Skip to main content

"...कविता कविता कविता..."


इकडे कविता तिकडे कविता
बघावे तिकडे कविताच कविता
पेपरच्या पुरवणीत कविता
मासिकाच्या गदारोळात कविता
रद्दी कागदावर दिसते कविता
कवितेच्या रद्दीवर कविता
सुटका नाही बजावतात कविता
संमेलनात सतावतात कविता
ऑर्कुट कविता सर्किट कविता
ब्लॉग कविता फेसबुक कविता
चितेवर कविता चिंतेवर कविता
उन्हावर कविता पावसावर कविता
गारांसारख्या आदळतात कविता
धबधब्यासारख्या कोसळतात कविता
तहानभूक विसरून कविता
उठता बसता पाडतात कविता
शब्दांपुढती शब्द कविता
वेळही जातो बनते कविता