दोन बातम्या, दोन प्रतिक्रिया

दोन विषयांत उघड असा काही संबंध नसताना कधीकधी निव्वळ त्यांच्या एकापाठोपाठ एक मांडणीमुळे त्यांच्यात काही साम्यस्थळं दिसू लागतात. तसंच काहीसं गेल्या आठवड्यात झालं. अनुज बिडवे या भारतीय मुलाची काही दिवसांपूर्वी परदेशात झालेली हत्या आपल्याकडे चांगलीच गाजली. गेल्या आठवड्यात न्यायालयानं या प्रकरणात शिक्षा सुनावली. आपल्या प्रसारमाध्यमांत मारेकर्‍याचं वर्णन हे मानसिक संतुलन बिघडलेला अशा प्रकारचं दिसलं. उदाहरणार्थ, 'लोकसत्ता'त २८ जुलैला पहिल्या पानावर आलेली ही चौकट पाहा -

या वृत्तांकनात तसं अनपेक्षित काही नव्हतं. पण नेमक्या आधीच्या दिवशी प्रसिद्ध झालेल्या एका बातमीत आणि यात काही विलक्षण साम्यं आढळली. ती बातमीदेखील प्रसारमाध्यमांत चांगलीच झळकली होती. ती म्हणजे गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांनी २००२च्या गुजरात दंगलींबाबत एका उर्दू नियतकालिकाला दिलेली दिलखुलास मुलाखत. त्याविषयीचं हे वार्तांकन उदाहरणार्थ पाहा.

नरेंद्र मोदींचा दंगलींत असलेला किंवा नसलेला हात आपल्या देशात अनेकांच्या भावना उचंबळून टाकणारी एक बाब आहे. शिरा ताणून त्यांची बाजू घेणं किंवा तितक्याच तिडकीनं त्यांच्या विरोधात बोलणं या दोनही गोष्टी तात्पुरत्या बाजूला ठेवूयात. ते दोषी आहेत की निर्दोष हा वादही नको. दोन बातम्यांत मला पटकन जी साम्यस्थळं दिसली ती अशी -

अनुज बिडवेच्या मारेकऱ्याला पश्चात्ताप वाटत नाही. नरेंद्र मोदींनाही वाटत नाही.
दोघांवरही अल्पसंख्य जमातीतल्या कुणालातरी मारल्याचे आरोप आहेत.
न्यायालय सुनावेल ती शिक्षा दोघांनाही मान्य आहे.

मग दोघांमध्ये फरक असलाच तर तो काय?

तर अशा वेळी पटकन व्होल्तेअरचं एक उद्धृत आठवलं -

It is forbidden to kill; therefore all murderers are punished unless they kill in large numbers and to the sound of trumpets.
- Voltaire
स्रोत : http://www.brainyquote.com/quotes/quotes/v/voltaire108412.html

field_vote: 
4
Your rating: None Average: 4 (1 vote)

प्रतिक्रिया

खरंय. बातम्यांबाबत 'हे' आणि 'ते' असे दिसते. पण व्होल्तेअर जे म्हणतोय त्याचा अर्थ
१. एकावेळी असंख्यांना मारा, म्हणजे शिक्षा होणार नाही.
२. एकावेळी असंख्यांना मारणाऱ्यांना शिक्षा होत नसल्याने, एकावेळी एकाला मारणाऱ्यालाही शिक्षा होता कामा नये.
असाही उद्या काढला जायचा ही भीती वाटून गेली. अशी भीती वाटणे हाही या बातम्यांचा, आणि त्यावर व्होल्तेअर जे म्हणतो त्याच्या (माझ्या) मर्यादित आकलनाचा परिणाम आहे. Smile
कारण, मोदी आरोपीही नाहीत. अनुजचा मारेकरी आरोपी होता, खटला झाला, कबुलीनुसार त्याचा गुन्हा 'सिद्ध' झाला. ही स्थितीही बाजूला ठेवू. मोदी आणि अनुजचा मारेकरी यांच्यात तुलना होत नाही. तुलना केली जाऊ नये. मोदी हा विषय स्वतंत्र भाष्याचा आहे. ते तसेच केले जावे. अनुजच्या हत्येचा विषय स्वतंत्र ठेवावा. अनुजची हत्या आणि त्यावरची सजा यावरील भाष्यासाठी उपलब्ध चौकट अरुंद आहे. मोदींबाबत तसे नाही. ती विस्तृत आहे. त्या चौकटीतील काही मुद्दे अनुजच्यासंदर्भात लागू असले तरी, स्केलमधला फरक केला पाहिजे.
हे असे न केल्यास मोदींसंदर्भातील कोणतेही भाष्य हे थिल्लर होण्याचा आणि ठरण्याचाही धोका आहे. "नरेंद्र मोदींचा दंगलींत असलेला किंवा नसलेला हात आपल्या देशात अनेकांच्या भावना उचंबळून टाकणारी एक बाब आहे" असे तुम्ही म्हटले आहे. 'नसलेला' हा शब्द तुम्ही योजला आहे येथे, त्याचे प्रयोजनच मुळी हे दाखवते की अनुजचा मारेकरी आणि मोदी यांच्यात थेट तुलना होऊ शकत नाही.
मी व्होल्तेअरच्या विधानांचा मुद्दाम विपर्यास करून पाहिला, तो यासाठीच.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सहमत,

अनुज बिडवेच्या मारेकऱ्याला पश्चात्ताप वाटत नाही. नरेंद्र मोदींनाही वाटत नाही.

वरील तुलना वास्तव आणि हायपोथेसिसची(किंवा गृहीतक) वाटते.

"पॉवर टू किल (अ‍ॅन्ड नो रीमोर्स)" हे तत्व दोघात समान दाखवण्याचा प्रयत्न अति-सामन्यिकरणाकडे झुकतो आहे असे वाटते, व त्यामुळेच मोदी आणि स्टेपलटन ह्यांना एकाच पारड्यात तोलणे कदाचित मोदींवर अन्याय असू शकेल.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

थेट तुलना होऊ शकत नाही हे मान्यच आहे. तरीही दोन वक्तव्यांमधलं साम्य ठळकपणे लक्षात आलं असा मुद्दा आहे. स्केलमध्ये फरक आहे हाच व्होल्तेअरच्या उद्धृताची आठवण येण्यामागचा मुद्दा आहे.

मोदी आरोपी किंवा दोषी आहेत किंवा नाहीत या कायदेशीर बाबी सोडून देऊ. मला या बाबतीत एक गंमत दिसते. ती म्हणजे - दोन्ही बाजूंनी शिरा ताणून बोलणार्‍यांना मोदींची दंगलीदरम्यानची भूमिका महत्त्वाची होती हे मान्य असतं. एका गटाला त्यामुळे मोदींविषयी प्रचंड आदर आणि आकर्षण वाटू लागलं, तर दुसर्‍या गटाला प्रचंड त्वेष; पण दोघेही त्यांना जबाबदार धरतात. त्यामुळेदेखील व्होल्तेअरच्या उद्धृताची आठवण आली.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

'मानवी वध करणे हे निषिद्ध आहे, सबब ते कृत्य करणारा शिक्षेस पात्र आहेच आहे, पण रणभेरींच्या दणदणाटात केलेल्या सामुदायिक हत्येबाबत तुम्हाला कुणी खूनी ठरविणार नाही" असे व्होल्तेअर विधानातून ध्वनीत होत असल्याने झालेल्या 'हत्या' [सिंगल ऑर मल्टीपल] संदर्भात स्टेपलटन आणि नरेन्द्र मोदी याना एकाच फोल्डरमध्ये घालून पटलावर आणणे योग्य नाही. स्टेपलटनने धडधडीत आपण मनोरुग्ण असल्याचे कबूल करून अनुज बिडवे हत्यासंदर्भात सुनावलेल्या शिक्षेला सामोरे जाण्याचे ठरविल्याचे वृत्तांकन सांगतेच; तर दुसरीकडे मोदी यानी 'मी दोषी असेन तर मला फासावर लटकवा' असे त्या मुलाखतीत म्हटले आहे. याचाच अर्थ असा की जनसमुदायाला गुजराथ दंगलीबाबत ते कितीही दोषी वाटत असतील (आणि तसे वाटणार्‍यांची संख्या या देशात अक्षरशः करोडोच्या संख्येत आहे) तरीही ज्याप्रमाणे इंग्लिशमध्ये म्हटले जाते "अनलेस अ‍ॅण्ड अनटिल...." सुप्रीम कोर्ट त्यांच्यावर व्यक्तीशः दोषीपणाचा आरोप सिद्ध करीत नाहीत तो पर्यंत ते एक 'स्वतंत्र नागरिक' या नात्याने आपले अस्तित्व तसेच पद भोगू शकतात.

संविधान आपण सारेच मानतो....मानलेही पाहिजेच....मग अशाच संविधानातून साकारलेला कायदाच जर एखाद्या व्यक्तीला [अजूनही] दोषी ठरवीत नसेल तर आपण त्याची तुलना दुसर्‍या दोषी ठरल्या गेलेल्या व्यक्तीबरोबर करणे उचीत नाही.

येल विद्यापीठातील राज्यशास्त्राचे प्राध्यापक स्टीव्हन विल्किन्सन यानी गुजराथ दंगलीचा अभ्यास केल्यानंतर मोदीसंदर्भात म्हटले होते, "“Riots are now a stain on your reputation forever in a way they never were before,” ~ याची फिकीर ना नरेन्द्र मोदीना असेल ना गुजराथमधील निवडणुकीत त्याना भरघोस पाठिंबा देणार्‍या मतदारांना.

सबब वर श्री.श्रावण मोडक यानी व्यक्त केलेल्या 'थेट तुलना' संदर्भातील मताशी मी सहमती व्यक्त करतो.

अशोक पाटील

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

>>ज्याप्रमाणे इंग्लिशमध्ये म्हटले जाते "अनलेस अ‍ॅण्ड अनटिल...." सुप्रीम कोर्ट त्यांच्यावर व्यक्तीशः दोषीपणाचा आरोप सिद्ध करीत नाहीत तो पर्यंत ते एक 'स्वतंत्र नागरिक' या नात्याने आपले अस्तित्व तसेच पद भोगू शकतात.<<

या कायदेशीर बाबीविषयी सहमतच आहे.

>>"“Riots are now a stain on your reputation forever in a way they never were before,” ~ याची फिकीर ना नरेन्द्र मोदीना असेल ना गुजराथमधील निवडणुकीत त्याना भरघोस पाठिंबा देणार्‍या मतदारांना.<<

याविषयीही सहमतच आहे.

पण आपल्यावर झालेल्या आरोपांच्या संदर्भात 'दोषी सिद्ध झालो तर शिक्षा भोगेन; खंत मात्र बाळगणार नाही' या दोघांच्या प्रतिक्रियांमध्ये मात्र कमालीचं साधर्म्य आहे. त्यांपैकी एकाकडे मनोरुग्ण म्हणून पाहिलं जातंय; तर दुसर्‍याकडे भारताचा संभाव्य पंतप्रधान म्हणून पाहिलं जातंय*. मी या दोन्हींकडे 'घटना' म्हणून नाही तर सार्वजनिक अभिव्यक्तींमधल्या (पब्लिक डिसकोर्स; प्रतिशब्द माहीत नाही) किंवा जनमानसातल्या दोन प्रतिमा या नात्यानं पाहतो आहे. त्यांत जो फरक आहे तो व्होल्तेअरच्या उद्धृताचाच आहे की काय, असा प्रश्न पडतो, एवढंच.

* - होतील किंवा नाही हाही मुद्दा नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

आपल्यावर झालेल्या आरोपांच्या संदर्भात 'दोषी सिद्ध झालो तर शिक्षा भोगेन; खंत मात्र बाळगणार नाही' या दोघांच्या प्रतिक्रियांमध्ये मात्र कमालीचं साधर्म्य आहे.

साधर्म्य शब्दांमध्ये आहे. त्या शब्दांच्या मागे जी संदर्भचौकट असेल तिच्यात साधर्म्य आहे, असे तुमचे म्हणणे आहे का?

[त्यांपैकी] एकाकडे मनोरुग्ण म्हणून पाहिलं जातंय; तर दुसर्‍याकडे भारताचा संभाव्य पंतप्रधान म्हणून पाहिलं जातंय*.

मोदींकडे मनोरुग्ण पाहिले जात नाही, असे कशावरून? त्यांचा एकूण पवित्रा पाहिला (त्यात त्यांच्यातील प्रशासकाच्या काही गोष्टी येतातच. अर्थात, माणसांकडं असं तुकडे पाडून पाहिले जात नसल्याने प्रशासक मोदी वेगळे कसे ठेवायचे म्हणा!) की त्यांची मनोभूमिका ही रुग्णाचीच आहे, असे म्हणणारे नाहीत? म्हणजे, तेही तसेच मानले गेले तर स्टेपलटन आणि मोदी सारखेच! मग व्होल्तेअर जे म्हणतो त्याचा उलटा अर्थ सोपा असेल. एकाऐवजी अनेकांना मारा...

मी या दोन्हींकडे 'घटना' म्हणून नाही तर सार्वजनिक अभिव्यक्तींमधल्या (पब्लिक डिसकोर्स; प्रतिशब्द माहीत नाही) किंवा जनमानसातल्या दोन प्रतिमा या नात्यानं पाहतो आहे. त्यांत जो फरक आहे तो व्होल्तेअरच्या उद्धृताचाच आहे की काय, असा प्रश्न पडतो, एवढंच.

नका पाहू. हे काही तरी सफरचंद-मोसंबं न्यायातलं ठरतं...

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

"एक वृक्ष कोलमडतो तेव्हा अनेक रोपटी मरतात." राजीव गांधी १९८४ साली म्हणाल्याचे पुसटसे आठवतेय्.सज्जन कुमार्,एच्.के.एल. भगत ह्या मनोरुग्णांची म्हणावी तशी देखल मिडियाने तेव्हा घेतली नव्हती.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

काय म्हणायचे आहे ते कळले आणि रोचक वाटले.

"One kills a man, one is an assassin; one kills millions, one is a conqueror; one kills everybody, one is a god”
- Jean Rostand

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मला या साम्याचा आणि त्याबरोबरच्या व्होल्तेअरच्या उक्तीचा लागलेला अर्थ असा :

एक व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीची हत्या करते तो खून ठरतो, अपराध ठरतो. मात्र एक समाज दुसऱ्या समाजातल्या अनेक व्यक्तींची हत्या करतो तेव्हा तो खून मानला जात नाही. अर्थात एकच व्यक्ती हे सामाजिक खून करत नाही. एखाद्या सेनापतीप्रमाणे किंवा राजाप्रमाणे ती व्यक्ती एका बाजूने कारणीभूत असते आणि दुसऱ्या बाजूने त्या बाजूची निव्वळ प्रतिनिधी म्हणून समाजमनातली इच्छा पुरी करत असते. व्यक्तीने व्यक्तीच्या खुनाला समाज तिरस्करणीय मानतो, कारण सर्वसाधारणपणे ते खून समाजांतर्गतच असतात. उलट समाज विरुद्ध समाज युद्धात अथवा मारामारीत आपल्याच मनातलं घडवून आणणाऱ्या व्यक्तीला दोषी मानायला समाज तयार नसतो.

स्टेपलटन आणि मोदी यांच्यात हा फरक आहे, त्यामुळे तुलना करताना तो लक्षात घेणं महत्त्वाचं आहे. मला वाटतं मोदी जेव्हा म्हणतात की मी जे केलं त्याची मला खंत नसेल तेव्हा ते समाजाचंच मत प्रतिनिधी/नेता म्हणून सांगत आहेत. स्टेपलटनला तो प्रातिनिधिक अधिकार नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

स्टेपलटन आणि मोदीला ओढुनताणुन एकत्र आणल्यासारखे वाटले. मोडकांशी सहमत. अशा तुलना करुन आपण अशाप्रकारच्या चर्चांना ट्रिवियलाइझ करत असतो.

स्टेपलटन नुस्ता मॅड आहे. पण मोदीच्या मॅडनेसमध्ये मेथड आहे. सरकारी देखरेखीखाली किंवा दुर्लक्षाच्या अखत्यातरित झालेले गुजरात दंगे एका विशिष्ठ धार्मिक समुदायाविरुद्ध केलेला मॉन्युमेन्टल गुन्हा आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मला उधळायला फार फार आवडतं

>>समाज विरुद्ध समाज युद्धात अथवा मारामारीत आपल्याच मनातलं घडवून आणणाऱ्या व्यक्तीला दोषी मानायला समाज तयार नसतो. <<

>>स्टेपलटन आणि मोदी यांच्यात हा फरक आहे, त्यामुळे तुलना करताना तो लक्षात घेणं महत्त्वाचं आहे. मला वाटतं मोदी जेव्हा म्हणतात की मी जे केलं त्याची मला खंत नसेल तेव्हा ते समाजाचंच मत प्रतिनिधी/नेता म्हणून सांगत आहेत. स्टेपलटनला तो प्रातिनिधिक अधिकार नाही.<<

अगदी बरोबर आहे. फक्त त्याबरोबर आणखी एक गोष्ट लक्षात घ्यावी लागेल : मला वाटतं अनुज बिडवेचा खून हा निव्वळ कुण्या एका माथेफिरूनं कुण्या एका व्यक्तीचा केलेला खून आहे असं आपल्याकडे पाहिलं जात नाही; तर त्याला वांशिक परिमाण लाभतं. ऑस्ट्रेलियात भारतीय वंशाच्या व्यक्तींच्या झालेल्या हत्या वगैरेंच्या पार्श्वभूमीवर भारतीय अशा घटना पाहात असतात आणि मग हत्या झालेल्या अल्पसंख्य समाजाच्या व्यक्तीच्या जागी स्वतःला कल्पत असतात. त्याउलट मोदींच्या बाबतीत (सर्वजणांच्या नाही; पण काही जणांच्या बाबतीत तरी) घडेल अशी माझी अपेक्षा होती. अनेक प्रतिक्रियांमध्ये अशा तुलनेविषयी नापसंती व्यक्त केली गेली; पण वंशभेदाचा 'खोलीतला हत्ती' अनुल्लेखानं मारला गेला. आपण 'द अदर' असण्याचा आणि नसण्याचा आपल्या समाजातल्या सार्वजनिक अभिव्यक्तीवर (पब्लिक डिसकोर्स) किती परिणाम होत असेल याविषयीची उत्सुकता मला होती. त्या अनुषंगानं मला असहमतीच्या प्रतिक्रियासुद्धा रोचक वाटल्या.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

मोदींनी निवडीचे स्वातंत्र्य नसलेल्या समुहाला लक्ष बनवले तर स्टेपलटनने थोडेफार निवडीचे स्वातंत्र्य असलेल्या समुहातील व्यक्तिला लक्ष बनवले एवढा फरक दिसतो. अनुज बिडवे यांना ब्रिटनमधल्या वंशभेदाविषयी काहीएक कल्पना असावी. (यात सर्व धोक्यांचे व्यवस्थित आकलन अपेक्षित नाही.) अनुज किंवा त्याच्या पालकांना ब्रिटनमध्ये जावे किंवा नाही हे ठरवण्याचे स्वातंत्र्य होते. गुजरातेतील मुस्लिमांना अशा प्रकारचे स्वातंत्र्य नव्हते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

अनुज किंवा त्याच्या पालकांना ब्रिटनमध्ये जावे किंवा नाही हे ठरवण्याचे स्वातंत्र्य होते. गुजरातेतील मुस्लिमांना अशा प्रकारचे स्वातंत्र्य नव्हते.

क्रेमरशी १००० टक्के सहमत. गुजरातेतल्या लोकशाहीत सत्तेतल्या समुदायाने अल्पसंख्याकांना श्रेणी देउन निरर्थक आणि कैच्याकै ठरवले आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मला उधळायला फार फार आवडतं

>>अनुज किंवा त्याच्या पालकांना ब्रिटनमध्ये जावे किंवा नाही हे ठरवण्याचे स्वातंत्र्य होते. गुजरातेतील मुस्लिमांना अशा प्रकारचे स्वातंत्र्य नव्हते.<<

सहमत. जे बळी पडले त्यांच्याविषयी न बोलता जे बळी पडले नाहीत अशांच्या सार्वजनिक अभिव्यक्तीबद्दल मी बोलतो आहे. या दोन बातम्यांविषयीच्या त्यांच्या प्रतिक्रियांमध्ये जो फरक दिसतो त्याचा 'अनुज बिडवेच्या जागी आपण असू शकतो पण गुजरातेतल्या मुसलमानांच्या जागी नाही' या कळत-नकळत जाणिवेशी काही संबंध असेल का?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

जे बळी पडले त्यांच्याविषयी न बोलता जे बळी पडले नाहीत अशांच्या सार्वजनिक अभिव्यक्तीबद्दल मी बोलतो आहे.

हं. इंच इंच लढवू Smile याला इंग्रजी बहुधा सोफिस्ट्री म्हणत्यात. प्रतिसादासरशी चर्चेचे मैदान छोटेछोटे होते आहे. मोदीने कुणाला कनपटीला पिस्तुल लावून थंडपणे त्याला शूट केले नाही. मोदीची सार्वजनिक अतिशय भिन्न प्रकारची आहे. झालीच तर त्याची तुलना सद्दाम, स्तालिन, चाउसेस्कु, गद्दाफींच्या सार्वजनिक अभीव्यक्तीशी होईल. गद्दाफीच्या पतनापूर्वीचे त्याचे विडियो, भाषणे बघा त्यातली अभिव्यक्ती बघा.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मला उधळायला फार फार आवडतं