गुवाहाटी आणि बागपत
गेल्या काही दिवसात आपल्याच देशात अशा काही घटना घडल्या आहेत ज्यामुळे कोणाही सुसंस्कृत भारतीयाची मान शरमेने खाली जाईल आणि संतापाचे अंगार दाटून येतील.आणि दुर्दैवाने आपण त्याविषयी काहीही करू शकत नाही म्हणून हळहळ व्यक्त करण्याशिवाय फारसे काही करू शकणार नाही.
घटना १: स्थळ: गुवाहाटी. एक १५-१६ वर्षांची मुलगी तिच्या मैत्रिणीचा वाढदिवस एका पबमध्ये साजरा करून बाहेर पडत असताना तिची काही माणसांबरोबर वादावादी झाली.त्यानंतर १५-२० जणांनी त्या मुलीचे केस ओढून तिला रस्त्यावर पाडले.त्या मुलीचे कपडे फाडायचा प्रयत्न करण्य़ापर्यंत या हैवानांची मजल गेली.आणि धक्कादायक गोष्ट म्हणजे हा सगळा प्रकार रेकॉर्ड होत होता आणि तो व्हिडिओ इंटरनेटवर आला आहे.त्या २० जणांची छायाचित्रे (त्या व्हिडिओतून घेतलेली) फेसबुक आणि इतर अनेक ठिकाणी आली आहेत.त्यांच्या चेहऱ्यांवर आपण करत आहोत ते कृत्य चुकीचे आहे असा पुसटसाही भाव नाही.यातील ३ जणांना पोलिसांनी पकडले आहे पण उरलेले अजूनही सापडलेले नाहीत.
जर का रस्त्यावरून जाणाऱ्या मुलीला अशा पध्दतीने वागविले जात असेल, तिचे कपडे फाडायचा प्रयत्न होत असेल तर आपण आपल्याला सुसंस्कृत का म्हणवावे?
काही वर्षांपूर्वी मुंबईत सुनील मोरे नामक पोलिस हवालदाराने मरीन लाइन्समधील पोलिस चौकीत एका १५-१६ वर्षीय मुलीवर बलात्कार केला होता.त्याच्या पुढच्या वर्षी ३१ डिसेंबरला रात्री गेटवे ऑफ इंडियावर नववर्षाचे स्वागत करत असलेल्या जमावाने दोन मुलींचे कपडे फाडले होते आणि ते कृत्य करणाऱ्यांचे हिंदुस्थान टाइम्समध्ये फोटोही आले होते.नशीबाने या मुलींना त्यांच्याबरोबर असलेल्या तरूणांनी त्यांना वेळीच गाडीतून त्यांच्या घरी नेऊन सोडले.समजा त्यांच्याबरोबर असे कोणी नसते तर त्यांची काय अवस्था झाली असती? अशा घटना घडल्यानंतर नेहमीप्रमाणे स्वयंघोषित नैतिक पोलिसांचे ’मॉरल पोलिसिंग’ चालू झाले. (अजून गुवाहाटीच्या प्रकरणात ते कसे चालू झाले नाही याचेच आश्चर्य वाटते).दरवेळी मुलींनी तोकडे कपडे घातल्यामुळे/दारू प्यायल्यामुळे या प्रसंगांना सामोरे जायची वेळ त्यांच्यावर येते अशाप्रकारचे ठेवणीतले डायलॉग झोडले जातात. इतरांनी काय करावे (तोकडे कपडे घालावे की घालू नये, दारू प्यावी की पिऊ नये) हे सांगायचा अधिकार अशा मॉरल पोलिसांना कोणी दिला?दुसरे म्हणजे मुलींनी तोकडे कपडे घातले हे त्यांच्या अंगाला हात लावायचे समर्थन कसे होऊ शकते?तिसरे म्हणजे तोकडे कपडे म्हणजे नक्की काय?अशा बुरसटलेल्या लोकांना नऊवारी साडीसोडून इतर सर्व काही तोकडेच वाटेल.गेट वे ऑफ इंडियाप्रकरणी हिंदुस्तान टाइम्स मध्ये आलेले फोटो मी पण बघितले होते.गुडघ्याइतक्या लांबीचा स्कर्ट आणि खांदे झाकणारा टॉप असा पेहराव त्या मुलींनी केला होता.याला तोकडे कपडे का म्हणावे?कामानिमित्त मी युरोप आणि ऑस्ट्रेलियात अनेकदा गेलो आहे.तिथे त्यापेक्षाही कितीतरी तोकडे कपडे घातलेल्या मुली असतात.तरीही भर रस्त्यावर त्यांच्या अंगाला हात लावून घाणेरडी कृत्ये होत नाहीत.
दृश्य क्रमांक २: राजधानी दिल्लीपासून ५०-६० किलोमीटर अंतरावरील बागपतजवळच्या एका गावातील खाप पंचायतीने ४० पेक्षा कमी वयाच्या स्त्रियांना बाजारात खरेदीसाठी जाऊ नये, मोबाइल फोन वापरू नयेत अशा स्वरूपाची बंधने घातली आहेत आणि प्रेमविवाहाला बंदी घातली आहे.आणि धक्कादायक बातमी म्हणजे उत्तर प्रदेशचे मंत्री आझम खान यांनी ’प्रत्येकाला आपले विचार मांडायचे स्वातंत्र्य आहे’ असे म्हणत एका पध्दतीने या खाप पंचायतीचे समर्थन केले आहे. अफगाणिस्तानमधील तालिबानला का नावे ठेवा?असे तालिबान आपल्या देशातच आहेत आणि तेही राजधानीपासून इतक्या जवळ बिनदिक्कतपणे आपले बुरसटलेले विचार मांडतात आणि इतकेच नव्हे तर त्याची सक्ती करतात.मागे हरियाणातील जिंद जिल्ह्यात जातीबाहेर प्रेम केल्याच्या ’गुन्ह्याबद्दल’ एका युगुलाला ठार मारले होते आणि ते कृत्य केल्याचा कसलाही पश्चात्ताप त्या लोकांना नव्हता याची आठवण आली.त्यांच्या जीवनपध्दतीत प्रेमविवाहाला स्थान नाही असे समर्थन या खाप पंचायतीच्या लोकांनी केले होते.त्यांच्या जीवनपध्दतीत प्रेमविवाहाला स्थान नसले तर त्यांनी स्वत: प्रेमविवाह करू नयेत.पण ज्यांच्या जीवनपध्दतीत प्रेमविवाहाला स्थान आहे अशांचा हक्क हिरावून घ्यायचा अधिकार त्यांना कोणी दिला?आणि त्याउपर त्यांना ’आमच्या जीवनपध्दतीच्या’ नावावर ठार मारायचा अधिकार त्यांना कोणी दिला?
अशा घटना वाचल्या की खूप व्यथित व्हायला होते.एक समाज म्हणून आपल्याला सुसंस्कृत म्हणवून घ्यायचा अधिकारच नाही असे वाटते.या सगळ्याला जबाबदार कोण आहे?प्रत्येकाला आपले आयुष्य आपल्या मर्जीने जगायचा अधिकार आहे आणि आपल्याला ते मान्य नाही म्हणून (किंवा अन्य कोणत्याही कारणाने) अशी कृत्ये करायचा कोणालाच अधिकार नाही हे आपला समाज कधी शिकणार?आणि अशा बातम्या वाचून दु:ख व्यक्त करण्याशिवाय आपण काय करू शकतो?मला पाच वर्षांचा एक मुलगा आणि दोन वर्षांची मुलगी आहे.या सगळ्या गोष्टी समजण्याइतकी ही मुलं मोठी नाहीत.पण ती जशीजशी मोठी होतील त्याप्रमाणे मला त्यांना या सगळ्या गोष्टी समजावून सांगायच्या आहेत म्हणजे मोठे झाल्यावर माझी मुले अशा कृत्यांपासून दूर राहतील आणि तोपर्यंत अशा प्रकारांविरूध्द काही चळवळ उभी राहिली असेल तर त्यात पुढाकार घेतील.याव्यतिरिक्त आपण काही करू शकतो का?तुमची काय मते आहेत?
(धडका देणारा)पिसाळलेला हत्ती
मी "मिसळपाव" संकेतस्थळावर "पुण्याचे वटवाघूळ" नावाने वावरतो
मी "उपक्रम" संकेतस्थळावर "आयाळ वाढलेला सिंह" नावाने वावरतो
मी "मायबोली" संकेतस्थळावर "जिभल्या चाटणारा बोका" नावाने वावरतो
वा वा!! या गोष्टीला ग्लॅमर
वा वा!!
या गोष्टीला ग्लॅमर मिळतंय हे पाहुन त्या मुलीलाही आनंद झाला असेल का हो? का हे सगळं नाटकंच होतं? पोटातंच उलटी झाली तुमचे विचार वाचुन.
भर रस्त्यावर एका मुलीला असं वागवलं, त्याचे फोटो / व्हीडीओ घेतले...अन तुम्ही त्याला ग्लॅमर म्हणता?
जे समोर आलं त्याचाविषयी लोकांनी आवाज उठवला...जर माहीतीच नसेल तर कोण काय बोलणार?
बाकी तुम्हाला मुलगी आहे का? नसली तर बायको आहे का? बरं ते जाउ द्या, आईतरी असेलंच ना? जरा तिचे विचार विचारा पाहु..
नाही नाही....
माझी शंका वेगळी आहे.
भारतात नियमित हे होतेच आहे; इतर वेळी शंख का केला जात नाही ही माझी विचारणा आहे.
भारत हा एक कत्तलखाना असून रोज हजारो कोंबड्या कापल्या जातात. त्यापैकी एखाद्याच कोंबडीबद्दल वाईट का वाटातं हे मी विचारतो आहे.
शिवाय, एखाद दुसरी घटना सोडून जारा मोठ्या कॅन्व्हासवर पाहिल्यास मूळ प्रश्न समजाची मानसिकता(घिसापीटा शब्द, तरीहे इथे वापरणं भाग) आणि त्याहून महत्वाचे म्हणजे कायदा-सुव्यवस्था हा आहे.
इकडे लक्ष दिल्यास एकूणात, टोटलात होणारी प्रकरणे कमी होतील.
युद्धमान स्थितीत अतिथंडीने सैनिक मरु लागल्यास तत्काळ त्याला औषधे देणे हे ठीकच.पण थंडीने पाय गारठून मृतप्राय झाला(गँगरिन सदृश)हा प्रॉब्लेम आहे का? नाही.मुळात, सैन्याकडे थंडीपासून बचाव करणारे असे काहीच नाही, फाटक्या कपड्यावर बिनबुटाचे ते लढताहेत अशी स्थिती असेल, तर आधी लक्ष तिकडे द्यायला हवे. ते जर नीट असेल तर लाखोच्या संख्येने निव्वळ नैसर्गिक प्रतिकूलतेने जे सैनिक मेले तीच संख्या अगदि काही शेकड्यांवर येउ शकते. योग्य उपाययोजनेने लाखो जीव वाचू शकतात्.असे काहीसे म्हणणे आहे.
किंवा वेगळ्या शब्दांत म्हणायचे तर "कायदा सुव्यवस्था धड नाही, गुन्हेगारास शासन झाले असे कधी होत नाही भरीला भर स्त्री दुय्यम्/उपभोग्य असे पब्लिक समजते आहे; ही समस्या आहे.छेडछड होणे ही घटना नसून ह्या सर्वाचा परिणाम आहे. शिवाय हे फार फार मोठ्या प्रमाणावर आहे; त्याबद्दल कुणीच का बोंबलत नाही, ही तक्रार आहे."
"कायद्याचा धाक" हा अशा घटना रोखायला पुरेसा ठरु शकतो. त्याचे तीन तेरा वाजलेत. कायद्याला सभ्य माणूस तुझ्या माझ्या सारखा घाबरतोय. गुंड नाही.कुठल्याही केसचा निकाल नाही, जेल्स म्हणजे पंचतारांकित हॉटेलांच्यावर सुविधा असणारी ठिकाणे झालीत हे सगळ्यांना ठाउक आहे, तरी सगळे गप्प बसले आहेत. ह्यामुळेच हरामखोरांना कशाचीही भीती नाही. त्यांना धाक बसेल असे काही केले तरी पुष्कळ होइल.
जेव्हा अशा घटना दिसत नाहीत तेव्हाही त्या सतत होतच आहेत भारतात. काल हा धागा नव्हता तेव्हाही हे होतच होते. मी प्रतिसाद टंकतोय तेवढ्या वेळात अजून घटना घडून गेल्यात.कित्येक ठिकाणी तर नवर्यानी इच्छेविरुद्ध पत्नीचा भोग घेतला असेल. अशी स्त्री तर आपल्याकडे खिजगणतीतही नसेल. कुठं एखादी नवप्रवेशित वेश्या अत्यंत किळस येइल अशा ग्राहकाला, गुप्तरोगानं पछाडलेल्या जनावरास नकार द्यायचा प्रयत्न करत असताना तिच्यावर बळजबरी करत असेल. वर जबरी संभोग झाल्यावर तोंडावर "ही तुझी किंमत" म्हणून चार्-दोन नोटाही फ्फेकून मारत असेल. बरे आता ती तक्रार घेउन गेलीच पोलिसाकडे तरी काय होणार हे सांगयला भविष्यवेत्त्याची दृष्तीच हवी असे काही नाही. हा प्रॉब्लेम मानसिकतेचा आहे. सज्जनांनी निष्क्रिय राहण्याचा आहे. व्यवस्थेने तोंडावर ओढून ठेवलेल्या चादरीचा आहे.
स्वतःच्याच पत्नीवर बलात्कार करुन आलेला भेटला, वेश्येवरही असा बलात्कार करुन आलेला भेटला आणि च्यायचं जन्मभराचं दिमाग खराब करुन गेला.मागचे दोन्-चार महिने विचित्र मनस्थितीत आहे.
एखाद-दुसर्या घटनेची नोंद घेउन बाकी सर्व निगरगट्टपणे कसे सोडून देता येते मिडियाला; ही तक्रार आहे.
मनोबा, बाकी गोष्टी सोडुन
मनोबा,
बाकी गोष्टी सोडुन देण्यासारख्या नाहीतच पण समोर न आल्याने कोणीच बोलत नाही हा प्रश्न आहे.
पण एक सांगा - रोजच्या जगण्यात मुलींना ग्रोपिंग, घाणेरडे बोलणे वगैरे प्रकारांना सामोरे जावं लागत असताना तुम्ही कीती वेळा मध्यस्थी केलीये? मी केलीये...स्वत: साठीच नाही तर इतरांसाठीसुद्धा. अगदी रात्रीच्या ११ वा. दादर रेल्वे स्टेशनवर घडलेला प्रकार अजुन लक्षात आहे.
माहीत नसलेलं जाउद्या पण जे माहीत आहे, समोर येतंय तिथे तर तुम्ही मदत करु शकता..
इतर उदाहरणे
बिछान्यात मूत्रविसर्जन केल्याची शिक्षा म्हणून एका आश्रमातील पर्यवेक्षिकेने त्या मुलीला तिचे मूत्र चाटायला लावले
हुंड्यासाठी एका पतीने त्याच्या पत्नीला स्वमूत्रप्राशन करायला लावले
पाण्यासाठी खोदलेल्या बोअरवेल निष्काळजीपणे तशाच सोडून दिल्याने त्यात पडून काही बालके मृत्युमुखी पडली
ही यादी दुर्दैवाने 'एंडलेस' म्हणावी अशी आणि इतकी आहे.
याचा काहींना त्रास होतो, खूप त्रास होतो. काहींना होत नाही.
'इतके सगळे भीषण, भेसूर आसपास होते आहे, मग एकदोन उदाहरणांबद्दल त्रागा का?' ही भूमिका समजून घेण्याचा प्रयत्न करतो आहे, किंवा हे वाक्य वाचले हे विसरण्याचा प्रयत्न करतो आहे. हजारो कोंबड्या कापल्या जाताहेत, मग एकाच कोंबडीविषयी त्रागा का? याचा अर्थ एका कोंबडीविषयीही कोणी त्रागा करु नये असा असेल का? तसा असेल तर बाकी 'वन गेटस व्हॉट वन डिझर्वज' असे म्हणून गप्प राहावे हे उत्तम.
बाकी लैंगिक गुन्ह्यांबद्दल. भारत हा 'सेक्शुअली फ्रस्टेटेड' देश आहे हे मी पूर्वी कुठेतरी म्हटले होते. ते पुन्हा म्हणण्याला पर्याय दिसत नाही. उष्ण कटिबंधात जन्म, 'नैतिकता' या शब्दाचा अर्थही ठाऊक नसलेला समाज, मुर्दाड आईबाप आणि बेफिकीर शिक्षक, वासना चाळवणार्या आणि सहज उपलब्द्ध असलेल्या गोष्टी आणि या प्रमाणात वासनेचे शमन करण्यासाठी आवश्यक असलेल्या सामाजिक तरतूदीचा अभाव यातून असले सडके नरपुंगव पैदा होतील, नाहीतर दुसरे काय होईल? संविधान एक सांगते, संस्कृती, समाज आणि संस्कार भलतेच सांगतात, निसर्गाच्या अनिवार धडका शरीराला आतून हलवून टाकतात, जागोजागी वासना आणि विखारांचे लोळ उठावेत असे वातावरण आहे.. अशात विवेक वगैरे शब्दांचे अर्थतरी कुणाला कळतील का?
असो....
+१
'इतके सगळे भीषण, भेसूर आसपास होते आहे, मग एकदोन उदाहरणांबद्दल त्रागा का?' ही भूमिका समजून घेण्याचा प्रयत्न करतो आहे, किंवा हे वाक्य वाचले हे विसरण्याचा प्रयत्न करतो आहे. हजारो कोंबड्या कापल्या जाताहेत, मग एकाच कोंबडीविषयी त्रागा का? याचा अर्थ एका कोंबडीविषयीही कोणी त्रागा करु नये असा असेल का?
हि विचारसरणी आश्चर्यजनक आहेच पण हास्यास्पदही आहे. जी उदाहरणं प्रकाशात येतात त्याबद्दल त्रागा व्यक्त होतो. माझ्या सारखा कोणी अशी उदाहरण त्रागा व्यक्त करण्याकरता शोधत बसत नाही किंवा हजार पैकी एकालाच त्रागा व्यक्त करायचा असे ठरवून त्रागा व्यक्त करत नाही. असे असताना हा प्रश्न विचारणे हास्यास्पद आहे. काही घटनांना जास्त कुप्रसिद्धी मिळते त्याचीही कारणं असतील. पण म्हणून यालाच का जास्त प्रसिद्धी मिळाली यावर खल करत बसणे वेळेचा अपव्यय आहे.
धाग्यात दिलेल्या घटना दुर्दैवी आहेत. व्हिडीओ शुटिंग करण्यार्यांबरोबरच इतर बघ्यांनाही जेव्हा सुबुद्धी येईल तेव्हा अशा गोष्टी घडणे कमी होईल. अशा बघ्यांमुळे अनेक घटना घडायच्या थांबल्याही असतील (आणि म्हणूनच त्यांबद्दल मी काही ऐकले नसेल).
छान वाटले....
कुणाला तरी होणारे चूक आहे असे वाटते आहे,(बाईने दारु पिल्याचा परिणाम म्हणून तिच्या कपड्याला हात घालणे स्वाभाविक आहे असे न वाटल्याचे पाहून)छान वाटले; बरे वाटले.
माझे म्हणणे काय आहे? I repeat
एकेकट्या घटनेला तेवढ्यापुरते बदडून काय होणार आहे. २६ नोवेंबर नंतर मेणबत्ती घेउन तेवढ्यापुरते नक्की काय साध्य झाले?
बरे अशा किश्श्यांचा पूर्ण पाठपुरावा तरी होतो का? की निव्वळ त्यांना फ्लॅश करून सोडून दिले जाते? पुढे काय होते?
हे मिटवायला एक शासकीय पातळीवर(किंवा बिगरसरकारीही चालेल) देशव्यापी मोहीम उघडली, आघाडी उघडली तरच काही होउ शकते.
ही मोहीम, हे आंदोलन सतत कार्यरत हवे; एखाद्या घटनेची तात्कालिक,प्रतिक्षिप्त क्रिया(reflex action) होण्यापेक्षा दीर्घकाळ चालणारे ते आंदोलन हवे.
पल्स पोलिओ मोहीम चालली, स्वातंत्र्यपूर्व काळी खादीचे आंदोलन काहीएक वर्षे चालले, तद्वतच.
किंवा काही प्रमाणात "स्त्रीमुक्ती"वाले करतात त्या धर्तीवर.ती माणसे कितीही कर्कश्श वाटली तरी आवश्यक आहेत.
कायदे बरेच आहेत, त्यांची अंमलबजावणी धड होत नाही तोवर काही खरे नाही.
तुम्ही शंख करा, बोंबला, पण कोर्टात साक्ष द्यायला साक्षीदार येत नाहीत, खुद्द तक्रारदार तक्रारी मागे घेतात तेव्हा काय होणार आहे?
बरे, तक्रारदाराने तयारीही केली तरी त्याची कोर्टाबाहेर "व्यवस्था"ही लावली जाते.
लोकांचा "टोन " जोवर "दारु पीते ही , म्हणून सगळ्या गावानं आळीपाळीनं रोज तिच्यासोबत काय वाटेल ते केले तरी चालेल" असा असेल तर
पुढला किस्सा घडणार हे निश्चित. आज गुवाहाटी, उद्या गुजरात, परवा गोवा.
म्हणून एकट्या घटनेला धरुन शंख का केला जातो हे मी पुन्हा विचारत आहे.
वरती लिहिलेला काही भाग पुन्हा इथे लिहितो आहे:-
माझी शंका वेगळी आहे.
एखाद दुसरी घटना सोडून जारा मोठ्या कॅन्व्हासवर पाहिल्यास मूळ प्रश्न समजाची मानसिकता(घिसापीटा शब्द, तरीहे इथे वापरणं भाग) आणि त्याहून महत्वाचे म्हणजे कायदा-सुव्यवस्था हा आहे.
इकडे लक्ष दिल्यास एकूणात, टोटलात होणारी प्रकरणे कमी होतील.
युद्धमान स्थितीत अतिथंडीने सैनिक मरु लागल्यास तत्काळ त्याला औषधे देणे हे ठीकच.पण थंडीने पाय गारठून मृतप्राय झाला(गँगरिन सदृश)हा प्रॉब्लेम आहे का? नाही.मुळात, सैन्याकडे थंडीपासून बचाव करणारे असे काहीच नाही, फाटक्या कपड्यावर बिनबुटाचे ते लढताहेत अशी स्थिती असेल, तर आधी लक्ष तिकडे द्यायला हवे. ते जर नीट असेल तर लाखोच्या संख्येने निव्वळ नैसर्गिक प्रतिकूलतेने जे सैनिक मेले तीच संख्या अगदि काही शेकड्यांवर येउ शकते. योग्य उपाययोजनेने लाखो जीव वाचू शकतात्.असे काहीसे म्हणणे आहे.
किंवा वेगळ्या शब्दांत म्हणायचे तर "कायदा सुव्यवस्था धड नाही, गुन्हेगारास शासन झाले असे कधी होत नाही भरीला भर स्त्री दुय्यम्/उपभोग्य असे पब्लिक समजते आहे; ही समस्या आहे.छेडछड होणे ही घटना नसून ह्या सर्वाचा परिणाम आहे. शिवाय हे फार फार मोठ्या प्रमाणावर आहे; त्याबद्दल कुणीच का बोंबलत नाही, ही तक्रार आहे."
"कायद्याचा धाक" हा अशा घटना रोखायला पुरेसा ठरु शकतो. त्याचे तीन तेरा वाजलेत. कायद्याला सभ्य माणूस तुझ्या माझ्या सारखा घाबरतोय. गुंड नाही.कुठल्याही केसचा निकाल नाही, जेल्स म्हणजे पंचतारांकित हॉटेलांच्यावर सुविधा असणारी ठिकाणे झालीत हे सगळ्यांना ठाउक आहे, तरी सगळे गप्प बसले आहेत. ह्यामुळेच हरामखोरांना कशाचीही भीती नाही. त्यांना धाक बसेल असे काही केले तरी पुष्कळ होइल.
जेव्हा अशा घटना दिसत नाहीत तेव्हाही त्या सतत होतच आहेत भारतात.
एखाद-दुसर्या घटनेची नोंद घेउन बाकी सर्व निगरगट्टपणे कसे सोडून देता येते मिडियाला; ही तक्रार आहे.
"ब्रेकिंग न्यूज" पेक्षा धाडाडीने आघाडी उघडणे, आणि चिकाटीने ती चालवणे आवश्यक आहे.
मांजराच्या गळ्यात घंटा कुणीतरी बांधणे आवश्यक आहे.
पुन्हा पुन्हा स्पष्टीकरण देण्याच्या भूमिकेत जाणं ठीक वाटत नाही. माझ्याकडे बोलण्यासारखं होतं, तितकं टंकलं आहे.
प्रतिक्रिया
मांडलेल्या दोन्ही घटना संतापजनक आहेत.
"यात नवे काय ? हे तर नेहमीच घडत आलेले आहे आणि अजूनही घडते. मग यात उल्लेखनीय तरी काय ?" या स्वरूपाच्या प्रतिपादनाला समजून घेतो आहे. माझ्या मते आता उल्लेखनीय गोष्ट कदाचित अशी घडत असेल की अशा घटनांना मिळणारी प्रसिद्धी, त्यांबरोबर जाहीररीत्या प्रसिद्ध होणारे पुरावे आणि प्रसिद्धीमाध्यमांच्या प्रसारामुळे मोठ्या लोकसंख्येपर्यंत त्याचे उमटलेले पडसाद यांच्यामुळे शासनव्यवस्थेमुळे पडू शकणारा दबाव. ("शकणारा". दर वेळी पडेलच असा नव्हे. ) आता ही प्रक्रियासुद्धा कितपत परिणामकारक आहे, कितपत उपयोगी आहे हे प्रश्न आहेतच. पण काही वर्षांपूर्वी ज्या घटना सहज दडपता येत होत्या त्या दडपता येणं कठीण आहे इतपत त्याचा अर्थ मला जाणवतो. "फेसबुक मुळे क्रांती" आणि "ट्विटरमुळे चळवळी" इत्यादि गुलाबी कल्पना बाजूला ठेवलेल्या बर्या. पण मूठभर लोकांपर्यंत बातमी पोचणे, त्यांनी पाहिली-न-पाहिल्यासारखी करणे आणि सर्वकाही एखाद दोन दिवसांत विसरले जाणे या, सुमारे पंधरा वर्षांपूर्वीपर्यंतच्या परिस्थितीपेक्षा, "मुख्यमंत्र्यांनी जातीने लक्ष घालणे" - म्हणजे त्यांना तसे घालावे लागल्याचे निदान दाखवणे - हे घडणे इतपत Cautious Optimism मला वाटतो.
माझ्यामते मुळ घटना निंदनीय
माझ्यामते मुळ घटना निंदनीय आहेतच.
मात्र इतर प्रतिसादात मन यांच्या मताचा मला किंचित विपर्यास केलेला वाटला. माझ्यामते मन यांनी सदर प्रकार निंदनीय / घृणास्पद / त्याज्य वगैरे नाहीत असे म्हटलेले नाहीत. किंबहुना ते आहेच. मात्र त्या बळींपैकी केवळ एकालाच 'ग्लॅमराईज' केले जाते व त्या ग्लॅमरमधे - किंबहुना ग्लॅमरमुळे - मुळ प्रश्न बाजूलाच रहातो. तथाकथित घटनेवर कधी गंभीर तर अनेकदा 'चवीचवीने' चर्चा होतात, च्यानेले आपापले टीआरपी वाढवतात आणि सदर घटनेवर दुसरी कुठलीतरी घटना घडेपर्यंतच फोकस रहातो. मात्र काही दिवसांतच सारे विसरले जाते. अशा बातम्या देण्याची पद्धत व त्यावरची ग्लॅमराईज्ड चर्चा यामधे प्रश्न हरवूनच जातो आणि हाती उरते ते गॉसिप!
जर मन यांचे मत, अशा 'घटनां'वर (व विशेषतः शोषित पात्रांवर) चर्चा करण्यापेक्षा त्या घटनांमागच्या प्रश्नांवर (पात्रांचा उल्लेख टाळून) चर्चा करून उपाय शोधता आले तर ते अधिक उपयुक्त व प्रभावी ठरावे असे मत असेल तर मी देखील त्याच्याशी सहमत (झालो) आहे. उगाच एकालाच ग्लॅमराईज का करावे ज्यामुळे त्याचे रुपांतर एक 'कथा' - 'गॉसिप' असे होईल? (याचा अर्थ अशा घटनांवर चर्चा करणे गैर आहे असेही माझे मत नाही - मात्र ते कमी उपयुक्त वाटते)
अवांतर आणि समांतर....
चर्चेशी थेट संबंध नसलेला मुद्दा सांगतोय, पण माझ्या विधानांवर आक्षेप घेतला जातोय, त्याबद्दल आहे.
वयाची विशी नुकतीच पार करत असताना माझे डोक्यावरचे केस विरळ होउ लागले. बरेच कमी झाले. ऐन विशीतल्या हल्लीच्या बहुतांश लोकांसारखा
मीही कॉन्शस झालो, नंतर चिंतितही झालो. बरे केस गेले ते अचानक एखाद्या तात्पुरत्या रोगाने गेले, तरी होमिपथीने किंवा इतर उपचारानी फार मोठ्या
प्रमाणावर ते परतही आणता येतात. पण माझे गेले ते male baldness pattern प्रमाणे. कित्येक पुरुषांचे वयाच्या चाळीशीनंतर जावेत तसे.
हे परत आणायला कुठलेही औषध उप्लब्ध नाही.
मला फारच कसेतरी होई. स्वतःला odd man out वाटे. बाहेरुन पाहणार्या कित्येकांना केस इतक्या लवकर गेले तरी ती एक क्षुल्लक गोष्ट आहे असे वाटे.
परदु:ख शीतल वाटते का ह्यांना ह्याचा मी विचार करी. अगदि जाउन हेअर ट्रान्सप्लांट ची चुअकशी करुन आलो.
इतर ठिकाणच्या केसांचे ते तुमच्या डोक्यावर सर्जिकल पद्धतीने रोपण करणार.सधारण खर्च पन्नस साठ हजाराच्या पुढे.
पुन्हा स्वतःला त्रास करुन घेणे. डोक्याला इंजेक्शन देउन लोकल अॅनेस्थेशिया देणार. डोक्याच्या मागच्या भागाची(मानेच्या वरती जिथे केस शिल्लक असतात तिथे) केसाम्ची मुळे पुढच्या भागात चिकटावता यावीत म्हणून सोलून काढ्णार, त्यात रक्तस्त्राव होणार, तो थांबवायला अजून पेन किलर्स वगैरे शस्त्रक्रियेनंतर चार चार आठवडे घ्यायला लावणार. त्यादरम्यान खाण्यात जरा कमी जास्त झाले तर उलटी होण्याची, चक्कर येण्याची शक्यता.(थेट डोक्याच्या आसपासच्या भागावरच शस्त्रक्रिया केली जाते आहे हे लक्षात घ्या). हे बरचसं लिपोसक्शन करुन घेण्याच्या छापाचं वाटलं.
बरं, हे सगळं कुणासाठी ? तर तिच्यायला इतरांना मी छान वाटावं म्हणून. हे "इतर " कोण? जे मला माझ्या टकलावरून टोमणे मारतील अशी मला धास्ती होती ते. माझी स्वतःची फारशी तक्रार होती का? तर नाही. माझं सगळं व्यवस्थित सुरु होतं. घरच्यांना काही फरक पडत होता का? जवळच्या मित्रांना काही फरक पडत होता का? हो; पडत होता, पण वेगळ्या अर्थाने. ते टोमणे मारत नव्हते. माझे केस नाहीत म्हणून माझ्याशी कुणी नाते तोडायला निघाले नव्हते.
त्यांना फक्त तरुण मुलाची केस गेल्यावर होणार्या संभाव्य कटकटींची चिंता वाटत होती. ती बाब सांभाळायला मी समर्थ होतो.
मग मी भ्यायलो कशाला होतो? केस जाणे ही खरोखरच तेवढी मोठी समस्या होती का?
मी मॉडेलिम्गच्या, अभिनयाच्या क्षेत्रातही नाही जिथे केवळ देखणे सौष्ठव हाच माझा अॅसेट आहे; मी आयटीवाला.
मी स्वतः आहे तसा ठीक आहे. चुलीत गेली दुनिया.
केस जाणे ही समस्या कमी आणि "लोकांनी विचित्र पाहिल्यावर काय करायचे" ही धास्ती असणे ही मोठी समस्या होती.
दुसरी समस्या सोडवली असता अपार मनःशांतीचा लाभ झाला. (आंजाच्या भाषेत अलम दुनियेला फाट्यावर मारुन निघालो.)
I am bald, I am beautiful हा तोरा टी शर्टवर मिरवावा तसा वागण्यात दिसला, तसा त्रास कमी झाला.
व्यक्तिमत्व्,पर्सनालिटी ही तुमच्या निव्वळ दिसण्यापेक्षा फार फार अधिक आहे, हे ऐकलं होतं, ते पुन्हा आठवलं.
लगेच सर्वगुणसंपन्न झालो असे नाही, पण पहिल्यापेक्षा तरी अधिक आत्मविश्वास होता,डौल होता चालीत आता.
केस जात राहतील हो, पण लोकांना अक्कल हवी, व्यांगावर खिल्ली न उडवायची. मला ती अक्कल हवी त्याला योग्य ते टॅकल करायची.
मी केस लावून खरी समस्या सुटेल का? ह्या भोसडिच्यांसाठी मी स्वतःला त्रास का करुन घेउ?
i repeat खरी समस्या ओळखा, दीर्घकालीन उपाय योजा.
मनोबा, तुझं म्हणणं रास्त नाही
मनोबा, तुझं म्हणणं रास्त नाही असं नाही. पण एकतर या घटनेत म्हातारी मेल्याचं दु:ख न करणं अमानवी आहे. दुसरं असं की या बाबतीत एकच एक उपाय केला आणि काम झालं असं होणं शक्य नाही. असा एकचएक उपाय या गोष्टीला नाही. झाला प्रकार वाईट या बाबतीत फार मतभेद नसतील, पण ते ही वगळता इतर अनेक प्रकारे, पातळ्यांवर समाजात शॉव्हनिझम दिसतं. त्याचा विरोध करण्याचीही तेवढीच आवश्यकता आहे.
घटना अतिशय दुर्दैवी, गर्हणीय
घटना अतिशय दुर्दैवी, गर्हणीय आहे. लहान मापपट्टीवर (स्केल) अशा प्रकारच्या घटना (अर्वाच्य भाषा, ओंगळ स्पर्श) नित्य-नित्य अगदी राजरोस लहान मुलींबरोबर, आया-बहीणींबरोबर घडत असतात.
आपण काय करु शकतो?
(१) मुलींना बाचावात्मक पवित्रा म्हणून रात्री कर्फ्यू लावणे.
(२) अगदी लहानपणापासून "चांगला स्पर्श/ओंगळ स्पर्श" याचे ज्ञान मुलामुलींना देणे
(३) अंगचटीला येण्याच्या घटना या गर्दीत हमखास घडतात अशावेळी बायकांनी/मुलींनी कधीच म्हणजे अगदी कधीही पुरषांच्या डब्यातून प्रवास करू नये - ही सूचना लहानपणापासून मुलींच्या मनावर बिंबविणे
या खूप "कॉमन सेन्स" वाल्या सूचना आहेत अधिक काही उपाय असतील तर स्वागत आहे.
(१) मुलींना बाचावात्मक
(१) मुलींना बाचावात्मक पवित्रा म्हणून रात्री कर्फ्यू लावणे.
जेवढी जास्त बंधनं, तेवढी सुटण्याची अधिक धडपड होणार. मुलांना त्यांची जबाबदारी समजावून देणे आणि जेवढं समजतंय त्याच्या प्रमाणात स्वातंत्र्य देणे. हे बाहेर पडण्याबाबत असो वा घरच्या कामांच्याबाबत. माझ्या बघण्यात एकही मुलगी अशी नाही जिला या बाबतीत आपली जबाबदारी समजत नाही; या मुली अजिबात हिरोगिरी करायला जात नाहीत. मुलांना स्त्रियांचा आदर करायला शिकवणं, भारतात होतंच असं नाही. मुलांशीही अनेक बाबतीत खुलेपणाने बोलल्यास त्यांनाही जबाबदारीची जाणीव होऊ शकते.
अंगचटीला येण्याच्या घटना या गर्दीत हमखास घडतात अशावेळी बायकांनी/मुलींनी कधीच म्हणजे अगदी कधीही पुरषांच्या डब्यातून प्रवास करू नये - ही सूचना लहानपणापासून मुलींच्या मनावर बिंबविणे
हे सुद्धा फार उपयोगाचं नाही. गर्दीच्या वेळेस अर्थातच अडचण नसते. पण अपरात्री प्रवास करायला लागल्यास बायकांच्या डब्यात चिटपाखरू नाही, एखादा पोलिसच असतो. अशा वेळेस बरोबर असणार्या पुरूषाबरोबर सामान्य डब्यातून प्रवास करणं कदाचित अधिक योग्य असेल. प्रत्येक वेळेस पुरूषांच्या डब्यातले लोकं गुंड प्रवृत्तीचे असतीलच असंही नाही. क्वचित कधी अपरात्री पुरूषांच्या डब्यातून मी प्रवास केला आहे; तेव्हाचा अनुभव फार छानच होता असं म्हणवत नाही, पण मनस्ताप करण्याची वेळ निश्चित आली नाही. अनेकदा याचं कारण दोन मुली आणि सहा-आठ मुलगे-पुरूष असे एकत्र असणे हे ही असेल.
अदिती म्हणत्ये ते
अदिती म्हणत्ये ते पटलं.
आणि-स्वसंरक्षणाचे धडे मुलींना शाळेत शिकवायला हवेत...आधी कुठे आणि काय धोके असतात हे सांगण्यापासून. ग्रोपिंगची समस्या मला अनुभव आला, तेव्हाच माझ्या लक्षात आली, तोवर असंही होऊ शकतं याची अजिबात कल्पना नव्हती. पुढे यापासून मुंबैच्या गर्दीमधे स्वत:च्या बचावासाठी छ्त्रीची फार मदत झाली.
पुरवणी
याच बरोबर अजून एक महत्त्वाची गोष्ट शिकवणे गरजेचे वाटते ते असे की समजा आपल्यावर अतिप्रसंग किंवा बलात्कार झाला तर काय काय करावे - काय काय करू नये (जसे आंघोळ करू नये, कपडे बदलु नयेत, असाल त्या परिस्थितीत (केवळ सुती कापडाने शरीर झाकावे) शक्य तितक्या लवकर नजीकचे पोलिस स्टेशन गाठावे व त्वरीत मेडिकल चेकपची मागणी करावी वगैरे वगैरे)
खरं तर हे शिक्षण शाळा-शाळांमधे देण्याचे गरजेचे आहे असे मला वाटते
एकूणच एखादीवर बलात्कार झाला ही जणू तिचीच चुक असल्यासारखे वागावे लागते - लपावे / लपवावे लागते- हा समाजाचा पराभव आहे.
+१
याच बरोबर अजून एक महत्त्वाची गोष्ट शिकवणे गरजेचे वाटते ते असे की समजा आपल्यावर अतिप्रसंग किंवा बलात्कार झाला तर काय काय करावे - काय काय करू नये (जसे आंघोळ करू नये, कपडे बदलु नयेत, असाल त्या परिस्थितीत (केवळ सुती कापडाने शरीर झाकावे) शक्य तितक्या लवकर नजीकचे पोलिस स्टेशन गाठावे व त्वरीत मेडिकल चेकपची मागणी करावी वगैरे वगैरे)
हो बरोबर.बलात्कार झाल्यानंतर किळस आणि घृणा वाटून संबंधित मुलीला/स्त्रीला आंघोळ कराविशी वाटणे सहाजिक आहे.पण तसे केल्यास महत्वाचे पुरावे-- बलात्कार केलेल्या पुरूषाचे वीर्य वगैरे नाहिसे होऊन कायद्याच्या दृष्टीने बलात्कार झाल्याचे सिध्द करणे अजून कठिण व्हायची शक्यता असते.
अर्थातच अशी वेळ कोणावरही येऊ नये हीच इच्छा.
आज टाईम्स ऑफ इंडियामध्ये
आज टाईम्स ऑफ इंडियामध्ये पुढील दोन धक्कादायक बातम्या वाचल्या. आपल्याच समाजातील काही स्त्रिया अशा विचार करतात हे वाचून खरोखरच आश्चर्य वाटले. या दोन्ही बातम्या "गुवाहाटी" आणि "बागपत" शीच रिलेटेड आहेत म्हणून त्या याच चर्चेत देत आहे.
१. महिला आयोगाच्या अध्यक्षा ममता शर्मा यांनी मुलींना विनयभंग टाळण्यासाठी काळजी घेऊन त्याप्रमाणे कपडे घालायची सूचना केली. दुवा
२. महिलांवर बंधने घालायच्या खाप पंचायतीच्या निर्णयाला समर्थन देण्यासाठी पश्चिम उत्तर प्रदेशातील सर्व महिला सभा जीन्स आणि टॉपची होळी करणार आहेत. दुवा
म्हणजे याचा अर्थ समाजात स्त्रीचे दुय्यम स्थान काही स्त्रियांनाच मान्य आहे असा घ्यावा का? खरोखरच आश्चर्य वाटायला लावले या दोन बातम्यांनी.
हद्द
१. महिला आयोगाच्या अध्यक्षा ममता शर्मा यांनी मुलींना विनयभंग टाळण्यासाठी काळजी घेऊन त्याप्रमाणे कपडे घालायची सूचना केली.
ही हद्द आहे. कोणीतरी पुराणमतवादी उठून म्हणतो की बायकांनी तोकडे कपडे घातल्याने त्यांच्यावर बलात्कार होतात, ते एक वेळ मूर्खपणा म्हणून सोडून देता येतं. पण अशी व्यक्ती महिला आयोगाच्या अध्यक्षपदी आहे हे ऐकून शब्दच खुंटले. या पदावरच्या व्यक्तीने ही घटना घेऊन आकाशपाताळ एक करावं तर ही बाई बॉइज विल बी बॉइज म्हणते. काय बोलणार?
+१
कहर आहे. काही महिन्यांपूर्वी 'सेक्सी' या शब्दाचा अर्थ काळाप्रमाणे बदलला आहे असं म्हणणार्या याच का त्या ममता शर्मा असा प्रश्न पडला आहे. ही ती बातमी.
काही वर्षांपूर्वी श्रीराम सेनेच्या मॉरल पोलिसिंगचा, हिंसेचा निषेध म्हणून 'पिंक चड्डी अभियान' चालवला होता. असं काहीतरी पुन्हा करण्याची आवश्यकता दिसते आहे.
काही महिन्यांपूर्वी 'सेक्सी'
काही महिन्यांपूर्वी 'सेक्सी' या शब्दाचा अर्थ काळाप्रमाणे बदलला आहे असं म्हणणार्या याच का त्या ममता शर्मा असा प्रश्न पडला आहे
तसं म्हणून त्यांनी फार पुरोगामित्व दाखवले होते असे नाही. शब्दाचा अर्थ काळाप्रमाणे बदलत नसून बोलणार्याच्या वासनेप्रमाणे बदलत असतो हे बाईंना माहित नाही काय? तेव्हाही त्यांनी वर बायकांनाच सल्ला दिला होता की कोणी 'सेक्सी' म्हटले तर पॉझिटिव्हली घ्या. उद्या रस्त्यात थांबवून एखादा टग्या 'हाय सेक्सी' म्हणाला तर कोणती स्त्री पॉझिटिव्हली घेऊ शकेल? सेक्सी जाऊ द्या अगदी ओळखीच्या पण 'तशा' दृष्टीने न आवडणार्या माणसाने लालसेने भरलेल्या डोळ्यांनी पाहात "तू खूप सतेज आणि आकर्षक आहेस" असे म्हटले तरी ते पॉझिटिव्हली घेणे शक्य आहे काय? म्हणजे आधीच सेक्शुअल हॅरासमेंटच्या विरोधात आनंदी आनंद असताना वर हे आगीत तेल कशाला?
म्हणूनच हे लिहीण्याचा खटाटोप केला होता.
या महिला आयोगाचे अध्यक्षपद म्हणजे राजकारणातली देवाणघेवाण म्हणून कोणत्यातरी बाईला (किंवा प्रभावशाली माणसाच्या बायकोला) भेट म्हणून देत असावेत असा मला दाट संशय आहे. या असल्या लोकांकडून कसल्या कल्याणाची अपेक्षा करणार?
त्या उपाध्यक्षा बाईंनी तर त्या मुलीचे नावही उघड केले म्हणे आणि लगेच वाहिन्यांचे प्रतिनिधी कॅमेर्यांसकट तिच्या घरी हजरही झाले. धन्य तो समाज, धन्य ते अधिकारी आणि धन्य तो देश!
ओळखीच्या वा अनोळखी, लालसेने
ओळखीच्या वा अनोळखी, लालसेने भरलेल्या डोळ्यांनी पाहात काहीही बोलले, न बोलले, कोणत्याही स्त्रीला हे आवडेल असं वाटत नाही. (असे पुरूष संख्येने खूपच कमी असतात असा स्वानुभव आहे. अन्यथा ओळखीतल्या, मैत्रीतल्या पुरूषाने यापेक्षाही अधिक जास्त टिंगल केली तरी हसायलाच येतं.)
बाकी श्रीमती शर्मा, उपाध्यक्षा यांच्याबद्दलच्या मतांशी सहमती.
गुवाहाटीचे खरे दूखणे वेगळेच
गुवाहाटीचे खरे दूखणे वेगळेच असायची शक्यता आहे. कोरीयाच्या धर्तीवर एक असे उद्यान तिकडे निर्माण करायची आवश्यकता आहे. दुवा क्र २
दुसरा अँगल
ममता शर्मांचे वक्तव्य काहीसे निषेधार्ह आहे. "काहीसे" अशासाठी की, मुली तोकडे कपडे घालतात म्हणून बलात्कार होतात असे त्यांचे म्हणणे नसू शकेल. [शुद्धीकरण केलेलेच पाणी नळातून यायला हवे हे खरेच पण तरीही] पावसाळ्यात पाणी उकळून प्यावे असे नगरपालिका सांगते तशा अर्थाने त्यांच्या वक्तव्याकडे पाहता येईल.
महिला आयोगाच्या अध्यक्षांनी असा 'सल्ला' देणे योग्य आहे का? या प्रश्नाचे उत्तर पुन्हा नगरपालिकेने पाणी उकळून घेण्याचा सल्ला देणे योग्य आहे का याच्याशी निगडित आहे.
[समाजाची/पुरुषांची मनोवृत्ती बदलायला हवी वगैरे सर्व मान्य आहे. ते जेव्हा कधी साध्य व्हायचे ते होईल. तोपर्यंत काय करावे याचा सल्ला त्यांनी दिला आहे असे वाटते].
[समाजाची/पुरुषांची मनोवृत्ती
[समाजाची/पुरुषांची मनोवृत्ती बदलायला हवी वगैरे सर्व मान्य आहे. ते जेव्हा कधी साध्य व्हायचे ते होईल. तोपर्यंत काय करावे याचा सल्ला त्यांनी दिला आहे असे वाटते].
हे बरोबरच आहे, पण मग मनोवृत्ती बदलायला काय करायला पाहिजे यासाठी सल्ला द्यायचंच नेमकं सगळे विसरतात ना! आधी तो सल्ला द्यावा त्यांनी आणि मग ते होईपर्यंत अमुक-अमुक करा अशी पुस्ती जोडावी.
थत्ते आणि ननि या दोघांचंही
थत्ते आणि ननि या दोघांचंही म्हणणं अत्यंत योग्य आहे. पण आताशा हल्ली आजकाल (हताशावाचक, वृद्धत्वनिर्देशक, कालवाचक शब्द) या आणि अशा विषयांवर बोलण्यात अर्थ नाही असं वाटायला लागलंय. आपण सेन्सिबल आहोत असा काहीसा स्वभ्रम ऑलरेडी दूर झाला आहे.
आता "ब्र" म्हणता ब्राम्हण्य अर्थात जातिवाद,
"हि" म्हणता हिंदू अर्थात मुस्लिमविरोधक अन आंधळे धार्मिक,
"म" म्हणता मराठी, अर्थात मराठीचा दुराग्रही अर्थात खळ्ळ फट्याकवाला..
"तो" म्हणता तोकडे कपडे अर्थात तातडीने बलात्कारसमर्थक स्वातंत्र्यविरोधक पगडीवाले प्रतिगामी
असे धडाधड गोळे येऊन माथी बसतात. आणि गंमत म्हणजे यातल्या कोणत्याही विषयाच्या दुरित अंगाला आपण अजिबात नसताना.. अत्यंत सेन्सिटिव्ह विषयांची ही एक शोकांतिका असते.
जो जे वांछील तो ते लाहो ही मनापासून प्रार्थना..
हा हा हा....
पोट फुटॅस्तोवर हसतोय.
काही गोश्टींना असं ग्लॅमर का मिळतं, त्यांची बातमी का होते हे आजवर न उमगलेले कोडे आहे.
भारतात दिवसाला काही हजार बलात्कार होतात.(अंदाजपंचे बोलत नाही, सरकारी आणि युनो वगैरेची आकडेवारी प्रसिद्ध होत असते, त्यात लिहिलय.)
त्यातले एक्-दोनच असे पेपरात का गाजतात हे कुणी सांगेल का.
साधारणतः नगरसेवकापासून पुढे आमदार, खासदार वगैरे मंडळी आणि त्यांची प्रभावळ ही धुतल्या तांदळाची आहे का असे कुणालाही विचारले तर तो
"अजिबात धुतल्या तांदळाची नाही", "सगळे एकजात हरामखोर" वगैरे वगैरे म्हणतो. शिवाय आपण खाजगी गप्पांत बोलतानाही ह्यानं अमुक मंत्रालय सोडून तमुक घेतलं म्हणजे त्याचं "यश/ प्रगती" आहे म्हणतो. त्यानं काय खरोखर त्या खात्याचा कारभार चालवायला घेतलय असं आपल्याला वाटतं का? अजिब्बात नाही. तरीही मग जेव्हा एखादे स्टींग ऑपरेशन होते तेव्हा आपण तेवढ्यापुरते दचकल्यासारखे का करतो?
किंवाभारतात दिवसाला काही शेकड्यांच्या घरात हत्या होतात. पण अचानक एखादीच केस "हिला न्याय मिळालाच पाहीजे" वगैरे म्हणून का बोंबलतो. इतरांबद्दल का बोंबलत नाही? आरुषीचा खून झाला ; वाईट झालं, पण तसेच खून आख्ख्या भारतात काही शेकड्यांच्या घरानं पडाताहेत, कित्येकदा खुद्द व्यवस्थेच्या आशिर्वादानं हे मुडदे पडताहेत; त्यांची आपण का दखल घेत नाही? जेसिका लाल हिला मारलं म्हणून आख्ख्या मिडियानं रान उभं केलं; इथं बीडमध्ये दोनेक दशकापासून एक व्यक्ती इतकी प्रभावशाली आहे की वर्दितल्या पोलिसांचा भरदिवसा खून होतोय, त्याबद्दल कुणीच कसं बोलत नाही? बरं, ही गोष्ट बीडचीच नाही, बिदरचीही आहे तशीच ती बिकानेर अन बैतूल ह्या भारतातल्याच इतर ठिकाणांचीही आहे.
एका निवडणुकित काँग्रेस व भाजपचे मुख्यमंत्रीपदाचे दावेदार अनुक्रमे जुदेव व अजित जोगी हे होते. दोघांवरही लागोपाठच्या दिवसात स्टिंग होउन टीव्हीवर ही संतमंडळी नोटांच्या गड्ड्या उचलताना दिसली. दोघेही आपापल्या ठिकाणाहून निवडूनही आले नंतर! पब्लिकनं नंतर सगळं सोडून दिलं.
.
.
.
ह्या घटना रोज घडातातच. त्यांचे पुढे काहीही होत नाही हे ही ठाउक आहे. उगाच नाटाके कशाला.
२६नोवेंबर २००८ला हल्ला झाला, आणि सगळी मंडळी एकदम "आता काहीतरी केलेच पाहीजे" वगैरे बडबडू लागली.
वस्तुतः भारत ह्यापुढे सुरक्षित नाही, कायम हे असेच होत राहणार आहे, हे कुठंतरी सगळ्यांनी मनोमन स्वीकरले आहे, आणि जणू काहीच घडले नाही असे सगळे जण वागताहेत, ..... पुढल्या हल्ल्यापर्यंत.
हे आपण असे विचित्र कसे?
राजीव गांधींच्या काळातही आउटलुक का कुठल्यातरी मासिकावर पहिल्या पानावर एका ओडिसामधील स्त्रीचे छायाचित्र होते. ती बाई पाचेकशे रुपयांसाठी आपल्या ५ वर्षांच्या मुलीला विकायला निघाली होती. आणि लोकांना म्हणे ह्यात धक्का वगैरे बसला.
मला सांगा, रस्त्यात डोळे फुटलेले, भीक मागणारे, हिजडे बनलेले* किती जण बघतो आपण,? प्रत्येक शहरात जवळपास शेकडो.बरोबर.
ह्यापैकी किती जण जन्मांध वगैरे होते? जवळपास कुणीही नाही. ह्यातले बहुतांश जणांना लहानपणीच कुणीतरी पळवून आणले,त्यांचे डोळे फोडून, हात पाय तोडून भीक मागायला बसवले. बरं, हे मी नवीन बोल्तोय असेही नाही,hippocrat भारतीयांना हे सर्वच ठाउक आहे. हे असे दिवसाला काही शे पोरांचे डोळे फोडले जातात, अनाथाश्रमातील बालके ही अघोरी संभोगासाठीच असतात, असे सर्वांनी जणू मान्यच केले आहे.
हे म्हणजे एखाद्या कत्तलखान्यात जाउन "अग बाई,ई ई ई...
त्या कोंबडीचा पाय कापला हो चांडाळानं"
असं किंचाळण्यासारखं आहे.
स्त्री(किंवा खरे तर कुणीही दुर्बल) ही इथे ज्बरदस्त रगडली जाते हे वास्तव आहे. भारतात काही मध्यमवर्गीय व उच्च मध्यमवर्गीय चौकटी सोडल्या तर सर्वत्र नृशंस "जंगलराज"च आहे. चौकटितही ते आहे, पण तुलनेने फारच कमी.
भारत हा एक कत्तलखाना आहे. मध्यमवर्गीयंना मारून त्यांना खाणे हे सोपे + चविष्ट नाही म्हणून म्हणून त्यांना सोडून देण्यात आले आहे. कत्तलखान्याच्या आसपासची कुत्री आपण. कुत्र्यांना कुणी खाउ इच्छित नाही इकडे म्हणून ती जिवंत असतात.
तस्मात् संवेदनशील, विचारी व्यक्तीने आपापल्या जाणिवांची पुंगळी करुन घ्यावी हेच उत्तम.
कशाकशाचा त्रास करुन घेणार.
*कित्येक पुरुष हे व्यवसायापुरते हिजड्यांचे कपडे घालतात हे ठीक. पण भारतात जबरदस्तीने शिश्न कापून वगैरे अघोरीप्रकारे कित्येक हिजडे "पैदा" केले जातात. काही स्वयंसेवी संघटनांचा ह्यावरही बराच खल सुरु आहे.