गागाभट्ट : आक्षेप व खंडण

गागाभट्टांनी राजेना छळले

एखाद्याला आरोपीच्या पिंजर्‍यामध्ये उभे करायचे असे ठरवलेच असेल व ज्यावेळी तसे ठरवण्यार्‍याकडील तात्विक मुद्दे संपतात आणि ती खोटी ठरवली जातात अशावेळी त्याचा ताळतंत्र सुटुन कोणत्या थराला जाऊन काय आरोप करेल याचे भान आरोपी ठरवणार्‍याला राहत नाही . आणि हेच काही लोक विसरतात आणि दुर्दैवाने काही अविचारी (विचार करण्याची क्षमता नसलेले किंवा समोरील मुद्दा विचार न करता अभ्यास न करता जशाच्या तसा स्विकारणारे) लोक त्यांचे अनुकरण करतात. त्याहुनही आपले दुर्दैव म्हणजे आपल्या समाजात असे लोक म्हणजे असे अविचारी लोक काही जास्तच प्रमाणात आहेत.

आज आपण असेच एक ताळतंत्र सुटुन केलेल्या आरोपांमधीलच एक आरोपाबद्दल चर्चा करणार आहोत. तो आरोप म्हणजे गागाभट्टांनी राजांना छळले , म्हणुन . मुद्दा नंबर एक _ गागाभट्ट हे वाईट आणि दोन _ पर्यायाने पुर्ण ब्राम्हण समाज वाईट. बरं जर असे समिकरण्च बनवले असेल की जर एखाद्याने राजांना छळले , तर त्याला दोश द्यायचाच त्याचबरोबर तो व्यक्ती ज्या समाजतील असेल त्या समाजालाही दोश द्यायचा तर मग असा समाजच उरत नाही की ज्यानी राजांना छळले नाही त्याचे काय ??

बरे याठिकाणी आपल्या हे लक्षात येते की "गगाभट्टांनी राजांना छळले" असेल तर कोणीही येवुन राजेंना छळावे इतके राजे दुधखुळे होते का ? एक एक मावळा , सरदार, साथिदार अगदी पारखुन घेणारे शिवराय गगाभट्टांनी त्यांना छळावेइतके खुळे होते का ? गगाभट्टांनी राजांना छळले या आरोपकर्त्यांच्या आरोपामधुन राजेंबद्दल जनतेमध्ये काय संदेश जातो. एखाद्या अवख्याने जर असे काही ऐकले तर त्याचे राजेंबद्दल काय धारंणा होईल ? याचा विचार हे लोक करत असतील का किंवा इतका साधा विचार करण्यची क्षमता या लोकांकडे नसेल का हा प्रश्न पडतो.

आता थोडे मुळ मुद्द्याकडे वळू हे लोक शिवरायांचा गागाभट्टांनी राज्याभिशेक केल्यावर शिवरायांनी गागाभट्टांना जे काही द्रव्य दिले त्यावरुन गागाभट्टांनी शिवरायांना छळले किंव लुटले असे हे लोक म्हणतात. असे असेल तर काय शिवरायांनकडे केवळ इतकेच द्रव्य होते की जे केवळ एका ब्राम्हणाला दिलेल्या दक्षीनेने संपुन जावे ? तत्कालीन साहीत्य अभ्यासल्यावर आपल्या लक्षात येते की गागाभट्टांनी शिवरायांचा सन्मानपुर्वक राज्याभिषेक केला व त्याच्या बदल्यात शिवरायांनी सभासद बखरी नुसार "एक करोड बेचाळीस लक्ष होन " इतकी दक्षीणा दिली आणि अर्थात एक करोड बेचाळीस लक्ष होन जर द्याल तर मी तुमचा राज्यभिषेक केला अशी अट गागाभटांनी शिवरायांना घातलेली कोठेही आढळणार नाही किंवा तशी शोधने ही मुर्खपणाचे ठरेल. शिवरायांनी गागाभटांना वरील दक्षीणा स्वेच्छेने दिलेली आहे. आणखीन एक महत्वाची गोष्ट अशी की जी गागाभट्टांनी शिवरायांकडून अपरिमित द्रव्य घेतले आणि त्यांचा राज्याभिशेक केला हे सांगताना जाणिवपूर्वक आपल्यापासुन लपवली किंवा इतकी कमी महत्व देवुन सांगीतली जाते की त्याचे महत्व आपल्याला वाटत नाही . आणि ति म्हणजे की शिवरायांनी फक्त्त गागाभटांनाच काय ते द्रव्य दिले किंवा दक्षीणा दिलि असे नाही तर या विशयी बखरकारांच्या नुसार. पन्नास हजार ब्राम्हण तपोनिधी सत्पुरुष, संन्यासी, अतिथी, मानभाव, जटाधारी, जोगी इत्यादिंना चार महिने पुरेल इतके मिश्ठान्न दिले. अष्ट प्रधान मंडळातील प्रत्येकास एक लक्ष होण तसेच एक हत्ती , घोडा, वस्त्रे, अलंकार वगैरे देण्यात आले. आता हे गागाभट्टांवर आरोप करणारे अतिशहाणे असे म्हणतील का की त्या अतिथी,तपोनिधी ,सत्पुरुष, संन्यासी व अष्टप्रधान मंडळ या सर्वांनी मिळून शिवरायांना छळले म्हणुन ?

आणखी एक येथे सांगायचा मुद्दा म्हणजे की गागाभट्टांनीच शिवरायांना राजाभिशेक करवुन घ्यावा असे सुचवलेले तत्कालीन लिखानामध्ये सापडते . हे सत्य लपवुन गागाभट्टांनी राजेंना छळले असे म्हणनार्‍यांना काय म्हणावे ?

ज्या गागाभट्टांच्या नावाने हे अविचारी लोक बोटे मोडतात त्या गागाभट्टांचबद्दल तत्कालीन बखरकारांनी "वेदमूर्ती राजर्षी " तसेच "भट गोसावी , थोर पंडीत, चार वेद सहा शास्त्रे, योगसंपन्न, ज्योतिषी, मांत्रीक , सर्व विद्येने निपुण, कलियुगाचा ब्रम्हदेव , पंडीत" असे गौरवोद्कार काढले आहेत.

याच्यापलीकडे आणखी काही लिहायचे आणि वाचणार्‍यांनी समजायचे बाकी राहीले असेल असे वाटत नाही. हा सुर्य आणि हा जयद्रत.

Taxonomy upgrade extras: 
field_vote: 
2
Your rating: None Average: 2 (1 vote)

जाऊ द्या हो. जाणार्‍याचं जातं अन् कोठावळ्याचं पोट दुखतं ही म्हण ऐकली नाहीत का तुम्ही? द्या सोडून.
त्यापेक्षा शुद्धलेखन न येणार्‍याला ब्राह्मण म्हणायचे की नाही ते सांगा पाहू.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

Hope is NOT a plan!

त्यापेक्षा शुद्धलेखन न येणार्‍याला ब्राह्मण म्हणायचे की नाही ते सांगा पाहू.

बर्‍यावाईट शुद्धलेखनाचा आणि ब्राह्मण असण्यानसण्याचा संबंध काय?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

ब्रह्मं जानाति स ब्राह्मणः किंवा ब्राह्मणः ब्रह्मं जानाति असं कायतरी ऐकलं होतं म्हणून शंका आली की ज्याला शुद्धलेखन कळत नाही त्याला ब्रह्म कळणे शक्य आहे काय?
आणि वरची ती म्हण शिवाजीराजांनी गागाभट्टांना पैसे दिले म्हणजे गागाभट्टांनी त्यांना लुटले अशी कोल्हेकुई करणार्‍यांसाठी आहे हेही स्पष्ट करून ठेवतो.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

Hope is NOT a plan!

'ब्रह्म' जाणण्यासाठी साक्षर असलंच पाहिजे असं कशावरुन? (ब्रह्म आहे आणि ते जाणता येते या तुमच्या विधानातल्या गृहितकांचा आधार घेऊन हा प्रश्न.:-))

ज्ञान आणि साक्षरता या दोन वेगळ्या गोष्टी आहेत असं सभोवताली दिसतं अनेकदा!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

'ब्रह्म' जाणण्यासाठी साक्षर असलंच पाहिजे असं कशावरुन?

Smile माहित नाही. तीच तर माझी शंका आहे की (ब्रह्म म्हणजे काहीतरी कळण्यासारखे असते या जुनाट समजुतीला खरी समजून) निरक्षर माणसाला (किंवा शुद्धलेखन न येणार्‍या माणसाला) ते कळू शकते काय आणि तो कोणत्याही घरात जन्मला असेल तरी त्याला ब्राह्मण म्हणावे काय?
शिवाय, ही शंका मी धागाकर्त्याला विचारली होती. धागा गागाभट्टांच्या बाबतीतला वरकरणी असला तरी तथाकथित ब्राह्मण आणि तथाकथित क्षत्रिय यांच्या बिनडोक झगड्याचा परिपाक आहे हे उघड आहे. आणि काही फालतू लोकांनी केलेल्या आरोपांतून गागाभटांना निर्दोष ठरवणे आपले कर्तव्य आहे असा धाग्याकर्त्याचा काही कारणाने समज झाला आहे असा माझा समज आहे म्हणून त्या कारणांमधला फोलपणा शोधण्यासाठी मी शंका विचारली. गागाभट्टांनी राजेंना छळले असे कोणाचेतरी म्हणणे आहे हे मला या धाग्यातच कळले. असो.

ब्रह्म आहे आणि ते जाणता येते या तुमच्या विधानातल्या गृहितकांचा आधार घेऊन हा प्रश्न

ही माझ्या विधानात आलेली असली तरी मी तयार केलेली गृहीतके नाहीत. ती नसतील तर ब्राह्मण हा शब्द निरर्थक आहे का अशी नवी शंका उत्पन्न होईल.

ज्ञान आणि साक्षरता या दोन वेगळ्या गोष्टी आहेत असं सभोवताली दिसतं अनेकदा!

अगदी बरोबर. म्हशींच्या मागे रानोमाळ हिंडणार्‍याला शाळेत शिकलेल्यापेक्षा कित्येक पटीने जास्त ज्ञान असू शकते.
बाकी इतर काही ज्ञान असो वा नसो पण कोणत्या लोकांची दखल घ्यायची आणि कोणत्या लोकांकडे दुर्लक्ष करावे इतके ज्ञान तरी प्रत्येकाला मिळालेच हवे यासाठी विशेष प्रयत्न करण्याची गरज आहे असे मला वाटते. या धाग्यावर शंका विचारून मला हे ज्ञान नाही हे मी सिद्ध केले आहे.

बाकी, माझ्या शंकेतून काढल्या जाणार्‍या इतर अर्थांबद्दल मी जबाबदार नाही. Smile

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

Hope is NOT a plan!

आपण कशाला असले वितंडवाद घालत बसतो?

हे सर्वमान्य आहे की आपल्या इतिहासात ठोस माहिती अशी फार थोडी हाताला लागते. त्याची कारणे अनेक आहेत पण त्यामध्ये आता शिरत नाही. जे आहे त्या सांगोवांगीच्या कथा. 'एक करोड बेचाळीस लक्ष होन','पन्नास हजार ब्राम्हण तपोनिधी सत्पुरुष', बत्तीस मणाचे सिंहासन' असल्या दंतकथांना काडीचाहि आधार किंवा आधारदायक पुरावा नाही. तरीपण त्या सर्व गोष्टी अक्षरशः खर्‍या आहेत असे ठरवून आपण वाद घालत बसतो.

साधा 'कॉमन सेन्स' वापरला तर ह्या दंतकथांचा फोलपणा कळेल. उपलब्ध नोंदींनुसार आणि अतिशय ढोबळ हिशेब करून असे म्हणता येईल की एका अंदाजानुसार मोगल साम्राज्याचा अकबराच्या काळातला एकूण महसूल १५ कोटि रुपये असावा (हॉबसन-जॉबसन). अबुल फझलच्या ऐने-अकबरीच्या अनुसारे महसूल १० कोटि रुपये होता. (येथे पान ४७.) तेथेच दाखविलेल्या दुसर्‍या अंदाजानुसार तो महसूल १० कोटींच्या थोडा कमी होता. १५ रुपये = १ तोळा सोने ह्या भावाने ही रक्कम १ कोटि ते ६६ लाख तोळे सोन्याइतकी आहे. आता होनाचे वजन काय होते हे कोणासच निश्चित ठाऊक नाही. ढोबळ हिशेबासाठी ते अर्धा तोळा जरी धरले तरी एकूण मोगल साम्राज्याचा महसूल २ कोटि ते १.३२ कोटि होन इतका होईल. गागाभट्टाच्या दक्षिणेची रक्कम जर खरी मानायची असेल तर सगळ्या मोगल साम्राज्याच्या महसुलाच्या जवळजवळ बरोबर ठरेल इतकी रक्कम गागाभट्टाला दक्षिणा म्हणून मिळाली असे मानावे लागेल. शिवाजी महाराजांच्या जवळतरी इतकी रोख रक्कम असेल का? हा मला तरी शुद्ध वेडेपणा वाटत आहे. तीच गोष्ट पन्नास हजार ब्राम्हण तपोनिधी सत्पुरुषांची. रायगडचा दुर्गम प्रदेश डोळ्यासमोर आणा म्हणजे कळेल की पन्नास हजार ब्राम्हण तपोनिधी सत्पुरुष तेथे एका जागी गोळा व्हायचे हे अशक्य काम आहे. पन्नास हजार ब्राम्हण तपोनिधी सत्पुरुषांची जेवणाखाण्याची व्यवस्था, त्यांच्या प्रातर्विधीची व्यवस्था अशा अगदी मूलभूत गोष्टी डोळ्यसमोर आणा म्हणजे हा आकडा किती भाकडकथा आहे हे कळेल.

आपण कशाबद्दल वाद घालत असतो? आपल्याकडे साध्यासाध्या नोंदी शिल्लक नाहीत, आहेत त्या खंडीभर शिळोप्याच्या गप्पा. शिवाजीमहाराज गुडघी रोगाने वारले म्हणजे नक्की कशाने? पावनखिंड ऩ़क्की कोठे होती? (अवान्तर - एक जागा 'पावनखिंड' म्हणून दाखवितात. मला वाटते दांडेकर-पुरंदरे ह्यांपैकी कोणीतरी तसे ठरविले आहे आणि त्यामुळे सश्रद्धांचा त्यावर विश्वास असून त्या जागेस आज तीर्थस्थानाचे महत्त्व आले आहे. मी स्वत: ती जागा जाऊन पाहिली. मी काही इतिहासतज्ज्ञ नाही वा युद्धशास्त्राचा जाणकार नाही. तरीहि सामान्यज्ञानातून दोन गोष्टी लगेच जाणवल्या. ती जागा एका घळीत २०-२५ फूट खाली घळीच्या तळाशी आहे. -येथे चित्र पहा. चित्रातील लोखंडी शिडया घळीत उतरण्यासाठी केल्या आहे. मी तसाच आत उतरलो. अशा घळीत बाजी प्रभु उतरला असेल तर त्याचा आणि त्याच्या सैन्याचा नाश करण्यासाठी त्यांच्या डोक्यावर वरून धोंडे टाकणे हा अतिशय सोपा उपाय शत्रूला मिळाला असता. हातघाईची लढाई होण्यापूर्वीच आपल्या सैनिकांसह डोक्यात धोंडा पडून बाजी प्रभु मरून गेला असता. ही तथाकथित 'पावनखिंड' विशाळगडापासून ४ ते ५ किमी अंतरावर आहे. इतक्या दूर अंतरावर लढाईच्या धुमाळीत तोफांचे आवाज कानावर पडतील हे मला तरी अशक्यप्राय वाटते.) आपला बराचसा इतिहास अशा दंतकथांनीच भरला आहे असे दु:खाने म्हणावे लागते.

डेविड स्टार्कीने केलेली 'Monarchy' ही ब्रिटनच्या राजेराण्यांवरची मालिका मी काही वर्षांपूर्वी पाहिली होती आणि त्यातील एक उल्लेख तेव्हापासून माझ्या लक्षात राहिला आहे. आठव्या हेन्रीचा राज्यभिषेक २४ जून १५०९ ह्या दिवशी झाला, शिवराज्याभिषेकाच्या १७१ वर्षे आधी. इंग्लंडात त्या काळात छापखाने होते. (आपल्याकडेहि गोव्यात होते पण तेथून ती कला उचलावी असे कोणाहि पंडिताला वा शासकाला जाणवले नाही.) राज्याभिषेकाचा संपूर्ण सोहोळा कसा पार पडेल, प्रत्येकाचे काम काय, त्याने कोठे बसायचे/उभे राहायचे हे प्रत्येकाला माहीत असावे म्हणून एक पुस्तक काढून त्याच्या प्रती सर्व महत्त्वाच्या व्यक्तींना वाटल्या होत्या. हेन्रीने आपल्या स्वतःच्या प्रतीवर केलेल्या हस्तलिखित नोंदी - notes - आजहि आपण पाहू शकतो. त्याचा राज्याभिषेक कसा झाला ह्याचा बारकासारका तपशील उपलब्ध आहे, दंतकथा निर्माण करण्याची आणि सांगत बसण्याची आवश्यकता नाही. अँटोनिया फ्रेजरबाईंनी लिहिलेली चरित्रे वाचा. प्रत्येक पुस्तकात शेकडो चित्रे, मूळ दस्तऐवज आणि आणि त्यांचे संदर्भ पाहायला मिळतात. पहिल्या एलिझाबेथ राणीने सही केलेला अर्ल ऑफ ससेक्सच्या वधाचा हुकूम बिटिश म्यूझियममध्ये मी स्वतः पाहिला आहे. इत्यादि.

ह्या पार्श्वभूमीवर आपल्याकडे आहे ते बहुतेक अविश्वसनीय बाजारगप्पांचे भरताड. आपण त्यावरून एकमेकांशी शिरा ताणून का भांडतो आहोत?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

आपण कशाला असले वितंडवाद घालत बसतो?

याबद्दल कोल्हटकर सरांशी सहमत आहे. वितंडवाद घालणे केव्हाही चूकच. सत्य शोधण्यास मात्र हरकत नसावी. पण ते शोधून तिथेच थांबले पाहिजे. त्यासाठी हमरीतुमरीवर येणे अनावश्यक आहे. जे घडले ते असे घडले. येथेच थांबता यायला हवे.

माझ्याकडे काही माहिती आहे ती देतोय.

मूळ इंग्रजी पुस्तकाचे नाव : Shivaji The Maratha - His Life and times - शिवाजी द मराठा - हिज लाईफ एन्ड टाईम्स
मूळ इंग्रजी लेखक : H.G.RAWLINSON (Professor of English, Deccan College, Poona.) एच.जी.रॉलिन्सन (१९१५ साली प्रकाशित)

या पुस्तकात पान क्र. ८५ वर पुढील मजकूर आहे.
Fifty thousands Brahmans fed for a week and innumerable costly presents were distributed. Gagabhatt alone received 10,000 pounds. या मजकुराचा संदर्भ पानाच्या शेवटी तळटीपेत दिला आहे तो हा.
Ref: Gazetteer, Bombay Pres., xi, 370 ff.

मराठी भाषांतर : पन्नास हजार ब्राह्मणांना एक आठवडा भोजन दिले गेले आणि असंख्य महागड्या भेटवस्तू वाटल्या गेल्या. फक्त गागाभट्ट यांना दहा हजार ब्रिटीश पाऊंड्स एवढी रक्कम मिळाली. ( तत्कालीन मराठी होन म्हणजे नक्की किती ब्रिटिश पाऊंड्स हे तपासून पाहिले पाहिजे, म्हणजे नेमकी रक्कम कळू शकेल.)
या माहितीसाठी पुरावा म्हणून तत्कालीन ब्रिटिश नोंदीचा दिला आहे - गॅझेटियर , बॉम्बे प्रेस, xi, 370 ff.

तर सभासद बखरीत पुढील उल्लेख आहे:
गागाभट मु…ख्य अध्वर्यू त्यांस अपरिमित द्रव्य दिले
संपूर्ण खर्चाची सं…ख्या एक क्रोड बेचाळीस लक्ष होन जाले. अष्टप्रधानांस लक्ष लक्ष होन बक्षीस दर असामीस, याखेरीज एक एक हत्ती, घोडा, वस्त्रे , अलंकार, असे देणे दिले. येणें प्रमाणे राजे सिंहासनारुढ जाले.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

जपून ठेवावा, लक्षात ठेवावा, पुन्हा पुन्हा वाचावा असा प्रतिसाद.
एका प्रतिसादासाठी धाग्यावर यावे लागले.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

एका प्रतिसादासाठी धाग्यावर यावे लागले.

उपरोल्लेखित प्रतिसाद या धाग्यावर आलेला आहे हे या धाग्यावर आल्याखेरीज समजण्याची कोणतीही तरतूद 'ऐसीअक्षरे'वर नाही.

फार कशाला, उपरोल्लेखित प्रतिसादाच्या कर्त्याने या धाग्यावर काही प्रतिसाद दिलेला आहे, हेदेखील या धाग्यावर आल्याखेरीज समजण्याची कोणतीही तरतूद 'ऐसीअक्षरे'वर नाही.

सबब, 'एका प्रतिसादासाठी धाग्यावर यावे लागले' हे विधान (मधला एखादा दुवा माझ्या निरीक्षणातून सुटला असल्याखेरीज) पटण्यासारखे वाटत नाही, एवढेच निरीक्षण या निमित्ताने नोंदवू इच्छितो.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

न वी बाजूंना दरवेळी उत्तर देणे कठीण आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

मनोबा,

भावना पोहोचल्या.
धन्यवाद Smile

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

>>पन्नास हजार ब्राम्हण तपोनिधी सत्पुरुष

सभासद बखर

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

आकडा फुगवून सांगायला?

विशेषतः

- 'ब्राह्मणभोजन घालणे' हे, फॉर व्हॉटेवर इट इज़ वर्थ, त्याच्या काळात प्रतिष्ठेचे लक्षण मानले जात असेल तर?
- पुढे एकविसाव्या शतकात या आकड्यावर 'वेस्टफुल एक्स्पेंडिचर'चे ऑडिट बसणार आहे, याची त्यास आगाऊ कल्पना नसेल तर?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

बखरकारांच्या वा भाटांच्या त्या भाकडकथा आणि आठव्या हेन्रीच्या नोंदी खर्‍या हे कसे ठरवतात? म्हणजे भारतीय लोक प्राचीन काळापासून खोटारडे होते आणि युरोपियन लोक सत्यवादी होते याला सवता पुरावा आहे का? हा एक लै मेजर मुद्दा आहे.
-===========================
मंजे पद्मनाभ मंदिरात मिळालेले सोने भाकडकथा आहे का? जर राजे लोक कोण्या अज्ञात (हो, ते मंदीर जनरली कोणाला पण अगोदर ऐकून माहित नव्हते) एवढे सोने देऊ शकतात तर शिवाजी गागाभट्टाला देतो ती भाकडकथा का? आजचे २२ बिलियन डॉलर किती झाले? १.३२ कोटी होन = (तुम्ही अंदाजे पंदाजे लावलेला गुणक खराच मानू) = ०.७१ कोटी तोळे = पद्मनाभ मंदिराच्या १२.५% सोने (२२ बिलियन डॉलर नि २७०००/--राज्या रु तोळा). मला काय ही भाकडकथा वाटत नाही.भारत तेव्हा जगाची आर्थिक राजधानी होता. म्हणजे आजच्या सारखे हेन्रीच्या वंशजांनी लूटून ३०० वर्षे झाली नव्हती. हिशेब आत्ताचा चष्मा उतरावून केलेला बरा. महाराजांची औकात पद्मनाभच्या १२.५% असणे ही भाकडकथा कशी? आपली एकके डिसकंटिन्यू झाली म्हणून भारतीय राजांचे कर्तृत्व लोक जितके मानतात तितके नाही हे लॉजिक पण विचित्र आहे. माझ्या मते तरी कॉमन सेन्स थोडा रिगरसली लावून स्वदेशीयांना बदनाम केले तर जास्त श्रेयस्कर.
===================
तोफेचा गोळा किती दूर पडतो? त्याचा आवाज ४-५ किमी जाणार नाही? आजच्या साध्या तोफांचा आवाज २५ किमी दूर जातो. अगदी रायफलचा आवाज २ मैल (३ किमी) जातो. पावन खिंडीत तलवारीचा आणि दगडांचा डेसिबल किती असणार ज्याला नॉइझ म्हणावे?
===================
भारतीय ऐतिहासिक (मंजे जुन्या) इतिहासकारांनी इतिहास नीट लिहिला नाही ही काय रड आहे हे कळले नाही. त्यांना गुप्तता पाळायची असेल सरकारी कारभाराबद्दल, आत्ताच्या इतिहासकारांना पुरावे देत बसण्यापेक्षा! त्यांना राजकारणच कळत नव्हते, इतिहास लेखनच कळत नव्हते, लेखनच कळत नव्हते, हिशेबच कळत नव्हता आणि ते अप्रामाणिक चरित्राचे लोक (लेखक) होते हा काय शहाणपणा? तो बहीर्जी नाईक कोण होता ते काही एक कळत नाही हे गुप्तहेर यश का अपयश? शिवाजीची संपत्ती नक्की किती हे शत्रूला न कळणे हे यश का अपयश?
=======================
अकबराचा रेवेन्यू का बरे घेतला म्हणे? तिथेच दोन ओळी खाली औरंगजेबाचा लिहिला आहे (तो तिप्पट आहे) तो जास्त सयुक्तिक नाही का? राजांच्या काळात औरंगजेब होता ना? नि लँड रेवेन्यूच का घेतल्ला. टोटल का नाही? आणि मुघल हे कर घेत, शिवाजी मात्र मुघलांचा रेवेन्यूच लुटत, शिवाय साठवलेली संपत्ती लुटत. मग बाजारगप्पा तुमच्या का बखरकारांच्या?
==================
रायगड आत्ताच्या ए सी क्लास करिता दुर्गम आहे. तेव्हा युद्धाकरता दुर्गम होता. लोक जाण्याकरिता का बरे दुर्गम होता? राज्याभिषेक काही डिमॉनेटायझेशन सारखा अर्ध्या रात्रीत झाला नसावा. आणि भारतातले मेळे, वार्‍या यांचे आकडे न बघताच भारतीयांकडे गर्दी नियंत्रण कौशल्य नव्हते म्हणण्याची घाई जास्त नाही का? शिवाय आज कोण्या राष्ट्रपतीचा राज्याभिशेक नसायच्या सामान्य दिवशी केंद्र, राज्य, स्थानिक सरकारे, त्यांच्या कंपन्या, उपक्रम इ रोज किती नवबामन जेऊ घालतात याची काही कल्पना आहे का?
========================
(आपल्याकडेहि गोव्यात होते पण तेथून ती कला उचलावी असे कोणाहि पंडिताला वा शासकाला जाणवले नाही.)
इंग्रज आपल्याकडचं काय काय उचलायला विसरलेत याची त्यांना यादी द्यायला हवी. फार खजील होतील ते.
===========================

पहिल्या एलिझाबेथ राणीने सही केलेला अर्ल ऑफ ससेक्सच्या वधाचा हुकूम बिटिश म्यूझियममध्ये मी स्वतः पाहिला आहे.

म्हणून आपला इतिहास खोटा? अजब आहे!!!
==========================
लोकांनी आज नको त्या गोष्टीवर भांंडू नये याचेशी मी तुमच्याशी सहमत आहे. परंतु पुरावा नाही म्हणून भारतीयांनी आपल्या ऐतिहासिक प्रेरणास्थानांना मामूली समजावे याला मात्र काही पुरावा नाही.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

प्रथम सागर ह्यांचे आभार, अशासाठी की 'Gazetteer, Bombay Pres., xi, 370 ff' असा एक संदर्भ त्यांनी दर्शविला. त्याचा मागोवा घेता ते कुलाबा (आताचा रायगड) जिल्ह्याचे १८८३ साली प्रसिद्ध झालेले गॅझेटीयर, भाग १३ आहे असे दिसले आणि ते येथे उपलब्ध आहे.

त्यामध्ये (पुस्तकाचे) पान ३६५ पासून ३७२ पर्यंतची पाने शिवराज्याभिषेकाबाबत आहेत. त्यात दोन स्रोतांमधील माहिती वेगवेगळी दिलेली आहे. पहिला म्हणजे ऑक्झेंडनच्या नेतृत्वाखाली आलेल्या इंग्लिश वकिलातीने पाहिलेल्या घटनांचे वर्णन (पान ३६५ ते ३६९) अणि दुसरा म्हणजे १८११ साली लिहिण्यात आलेली एक बखर (पान ३६९ ते ३७२). पान ३६९च्या तिसर्‍या तळटीपेत त्यापुढील मजकुराचा स्रोत म्हणून १८११ सालची बखर असा उल्लेख आहे, मात्र तिचे नाव स्पष्ट दिलेले नाही. आपणास असा सहजच तर्क करता येतो की ही मल्हार रामराव चिटणीस, जे सातार्‍यात शाहू दुसरे ह्यांच्या दरबारात होते, ह्यांनी लिहिलेली बखर आहे कारण त्या काळाच्या सुमाराची दुसरी कोणतीच बखर उपलब्ध नाही.

हे सारे इतक्या तपशीलात लिहिण्याचे कारण असे की रॉलिन्सन ह्यांच्या पुस्तकातील माहितीचा स्रोत ही दुसरी बखर आहे. रॉलिन्सन ह्यांचा आणखी अन्य काही स्रोत असल्याचे त्यांनी लिहिलेले नाही. म्हणजेच रॉलिन्सन ह्यांच्या विधानांवर तितकाच विश्वास ठेवता येईल जितका चिटणीस बखरीवर ठेवता येईल.

दोन्ही स्रोतांनी केलेली समारंभाची वर्णने आपापल्या परीने मनोरंजक आणि उद्बोधक आहेत. प्रत्येकात काही तपशील आहेत जे दुसर्‍यात नाहीत. चिटणिसांमध्ये हिंदु समाजातील व्यक्तीलाच जाणवतील असे अनेक तपशील आहेत, जे इंग्लिश वकिलातीत नाहीत. उलट इंग्लिश वर्णन समारंभाचे समकालीन आहे, तसेच तपशीलांच्या बाबतीत अधिक नि:पक्षपाती आणि वास्तव आहे कारण ते अधिकृत कार्याचा भाग म्हणून लिहिले आहे. ते अवास्तव लिहून लिहिणार्‍याचा काहीच लाभ होणार नव्हता. चिटणिसी वर्णन एकतर सुमारे दीडशे वर्षांनंतरचे आहे आणि मालकाला खूष ठेवण्याकडे त्याचा कल असणे साहजिक आहे. त्याचबरोबर हेहि लक्षात ठेवावयास हवे की लेखक चिटणीस हे सातारच्या राज्यात महत्त्वाच्या जागी होते आणि म्हणून सातारा दफ्तरखान्यातील काही कागद त्यांच्या अवलोकनात आले असणार.

बाकी तपशील वगळून ह्या दोन स्रोतांनी समारंभाच्या दानदक्षिणेवर किती खर्च दाखविला आहे ते पाहू, कारण चालू धाग्याचा विषय तोच आहे.

इंग्लिश वकिलातीच्या वर्णनाप्रमाणे शिवाजीची सोन्याच्या नाण्यांनी सुवर्णतुला करण्यात आली ती १,६१,००० पगोडा म्हणजे १० स्टोन (१४०) पौंड भरली ही सर्व आणि अधिक १,००,००० पगोडा इतके द्रव्य राज्याभिषेकासाठी जमलेल्या ब्राह्मणांना देण्यात आले. ह्यापूर्वी प्रतापगडास जाऊन राज्याभिषेकाप्रीत्यर्थ शिवाजीने देवीस ४२ पौंड सोने वाहिले होते. १,६१,००० पगोडा म्हणजे १४० पौंड म्हणून देवीस वाहिलेले सोने ४२ पौंड म्हणजे ४८,३०० पगोडा. अशा रीतीने एकूण दानदक्षिणा ३,०९,३०० पगोडा इतकी झाली.

१,००,००० पगोडा म्हणजे ३५,००० पौंड (नाण्यात) असे येथे म्हटलेले आहे. तसेच १ पौंड (नाणे) म्हणजे १० रुपये असे कोष्टकहि ठिकठिकाणी दर्शविले आहे. ह्याचाच अर्थ म्हणजे येथील उल्लेखिलेला पगोडा साडेतीन रुपयांबरोबरचा आहे. म्हणून ३,०९,३०० पगोडा म्हणजे १०,८२,५५०
रुपये होत. अशा रीतीने राज्याभिषेकापूर्वी आणि राज्याभिषेक समयी १०-११ लाखाचा दानधर्म झाला असे इंग्लिश वकिलातीच्या वर्णनावरून दिसते.

१८११च्या बखरीप्रमाणे पुढील दानदक्षिणा देण्यात आली. गागाभट्ट रु.१,००,०००, कुलपुरोहित रु. २४,०००, समारंभात प्रत्यक्ष भाग घेतलेले अन्य पुरोहित रु.५,००० प्रत्येकी, अन्य ब्राह्मण दर्जानुसार रु. १,००० ते रु. १०, किरकोळ भिक्षुक रु. ५ ते रु.२. ह्याखेरीज ५०,००० ब्राह्मणांना काही दिवस भोजन आणि रु. १ अशी दक्षिणा देण्यात आली.

ही दोन्ही वर्णने कमीअधिक प्रमाणात एकमेकांशी मिळती आहेत. साधारण १०-११ लाखांपर्यंत दानधर्म झाला असावा. बखरीतील ५०,००० ब्राह्मणांना भोजन ही फारच अतिशयोक्ति असावी कारण ५०,००० ब्राह्मण रायगडावर किंवा आसपासहि राहू देखील शकणार नाहीत.

ह्या दोन वर्णनांपासून मैलोगणती दूर असलेले वर्णन १६९४ साली जिंजीत लिहिल्या गेलेल्या सभासदाच्या बखरीत आहे. 'एक करोड बेचाळीस लक्ष होन गागाभट्टास','पन्नास हजार ब्राम्हण तपोनिधी सत्पुरुष कित्येक दिवस भोजनास', बत्तीस मणाचे सिंहासन' असल्या दंतकथांचे मूळ तीच बखर आहे. जिज्ञासूंना तिचे भाषान्तर येथे पाहता येईल. बखर वाचताच ध्यानी येते की संभाजीविरुद्ध आणि राजारामास खूष करण्यासाठी ती लिहिण्यात आली आहे. ती राज्याभिषेकाला जवळजवळ समकालीन असली तरी अतिशयोक्तीमुळे तिच्यातील आकडे विश्वासपात्र वाटत नाहीत. त्यातील आकडे कसे अर्थशून्य आहेत ह्यावर वरती टिप्पणी केलीच आहे.

विश्वनाथ काशिनाथ राजवाडे ह्यांनी एका ठिकाणी म्हटल्याप्रमाणे अभारतीय तटस्थ स्रोत मिळाल्यास बखरीची विश्वासार्हता वाढते. चिटणीस बखर आणि इंग्लिश वकिलातीचा वृत्तान्त एकमेकांशी जुळते असल्याने ते अधिक स्वीकारार्ह दिसतात आणि सभासद विश्वासार्ह वाटत नाही.

तरीहि सभासदाचे विधान शिरोधार्य मानून चालणार्‍या साठमार्‍या म्हणजे वेळेचा अपव्यय आहे असे मला वाटते.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

नुसती माहितीपूर्ण श्रेणी देणं पुरेसं नाही, म्हणून हा तुमच्या पायी नमस्कार. इतका सखोल अभ्यास करून दिलेला हा प्रतिसाद पाहून थक्क व्हायला होतं. तुमचे इतरही प्रतिसाद खोलवर माहिती देणारे असतात. त्या सगळ्यांनाच एकत्र नमन.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

हा खरा अभ्यास!
वाईटातून चांगलं निघतं म्हणतात ते हेच.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

Hope is NOT a plan!

अगदी असंच म्हणतो!
धाग्याचे या प्रतिसादाने सोने झाले!
अरविंदराव! अनेक आभार

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

श्री. रा. घासकडवी यांच्या प्रतिसादाच्या शब्दाशब्दाशी सहमत.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

श्री.अरविंद कोल्हटकरसरांचे प्रतिसाद....याच धाग्यावरील नव्हे तर, अन्य विषयांवरीलही....वाचणे म्हणजे प्रत्यक्ष बखर वाचनांचाच सुंदर अनुभव असतो. या न्यायाने मी तर असेही धाडसाचे विधान करू इच्छितो की, जर अशी वाचन मेजवानी सदस्यांना मिळणार असेल तर मग 'साठमार्‍यां'चे स्वागतच करावे लागेल.

"ब्लेसिंग्स इन डिसगाईस" चे चांगले उदाहरण म्हणजे अशाप्रकारचे धागे सिद्ध होत आहेत, ते केवळ अशा सखोल अभ्यासू प्रतिसादामुळे.

या निमित्ताने 'ऐसी अक्षरे' अ‍ॅडमिन टीमने 'बखर एक वाङ्मयप्रकार' अशी एका स्वतंत्र धाग्याची निर्मिती करावी असे सुचवावे वाटते. 'सभासद' बखर आणि त्यातील वर उल्लेख करण्यात आलेले 'देणगी वाटप' अतिरंजीत वर्णन हे त्या त्या काळात मराठी मनाला मोहरून टाकत आले असणार हे नि:संशय. एक प्रकारे सामाजिक मनाची उन्नती ताजातवानी ठेवण्यासाठी असे वर्णन लेखकाना/राजकारण्यांना कदाचित आवश्यकही वाटत असेल. त्या त्या शतकातील सम्राट, राजे, हुकूमशहा यांच्या पदरी अशा भाटांची मांदियाळी झाली असल्यास नवल नाही; त्यामुळे एखाद्या ऐतिहासिक प्रसंगाचे वर्णन करताना हेच बखरकार आपली स्वामीनिष्ठा किती जाज्ज्वल्य आहे हे दर्शविण्यासाठी सम्राटाने केलेल्या राईइतुक्या घटनेला पर्वताचे रूप देण्यासाठीच पिसकाड्या झिजवीत असत आणि त्या वर्णनाला विरोध तरी मग कोण करेल ?

सर जदुनाथ सरकार तसेच वि.का.राजवाडे यांच्यासारख्या इतिहासाचार्यांनी बखरींना इतिहासाचे साधनग्रंथ म्हणून कधीच मान्यता दिलेली नाही....[जरी बखरीतून इतिहास वजा करता येत नसला तरी]....त्याचे एक प्रमुख कारण म्हणजे सभासद बखरी म्हणजे घटनांचा मागोवा नसून त्या 'चरित्रपर बखरी' झाल्या होत्या. तर हनुमंतस्वामीच्या बखरी म्हणजे सांप्रदायिक बखरी मानल्या गेल्या. यामुळे झाले असे की, आपल्या 'चरित्र-नायका' ला सजवून मखरात बसविण्यासाठी सभासदाने ज्या लिखाणशैलीचा अवलंब केला त्यामध्ये अतिरंजिकता अविभाज्य बनली.....जी आज शक्य झाल्यास काळाच्या कसोटीवर घासून घेणे क्रमप्राप्त मानावे लागेल. इतिहासातील काही विभूतींच्या संदर्भात 'ऐतिहासिक सत्य' व बखरीतील वास्तव या दोन्हीत तफावत दिसून येत असेल तर सर्वसामान्य वाचक बखरीकडेच का ओढला जातो, त्याला कारण म्हणजे आपल्या नायका'ने आयुष्यभर नायकासमानच वर्तन केले असल्याचा पट समोर आला की बापुड्या वाचकाला त्यात समाधान वाटत असते.

जमला असेल पाच हजाराचा तरी लिहिताना "पन्नास हजाराचा ब्रह्मवृंद गडावर जमला...." अशी फुगविलेली बेडकी ऐतिहासिक सत्य मानावे की सभासदाने 'चरित्रकारा'ची प्रतिमा अतिभव्य करण्यासाठी घेतलेले लेखनस्वातंत्र्य, हा जरी वादाचा मुद्दा होऊ शकत असला तरी त्याबद्दल सरकार, राजवाडे, सरदेसाई आदींसारखे इतिहासकार बखरींना मोडीत काढीत नसावेत. त्याला कारणही ऐतिहासिक व्यक्ती, त्यांच्याभोवती गुंफलेले ऐतिहासिक प्रसंग आणि त्यांच्या अन्योन्य संबंधातून प्रकट होणारे 'किमान वास्तव्य' इतिहासाच्या मागोव्यासाठी पूरकच सिद्ध झाले आहेत. [शिवकालीन घडामोडीच्या अभ्यासकांना कृष्णाजी अनंत सभासदांची 'बखर' जवळची वाटायचे कारण देखील हेच की सभासद छ.राजाराम महाराजांच्या सेवेत होते, तसेच थोरल्या महाराजांच्या आयुष्यातील काही घटनांचे ते प्रत्यक्षदर्शी साक्षीदारही राहिले होते आणि त्यामुळे ते अधिकृत समकालीन मानले गेले. चिटणीस बखरीलाही अगदी तेवढा नसला तरी बर्‍यापैकी संदर्भ म्हणून मान मिळतो.]

असो....तूर्तास इतकेच असू दे. श्री.कोल्हटकर यांच्यासारख्या अभ्यासू व्यक्तीना हा विषय रोचक तसेच स्वतंत्र अस्तित्वाच्या योग्यतेचा वाटत असल्यास चर्चा त्या अनुषंगाने घडू शकेल.

अशोक पाटील

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

अशोक काका,

नेहमीप्रमाणेच तुमचा तुफान फटकेबाजी करणारा मार्मिक प्रतिसाद Smile

"पन्नास हजार ब्राह्मणांना आठवडाभर भोजन दिले गेले" यात आकडा अतिशयोक्ती वाटत असली तरी या आकड्याच्या ब्रिटिश नोंदी देखील आहेत हे विसरुन चालणार नाही. रयतेच्या राजाच्या राज्याभिषेकास अवघ्या महाराष्ट्रातून इतके लोक येणे अशक्य नाहिये. तुम्ही म्हणता तसे अतिरंजितता हा बखरींचा अविभाज्य भाग असला तरी नीरक्षीर विवेकाने आपण त्यातून सत्य बाजूला करत राहिले पाहिजे.

खरे तर या चर्चेत सहभागी व्हायचेच आहे. पण आजच्यासारखा वेळ यापुढेही मिळायला हवा. अनेक ऐतिहासिक साधने हाताशी प्रत्यक्ष आहेत. त्यामुळे मजा येते आहे या चर्चेत.

अशोक काका, तुमचे अजून सविस्तर प्रतिसाद व चर्चेतील सहभाग मला अपेक्षित आहे. कारण शाहू महाराजांच्या सातारा गादीशी अगदी घरोबा असलेल्या कोल्हापूरमधले तुम्ही आहात (तुमच्याकडून तेवढी हक्काची अपेक्षा मी नक्कीच करु शकतो) Wink

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

प्रतिसाद काल दोनदा वाचला.. आज परत वाचला..
काहीतरी उत्तम वाचल्याचे समाधान मिळाले...

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

*******************
Evey, please. There is a face beneath this mask but it's not me. I'm no more that face than I am the muscles beneath it or the bones beneath them. -V (V for Vendetta)

कोल्हटकर सरांचे हे विश्लेषण उत्तम आहे. पुराव्यांच्या साहाय्याने शोध कसा घेत जावे याचा एक आदर्श म्हणून हा प्रतिसाद वाचकांना नेहमीच लक्षात राहील.

कोल्हटकर सर, माझे काही विचार मांडतोय...

रॉलिन्सन ह्यांचा आणखी अन्य काही स्रोत असल्याचे त्यांनी लिहिलेले नाही. म्हणजेच रॉलिन्सन ह्यांच्या विधानांवर तितकाच विश्वास ठेवता येईल जितका चिटणीस बखरीवर ठेवता येईल.

येथे एक गोष्ट नमूद करावीशी वाटते ती ही की हे रॉलिन्सन साहेब पुण्यातील डेक्कन कॉलेजाचे प्राध्यापक होते. आजही या डेक्कन संस्थेचा ऐतिहासिक कागदपत्रांसाठीचा व विश्वासार्हतेचा लौकीक कायम आहे. तेव्हा ब्रिटिश राजवटीत अस्सल कागदपत्रे किंवा त्या कागदपत्रांचे अधिकृत संदर्भ उपलब्ध झाल्याशिवाय रॉलिन्सनसाहेबांनी कोणत्याही पडताळणीशिवाय लेखन केले असेल असे वाटत नाही. रॉलिन्सन साहेबांचे हे पुस्तक माझ्या घरच्या संगणकावर आहे. गुगलून पाहिले, पण नेमका दुवा सापडला नाही. लवकरच त्यांच्या पुस्तकाचा दुवा देण्याचा प्रयत्न करेन. या पुस्तकाच्या शेवटी त्यांनी काही संदर्भ दिलेले आहेत. ते ही पहायला हवेत.

विश्वनाथ काशिनाथ राजवाडे ह्यांनी एका ठिकाणी म्हटल्याप्रमाणे अभारतीय तटस्थ स्रोत मिळाल्यास बखरीची विश्वासार्हता वाढते. चिटणीस बखर आणि इंग्लिश वकिलातीचा वृत्तान्त एकमेकांशी जुळते असल्याने ते अधिक स्वीकारार्ह दिसतात आणि सभासद विश्वासार्ह वाटत नाही.
तरीहि सभासदाचे विधान शिरोधार्य मानून चालणार्‍या साठमार्‍या म्हणजे वेळेचा अपव्यय आहे असे मला वाटते.

या मताशी थोडा असहमत आहे सर. कारण खुद्द राजवाडेंनी सभासद बखरीतली माहिती अविश्वसनीय असल्याचे कुठेही म्हटलेले नाही (असल्यास मला ते मुळातून वाचायला आवडेल, संदर्भ देऊ शकलात तर मदतच होईल. ) दुसरे असे की राजाराम महाराजांना खुश करण्यासाठी कृष्णाजी अनंत सभासद यांना तत्कालीन उपलब्ध असलेल्या कागदपत्रांचा आधार न घेता मनाला वाटेल तशी खुशमस्करी आकड्यांतून करण्याचे काही कारण आहे असे मला वाटत नाही. खुशामत करायची असेल तर ती व्यक्तीच्या पराक्रमाची जास्त होऊ शकेल. पण शिवाजी महाराजांचे कर्तृत्त्वच एवढे मोठे होते की घटनाक्रमाला खुलवून सांगण्यापलिकडे जास्त प्रकारची खुशामत करायची गरज सभासदांनाही पडू नये. कारण दीडशे वर्षांनंतर चिटणीसांकडे जसे सरकारी कागदपत्रे असू शकतात तितके , किंबहुना त्याहीपेक्षा जास्त विश्वासार्ह कागदपत्रे ही छत्रपतींच्या राज्याचा वारसा चालवणार्‍या राजाराम महाराजांकडे असू शकतात. कारण पुढील दीडशे वर्षांच्या कालावधीत त्या कागदपत्रांपैकी कित्येक नष्ट झाली असल्याची शक्यताही असू शकते. शिवाजी महाराजांच्या संदर्भात तत्कालीन असलेली सभासद ही एकमेव बखर आहे. म्हणूनच राजवाडेंनी सभासद बखरीची विश्वासार्हता आणि महत्त्वही नाकारलेले नाहिये. राजवाडे म्हणतात तसे अभारतीय ब्रिटिश वकीलातीच्या संदर्भामुळे माहितीला बळ मिळते हे जरुर खरे आहे. पण त्याच बरोबर आपण हेही लक्षात घ्यायला हवे की ब्रिटिशांकडच्या नोंदी उपयोगी असल्या तरी शिवराज्याभिषेकाची सर्व तंतोतंत माहिती त्यांना मिळेलच असेही नाही. ही शक्यताही आपण लक्षात घ्यायला हवी. कारण ब्रिटिशांशी शिवाजी महाराजांच्या वकीलाने जी माहिती दिली व ब्रिटिशांनी जो प्रत्यक्ष सोहळा पाहिला त्याप्रमाणे वर्णन त्यांनी करुन ठेवले आहे. परखडपणा, निष्पक्ष दृष्टीकोन, प्रत्येक बारीक सारीक नोंद, पुराव्यांसकट तर्काला बळकटी देणे, इ.. अशा सर्व बाबी ब्रिटिशांकडून शिकण्यासारख्या असल्या आणि त्या शिस्तीचा अभाव असला तरी सभासदांच्या नोंदी नाकारता येत नाहीत.
सभासद बखर गागाभट्टांविषयी अपरिमित द्रव्य हा शब्दप्रयोग करते. ही अतिशयोक्ती वा खुशामत असली तरी एक क्रोड बेचाळीस लक्ष होन हा एकूण खर्चाचा आकडा सभासदांचीच बखर पुरवते हेही सत्य नाकारुन चालणार नाही. आजही एखाद्या श्रीमंताने आपल्या मुलीचे लग्न थाटामाटात करुन दिले व कोणतीही कमतरता ठेवली नाही तर लोक म्हणतातच ना की अमाप खर्च केला. त्याप्रमाणे सभासदांची गागाभट मु…ख्य अध्वर्यू त्यांस अपरिमित द्रव्य दिले या वाक्याचा संदर्भ घ्यावा. गागाभट्टांस दिलेल्या अपरिमित द्रव्याचा ब्रिटिश नोंदीप्रमाणे नेमका आकडा काढण्यासाठी उपयोग नक्कीच आहे.
तो आकडा काढण्यासाठी मात्र तुम्ही घेतलेल्या कष्टांची जरुर दाद देतो. पण त्याला अजून ठामपणा येण्यासाठी शिवाजी महाराजांच्या होन या मुद्रेचे मूल्य ठरवायला हवे.
१ होन = २.६ ते २.९ ग्रॅम सोने अशी नोंद आहे. पण अस्सल नोंद मिळाली तर जास्त उत्तम. १ होन या सुवर्णमुद्रेचे मूल्य ठरवले गेले तर संपूर्ण राज्याभिषेकाच्या सोहळ्याच्या खर्चाचे गणित जुळवता येईल.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

१ होन = २.६ ते २.९ ग्रॅम सोने अशी नोंद आहे. पण अस्सल नोंद मिळाली तर जास्त उत्तम. १ होन या सुवर्णमुद्रेचे मूल्य ठरवले गेले तर संपूर्ण राज्याभिषेकाच्या सोहळ्याच्या खर्चाचे गणित जुळवता येईल.

हो.. शिवाय.. किंबहुना याच्याही आधी नाण्याची किंमत अ‍ॅट पार गोल्ड किंवा वजनी सोन्याइतकी होती का हे पहायला हवं. होन हे सुवर्णनाणं होतं आणि शिवराई हे तांब्याचं नाणं होतं इतकी माहिती आठवते आहे. आता होन या नाण्याचं मूल्य आणि त्याची सुवर्ण म्हणून वजनी किंमत ही एकच धरणं त्याकाळच्या अर्थशास्त्रानुसार योग्य ठरेल का?

उदा आजच्या पाच रुपयांच्या स्टीलच्या नाण्याची किंमत पाच रुपये आहे.. त्याचं वजन समजा दहा ग्रॅम आहे तर त्याची किंमत दहा ग्रॅम स्टीलच्या बाजारमूल्याइतकी असं म्हणता येणार नाही. इत्यादि.

किंवा माझा मुळात काहीतरी समजुतीचा घोळही होत असेल. होनाचं मूल्य एक होनच असणार ना? त्याचं रुपयांत तुलनात्मक मूल्य (त्याकाळचं) काढायचं असेल तर नाण्याचं वजन किती ग्रॅम हा मुद्दा महत्वाचा ठरु नये.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

गवि यांनी अतिशय उत्तम प्रश्न उपस्थित केला आहे.

माझ्या माहितीप्रमाणे नाणकशास्त्राच्या नियमांनुसार नाण्याचे वजन हे त्याच्या प्रत्यक्ष मूल्याशी निगडीत असायला हवे, त्याप्रमाणे ते असतेही. अलिकडच्या काळात हा नियम भारतीय नाण्यांसाठी पाळला जात नाही. पण जुन्या काळी मात्र पाळला जायचा.

जाणकारांनी या मुद्द्यावर अधिक भर द्यावा अशी गविंबरोबरच माझीही विनंती

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

एच.जी.रॉलिन्सन यांच्या Sivaji The Maratha his life and times या पुस्तकाचा हा दुवा

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

चिटणीस बखर आणि इंग्लिश वकिलातीचा वृत्तान्त एकमेकांशी जुळते असल्याने ते अधिक स्वीकारार्ह दिसतात.

त्या एकमेकावर आधारित असल्याची संभावना जास्त आहे, वास्तवाच्या जवळ असल्याची संभावना कमी आहे.
===============
कुठे १६९४ नि कुठे १८८३!!! २०० वर्षांनी इंग्रजांच्या शासनकाळात (जसे सभासदास शंभू, शाहू, शिवाजी प्रेम होते तसे) इंग्रजांना हवा तसा इतिहास लिहून घेतला असेल. जेते हवा तसा इतिहास लिहून घेतात असं इथे बर्‍याच लोकांना म्हणताना मी ऐकलं आहे. हे म्हणजे अशोकाच्या शीलालेखावर विश्वास न ठेवता रोमिला थापरच्या कागदावर विश्वास ठेवण्यासारखं आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

सागर....

तुम्हाला धन्यवाद देत असतानाही मी असेच म्हणेन की, इतिहासाच्या अभ्यासाकरीत 'बखरी' चे महत्व अनन्यसाधारण असेच मानतो. फक्त 'रॅशनल' पातळीवर विचार करताना आपण शक्यतेच्या बाजूही [तटस्थपणे] सांभाळणे तितकेच गरजेचे मानले पाहिजे, अन्यथा 'व्यक्तीपूजे'चा दोष निर्माण होईल. आकड्यांविषयी तर नेहमीच मतमतान्तरे येत राहतात [अगदी महाभारतात कौरव-पांडव युद्धावेळी अठरा अक्षौहिणी सैन्य एकमेकासमोर ठाकले असे वाचले की मग साध्या अंकगणितानुसार हा आकडा नेमका किती हा प्रश्न समोर येतो. उत्तरे तर चकरावून टाकणारी असतात. कारण मी वाचले आहे की "१ अक्षौहिणी = वन हंड्रेड ट्रिलिअन्स". असे १८...मग इतकी महाप्रचंड सेना मावण्याइतपत रणमैदान असले पाहिजे हे गृहितक समोर घ्यावे लागते].

"५० हजार ब्रह्मवृंद" असा उल्लेख कित्येक ठिकाणी येतो हे मान्य. म्हणजे गडावर त्या काळात फक्त 'ब्रह्मवृंद' च उपस्थित होते का ? महाराजांसमवेत सावलीसम राहाणारे त्यांचे मावळे आपल्या कुटुंबकबिल्यासह सोहळा काळात तिथे असणार हे अमान्य करण्यासारखे नाही. सभासद बखरीत जसे उल्लेख आहेत तसे सेतु माधवराव पगडी आणि बाबासाहेब पुरंदरे यांच्या लिखाणातही राज्याभिषेकाचे जे उल्लेख येतात तिथे "तयारीसाठी २० हजार ब्राह्मण गडावर हजर होते" असे म्हटले गेले आहे तर राज्याभिषेकानंतर महाराजांनी जिजाऊंच्या पायांना स्पर्श केला ते पाहाण्यासाठी ५० हजाराचा जमाव गडावर एकत्र जमला होता, असा उल्लेख आहे.

अर्थात या आकडेगोंधळामुळे मुख्य सोहळ्याचे महत्व बिलकुल कमी होत नाही, त्याची महती तिथल्या तिथे अबाधित अशीच आहे. फक्त 'सत्य' पारखण्यासाठी 'बखरी' चा (च) उपयोग करावा का ? असा प्रश्न अभ्यासकांना पडत राहिला आहे.

तुम्ही सर जदुनाथ सरकार आणि वि.का.राजवाडे यानी 'सभासद बखरी' संदर्भात केलेल्या मताबद्दल वर पृच्छा केली आहे. त्यासाठी तुम्ही ~

Creative Pasts - Historical Memory and Identity in Western India : 1700 to 1960 - हे कोलंबिया युनि.प्रेसने २००६-०७ मध्ये प्रकाशित केलेले व प्राची देशपांडे यानी लिहिलेले पुस्तक मिळवावे. यात या दोन इतिहासाचार्यांची "बखरी" तील नोंदींना कितपत 'सत्य' मानावे याबाबतची परखड मते वाचायला मिळतील.

अशोक पाटील

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

फक्त 'रॅशनल' पातळीवर विचार करताना आपण शक्यतेच्या बाजूही [तटस्थपणे] सांभाळणे तितकेच गरजेचे मानले पाहिजे, अन्यथा 'व्यक्तीपूजे'चा दोष निर्माण होईल.

ही एकदम पंच लाईन आहे अशोक काका Smile
तुमचा हाही प्रतिसाद म्हणजे पुन्हा एकदा षटकार आहे.

महाभारताबद्दलचा प्रवाद तुम्ही सांगितलाय तो खराच आहे. आजही १८ अक्षौहिणी म्हणजे किती यावर मंथन होते.

राज्याभिषेकानंतर महाराजांनी जिजाऊंच्या पायांना स्पर्श केला ते पाहाण्यासाठी ५० हजाराचा जमाव गडावर एकत्र जमला होता, असा उल्लेख आहे.

हे खरे असू शकते. कारण ५०,००० ब्राह्मणांना भोजन हे एक आठवड्याच्या काळात दिले गेलेले होते. २०,००० ब्राह्मणवृंद राज्याभिषेकाच्या वेळी गडावर वा परिसरात उपस्थित होता. त्यावेळी अर्थातच उरलेले ३०,००० लोक हे मावळे व सर्वसामान्य लोक आपापल्या कुटुंबासह रयतेच्या तारणकर्त्या राजाच्या राज्याभिषेक सोहळ्यास येणे अगदी शक्य आहे. कित्येक महिने अगोदरपासून या सोहळ्याची तयारी सुरु होती, त्यामुळे शिवाजी महाराजांच्या राज्याच्या कानाकोपर्‍यातून लोक या राज्याभिषेकासाठी येणे अशक्य नाहिये.

फक्त 'सत्य' पारखण्यासाठी 'बखरी' चा (च) उपयोग करावा का ? असा प्रश्न अभ्यासकांना पडत राहिला आहे.
"बखरी" तील नोंदींना कितपत 'सत्य' मानावे

अशोक काका, तुमच्या प्रतिसादातले हे मुद्दे मला अतिशय महत्त्वाचे वाटतात. खास करुन कंसातला च (च) Smile
कोणा एका संशोधकाने लिहून ठेवले आहे. नेमके नाव नाही आठवत. (बहुतेक राजवाडे किंवा शेजवलकर) बखरकारांची घटनाक्रम रंगवून सांगण्याची एक खास पद्धत आहे व ती अभ्यासाने ओळखू येते. व त्यानंतर उपलब्ध ऐतिहासिक कागदपत्रांच्या साहाय्याने या बखरीतला अतिरंजितपणा संशोधकाला सहज वगळता येतो. जोपर्यंत बखरीत मिळणार्‍या विधानांना खोडून काढणारे ठोस पुरावे मिळत नाहीत तोपर्यंत तरी बखर प्रमाण म्हणून मानण्याची एक प्रथा इतिहासकार पाळतात. कारण ही बखर ऐतिहासिक कालीन असल्यामुळे कालमाहात्म्यामुळे तिला एक वेगळेच वजन प्राप्त झालेले असते.

अवांतरः तुम्ही सुचवलेले पुस्तक मी अवश्य वाचेन. शोधतोय.. कुठे मिळाले तर मला अवश्य सांगा.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

हाच धागा इतर काही साईटींवर पडल्यास कसे होईल व उत्तरे कशी येतील याचा इच्चार केला,
ड्वाले पाणावले नाहीत.
पोटात ढवळून आले..

चर्चा अन चिखलफेक यातील फरक तो हाच. इथे झाली ती चर्चा. निव्वळ भडकाऊ धाग्यातून चांगाले कसे निष्पन्न होऊ शकते, ते इथे समजते.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

-: आमचे येथे नट्स क्रॅक करून मिळतील :-

'त्याचं रुपयांत तुलनात्मक मूल्य (त्याकाळचं) काढायचं असेल तर नाण्याचं वजन किती ग्रॅम हा मुद्दा महत्वाचा ठरु नये.' (गवि)

नाण्याचे मूल्य त्याच्यामधील धातूच्या प्रमाणावर अवलंबून असते हा मूलभूत नियम. किंबहुना store of value असलेला धातु विनिमयामध्ये सौकर्याने वापरता यावा हे 'नाणे' हा प्रकार निर्माण होण्यामागचा विचार असतो. आधुनिक काळात अंतर्गत धातु ह्या नैसर्गिक हमीच्या स्थानावर चलनामागची शासनाचे दिलेली हमी हे आपल्या चांगलेच अंगवळणी पडलेले आहे, त्यामुळे हे मूलभूत तत्त्व आपल्या लगेच नजरेत येत नाही. उदाहरणार्थ १०० रुपयेच्या नोटेला केवळ कागद म्हणून काहीच किंमत नाही, पण त्यातील १०० रुपयाच्या store of value मागे भारत सरकारचे शासन उभे असल्याने त्या नोटेला ती किंमत येते. जुन्या काळात अशा हमीवर प्रजेचा विश्वास बसणे सोपे नसल्याने - ज्याची कारणे अनेक असतात - नैसर्गिक धातुमूल्याची हमीच कामी येई आणि नाण्याची किंमत त्यातील धातूच्या मानावर अवलंबून असे. ह्यासाठी वरच्या मूल्याच्या नाण्यांमध्ये चांदी आणि सोने हे कमी पुरवठा आणि तरीहि जास्ती मागणी असलेले धातु विशेषेकरून वापरात येत. काहीहि कारणाने - उदाहरणार्थ तूट भरून काढण्यासाठी शासनानेच नाण्याचे दर्शनी मूल्य तेच ठेवून धातु कमी केला तर - जुनी नाणी टांकसाळीत परतवून त्यांच्या जागी नवी नाणी घेणे हा एक व्यवसायच होई. ह्यालाच 'Bad money drives good money out of circulation' (Gresham's Law) असे म्हणतात.

ह्या कारणाने काही चलाख लोक नाण्यातून धातूचा छोटा तुकडा कोरून काढणे हा गुन्हेगारीचा व्यवसाय करीत (debasement of coinage) आणि अशा गुन्ह्यांना मृत्युदंडापर्यंतची कठोर शिक्षा मिळत असे. असे debasement of coinage आता त्या मानाने कमी झाले आहे कारण सोने अथवा चांदी बाहुल्याने असलेली नाणी आता जवळजवळ कोठेच नसतात. निकेलसारख्या धातूंच्या नाण्यांचे debasement of coinage करून फारच किरकोळ नफा मिळतो. तरीहि भारतीय पाच रुपयाचे नाणे वितळवून त्याचे रेझर ब्लेड करण्याचा व्यवसाय बांगलादेशात करतात असे वाचनात आले. (येथे पहा.) एका नाण्याची सहा ब्लेड्स करता येतात आणि ती एका ब्लेडला २ रुपये अशी विकली जातात, म्हणजेच ५ रुपयातून १२ रुपये काढता येतात.

पूर्वी बादशहा वा राजे आपल्या नावाची नाणी पाडण्याचा परवाना गावोगावच्या पतदार सावकारांना देत असत. त्यामुळे नाण्यांना त्या त्या गावाच्या नावाने ओळखले जाई, जसे पादशाही होन, सणगिरी होन, अच्युतराई होन, रामराई होन, देवराई होन, जडमाळ होन, धारवाडी होन, कावरी होन, शैल्यघाटी होन, पामनायकी होन, अदवानी होन, ताडपत्री होन, निशाणी होन, उकिरी होन, सापे होन, एकेरी होन इत्यादि. ह्या मागची गावांची नावे अथवा राजांची नावे सहज ओळखता येतात. बाजारात प्रत्येक नाण्याला त्यात्या टांकसाळीच्या विश्वासार्हतेनुसार कमीअधिक किंमत मिळत असे आणि बट्टा कापून एक नाणे दुसर्‍यात बदलून देणे हाहि सावकारांचा उत्पन्नाचा प्रमुख मार्ग होता. ह्या व्ययसायातील अनुभवी आणि जाणकार कारकुनांस 'पोतनीस (पोतनवीस), पोतदार' अशी आडनावे मिळत, कारण 'पोता' म्हणजे रोख रक्कम. मारवाडी हिशेबात 'पोता बाकी' असा शब्द रूढ आहे.

आजहि जुन्या नाण्यांच्या बाजारत जुन्या नाण्याला मिळणारी किंमत मुख्यत्वेकरून त्यातील शुद्ध धातूचे प्रमाण - आणि अर्थातच त्या नाण्याचा दुर्मिळपणा - ह्यावर ठरते.

हे ह्या विषयाचे सुबोधीकरण झाले. मूळ विषय ह्याहून खूप गहन आहे पण त्या तपशीलात जात नाही. अर्थशास्त्राचे अभ्यासक काही अधिक सांगू शकतील.

जाता जाता एक योगायोग. वरती मीच एका ठिकाणी इंग्लिश वकिलातीच्या वर्णनातला एक पगोडा = साडेतीन रुपये असे म्हटले आहे. त्याला अधिक पक्का आधार माझ्या वाचनात आला आहे. सर दिनशा वाच्छा ह्यानी लिहिलेले 'Shells from the sands of Bombay, My Recollections and Reminiscences 1860-1875' हे १९२० साली प्रसिद्ध झालेले पुस्तक माझ्या वाचनात आले. त्यात पान २६३ वर जेराल्ड अ‍ॅंजियरच्या काळातील पुढील कोष्टक आहे:
१ रु = २ शि ६ पे,
१ पगोडा = ९ शि.
राज्याभिषेकाला गेलेल्या इंग्लिश वकिलातीचा हाच काळ आहे. त्यावरून असे दिसते की पगोडा नावाचे नाणे खरोखरीच वापरात होते. वरील कोष्टकाप्रमाणे १ पगोडा = ३.६ रुपये असे निघते. मी हेच मूल्य १ पगोडा = ३.५ रुपये असे दाखविले होते.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

____/\_____ Smile

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

धीरूभाई अंबानींनी ते आफ्रिकेत असताना नाणी वितळवून त्यातील धातू विकायचे उद्योग केले होते असे वाचल्याचे आठवते. अंबानी येमेनमध्ये होते तेव्हा येमेनी रिआलची नाणी चांदीची असत.ती नाणी वितळवून ते चांदी लंडनमधील धातूचा व्यापार करणार्यांना विकत असत असे वाचनात आले आहे. तेव्हा गविंचा मुद्दा-- नाण्याची दर्शनी किंमत खरी की त्या धातूची किंमत खरी हा मुद्दा पूर्णपणे व्हॅलिड आहे असे वाटते.

अंबानींविषयी अधिकः http://www.citehr.com/20902-story-dhirubhai-ambani.html

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माझी पुण्याचे वटवाघूळ,आयाळ वाढलेला सिंह आणि जिभल्या चाटणारा बोका ही इतर नावे आहेत.भविष्यात नव्या मराठी संकेतस्थळांवर मला "दोन मदारींचा उंट","लांब मानेचा जिराफ","जाड कातडीचा गेंडा" आणि "दाट केसांचे अस्वल" ही नावे घ्यायची आहेत. ही नावे कॉपीराईटेड आहेत.

कोल्हटकर सर,

पुन्हा एकदा सुरेख प्रतिसाद व सविस्तर माहिती.

मुळात नाण्यांची गरज कधी निर्माण झाली? तर पूर्वी बार्टर एक्स्चेंज पद्धती होती. पुढे कालपरत्वे त्यात सुधारणा होऊन मूल्य ठरवणे गरजेचे होऊ लागले. त्या गरजेतूनच नाणकशास्त्राचा जन्म झाला. त्यानंतर प्रत्येक वस्तूचे मूल्य नाण्यांच्या संख्येत ठरवले जाऊ लागले.

शिवाजी महाराजांची सुवर्णमुद्रा होन = १ पगोडा असू शकेल काय?
म्हणजे होन ची किंमत ठरवता येईल. सर्वसाधारणपणे १ होन = तत्कालीन ६-७ रुपयांच्या आसपास असू शकेल.
(१ पौंड म्हणजे १० रुपये ही त्यानंतरच्या काळातील नोंद कुठेतरी उपलब्ध आहे. तो संदर्भ सापडला की तोही येथे देईन. पण नोंद आहे हे नक्की. त्या दाखल्यांवरुन १ होन म्हणजे नेमके किती रुपये हा आकडा काढता यावा.)

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

विद्वान मित्रांनो,
अरविन्द कोल्हटर यांचा पूर्ण आदर राखून मी ही प्रतिक्रिया येथे देत आहे, हे मी आधीच स्पष्ट करू इच्छितो. कोल्हटकर यांनी दिलेली माहिती वाचकांची दिशाभूल करणारी आहे, म्हणून मला येथे लिहावे लागत आहे. कोल्हटकर यांच्या प्रतिक्रियेतील दोन मुद्दावर येथे लिहिणार आहे.

१. मोगलांचे उत्पन्न
२. बखरींची विश्वासार्हता

मोगल साम्राचा एकूण महसूल २ कोटी ते १.३ कोटी होन इतका होईल, असे मोघम विधान कोल्हटकर करतात. ते तद्दन खोटे आहे. एवढ्या तुटपुंज्या रकमेवर भारतासारख्या खंडप्राय देशाचा कारभार कसा पाहत होते, एवढा साधा प्रश्न वाचकांपैकी कोणालाही पडला नाही, याचेही आश्चर्य वाटते.

मोगल सम्राट शहाजहान याने बांधलेल्या ताजमहालाचा एकूण खर्च ३२ कोटी होता. (भारत सरकारच्या पर्यटन खात्याने ताजमहालावर स्वतंत्र वेबसाईट तयार केली आहे. तिच्यावर ही सर्व आकडेवारी उपलब्ध आहे. जिज्ञासूंनी ती अवश्य पहावी.) ताजमहाल बांधायला २२ वर्षे लागली. याचाच अर्थ वर्षाला किमान १.५ कोटी रुपयांची तरतूद शहाजहानला ताजहालासाठी करावी लागली. १.३ कोटी रुपयांचे उत्पन्न असताना एकाच इमारतीवर दीड कोटीची तरतूद शहाजहानाला कशी काय करता आली, हे फक्त कोल्हटकरांनाच माहिती असू शकते. आणखी एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी. ताजमहाल ही शहाजनाने बांधलेली एकच एक इमारत नव्हे. अशा शेकडो इमारती त्याने बांधल्या. (लाल किल्ल्याच्या बांधकामावर झालेला खर्च जिज्ञासूंनी अवश्य पहावा.) शहाजनाने बांधलेल्या इमारतींची किम्मत काढली तर अब्जावधी रुपये भरेल. कोट-दोन कोट रुपये उत्पन्न असलेला माणूस हे करू शकेल, असे आपणास वाटते का?

ताजमहाल १६५६ साली बांधू पूर्ण झाला. तर शिवरायांचा राज्याभिषेक १६७४ साली झाला. म्हणजेच शिवरायांच्या राज्याभिषेकाच्या २१ वर्षे आधी ही इमारत तयार झाली. या २१ वर्षांच्या काळात मोगल साम्राज्याचे उत्पन्न किती वाढले असेल? मग कोल्हटकर महसुलाचा १.३ कोटी हा आकडा कोल्हटकर कोठून आणतात? एक तर कोल्हटकर हे अज्ञानी असावेत, qकवा ते जाणीवपूर्वक दिशाभूल करीत असावेत, असे म्हटल्याशिवाय प्रत्यवाय नाही.

तूर्त एवढेच. बखरींच्या विश्वासार्हतेच्या मुद्यावर उद्या लिहीन.

इति लेखनसीमा.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

सूर्यकांत पळसकर ह्यांच्या प्रतिसादात चार मुद्दे दिसतात.

१)"मोगल साम्राचा एकूण महसूल २ कोटी ते १.३ कोटी होन इतका होईल, असे मोघम विधान कोल्हटकर करतात. ते तद्दन खोटे आहे. एवढ्या तुटपुंज्या रकमेवर भारतासारख्या खंडप्राय देशाचा कारभार कसा पाहत होते, एवढा साधा प्रश्न वाचकांपैकी कोणालाही पडला नाही, याचेही आश्चर्य वाटते."

माझे विधान मोघम नसून मागील गृहीते स्पष्ट करून मगच केलेले आहे आणि विश्वसनीय आधारहि दर्शविलेले आहेत. मी ex-cathedra विधान केलेले नाही. माझे शब्द असे आहेत:

"एका अंदाजानुसार मोगल साम्राज्याचा अकबराच्या काळातला एकूण महसूल १५ कोटि रुपये असावा (हॉबसन-जॉबसन). अबुल फझलच्या ऐने-अकबरीच्या अनुसारे महसूल १० कोटि रुपये होता. (येथे पान ४७.) तेथेच दाखविलेल्या दुसर्‍या अंदाजानुसार तो महसूल १० कोटींच्या थोडा कमी होता. १५ रुपये = १ तोळा सोने ह्या भावाने ही रक्कम १ कोटि ते ६६ लाख तोळे सोन्याइतकी आहे. आता होनाचे वजन काय होते हे कोणासच निश्चित ठाऊक नाही. ढोबळ हिशेबासाठी ते अर्धा तोळा जरी धरले तरी एकूण मोगल साम्राज्याचा महसूल २ कोटि ते १.३२ कोटि होन इतका होईल."

येथील माझे गृहीतकृत्य होनामध्ये किती सोने असावे ह्याबाबतचे आहे आणि कोठलाहि पुरावा नसल्यामुळे मी 'ढोबळ हिशेबासाठी' - माझेच शब्द - १ होन = अर्धा तोळा असे दिले आहे. सागर ह्यांच्या मते ते २.६ ते २.९ ग्रॅम असावे अशी 'नोंद' आहे (कोठे आहे ही नोंद?). तेहि मान्य केले तर महसूल ४-५ कोटि होनांच्या घरात जाईल. काहीहि अंदाज धरला तरी गागाभटाची तथाकथित दक्षिणा १ कोटि ४२ लाख होन ही मुघल साम्राज्याच्या एकूण उत्पन्नाचा फारच मोठा भाग असेल आणि इतकी दक्षिणा एकटया गागाभट्टाला मिळणे हे कल्पनाशक्तीला कितीहि ताण दिला तरी पटणारे नाही. गागाभट्ट ठेवेल कोठे इतकी मोठी रक्कम आणि मराठ्यांच्याकडे तरी इतकी मोठी रोख रक्कम एकगठ्ठा होती का?

वस्तुतः मी ह्या होनांच्या हिशेबाच्या जंजाळात घुसलो ह्याचे कारण सभासद बखरीचा आकडा होनात आहे म्हणूनच. त्याची खरे तर काही आवश्यकता नव्हती. इंग्रज वकिलातीचे आणि चिटणिसी बखरीचे दानदक्षिणेचे आकडे रुपयात आहेत आणि ते दोघेही ती रक्कम १०-११ लाख रुपये अशीच देतात. हे शक्यतेच्या पातळीत आहे आणि इंग्रज वकीलाने हा आकडा खोटा दर्शवावा ह्याचे काहीहि कारण नसल्याने विश्वासार्हहि आहे.

२)होनातील दर्शविलेली १ कोटि ४२ होनाची रक्कम विश्वासार्ह आहे असे दर्शविण्यासाठी पळसकरांचा दुसरा आधार म्हणजे मोगल वसूल फुगविणे, आणि तेहि '३२ कोटींचा ताजमहाल परवडणार्‍या' बादशाहांचे उत्पन्न त्याहूनहि अधिक असणार असा जावईतर्क करून. मोगल महसूल नक्की किती होता ह्याबाबत त्यांच्याजवळ काहीहि प्रत्यक्ष आधार नाही.

माझा महसुलाचा आकडा (१५ कोटि रुपये) हा हॉबसन-जॉबसनमधील दामाबद्दलच्या नोंदीवरून आणि ऐने-अकबरीचा आकडा तेथे दाखविलेल्या दुसर्‍या ग्रंथावरून घेतला आहे, तो माझ्या कल्पनेचा वारु नाही. खाली जदुनाथ सरकारांच्या India of Aurangzeb ह्या पुस्तकातील Ch. 1 p. xxxii मधील मुघल महसुलाचे सालोसालचे आकडे दाखविणारा तक्ता जोडत आहे. दुसर्‍या स्तंभातील १५९४च्या महसुलाचा ऐने=अकबरीचा आकडा १३ कोटि २१ लाखाचा आहे (आकड्यांमधील तफावत बहुतांश दाम-रुपया कोष्टकामुळे पडलेला आहे. महसूल दामात मोजत, ग्रंथकार समजुतीच्या सोपेपणासाठी ते रुपयात बदलतात.) तेथील सर्व आकडे माझ्यापेक्षा फार दूरचे नाहीत हे सूर्याइतके स्पष्ट आहे. मला वाटते इतके आधार पळसकरांना पुरावेत, अन्यथा नुसतेच तर्क न करता त्यांनी काही आधार विश्वसनीय - कोणाची तरी वेबसाइट नव्हे - असा आधार दाखवावा. (इतका 'कमी' महसूल कसा असा प्रश्न पडू नये. त्याकाळचे दर आणि सर्वसामान्य उत्पन्ने पाहता तो पुरेसा आहे. आजच्या रुपयाकडे पाहू नका. त्या काळात खरोखरच गोरगरीबांना उपजीविकेला कवडयाहि पुरत.)

३)ताजमहालचा खर्च आणि त्यावरून मुघल महसूल हे सुताने स्वर्गाला नेणारे सूत अगदीच कच्चे आहे आणि त्याच्या आधाराने कोणी वर चढू पाहील तर तो तोंडघशीच पडेल. "मोगल सम्राट शहाजहान याने बांधलेल्या ताजमहालाचा एकूण खर्च ३२ कोटी होता." असे सूर्यकांत पळसकर आपल्याला सांगतात.. मी ज्या ज्या वेबसाइट्स पाहिल्या तेथे तेथे हा खर्च ३२ मिलियन रुपये (३.२ कोटि रुपये) इतका दर्शविला आहे. (३२ कोटि म्हणजे ३२० मिलियन.) वानगीदाखल पहा हे, हे आणि हे. मूळचा आकडाच चुकीचा. त्या ढिसाळ पायावर काय इमला उभारणार? पुष्कळ भारतीयांच्या लक्ष, मिलियन (दशलक्ष) आणि कोटीच्या कल्पना स्पष्ट नसतात हीहि शक्यता आहेच

ह्या ३२ मिलियनच्याहि कथेच्या खरेपणाची पण मला स्वतःला खात्री नाही. बहुतांशी हीहि एक बिनबुडाची पण सुरस आणि चमत्कारिक कथा असावी असे वाटते. प्रयत्न करूनहि मला तिच्यासाठी विश्वसनीय आधार सापडलेला नाही. पुनः सांगतो, कोणाची तरी वेबसाइट हा पुरेसा आधार मी मानत नाही. ती कोणीहि credulous व्यक्तीने ऐकीव माहितीच्या आधारे तयार केलेली असू शकते. असा काही विश्वसनीय स्रोत माहीत असेल तर पुढे जा, पोकळ, शिळोप्याच्या बाजारगप्पा नकोत.

विश्वसनीय म्हणून मी भारत सरकारच्या पुरातत्त्व खात्याच्या ताजमहालविषयक http://asi.nic.in/asi_monu_whs_agratajmahal.asp ह्या संस्थळाकडे गेलो. (हे संस्थळ पुरातत्त्व खात्याचेचे आहे ह्याविषयी मला खात्री आहे कारण ती भारत सरकारच्या National Informatics Centre ह्या विभागाने बनविली आहे, जो सरकारच्या बहुतेक साइट्स बनवतो. nic.in वरून हे कळते.) ह्या अधिकृत संस्थळाच्या ताजमहाल वर्णनात त्याच्या बांधणीखर्चाचा कोठेच उल्लेख नाही. मला असे वाटते की जर पुरातत्त्व भागाला जर हा आकडा माहीत असता तर त्यांनी नक्कीच तो येथे उल्लेखिला असता.

४)पळसकरांचा ताजमहालचा गोंधळ एवढ्यातच संपत नाही. ते म्हणतातः"ताजमहाल बांधायला २२ वर्षे लागली.' आता वर उल्लेखिलेली पुरातत्त्व विभागाची साइट म्हणते की त्या कामाल १७ वर्षे लागली. ही म्हणते २१, (१६३२-५३). पळसकर खरे का पुरातत्त्व खाते? मी असे म्हणेन की ताजमहालची ठोस माहिती थोडी आहे.

गागाभट्टाने १ कोटि ४२ लाख होनाची दक्षिणा घेतली/उकळली हे 'येन केन प्रकारेण' सिद्ध करण्याचा खटाटोप कशासाठी चालू आहे हे मला कोडेच आहे. शुद्ध ज्ञानाची तहान आणि माहीत नाही ते जाणून घ्यायचे कुतूहल इतकेच ते कारण नसावे असा माझा तर्क.

आता समारोप करून माझ्यापुरता मी ह्या विषयाचा निरोप घेतो कारण आणखी काही लिहिण्याजोगे माझ्यापाशी आत्तातरी काही नाही. पळसकरांनी काही भरीव माहिती - गप्पा आणि सांगोवांगीच्या कथा नाहीत - पुढे आणली तर बघू!

(ता. क. माझ्या असे ध्यानात आले आहे की वरील महसूल तक्ता, जो चित्ररूपाने चिकटविला होता. तो Internet Explorer मध्ये दिसत नाही. असे का ह्या प्रश्नाचे उत्तर माझ्या कुवतीबाहेरचे आहे. http://img585.imageshack.us/img585/7826/mughalrevenue.jpg हा URL ब्राउजरमध्ये घालून पहा एव्हढे सुचवितो.)

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

अभिनिवेश आणि अहंकार जोपासून कोणीही इतिहासकार होऊ शकत नाही. या दोन्ही गोष्टींचा पाया आणि कळस असत्याला भिडलेला असतो. कधी दिशाभूल तर कधी अर्धी माहिती असे हातखंडे अभिनिवेश बाळगणारे लोक वापरतात. श्री. अरविंद कोल्हटकर यापेक्षा वेगळे काहीही करीत नाहीत. कोल्हटकर यांचे प्रत्येक वाक्य खोटेपणाने ओतप्रोत भरलेले आहे. कसे ते पाहा.

१. ताजमहालाविषयी माहिती देताना मी वेबसाईटचा हवाला यासाठी दिला की, कोणाही वाचकाला तात्काळ त्याची पडताळणी करून पाहता येते. मी अधिकृत सरकारी वेबसाईटचा आधार घेतला आहे. ही माहिती पुरातत्व खात्याच्या आकडेवारीवर आधारित आहे. इंग्रजांचा प्रख्यात पुरातत्ववेत्ता आणि भारतीय पुरातत्व खात्याचा प्रमुख लॉर्ड कqनगहॅम याने ही माहिती खोदून काढली आहे. या माहितीला नाकारण्यासाठी कोल्हटकर कोणत्या तरी टुकार वेबसाईटचे मोघम हवाले देतात आणि ताजमहालाचा खर्च ३२ मिलियन असल्याचे सांगतात. कोल्हटकर साहेब, यालाच दिशाभूल म्हणतात. खोटे लिहायचे असले की अशी चलाखी करावी लागते. मी अधिकृत पुरातत्व खाते आणि पर्यटन खात्याची आकडे देतो, तिला कोल्हटकर बाजार गप्पा म्हणतात. आता बाजारगप्पा कोण मारतो, हे वाचकांनीच ठरवावे.

२. ताजमहालाचे बांधकाम किती वर्षे चालले याबाबत वाद घालताना कोल्हटकर आपले अज्ञान प्रकट करतात. १७ वर्षे, २१ वर्षे की २२ वर्षे? त्यांना माहिती नसावी, १७ वर्षांत ताजचे इंटेरियर तयार झाले. तर पुढील वर्षे एक्टेरियरसाठी लागली. बांधकाम सुरू झाले ते वर्ष मोजले की, बरोबर २२ वर्षे होतात.

३. कोल्हटकरांनी हॉबसन जॉबसन (कोण महापुरूष कोणास ठाऊक?)आणि अबूल फजल यांचा हवाला देऊन मोगलांच्या महसूलाची आकडेवारी दिली आहे. ही आकडेवारी देताना कोल्हटकर मोठी चलाखी करतात. ही आकडेवारी सम्राट अकबराच्या काळातली आहे. शिवरायांचा राज्याभिषेक अकबराचा नातू औरंगजेब याच्या काळातील आहे. पण औरंगजेबाचे उत्पन्न किती होते, हे कोल्हटकर गुलदस्त्यात ठेवतात. कारण ती आकडेवारी त्यांना सोयीची नाही. कोल्हटकर साहेब, माझे आजोबा शिक्षक होते. त्यांचे मासिक वेतन सव्वा रूपया होते. म्हणून माझे वेतन तुम्ही सव्वा रूपया गृहीत धरणार आहात का?

४. होन आणि रुपयांचा विनिमय दर ठरविताना कोल्हटकर जी दिशाभूल करतात, ती तर फारच भयंकर आहे. होन आणि रुपये यांचा कुठलाही पुरावा नसल्यामुळे मी होन म्हणजे अर्धा तोळा असे गृहीत धरले, असे वक्तव्य कोल्हटकर करतात. कोल्हटकर साहेब, तुम्ही काहीही गृहीत धराल हो; पण अशा गृहीतकांवर इतिहास लिहिला जात नसतो. इतिहास पुरावे मागतो. कोणत्याही काळात आर्थिक व्यवहार मोघम नसतात. त्याकाळी मोगल आणि दख्खनच्या चलनाचे विनिमय दरसुद्धा निश्चितच होते. ते तुम्हाला माहिती नाहीत, त्याला मी काय करणार? सोपे उदाहरण सांगतो. शिवाजी महाराज आगèयाला गेले होते, तेव्हा त्यांनी मिर्झा राजांकडून कर्ज घेतले होते. विनिमय दर निश्चित नसता, तर हा व्यवहार कसा झाला असता? कोल्हटकर साहेब थोडी माहिती घ्या. तुम्हाला होन म्हणजे काय हेच नीट माहिती नाही हो. अर्धवट माहितीघातक असते.

५. मोगलांच्या महसुलाचे आकडे देताना कोल्हटकर यांनी कमालीचा गोंधळ घातला आहे. कोल्हटकर यांनी तीन-चार वेगवेगळे आकडे दिले आहेत. त्यांनीच दिलेले आकडे पाहा :
हॉबसन जॉबसन - १५ कोटी
अबूल फजल - १० कोटी.
हॉबसन-जॉबसन आणि अबूल फजल यांच्या आकड्यांत ५ कोटींचा फरक आहे. हा फरक मोठा आहे. एकीकडे गागाभट्टांच्या दक्षिणेचा १ कोटी ४२ लाखांचा आकडा कोल्हटकरांना खूप मोठा वाटतो. पण दोन आकडे देताना ते ५ कोटींचा फरक ठेवतात. आहे की नाही गंमत? वरच्या पॅ-यात अबूल फजलच्या नावे १० कोटींचा महसूल कोल्हटकर दाखवितात. खाली मात्र तोच आकडा खाली १३ कोटी २१ लाख होतो. येथेसुद्धा ३ कोटी २१ लाखांचा फरक!

कोल्हटकरांचा आकड्यांचा गोंधळ इथेच थांबत नाही. सर जदुनाथ सरकार यांची साक्ष काढून कोल्हटकरानी एक तक्ता येथे जोडला आहे. त्यात १६९५ सालचा महसूल २० कोटी १२ लाख ७६ हजार ४२५ एवढा दाखविला आहे. ही आकडा शिवराज्याभिषेकाच्या नजिकच्या काळाचा आहे.

म्हणजे पाहा, पहिल्या पोस्टमध्ये कोल्हटकर मोगल साम्राज्याचा एकूण महसूल १० कोटींच्या वर न्यायला तयार नव्हते. तो त्यांनीच आता २० कोटींच्या वर नेला आहे. म्हणजे दुप्पट फरक. दोन पोस्टमध्येच कोल्हटकरांच्या आकड्यांत एवढा फरक पडला आहे. पुढच्या पोस्टमध्ये कदाचित ते आणखी वर जातील. काही सांगता येत नाही.

६. वेबसाईट हा पुरावा होऊ शकत नाही, असे कोल्हटकर एकीकडे म्हणतात आणि दुसरीकडे अनेक वेबसाईटच्या लिन्क प्रतिसादात देतात. आहे की नाही दिशाभूल?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

महत्त्वाची स्पष्टिकरणे आणि सूचना :
अ. माझ्या प्रतिसादाला उत्तर देताना कोल्हटकर शेवटी अगतिक होताना दिसतात. गागाभट्टाने १ कोटी ४२ लाख होनांची दक्षिणा घेतली/उकळली हे येनकेन प्रकारे सिद्ध करण्याचा खटाटोप कशासाठी चालू आहे? असा प्रश्न कोल्हटकर विचारतात. अभिनिवेश यालाच म्हणतात. माझे विवेचन गाागाभट्टाने किती दक्षिणा यावर नाहीच. मोगलांच्या महसूलाची खोटी माहिती कोल्हटकरांनी दिली, म्हणून मी प्रतिसाद लिहिला.

ब. गागाभट्टांना जी काही दक्षिणा शिवाजी महाराजांनी दिली, त्याबद्दल वाद घालणे हाच मुळात मुर्खपणा आहे. गागाभट्टांनी दक्षिणा उकळली असे म्हणणे तर त्याहून मोठा मुर्खपणा आहे. गागाभट्टांनी मागितली नसती, तरी महाराजांनी त्यांना दक्षिणा दिलीच असती. तो त्याकाळचा रिवाजच होता.

क. संभाजी ब्रिगेड आणि त्यांचे चेले चपाटे ख-या-खोट्या गोष्टींच्या आधारे अपप्रचार करीत असतील, तर त्याला उत्तर देताना आपण विशेष काळजी घेतली पाहिजे. कारण आपण जेव्हा एक खोटी गोष्ट रेटण्याचा प्रयत्न करतो, तेव्हा आपल्या १०० ख-या गोष्टी संशयाच्या भोव-यात सापडतात.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

खोटी माहिती कोल्हटकरांनी दिली
फार तर
चुकीची माहिती कोल्हटकरांनी दिली असं म्हटलेलं समजू शकतो. "खोटा" हा शब्द फारच offensive वाटला.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

याच धाग्यावर प्रतिसाद लिहिताना मी म्हटले, की असल्या इन्फ्लमेटरी धाग्यावरही किती छान चर्चा होऊ शकते ते इथे कळते.
कोल्हटकर आगतिक होताना तुम्हाला दिसले म्हणून माझं जरा सटकलं आहे. तसा मी थोडा सभ्य अन बराच असभ्य आहे, तेव्हा,

मा. (मा. म्हणजे काय ते महाराष्ट्राच्या आजच्या राजकारणात असलात तर तुम्हास ठाऊक असेलच.) पळसकर साहेब,

तुमचे धागे, अन प्रतिसाद वाचून वाटते, तुम्हाला इथे चर्चा करण्यात रस नाही, फारतर 'खाजवून खरूज काढणे' हा तुमचा उद्देश आहे. तुमचा दृष्टीकोण पूर्वग्रहदूषीत आहे असे म्हणतो. छत्रपती शिवाजी महाराज अन त्यांच्या जीवनात घडलेल्या गोष्टी तुम्ही फक्त जातीय रंगाने पहात आहात, असेही म्हणतो. "ब्रिगेड"च्या विरोधात लिहिणे म्हणजे इथे चाललेल्या चर्चेत अशा प्रकारे सहभागी होणे नव्हे. तुमचा धागा निमित्तमात्र असून या विषयाबद्दल चाललेल्या सभ्य चर्चेत तुम्ही डोकावला नसतात तर अधिक चांगले झाले असते असे म्हणतो.

एकतर पैठण/नाशिकचा ब्रह्मवृंद सोडून राजांना राज्याभिषेक करायला काशीचा कुणी गागाभट्ट का आणावा लागला, याची मुळे यवन महाराष्ट्रात उतरला त्या आधीच ज्ञानेश्वरांना छळणार्‍या धर्ममार्तंडांपासून उगवली आहेत. असो. इतिहासाचे वाचन तुम्ही केलेलेच आहे. उगा कुस्ती खेळण्यात मला रस नाही.

क. संभाजी ब्रिगेड आणि त्यांचे चेले चपाटे ख-या-खोट्या गोष्टींच्या आधारे अपप्रचार करीत असतील, तर त्याला उत्तर देताना आपण विशेष काळजी घेतली पाहिजे. कारण आपण जेव्हा एक खोटी गोष्ट रेटण्याचा प्रयत्न करतो, तेव्हा आपल्या १०० ख-या गोष्टी संशयाच्या भोव-यात सापडतात.

तुमच्या धाग्याच्या शीर्शकात म्हटल्याप्रमाणे, तुम्ही केलेले 'खंडण' खोटे आहे असे मी म्हणतो. म्हणजेच : आपण जेव्हा एक खोटी गोष्ट रेटण्याचा प्रयत्न करतो, या तुमच्याच वाक्यानुसार तुम्ही खोटे रेटत आहात असे म्हणतो.

महोदय, थोरले राजे ही फक्त तुमची मक्तेदारी नव्हे. तो माणूस माझाही पूर्वज आहे, अन मलाही वंदनीय आहे, कदाचित तुमच्या पेक्षा जास्त.
सबब,
तुमचे हे असले धागे पुन्हा आल्यास चर्चा सुरू होण्याआधी उडवावेत, ही माझी या संस्थळाच्या अ‍ॅडमिनना नम्र विनंती आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

-: आमचे येथे नट्स क्रॅक करून मिळतील :-

प्रतिसादाच्या पूर्वार्धाशी, तसेच प्रतिसादामागील भावनेशी सहमतीकडे कल आहे, किमान विरोध नाही. (इनॅज़्मच अ‍ॅज़ ज्या प्रतिसादाच्या आक्षेपार्थ हा प्रतिसाद आहे, त्या मूळ प्रतिसादाचा "टोन" खटकतो, नि निश्चितच खटकणीय आहे.)

मात्र, काही बाबींकडे किञ्चित अङ्गुलिनिर्देश करून लक्ष वेधू इच्छितो.

तुमचा धागा निमित्तमात्र असून या विषयाबद्दल चाललेल्या सभ्य चर्चेत तुम्ही डोकावला नसतात तर अधिक चांगले झाले असते असे म्हणतो.

तुमच्या धाग्याच्या शीर्शकात म्हटल्याप्रमाणे, तुम्ही केलेले 'खंडण' खोटे आहे असे मी म्हणतो. म्हणजेच : आपण जेव्हा एक खोटी गोष्ट रेटण्याचा प्रयत्न करतो, या तुमच्याच वाक्यानुसार तुम्ही खोटे रेटत आहात असे म्हणतो.

तुमचे हे असले धागे पुन्हा आल्यास चर्चा सुरू होण्याआधी उडवावेत, ही माझी या संस्थळाच्या अ‍ॅडमिनना नम्र विनंती आहे.

ज्याच्या प्रतिसादाच्या आक्षेपार्थ हा प्रतिसाद आहे तो प्रतिसादक (सूर्यकान्त पळसकर) आणि या धाग्याचा प्रवर्तक (सुरज महाजन) या दोन वेगवेगळ्या व्यक्ती असाव्यात (किंवा, किमानपक्षी दोन वेगवेगळे आयडी असावेत), अशी शङ्का एखाद्या चाणाक्ष निरीक्षकास येणे हे अगदीच अस्वाभाविक नसावे, एवढ्या एकाच क्षुल्लक बाबीकडे सविनय निर्देश करू इच्छितो. बाकी उभयपक्षी चालू द्यावे, ही नम्र विनन्ती.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

सूर्यकांत पळसकर यांच्या प्रतिसादातील भाषा (व्यक्तीगत टीका) खटकण्यासारखी आहे हे लक्षात येते.
पण त्यांनी उपस्थित केलेले मुद्दे व सविस्तर विवेचन त्यांच्या विद्वत्तेचीही साक्ष देतात.

माझी श्री. पळसकर यांना विनंती आहे की व्यक्तीगत टीका टाळून व थेट आरोपाची भाषा टाळून मुद्द्यांच्या अनुषंगाने सकारत्मक पद्धतीने वाद-विवाद करावेत, म्हणजे कोल्हटकर सरांचे मुद्दे चुकीचे असतील तर पुराव्यांनिशी त्यांचे खंडन झालेले वाचकांना दिसू शकेल. कारण टीकेची भाषा आली की मुद्द्यांमधील गांभीर्य हरवते व तुमची सर्व मेहनत जवळपास वाया जाते. मुद्दे खोडत पुराव्यासह तुमची मते तुम्ही मांडलीत तर कोल्हटकर सर सुद्धा सकारात्मक प्रतिसाद देऊ शकतील. तुमच्या लेखनात अभ्यास जाणवला म्हणून हे लिहितो आहे. थेट आरोपाची भाषा टाळता आली तर चर्चा सकारात्मकतेने पुढे मार्गस्थ होईल अशी आशा आहे.

धन्यवाद

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

कसे झाले कुणास ठाउक. (पळसकर्=महाजन))
धन्यवाद!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

-: आमचे येथे नट्स क्रॅक करून मिळतील :-

सागर ह्यांना धन्यवाद. त्यांनी सप्टेंबर २ च्या प्रतिसादात दर्शविल्याप्रमाणे मी रॉलिन्सन ह्यांचे Sivaji The Maratha his life and times हे पुस्तक DLI मधून मिळवले. पुस्तक लहान १२५ पानांचे आहे आणि त्याचाच सारांश सुमारे २५ पानात त्याच लेखकाच्या Indian Historical Studies ह्या archive.org मधील पुस्तकातहि उपलब्ध आहे आणि तेथे मी ते आधीच पाहिलेले होते.

शिवराज्याभिषेकाचे अगदी त्रोटक वर्णन रॉलिन्सन ह्यांनी दिलेले आहे आणि त्यात दानदक्षिणेच्या विषयात ५०,००० ब्राह्मणांना अनेक दिवस भोजन आणि गागाभट्टाला १०,००० पौण्ड दक्षिणा इतकाच तपशील आहे. ह्या माहितीचा स्रोत म्हणून तळटीपेत Gazetteer, Bombay Pres, xi, 370 ff असा उल्लेख आहे, जो सागर ह्यांनीहि वरती केलेला आहे.

('Gazetteer, Bombay Pres, xi, 370 ff' म्हणजे बाँबे प्रेसिडेन्सी गॅझेटीअर सीरीज् मधील ११ व्या क्रमांकाचे कुलाबा जिल्ह्याचे गॅझेट असे मी वर लिहिले आहे. ff म्हणजे 'Folio' ह्या लॅटिन शब्दाचे संक्षिप्त रूप आणि त्याचा अर्थ 'ह्यापुढील पाने' असा होतो. ह्या गॅझेटीअरच्या ३७०व्या पानापासून पुढील पाने असा हा संदर्भ आहे.)

हे गॅझेटीअरहि मी पाहिलेले आहे. तेथील राज्याभिषेकाची माहिती दोन स्रोतांमधून आलेली आहे. एक म्हणजे राज्याभिषेकाच्या जागी उपस्थित असलेल्या इंग्लिश वकिलातीचा पत्रव्यवहार आणि दुसरा म्हणजे १८११ सालची बखर. ह्या बखरीचा असाच त्रोटक उल्लेख गॅझेटीअरमध्ये केला आहे पण ही बखर म्हणजे चिटणिसी बखर हा तर्क सहजच निघतो कारण अशी अन्य कोणतीच बखर अभ्यासकांस माहीत नाही.

इंग्लिश वकिलातीच्या वर्णनाप्रमाणे शिवाजीची सोन्याच्या नाण्यांनी सुवर्णतुला करण्यात आली ती १,६१,००० पगोडा म्हणजे १० स्टोन (१४०) पौंड भरली ही सर्व आणि अधिक १,००,००० पगोडा इतके द्रव्य राज्याभिषेकासाठी जमलेल्या ब्राह्मणांना देण्यात आले. ह्यापूर्वी प्रतापगडास जाऊन राज्याभिषेकाप्रीत्यर्थ शिवाजीने देवीस ४२ पौंड सोने वाहिले होते. १,६१,००० पगोडा म्हणजे १४० पौंड म्हणून देवीस वाहिलेले सोने ४२ पौंड म्हणजे ४८,३०० पगोडा. अशा रीतीने एकूण दानदक्षिणा ३,०९,३०० पगोडा इतकी झाली. (इंग्लिश वर्णनात जो प्रतापगडला ४२ पौंड सोने वाहिल्याचा उल्लेख आहे तो सभासदात वा चिटणीसात नाही. '५६,००० रुपयांचे तीन मण वजनाचे छत्र देवीस अर्पण केले असे' असे वर्णन कोठेतरी अन्य मराठी स्रोतात आहे असे माझ्या वाचनात आहे, त्याचेच हे दुसरे रूप दिसते. तपशीलाच्या अशा बारकाव्यामुळेच, आणि अर्थातच इंग्रज वकील जागेवर उपस्थित असल्याने मला इंग्रज वकिलातीच्या वर्णनाचे मोल अधिक वाटते.)

१,००,००० पगोडा म्हणजे ३५,००० पौंड (नाण्यात) असे येथे म्हटलेले आहे. तसेच १ पौंड (नाणे) म्हणजे १० रुपये असे कोष्टकहि ठिकठिकाणी दर्शविले आहे. ह्याचाच अर्थ म्हणजे येथील उल्लेखिलेला पगोडा साडेतीन रुपयांबरोबरचा आहे. म्हणून ३,०९,३०० पगोडा म्हणजे १०,८२,५५०
रुपये होत. अशा रीतीने राज्याभिषेकापूर्वी आणि राज्याभिषेक समयी १०-११ लाखाचा दानधर्म झाला असे इंग्लिश वकिलातीच्या वर्णनावरून दिसते. पगोडा म्हणजे ३.६ रुपये असे दर्शविणारा सर दिनशा वाच्छा ह्यांच्या पुस्तकाचाहि संदर्भ मी वर दिला आहे.

१८११च्या चिटणीसाच्या बखरीप्रमाणे पुढील दानदक्षिणा देण्यात आली, तिचा मनोरंजक तपशील पुढीलप्रमाणे. गागाभट्ट रु.१,००,०००, कुलपुरोहित रु. २४,०००, समारंभात प्रत्यक्ष भाग घेतलेले अन्य पुरोहित रु.५,००० प्रत्येकी, अन्य ब्राह्मण दर्जानुसार रु. १,००० ते रु. १०, किरकोळ भिक्षुक रु. ५ ते रु.२. ह्याखेरीज ५०,००० ब्राह्मणांना काही दिवस भोजन आणि रु. १ अशी दक्षिणा देण्यात आली.

ही दोन्ही वर्णने कमीअधिक प्रमाणात एकमेकांशी मिळती आहेत. इंग्रज वकिलाने ५०,००० ब्राह्मणांचा उल्लेख केलेला नाही तर चिटणिसाला प्रतापगडाला पाठविलेल्या सोन्याचा उल्लेख केलेला नाही, जो अन्य मराठी संसाधनांमध्ये आहे आणि खराच असावा. सभासद मात्र गागाभटाच्या १ कोटि ४२ लक्ष सोन्याच्या अति-मोघम आणि अति-अतिशयोक्त वर्णनापलीकडे काहीच बोलत नाही.

इंग्रज वकील आणि चिटणीस ह्यांचा मेळ घालून साधारण १०-११ लाखांपर्यंत दानधर्म झाला असावा असे मला वाटते. ब्राह्मणभोजनेहि झाली असणार कारण ती काळाला धरून आहेत पण ५०,०००च्या आकड्यावर विश्वास ठेवणे अवघड आहे.

ह्याच्या उलट बाजूस आणि कसाहि विचार केला तरी १ कोटि ४२ हजार होनांचा सभासदाचा आकडा अशक्य दिसतो. अनेक प्रकारचे होन बाजारात चालू होते पण त्यांची वजने वगैरेंबद्दल काहीहि निश्चित माहिती इतिहासात मिळत नाही असे मी वर म्हटलेले आहेच. (त्यावेळेच्या, एव्हढेच काय, ब्रिटिशांनी १८०० च्या पुढेमागे हळूहळू काही एकवाक्यता आणेपर्यंतच्या काळापर्यंत, शेकडो प्रकारची नाणी एकसमयावच्छेदेकरून हिंदुस्तानभर चालत असत हे ह्या विषयाच्या अभ्यासकांना माहीत आहे. अशी नाणी एकमेकांत बदलून देणे आणि त्यासाठी 'बट्टा' commission कापून घेणे हे काम सावकार करत असत. उत्तर पेशवाईतील पुण्यातील दीक्षित-पटवर्धनांची पेढी हे काम कसे करत असे हे मी स्वतः त्यांच्या वह्यांमधून पाहिलेले आहे. येथे एक मनोरंजक तपशील नोंदवतो. ह्या दीक्षित-पटवर्धनांची बाग कोथरूडला होती. तिचेचे प्लॉट पाडून आजची 'पटवर्धन बाग' वसाहत झालेली आहे. एक जुने मराठी लेखक वि.मा.दी.पटवर्धन ५०-६० वर्षांपूर्वी शाळेत असलेल्यांना आठवत असतील. त्याचे पूर्ण नाव वि.मा. दीक्षित-पटवर्धन असे होते. गिरगावातील ब्राह्मणसभा ज्या भागात आहे तो सर्व एकेकाळी ह्या दीक्षित-पटवर्धन कुटुंबाच्या मालकीचा होता अशी माझी समजूत आहे, कारण त्यांच्या पुण्याच्या पेढीची मुंबईतहि एक शाखा होती.)

मला स्वत:ला होनाचे वजन ठाऊक नाही असे मी वर म्हटलेलेच आहे. ते कितीहि असले तरी त्याचे मूल्य एका रुपयाहून जास्तीच असणार, कमी नाही हे उघड आहे कारण ते नाणे सोन्याचे आहे. त्याचे वजन कितीहि गुंजा-मासे असले तरी एक कोटि ४२ लाख होन म्हणजे काही कोटि रुपये होतील. वाचकाने हवे तितके कोटि धरावे.

आता तुलनेसाठी मुघल महसूलाकडे एक नजर टाकतो. त्यातहि अनेक स्रोत वेगवेगळी माहिती देतात. ह्यातली अमुकच माहिती बरोबर असे मी म्हणू शकत नाही कारण मी मुघल साम्राज्याचा हिशेबतपासनीस नव्हतो. जदुनाथ सरकारांच्या तोडीच्या अभ्यासकालाहि जे निश्चित सांगता येत नाही तेथे मज पामराची काय पत्रास? मी केवळ जदुनाथ काय म्हणतात ते दाखवू शकतो, जाणून घ्यायची इच्छा असल्यास ते वाचावे नाहीतर सोडून द्यावे इतकेच. अन्य कोण्या गाढया अभ्यासकाला हे निश्चित माहीत असले तर त्याचे पायाचे तीर्थ मात्र माझ्याकडे पाठवून द्यावे!

कोणाचीहि माहिती मान्य केली तरी ती १ अब्ज रुपयांच्या खूपच खाली आहे. ऐने-अकबरी हा खुद्द अकबराच्या दरबारातील विद्वान अबुल फझल ह्याने लिहिलेला ग्रंथ आहे आणि बहुतेक अभ्यासकांचा त्याच कारणासाठी त्याच्यावर विश्वास आहे. तो अकबराचा महसूल १० कोटि रुपयांच्या पुढेमागे दाखवितो. अन्य स्रोत काळानुसार काही अन्य आकडे दर्शवितात हेहि मीच वर म्हटलेले आहे. कोठलाहि आकडा पकडला अणि मुघलांचा एकूण महसूल १०,२०, ३० कोटि असा काहीहि असला त्याच्या पुढे गागाभट्टाला एकटयाला काही कोटि रुपयांत दक्षिणा मिळाली असेल हे मला कपोलकल्पित वाटते. ह्याला पुरावा नाही, पण कॉमन सेन्स नावाची गोष्ट - जी इतकी कॉमन नसावी असे आता वाटू लागले आहे - हिला मार्गदर्शक केल्यास रस्ता चुकत नाही.

...आणि म्हणूनच मी धागानिर्माते सूरज महाजन ह्यांना अगदी प्रारंभास असा सल्ला दिला होता की'अगा जे घडलेच नाही' अशा पराचा कावळा करून भुई धोपटण्यात अथवा दांडपट्टे फिरविण्यात मला काही राम दिसत नाही. तेच पुनः येथे म्हणत आहे. त्यांनीहि १ कोटि आणि ४२ लाख होनाच्या दक्षिणेच्या आकडयावर विश्वास ठेवू नये आणि इतरांनीहि ठेवू नये.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

मित्रहो,
मी मांडलेल्या मुद्यांशी अनेकांनी सहमती दर्शविली त्याबद्दल मी प्रथमत: ॠण व्यक्त करतो. बहुतांश जणांना माझ्या प्रतिसादाची भाषा खटकली. कोणालाही व्यक्तिश: दुखवावे अशी माझी भूमिका नाही. माझ्या पहिल्या प्रतिसादाची सुरूवातच मुळी ‘अरविंद कोल्हटकरयांचा पूर्ण आदर राखून मी माझी प्रतिक्रिया देत आहे' या वाक्याने केलेली आहे. तरीही माझी भाषा खटकणारी वाटत असल्यास मी तीबद्दल दिलगिरी व्यक्त करतो. माझ्या प्रतिसादावर आलेल्या काही प्रतिक्रिया जहाल म्हणता येतील अशा आहेत, हेही येथे लक्षात घेणे आवश्यक आहे, असे मला सर्वांच्या निदर्शनास आणून द्यावेसे वाटते.

व्यक्तिगत टीका टाळून आपण निरोगी चर्चा करू शकतो, अशी भूमिका श्री. सागर यांनी मांडली आहे. ती अधिक संयमीत आणि योग्य वाटते. सर्वांनीच तिचे अनुकरण करावे, असे सूचवावेसे वाटते.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

मित्रहो,
श्री. अरविन्द कोल्हटकर यांचा ताजा प्रतिसाद आणि आधीचे त्यांचे दोन प्रतिसाद याच्यातील तपशीलात काहीही फरक नाही. जुनीच आकडेवारी देऊन त्यांनी आपला विषय रेटला आहे.

त्यांची दोनच वाक्ये खाली देतो :
१. मला स्वत:ला होनाचे वजन ठाऊक नाही असे मी वर म्हटलेलेच आहे.
२. आता तुलनेसाठी मुघल महसूलाकडे एक नजर टाकतो. त्यातहि अनेक स्रोत वेगवेगळी माहिती देतात. ह्यातली अमुकच माहिती बरोबर असे मी म्हणू शकत नाही.

येथे मुद्दा असा आहे की, ज्याबद्दल स्वत: कोल्हटकर यांनाच खात्री नाही, त्या माहितीच्या आधारावर ते काही दावे करीत आहेत. या दाव्यांच्या आधारे ते सभासद बखरीतील माहिती खोटी (किन्वा चुकीची!) आहे, असे म्हणू पाहत आहेत. एवढ्या तुटपुंज्या आधारावर सभासद बखरीतील आकडे बाजूला सारून कोल्हटकर म्हणतात ते आकडे स्वीकारणे नुसते चुकीचेच नाही, तर घातक ठरेल.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

बखरींविषयी काही निवेदन करणार असल्याचे मी माझ्या पहिल्या प्रतिसादात म्हटले होते. तथापि, हा विषय बाजूला राहिला होता. आता त्याबाबत थोडेसे.

बखरींमध्ये अतिशयोक्त वर्णने येतात, ही गोष्ट खरी आहे. तथापि, येथे एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की, सर्वच बखरींचे ऐतिहासिक मूल्य सारखे नसते. घटना घडल्यानंतर जितक्या लवकर कोणताही दस्तावेज लिहिला जाईल, तितकी त्याची विश्वसनीयता वाढते. दस्त जितका उशिरा लिहिला जाईल, तितकी त्याची विश्वसनीयता कमी होत जाते. जसजसा काळ लोटत जातो, तस तसे मूळ घटनांभोवती आख्यायिकांची पुटे चढत जातात. उदा. रामायण आणि महाभारत यांना इतिहासग्रंथ म्हणतात. तथापि, त्यांचे ऐतिहासिक मूल्य आता फारच कमी झाले आहे. कारण त्यात आख्यायिका आणि दंतकथांची संख्या मूळ घटनांपेक्षा जास्त झाली आहे. तसेच बखरींचे आहे. ऐतिहासिक व्यक्तींच्या मृत्यूनंतर जास्तीत जास्त लवकर लिहिल्या गेलेल्या बखरी अधिक विश्वसनीय समजल्या जातात.

या दृष्टीने शिवचरित्राबाबत सभासदाची बखर सर्वाधिक विश्वसनीय समजली जाते. कारण ती महाराजांच्या मृत्यूनंतर सर्वांत प्रथम लिहिली गेली. शिवरायांचे सुपुत्र राजराम महाराज यांनी सभासद नावाच्या आपल्या एका कारकुनाकडून ही बखर लिहून घेतलेली आहे. ती १६९४ साली लिहून पूर्ण झाली. पुत्र या नात्याने राजाराम महाराजांना शिवरायांच्या आयुष्यातील घटना अधिक विश्वसनीयरित्या माहिती असणार, यात शंकाच नाही. त्यामुळे त्यांच्या आदेशाने तयार झालेली बखर इतर कोणत्याही बखरीपेक्षा अधिक विश्वासार्ह मानली जाते, मानावी लागते. मल्हार रामराव चिटणीसाची बखर १८११ साल नन्तरची आहे. याचाच अर्थ सभासद बखरीनंतर ११७ वर्षांनी चिटणीसाची बखर लिहिली गेली आहे. त्यामुळेच तिचे महत्त्व तुलनेने कमी ठरते.

इति लेखनसीमा.
धन्यवाद.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

सभासद बखर ची मोडि तील प्रत कुठे उपलब्ध आहे ?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

श्री कोल्हटकरांच्या अभ्यासाने आश्चर्य वाटायला होते. आणि त्यांच्या संयमापुढे नम्र व्हायला होते.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

सभासद बखर ची मोडि तील प्रत कुठे उपलब्ध आहे ?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0