Skip to main content

महाराष्ट्र

एकोणिसाव्या शतकातील महाराष्ट्र - जागृती आणि प्रगती (भाग १)

इतिहासाचा अभ्यास करताना जिथे सलग प्रवाह खंडित झालेला दिसतो, अशा जागा शोधून त्यांचा अभ्यास केला गेला पाहिजे. भारताच्या इतिहासात १८१८ ते १९२० हा काल अशी जागा होती जिथे अखंड प्रवाह खंडित झाला आणि प्रवाहाला नवीन वळण मिळाले. त्या दशकाबद्दल सुधीर भिडेंची लेखमाला.

इतिहासाकडे वेगळ्या दृष्टीने पाहणारी विदुषी - प्राची देशपांडे

“ऐसी अक्षरे” परिवारातल्या डॉ. प्राची देशपांडे यांना अलीकडेच बौद्धिक आणि शास्त्रीय ज्ञानविश्वात अत्यंत प्रतिष्ठित मानला जाणारा ‘इन्फोसिस पुरस्कार‘ मिळाला. त्या निमित्ताने त्यांच्या संशोधकीय कार्याची ही ओळख.

महाराष्ट्रदिनाच्या निमित्ताने - अरुण खोपकर

मी जपानमध्ये क्योटोला असतानाची एक घटना. शोगुनच्या राजवाड्यात काही प्रवाशांच्या जथ्याबरोबर मी तिथल्या मार्गदर्शकाचे बोलणे ऐकत होतो. राजाच्या शयनगृहातल्या बांबूंच्या जमिनीचे वैशिष्ट्य म्हणजे त्यावर पाय पडला की बांबू एकमेकांवर घासून आणि बांबूंतली हवा बाहेर पडून त्यातून वाद्यासारखा सूर निघत असे. राजावर अपरात्री हल्ला झाला तर राजा जागा व्हावा म्हणून ही व्यवस्था. तो जागा तर व्हावाच पण त्याची झोपमोड करणारा ध्वनी हा स्वरबद्ध असावा. जपानी सौंदर्यदृष्टीच्या अनेक सूक्ष्म पैलूंतला हा एक.

निवडणुकीच्या रिंगणात उतरताना: गप्पा ’आप’च्या उमेदवाराशी - १

भारतासारख्या मोठ्या देशात इतक्या मोठ्या प्रमाणात अत्यंत शांततेत प्रत्यक्ष मतदान होणं ही प्रत्येक वेळी एक मोठी घटना असते. यंदाची निवडणूकही त्याला अपवाद नाही. यंदाच्या निवडणुकीत काही महत्त्वाचे बदल दिसत आहेत. त्यांत लोकसभा उमेदवारांना प्रत्येकी ७० लाख रुपये खर्च करायची मुभा, NOTA या पर्यायाला मतदान केंद्रातील यंत्रांवर एक अधिकृत स्थान आणि काही मतदारसंघात तुम्ही मतदान केल्यावर तुम्ही ज्या उमेदवाराला मत दिलं आहे त्याचं चिन्ह एका यंत्रातून प्रिंट होऊन बाहेर पडेल, जे तुम्ही दुसर्‍या मतपेटीत टाकायचं आहे (तक्रार आल्यास छापील मतांची गणना करता यावी म्हणून) अशा प्रकारचे प्राशासनिक बदल आहेत.