अश्वलायन गृह्यसूत्र

श्रीमती सुप्रिया जोशी यांचा ‘मी वाचलेला एक भयंकर ब्लॉग' हा लेख वाचला. ‘अश्वलायन गृह्यसूत्र' काय आहे, असा असा प्रश्न त्यांनी या लेखात उपस्थित केला आहे. श्रीमती जोशी यांच्या लेखावर येथे भरपूर चर्चाही झाल्याचे दिसले. तथापि, ‘अश्वलायन गृह्यसूत्र' नेमके काय आहे, याची कोणतीही चर्चा झाल्याचे मला आढळून आले नाही. त्यामुळे या सूत्राची थोडक्यात माहिती येथे देत आहे.

सूत्रग्रंथ म्हणजे काय?
प्रत्येक वेद हा संहिता, ब्राह्मणग्रंथ, आरण्यग्रंथ, उपनिषद आणि सूत्रग्रंथ असा विस्तार पावलेला आहे. वेद म्हटला की, त्याचे एक ब्राह्मण असते, आरण्यक इ. असते. त्याच प्रमाणे एक सूत्रही असते. सूत्राशिवाय वेद पूर्ण होत नाही. आपले वेद हे नुसतेच ग्रंथ नाही. वेद हे एका संस्कृतीचे वहन करणारे ग्रंथ आहेत. त्यामुळे संस्कृती जशजशी बदलत गेली, तसतशा गरजा बदलत गेल्या. नवे नियम आले. या नियमांची नीट बांधणी होणे आवश्यक होती. त्यानुसार नवनवी ग्रंथरचना होत राहिली. अशा प्रकारे वेदांचा विस्तार होत गेला. आपण वेद म्हटले की नुसती मूळ संहिता गृहीत धरतो. तथापि, तेवढ्याने वेद पूर्ण होत नाही. अशा प्रकारे चारही वेदांना आपापले सूत्रग्रंथ आहेत. प्रत्येक सूत्र ग्रंथाचे दोन भाग होतात. त्यातला एक भाग म्हणजे गृह्यसूत्र, तर दुसरा म्हणजे श्रौतसूत्र. साधारणपणे गृह्यसूत्रे ही वैयक्तिक आणि कौटुंबिक विधींचे नियमन करतात; तर श्रौतसूत्रे सार्वजनिक स्वरूपात केल्या जाणाèया यज्ञादी विधीचे नियमन करतात. वेदवाङ्मयाचा पसारा वाढत गेल्यानंतर ते पाठ करून ठेवणे अवघड होऊ लागले. तेव्हा सुटसुटीत आणि कमीत कमी शब्दांत नियम बांधून ठेवण्याची गरज निर्माण झाली. त्यातून सूत्रांची निर्मिती झाली. एकाच विषयाला वाहिलेल्या सूत्रांचे संकलन करून सूत्रग्रंथ बनले. या ग्रंथांतील सूत्रे अगदी छोटी-छोटी म्हणजे अवघ्या चार ते पाच शब्दांची असतात. एकेका शब्दांचीसुद्धा असंख्य सूत्रे आहेत.

येथे आणखी एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की, कोणत्याही वेदाचा भाग नसलेले काही सूत्रग्रंथही सापडतात. पतंजलीची योगसूत्रे हे अशा सुट्या सूत्रांचे उत्तम उदाहरण आहे. आज आपल्याकडे जे काही योग्यशास्त्र उपलब्ध आहे, ते पतंजलीच्या योगशास्त्रातून घेतले गेले आहे. वेदांवरची सूत्रे लोकप्रिय झाल्यानंतर इतर विषयांसाठीही त्याकाळच्या लोकांनी सूत्र पद्धतीचा वापर केला. त्यातून सुटे सूत्रग्रंथ निर्माण झाले.

अश्वलायनगृह्य सूत्र काय आहे?
श्रीमती सुप्रिया जोशी यांनी ज्याचा उल्लेख केला आहे ते अश्वलायन गृह्यसूत्र ऋग्वेदाचा भाग आहे. गृह्य म्हणजे गृहासंबंधीचे, म्हणजेच घरगुती. इतका साधा सोपा अर्थ आहे हा. ऋग्वेदी ब्राह्मणांच्या दैनंदिन आणि नैमित्तिक विधींचे नियम या ग्रन्थात आहेत. भारतीय परंपरेतील संपूर्ण १६ संस्कारांचे विधी त्यात सांगितले आहेत. म्हणजेच हे विधी कसे करावेत, कोणत्या विधी प्रसंगी कोणते मंत्र म्हणावेत हे या सूत्रात लिहिलेले आहे. गर्भाधान संस्कार, कर्णभेद संस्कार, विवाह संस्कार, अंत्यसंस्कार हे यातील आपल्याला माहीत असलेले काही ठळक संस्कार होत. ऋग्वेदी ब्राह्मणांचे आपतस्तंभ नावाचे आणखी एक सूत्र आहे. तथापि, अश्वलायन सूत्र अधिक प्रसिद्ध आहे.

या सूत्राला ‘अश्वलायन' हे नाव कसे मिळाले?
अश्वलायन नावाचे एक ऋषी होऊन गेले. त्यांनी या सूत्राची रचना केली. म्हणून त्याला ‘अश्वलायन सूत्र' असे म्हटले जाते. अश्वलायनाच्या सूत्रांचे वर सांगितल्या प्रमाणे शौत आणि गृह्य असे दोन भाग आहेत. श्रीमती सुप्रिया जोशी यांनी येथे ज्या बद्दल विषय काढला आहे, ते अश्वलायनाचे गृह्यसूत्र आहे.

मूळ संहिता कोठे मिळेल?
अश्वलायन गृह्यसूत्राची मूळ संहिता सध्या कोठे ग्रंथ रूपाने उपलब्ध असल्यास मला माहिती नाही. पण ती असणारच असणार. माझ्याकडे एक जुनी प्रत आहे. कोणाला पाहायची असल्यास मी ती दाखवू शकेन.

माझ्या मो.क्र. : ९८५०४०६०२९.
माझा ब्लॉग येथे पाहा

Taxonomy upgrade extras: 
field_vote: 
3
Your rating: None Average: 3 (4 votes)

संक्षिप्त तरीही माहितीपूर्ण.
इतरही विषयांप्र्माणेच ह्यातही काहीच येत नसल्याने काहीच बह्र घालू शकत नाही. माहिती, तोंडओळख म्हणून लेख चांगला वाटतो आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

सूर्यकान्तजी,

नक्कीच माहितीपूर्ण लेख आहे.
आश्वलायन गृह्यसूत्रे म्हणजे काय हे अगदी स्पष्ट करणारा आहे.

या धाग्यावर काही गृह्यसूत्रे देऊन त्यावर चर्चा झाली तर उत्तमच.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सूत्र म्हणजे काय हे कळलं. त्याच अनुषंगाने ब्राह्मणं, आरण्यकं व उपनिषदं यांमध्ये काय प्रकारचं साहित्य येतं आणि मूळ वेदसंहितेशी या सगळ्यांचा संबंध नक्की कुठच्या प्रकारचा असतो हे जाणून घ्यायला आवडेल.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

तोंडओळख चांगलीच आहे.

'अश्वलायन नावाचे एक ऋषी होऊन गेले. त्यांनी या सूत्राची रचना केली. म्हणून त्याला ‘अश्वलायन सूत्र' असे म्हटले जाते.' असे वर म्हटले आहे. त्यातील 'अश्वलायन' ह्या शब्दात थोडी दुरुस्ती. ग्रंथांची नावे 'आश्वलायनगृह्यसूत्राणि' आणि 'आश्वलायनश्रौतसूत्राणि". ऋषीचे नाव अश्वल, जो शौनकाचा शिष्य होता. अश्वलाचे ते आश्वलायन. पहा मोनियर विल्यम्स पृ. १५९, मोतीलाल बनारसीदास आवृत्ति.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

चांगली माहिती.. आभार!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

दोस्तहो, मनापासून धन्यवाद.
आपला हा ग्रुप खरोखरच वाचणारा आहे, याची अनुभूती या लेखाच्या निमित्ताने आली. श्री. सागर यांनी सूचविल्याप्रमाणे अश्वलायन सूत्रांचा एक अध्याय येथे यथावकाश देईन. त्यावरून या ग्रंथाचे स्व्ररूप आपल्या लक्षात येईल. तसेच श्री. राजेश घासकवडी यांनी सूचविल्या प्रमाणे वेदवाङ्मयाची संपूर्ण तोंड ओळख होईल, अशी माहितीही यथावकाश देण्याचा प्रयत्न करीन.

सर्वांचे आभार.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

श्री. अरविन्द कोल्हटकर,
आपला भर इंग्रजी संदर्भांवर अधिक दिसतो. अश्वलाचे (अश्वलाने लिहिले) म्हणून अश्वलायन ही तुम्हाला गवसलेली व्युत्पत्ती माझ्या वाचनात आलेली नाही. अश्वलायनांचे पूर्ण रूपातील नाव अश्वलायनाचार्य असे आहे.

तुमच्या व्यत्पत्तीतून काही घोटाळे संभवतात. उदा. अश्वलाचे (अश्वलाने लिहिलेले) म्हणून अश्वलायन तसे रामाने लिहिले म्हणून रामायण असे गृहीत धरावे लागेल. हाच न्याय उलट्या पद्धतीने लावल्यास पतंजलीच्या योगसूत्रांना पतंजलायन योगसूत्रे म्हणावे लागेल. पण तसे दिसून येत नाही. संस्कृतामध्ये अयनान्त नामे काही प्रमाणात सापडतात. त्याचे सर्व परिचित उदाहरण म्हणजे महर्षि बादरायन(ण). बादरायणांना बादरायणाचार्य असे म्हणतात, हे सर्वांना माहिती असेलच. त्याचप्रमाणे अश्वलायनाचार्य असे हे नामाचे रूप आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आपल्या सर्वांचीच थोडी गल्लत होत आहे असे मला वाटते म्हणून माझे मत पुनः एकदा मांडतो.

ग्रंथाचे नाव 'अश्वलायन सूत्र' असे नसून 'आश्वलायन सूत्र' आहे असे मी वर स्पष्ट लिहिले आहे आणि मी पुनः तेच म्हणतो - 'अ' नाही 'आ'.

आता ह्याचा कर्ता अश्वल का आश्वलायन ह्यावर दुमत आहे, पण तो कर्ता 'अश्वलायन' निश्चितच नाही. कर्ता अश्वल असे मी का म्हणतो हा प्रश्न का पडावा? त्याची मोनियर विल्यम्सच्या पानासकट नोंद मी वरती केली आहे तेथे पाहिल्यास 'गवसेल'. मो.वि. चा शब्दकोष संस्कृत अभ्यासाच्या क्षेत्रात गेली १००हून अधिक वर्षे एक प्रमाणग्रंथ म्हणून जगभर मान्यता पावलेला आहे. माझ्या त्यावर 'आप्तवाक्य' म्हणून विश्वास आहे.

केवळ इंग्रज मो.वि.च नाही तर भारतीय आपटेहि 'आश्वलायन' हाच उच्चार देतात. तसेच आधार इंग्रजी वा मराठी वा स्वाहिली हा मुद्दा नसून तो बरोबर आहे का नाही हेच महत्त्वाचे. ग्रंथकर्त्याचे नाव 'अश्वलायन' आहे असे ज्यांना वाटते त्यांनी आधार दाखवावा, कोणत्याहि भाषेतील, असे मी म्हणतो.

आश्वलायनगूह्यसूत्रांवरील गार्ग्यनारायणीयवृत्ति मी पाहिली. तिचा मंगलाचरणाचा श्लोक असा आहे. तेथेहि 'आश्वलायन' हाच उपयोग आहे.

आश्वलायनमाचार्यं प्रणिपत्य जगद्गुरुम्।
देवस्वामिप्रसादेन क्रियते वृत्तिरीदृशी॥

(जगद्गुरु आश्वलायन आचार्यांच्या पाया पडून देव आणि वन्द्य अशांच्या कृपेने मी ही वृत्ति रचीत आहे.)

आपटे आणि मोनियर विल्यम्स ह्या कोषातील आवश्यक तो भाग अधिक स्पष्टीकरणासाठी खाली दाखवीत आहे. (Diacritical Marks च्या जागी मी Itrans Coding वापरले आहे कारण ह्या लिखाणात Diacritical Marks दाखविणे माझ्या संगणकक्षमतेबाहेरचे आहे.)

अश्वल - [अश्वं लाति - क] N of a sage, The Hotri-priest of Janaka, अथ ह जनकस्य वैदेहस्य होताऽश्वलो बभूव (Bri. Up.) असा बृददारण्यक उपनिषदातील आधार दर्शविला आहे. (आपटे पृ. १८४)

आश्वलायन N. of the author of a celebrated ritual work, called the Ashvalaayana SUtras. (आपटे पृ.२३७)

Ashvala (as) m.N. of the Hotri-priest of Janaka king of Videha. Sbr. xiv. (cf.Ashvalaayana) (मोनियर विल्यम्स पृ.११६)

आश्वलायन Ashvalaayana , as, m. (fr. ashvala...) N. of a pupil of Shaunaka's, author of SUtra or ritual work (relating to the Rig-veda) and founder of a Vedic school. (मोनियर विल्यम्स पृ.१५९) (ह्यानंतर -grihya-kaarikaa, -BraahmaNa, आणि -shaakhaa म्हणजेच आश्वलायन गृह्यकारिका आणि आश्वलायन ब्राह्मण आणि आश्वलायन शाखा ह्यांच्यावर टिप्पणी आहे.)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0