वाचनानुभव!

‘मी का वाचते?’ ह्याचा विचार करताना जाणवले ते असे ---
२००४ साली वाचनाला नव्याने सुरूवात झाल्यापासून आजपर्यंत, जवळ-जवळ प्रत्येक पुस्तक वाचताना नकळतपणे मी स्वत:शी भिडत आले. इथे ‘स्वत:’ म्हणजे निव्वळ ‘मी’ नसून त्यानिमित्ताने एकंदरीत आपल्याभोवतीची परिस्थिती-घटना-माणसे-इ. कडे बघण्याची नवी नजर मिळत राहिली, प्रत्येक वाचनातून !!!
वाचन करताना लेखकाचा उद्देश काय असू शकेल ह्याचा विचार मी आजवर कधी केला नाही. त्याची भूमिका समजून घेण्याची गरज फारशी जाणवली नाही. कारण बर्‍याचदा मनोगतातून ती थेटपणे व्यक्त झालेली असते आणि जिथे मनोगत नसते (उदा. कथा-कादंबर्‍या-कविता) तिथे त्या कलाकृतीकडे ‘माझ्या’ नजरेतून बघावेसे वाटते, लेखकाच्या नव्हे!
`मी का वाचते' ह्याचा विचार केला, त्याचप्रमाणे ‘मी का लिहिते?’ हेही वेळोवेळी तपासून बघताना काही गोष्टी लक्षात आल्या--
सर्वांत महत्त्वाचे म्हणजे स्वानंद! स्वत:साठी लिहिणे, स्वत:च्या आनंदासाठी विस्ताराने लिहिणे... पहिला टप्पा!
विचारांची स्पष्टता येते.
वाचताना सुटलेल्या काही गोष्टी लिहिताना विचारात घेता येतात.
हा आनंद मिळत राहिला की आपोआपच ‘माझा लेख इतरांना वाचताना काय वाटेल’ असं वाटू लागतं. हा दुसरा टप्पा!
मग मला ‘असे का वाटले’ ते लिहिताना आपलेच विचार जास्त स्पष्ट होत रहातात
त्यावरील इतरांची मते वाचताना, ‘असाही (आपण केला त्यापेक्षा वेगळा) विचार असू शकतो’ हे ध्यानात येते.
थोडक्यात, ‘लिखाण वाचण्याने’ अन ‘वाचलेल्या लिखाणा’विषयी लिहिण्याने ‘अनेक’ विचारांच्या शक्यता जाणवतात आणि आपल्या आकलनात भर पडते.

चित्रा राजेन्द्र जोशी.
१६.०७.२०१२

Taxonomy upgrade extras: 
field_vote: 
0
No votes yet

पण २००४ साली असं विशेष काय घडलं?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- जयदीप चिपलकट्टी

(होमपेज)

जयदीप,

२००४:
नोकरी सोडून दिल्याने दुहेरी दगदग-धावपळ यातून मोकळी झाले. फक्त घरात राहण्याचा जम बसला. रिकामा वेळ मिळू लागला. `वाचू आनंदे' घरपोच वाचनालयाच्या संपर्कात आले. घरबसल्या उत्तमोत्तम पुस्तके वाचायला मिळू लागली. वाचनालयाच्या `वाचकघर' ह्या मासिक उपक्रमात भाग घेऊ लागले. आणि वाचता-वाचता विचार करू लागले, इतरांचे विचार ऐकता-ऐकता स्पष्टता येत राहिली आणि अखेर....
लिहूही लागले ---- स्वान्ंदासाठी!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

चर्चाप्रस्ताव थोडा अपुरा वाटला.

माझ्या बाबतीत म्हणायचं झालं तर अगदी लहानपणापासूनच मला वाचनाची आवड आहे. त्यामुळे ती का आहे, किंवा नक्की त्यातून मी काय मिळवतो वगैरे विचारण्याच्या फंदात पडलेलो नाही. आनंद मिळतो हे उघडच आहे. वेळही छान जातो. मी बरंच नॉन-फिक्शनही वाचतो. त्यातून बरीच माहितीही मिळते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

राजेश घासकडवी,

चर्चाप्रस्ताव थोडा अपुरा वाटला..........

सकाळच्या घाईत तो पूर्ण करता आला नाही. आता केला आहे असे वाटते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

या विषयावर किंवा याच्याशी समांतर विषयावर पुस्तकविश्वच्या दिवाळी अंकातील पुढील तीन लेख अत्यंत वाचनीय आहेत:

-- टण्या यांचा 'डाऊन द मेमरी लेन'
-- श्रावण मोडक यांचा 'कृतज्ञ'
-- नंदन यांचा 'पुनर्वाचनाय च'

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

सुरेख लेख आहेत. थँक्स.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

निखळ आनंद!!! आनंदासाठी वाचते.

लहानपणी आई-बाबा वाचायचे तेव्हा मी शेजारी बसून, खेळत-खेळते- झोपून विचार करत असे अरेच्च्या ज्या पुस्तकात चित्रे नाहीत त्या पानांवर हे लोक इतका वेळ कसा काय घालवितात? कालांतराने वाचावयास शिकले आणि वेडच लागले, समोर येईल ते वाचायचे.

sarah ban breathnach हीचे पुस्तकांबद्दलचे पुढील वाक्य खूप आवडते - A passionate woman, I like my men and books to knock my socks off. It's got to be love at first sight. I need to be bowled over by an author's insight, to wonder how I lived before the book explained it all to me, or how the author knew me so well.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0