कलेस लागू आहे).
ही कविता 'झाली' असेल आणि इथे जशीच्या तशी इथे दिली असेल, तर काही म्हणणे नाही पण बैठक मारून 'केली' असेल तर निश्चित अधिक चाङ्गली करता आली असती.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मजा आली.

> विशेष असलास तर 'एकेरी अवतरणात'
> अतिविशेष असलास तर "दुहेरी"

या ओळी नीट समजल्या नाहीत. (बाकी समजल्या अशी फुशारकी फोल असेलही...)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

अतिशहाणा, विसर्ग चिन्ह राहिले आहे खरे!

ऋषिकेश, तुमचा 'कोड' पुरा नाही बा कळला..

अमुक, मुद्दा बरोबर आहे..माझ्या लेखी हे मुक्तक आहे, बैठक मारुन लिहिलेले नाही...येथे ती क्याटेगरी न सापडल्याने कवितेचे लेबल लावले आहे..

धनंजय, तुमच्या प्रश्नाचे उत्तर माझ्यापाशीही नाही..सदर मुक्तकास लिहून जमाना झाला आहे..(जानेवारी २००१, टु बी प्रिसाइज) ..त्यामुळे तेव्हा काय सुचून या ओळी लिहिल्या ते आता लक्षात नाही..बहुदा शाब्दिक चमत्कृती असावी असं वाटतं...

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0