Skip to main content

भाषा

समर्थ रामदास - अलिकडील लेखन, संशोधन, टीका

समर्थ रामदासांवर, खासकरून दासबोधावर आणि त्यांच्या अन्य काव्यावर मराठीत अलिकडे (म्हणजे गेल्या २०-३०झालेल्या) झालेल्या संशोधनपर लेखनाबद्दल कोणी माहिती देऊ शकेल का? 'धार्मिक' किंवा 'अध्यात्मिक' दृष्टीकोनातून चालेल, पण थोड्या अ‍ॅकॅडेमिक, भाषाशास्त्रीय दृष्टीकोनातून असल्यस उत्तम.
(मी या आधी न. र. फाटकांचे पुस्तक वाचले आहे, पण ते आता बरेच जुने झाले.)

धाग्याचा प्रकार निवडा:

जालावरचे दिवाळी अंक २०१३

गेल्या वर्षीपासून आपण 'ऐसी अक्षरे'वर विविध जालीय दिवाळी अंकाचा आढावा/मागोवा घेत आहोत. याही वर्षी आता जालावर दिवाळी अंक प्रकाशित होऊ लागतील. काही प्रकाशित झाले देखील आहेत. हा धागा अश्याच जालावरील दिवाळी अंकांबाबत चर्चा करण्यासाठी आहे. तुम्ही वाचलेल्या, माहित असलेल्या आणि जालावर उपलब्ध असलेल्या दिवाळी अंकांबद्दल इथे मनमोकळी चर्चा करू शकता, समीक्षा करू शकता, परिचय करून देऊ शकता आणि आपली मते मांडू शकता.

धाग्याचा प्रकार निवडा:

एस्पेरांतोः सोपी, साधी परंतु अस्तंगत होत असलेली जागतिक भाषा

आपल्यातील बहुतेक एस्पेरांतो हे नाव प्रथमच ऐकत असतील. कदाचित ही भाषा ओळखणारे वा बोलणारे आपल्यापैकी कुणीही नसतील. परंतु एस्पेरांतो ही एक जागतिक भाषा आहे व त्याचा जन्म 130 वर्षापूर्वी झाला.

धाग्याचा प्रकार निवडा:

भाषिकाचे दौर्बल्य की भाषेचे स्वतःचे दौर्बल्य?

मनुष्य स्वतःशी आणि इतर जगाशी भाषेतून संवाद साधतो. या भाषांची लौकिक रुपे त्यांच्या आदर्श रुपांपासून फार दूर आहेत. भाषेचे/भाषेत (दोन्हीपैकी काय उचित आहे?) किती प्रकारचे दोष आहेत यांची यादी बनवणे अवघड आहे. मनुष्याला न गवसलेल्या विश्वातल्या कितीतरी सत्यांचं हे त्याच्यापासूनचं अंतर कदाचित फक्त भाषेमुळे निर्माण झाले असेल. भावनांचे मनात/मनाबाहेर प्रकटीकरण करणे यासाठी कदाचित भाषेची गरज नसेलच. मग ते भाषेत केले तर अतिशय अपूर्ण असेल.

धाग्याचा प्रकार निवडा:

गोव्याच्या कोंकणी भाषेच्या भाषिकांना मदतीची विनंती

नमस्कार,

मी अनेक वर्षांनी इथे पोस्ट टाकण्याचा प्रयत्न करते आहे. शब्दनिवडीच्या ज्या चुका होतील, त्या कृपया गोड मानून घ्याव्यात ही विनंती!

मला सध्या गोव्याची कोंकणी भाषा बोलणाऱ्या व्यक्तींची थोडी मदत हवी आहे. जर तुम्ही ह्या भाषेचे भाषिक असाल, तर कृपया माझ्याशी संपर्क साधा अथवा इथे प्रतिक्रिया द्या.

थोडक्यात माहिती खालीलप्रमाणे:

काय मदत हवी आहे?

डेटा ॲनोटेशन करायचे आहे: म्हणजे ह्या भाषेत लिहिलेला मजकूर वाचून त्या मजकूराची शैक्षणिक गुणवत्ता काय ह्याचे रेटिंग द्यायचे आहे.

धाग्याचा प्रकार निवडा:

माहितीमधल्या टर्म्स

ऐसीच्या दिवाळी अंकांबद्दल

ऐसीच्या दिवाळी अंकांना सातत्यानं आलेल्या भरघोस आणि वाढत्या प्रतिसादाबद्दल वाचकांचे मनापासून आभार.

धाग्याचा प्रकार निवडा:

माहितीमधल्या टर्म्स

आवाहन

आवाहन
मराठीतील ज्येष्ठ कथाकार जी. ए. कुलकर्णी यांचे २०२२ हे जन्मशताब्दी वर्ष. जीएंचे मराठी साहित्यातील योगदान लक्षात घेऊन २०२२-२३ या वर्षांत जी. ए. कुलकर्णी परिवार व इतर हितचिंतकांतर्फे अनेक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. जी. एंच्या लेखनावर आधारित एकांकिका, जी. एंवर केल्या गेलेल्या लेखनाचे अभिवाचन, जी. एंवरील पुस्तकांचे प्रकाशन, जी. एंनी काढलेल्या चित्रांचे प्रदर्शन असे अनेक कार्यक्रम या वर्षांत महाराष्ट्र व कर्नाटक या दोन राज्यांतील अनेक ठिकाणी साजरे केले जाणार आहेत.

धाग्याचा प्रकार निवडा:

माहितीमधल्या टर्म्स

इतिहासाकडे वेगळ्या दृष्टीने पाहणारी विदुषी - प्राची देशपांडे

“ऐसी अक्षरे” परिवारातल्या डॉ. प्राची देशपांडे यांना अलीकडेच बौद्धिक आणि शास्त्रीय ज्ञानविश्वात अत्यंत प्रतिष्ठित मानला जाणारा ‘इन्फोसिस पुरस्कार‘ मिळाला. त्या निमित्ताने त्यांच्या संशोधकीय कार्याची ही ओळख.

संदीप खरे यांची कविता समजून घेण्याचा नम्र प्रयत्न

गेल्या पंधरा-वीस वर्षांचा विचार करताना असं दिसलं की संदीप खरे यांच्या कवितेला मराठी कवितेच्या प्रांतात जितकी लोकप्रियता मिळाली, तितकी अन्य कुठल्याच कवीच्या कामाला मिळालेली दिसत नाही. नव्या कादंबर्‍या आल्या. काही लेखक-लेखिका २००० सालानंतर प्रकाशात आले. काही नवी प्रकाशनं, नियतकालिकं उदयाला आली. पण लोकप्रिय कवितेच्या बाबत खरे यांच्या जवळपास जाणारं काही घडलं आहे, असं जाणवत नाही.

धाग्याचा प्रकार निवडा:

माहितीमधल्या टर्म्स