Skip to main content

एक कोडे

Node read time
1 minute
1 minute

झिन४२ Mon, 15/04/2024 - 17:17

disat nahiyet..

kuni madat karel ka?

'न'वी बाजू Mon, 15/04/2024 - 17:58

नमस्कार!

मी (पक्षी: झिन४२) एक गणितातील कोडे सेट करायचा प्रयत्न करत आहे. आपण हे कोडे सोडवायचा प्रयत्न करून मला फीडबॅक द्याल काय?

——————————

“वीस प्रश्न”

पृथ्वीवरील लहान मुले “वीस प्रश्न” हा गेम खेळतात. एक मुल (sic) मनात एक गोष्ट धरते. बाकीचे त्याला प्रश्न विचारतात जसे की:

- ‘मनात धरलेली गोष्ट निर्जीव आहे का?’

- ‘मनात धरलेली व्यक्ती स्त्री आहे का?’

सर्व प्रश्न अशा प्रकारे विचारले पाहिजेत की उत्तरं हो किंवा नाही असली पाहिजेत.

दुसऱ्या एका ग्रहावर सगळच (sic) वेगळं आहे. सर्वप्रथम त्यांच्याकडे २ ऐवजी 3 लिंगं आहेत

- स्त्री
- पुरुष
- काम्या

त्यामुळे पृथ्वीवर खालील प्रश्नाचे जरी ‘हो” किंवा “नाही’ उत्तर असेल तरी ते काहीना काही “useful’ उत्तर असेल

- “मनात धरलेली व्यक्ती स्त्री आहे का?”

पण परग्रहावर ज़र उत्तर उत्तर “नाही” असेल तर मात्र लिंग “पुरुष” किंवा “काम्या” असे असू शकते.

एकंदरीतच “3” हा आकडा एलियन्स साठी खुपच (sic) शुभ आहे. त्यांना टोटली तीनच बोटे आहेत. एका हातावर एक नि दुसऱ्या हातावर दोन. कुठल्या हातावर कीती (sic) ते नाही माहीती (sic). फक्त टोटल तीन हे नक्की.

त्यामुळे त्यांची पुर्ण (sic) फिलॉसॉफी आणि धर्म “3” या आकड्या भोवती फिरतो. त्यांना प्रत्येक गोष्टीत 3 ऑप्शन्स आवडतात.

पझल: या एलियन ग्रहावर, “२० प्रश्न” या गेमचं नाव काय असेल?

====================

डिस्क्लेमरे:

- येथे ‘मी’ म्हणजे ‘झिन४२’. ‘‘न’वी बाजू’ नव्हेत. ‘न’वी बाजूंचे योगदान येथे केवळ टंकनप्रयासापुरते.

- शक्य तितके मुळाबरहुकूम टंकण्याचा प्रयत्न केला आहे. ऑटोकरेक्टगिरीचा मोह शक्य तितका टाळला आहे.

- या कोड्यासंबंधीच्या कोठल्याही बाबीस ‘न’वी बाजू जबाबदार नाहीत. या संबंधात कोठलीही पृच्छा झिन४२ यांजजवळ करावी. आगाऊ आभार.

गवि Mon, 15/04/2024 - 20:54

In reply to by 'न'वी बाजू

“मनात धरलेली व्यक्ती स्त्री आहे का?”

पण परग्रहावर ज़र उत्तर उत्तर “नाही” असेल तर मात्र लिंग “पुरुष” किंवा “काम्या” असे असू शकते.

उप प्रश्न

हो किंवा नाही असे दोन पर्याय असणारा प्रश्न हीच जर अट असेल तर तीन पर्याय (उत्तरांचे) असलेले प्रश्न देखील एकत्र (कंपाऊंड) करून अथवा कंडीशनल स्वरूपात कॉम्प्लेक्स अशा एकाच प्रश्नात आणून विचारता येतील का की जेणे करून एकाच प्रश्नात निश्चित कयास केला जाऊ शकेल. तूर्त तरी सुचत नाही.

उदा. तू क असशील आणि तू ब ला असे विचारलेस की..तर तो हो / नाही काय म्हणेल किंवा हो म्हणेल का... वगैरे वगैरे. बहुधा नाही जमणार.

'न'वी बाजू Mon, 15/04/2024 - 21:13

In reply to by गवि

हो किंवा नाही असे दोन पर्याय असणारा प्रश्न हीच जर अट असेल तर तीन पर्याय (उत्तरांचे) असलेले प्रश्न देखील एकत्र (कंपाऊंड) करून अथवा कंडीशनल स्वरूपात कॉम्प्लेक्स अशा एकाच प्रश्नात आणून विचारता येतील का की जेणे करून एकाच प्रश्नात निश्चित कयास केला जाऊ शकेल. तूर्त तरी सुचत नाही.

उदा., एखाद्या गोष्टीच्या प्राथमिक भौगोलिक स्थानाबद्दल "A-continents?" असा प्रश्न विचारता येऊ शकतोच. "नाही" म्हटल्यास युरोप हाच पर्याय उरतो, परंतु "हो" म्हटल्यास थोडे अधिक drill down करावे लागते, वगैरे वगैरे. या अशा ट्रिक्स, मला वाटते, या विश्वात काय किंवा त्या विश्वात काय, वापरता याव्याच.

किंबहुना,

“मनात धरलेली व्यक्ती स्त्री आहे का?”

पण परग्रहावर ज़र उत्तर उत्तर “नाही” असेल तर मात्र लिंग “पुरुष” किंवा “काम्या” असे असू शकते.

"मनात धरलेली व्यक्ती ही स्त्री आहे का?" या प्रश्नाचेही असेच म्हणता येईल. हा प्रश्न आणि "मनात धरलेली व्यक्ती पुरुष किंवा काम्या आहे का?" हा प्रश्न एकमेकांना complementary असावेत, नाही काय?

गवि Tue, 16/04/2024 - 07:21

In reply to by 'न'वी बाजू

एकाच प्रश्नात निश्चित कळेल (deduce करता येईल) असा प्रश्न तयार केला जाऊ शकतो का? बहुधा नाही.

एकजण नेहमी खरे बोलतो आणि दुसरा नेहमी खोटे बोलतो.. अशा प्रकारच्या कोड्यांत (हो. मी पूर्वी सोडवली आहेत अशी कबुली गटणे धर्तीवर देतो), तू त्याला असा प्रश्न विचारलास तर तो काय सांगेल ते मला सांग वगैरे करून ते नॉट गेट हॅण्डल करता यायचे. इथे तशी सोय तूर्त दिसत नाही.

'न'वी बाजू Mon, 15/04/2024 - 18:22

त्यांचा धर्म किंवा फिलॉसफी काहीही असो, परंतु, (केवळ एक हुक्की म्हणून) ते या गेमचे नाव ‘लपंडाव’, ‘कबड्डी’, ‘पाच-तीन-दोन’, किंवा ‘माझ्या आईचं पत्र हरवलं’ असे ठेवणारच नाहीत, हे कशावरून? आणि, त्यांनी ते तसे ठेवल्यास, त्याबद्दल आक्षेप घेण्याकरिता आपण पृथ्वीवासी नक्की कोण लागून गेलो? किंबहुना, त्यांनी या गेमला काय म्हणावे (किंवा मुळात त्यांनी हा गेम खेळावा) हे ठरविणारे आपण नक्की कोण?

(‘लपंडाव’, ‘कबड्डी’, ‘पाच-तीन-दोन’ किंवा ‘माझ्या आईचं पत्र हरवलं’च कशाला, परंतु, ‘घृअन्क्रुम्फे’ अथवा ‘योड्डमुट्टी जंगल कुडमुकुडे वाघा गुडमुडगुडे’ असे काहीतरी (पृथ्वीवरील) कोठल्याही भाषेत निरर्थक असे नावसुद्धा ठेवण्यास मुखत्यार आहेत एलियन लोक!)

मुळात एलियन्सचे गेम हे पृथ्वीवरील गेम्सवर बेतलेले असतील, ही अपेक्षा अवाजवी वाटते. त्याउपर, त्यांचा धर्म, त्यांच्या बोटांची संख्या, आणि (supposedly पृथ्वीवरील गेम्सवरून बेतलेल्या) त्यांच्या गेम्सचा फॉर्मॅट, यांचा संबंध काय?

फारच taken for granted करतो ब्वॉ बिचाऱ्या एलियन्सना, आपण पृथ्वीवासी लोक!

—————

, श्रेय: पु.ल.

मिसळपाव Tue, 16/04/2024 - 06:05

In reply to by 'न'वी बाजू

२ कळलं पण १ - "‘घृअन्क्रुम्फे’" - चा संदर्भ काय? आणि दोनच उदाहरणं दिलीत ती? तुम्हाला 'तीन' आकड्याचं कौतुक नाही वाटतं? ;-)

'न'वी बाजू Tue, 16/04/2024 - 06:37

In reply to by मिसळपाव

"प्रसिद्ध नायजेरियन कवी ठोम्बे घृअन्क्रुम्फे छुक् छुकुम्बा यांच्या 'कानिबाल हुप् कानिबाल' या काहिली भाषेतील कवितेचा बंब बेलापूरककृत 'माणसा माणसा हुप' हा अध:पात..."

('अघळपघळ'मधून कोठून तरी.)

(कोण म्हणतो, मराठी मनुष्य रेसिस्ट असू शकत नाही म्हणून? अगदी पु.ल. झाले, म्हणून काय झाले?)

--------------------

तुम्हाला 'तीन' आकड्याचं कौतुक नाही वाटतं?

तुम्हाला मी एलियन वाटतो?

तुमचा दोष नाही. पूर्वाश्रमीच्या आयएनएसलासुद्धा (Immigration and Naturalization Service – गेऽली बिचारी!) वाटायचो. पण मग नंतर naturalize झालो. (म्हणजे मुळात natural नव्हतो, हा आरोप तरीही आहेच.)

'न'वी बाजू Mon, 15/04/2024 - 18:32

दोनऐवजी तीन लिंगे हा प्रकार पृथ्वीवरदेखील सापडतो. मधमाशांमध्ये!

पुरुष: Drone.
स्त्री: Queen Bee.
काम्या: Worker Bee.

फार कशाला, पृथ्वीवरील मानवांतसुद्धा लिंगांच्या असंख्य छटा असतात, असे आजकाल मानतात, नव्हे काय? (म्हणून तर ती pronounsची भानगड!)

'न'वी बाजू Mon, 15/04/2024 - 19:26

In reply to by झिन४२

तुमच्या एकंदर विचारधारेप्रमाणे (म्हणजे, मला जितपत कळली, तितपत), प्रश्नाच्या उत्तराकरिता तीन पर्याय असले पाहिजेत. (बहुधा. खात्री नाही.)

या खेळाची अशी एक आवृत्ती पृथ्वीतलावर अगोदरच अस्तित्वात आहे. आमच्या कॉलेजात ती खेळली जात असे.

या आवृत्तीत "Yes" आणि "No" ऐवजी "Yes", "No", आणि "Maybe" असे तीन पर्याय उपलब्ध असत. मात्र, त्याने एकंदरीत गेमच्या स्वरूपात काहीही फरक पडत असल्याचे जाणवले नाही. (एक जास्तीची हिंट मिळण्याव्यतिरिक्त.)

(तसेही, "पुरुष", "स्त्री", आणि "काम्या" परिस्थितीवर याने काही फरक पडणार नाहीच. "मनात धरलेली व्यक्ती स्त्री आहे काय?" या प्रश्नाचे उत्तर (मनात धरलेली व्यक्ती ही अर्धनारीनटेश्वर असल्याखेरीज) "Maybe" असे कधीच येऊ शकणार नाही. ("अर्धनारीनटेश्वर" आणि "काम्या" या दोन भिन्न use cases आहेत. "अर्धनारीनटेश्वरा"करिता "Maybe" हे उत्तर उचित ठरेल; "काम्या"करिता मात्र "No" हेच उत्तर उचित ठरावे.))

कदाचित, उपलब्ध प्रश्नांची संख्या या अतिरिक्त पर्यायामुळे अति ठरू शकेलही, अत एव थोडी कमी करता येईलही. परंतु, याचे नक्की गणित काय असावे, हे समजत नाही.

किंवा, कदाचित एलियन्सची गणनपद्धती ternary असू शकेल, याकडे ही हिंट असावी काय? (माणसाला दहा बोटे असतात, हा decimal गणनपद्धतीचा उद्गम असावा, तद्वत?) Ternary पद्धतीत वीस हा आकडा कदाचित २०२ असा लिहिला जाईल, परंतु त्याचा अर्थ (आणि उच्चार) 'वीस' (किंवा, एलियन्सच्या भाषेत 'वीस'ला जे काही म्हणत असतील, ते) याव्यतिरिक्त आणखी काही होण्याचे कारण लक्षात येत नाही.

थोडक्यात, नक्की कशाकडे रोख आहे, ते कळत नाही.

'न'वी बाजू Mon, 15/04/2024 - 20:13

In reply to by झिन४२

तुमच्या गणिताचा रोख (थोडाथोडा) समजला. एका गोष्टीचे स्पष्टीकरण मात्र रोचक ठरेल: तुमच्या पद्धतीत उत्तराचे पर्याय काय? "Yes"/"No"/"Maybe", की अन्य काही?

की "Yes"/"No" हे दोन(च) पर्याय तसेच ठेवून त्यावर बाकीचा सगळा डोलारा उभा आहे? (तसे असल्यास, नक्की काय बदलले? बोले तो, आपल्या विश्वात नि त्यांच्या विश्वात मग नक्की काय वेगळे आहे?)

झिन४२ Mon, 15/04/2024 - 21:38

In reply to by 'न'वी बाजू

सर्व प्रश्न अशा प्रकारे विचारले पाहिजेत की उत्तरं हो किंवा नाही असली पाहिजेत.

त्यांना प्रत्येक गोष्टीत 3 ऑप्शन्स आवडतात.

…त्यांना भले ३ ऑप्शन्स आवडत असोत, परंतु कोठल्याही प्रश्नाच्या उत्तराकरिता (पृथ्वीवरल्याप्रमाणेच) (‘हो’ किंवा ‘नाही’ अशी) २च ऑप्शन्स (३ ऑप्शन्स नव्हेत!) उपलब्ध आहेत!

मग याचे गणित पृथ्वीवरल्या आवृत्तीच्या गणितापेक्षा यत्किंचितही वेगळे कसे?

विशेषतः, “‘हो’ उत्तर सर्च स्पेस २/३ने कमी करते” असे काहीसे जे आर्ग्युमेंट तुम्ही मांडलेत, ते नक्की कशाच्या आधारावर? (वाचकांच्या सोयीकरिता ते आख्खे आर्ग्युमेंट कृपया येथे देऊ शकाल काय?)

आणि, शक्य झाल्यास एखादा डेमो गेम प्ले-बाय-प्ले देऊ शकाल काय? जेणेकरून आपल्याला काय म्हणायचे आहे, ते स्पष्ट व्हावे.

आभार.

झिन४२ Tue, 16/04/2024 - 19:38

In reply to by 'न'वी बाजू

येस हा ऑपश्न असेल, तर कुणी मेबी का म्हणेल?
वन इस स्टाँगर केस दॅन द अदर.

'न'वी बाजू Tue, 16/04/2024 - 20:58

In reply to by झिन४२

'मनात धरलेली व्यक्ती Indian आहे का?' या प्रश्नाचे उत्तर, मनात धरलेली व्यक्ती बॅ. महंमद अली जीना असल्यास, 'हो' किंवा 'नाही' कोठल्याही प्रकारे देणे दिशाभूलजनक असू शकते. तेथे 'कदाचित' हाच पर्याय योग्य ठरेल.

('मनात धरलेली व्यक्ती पाकिस्तानी आहे का?' - शेख मुजीब उर-रहमान. ऑस्ट्रियन - हिटलर. इटालियन - सोनिया गांधी. अमेरिकन - वुडहाउस. (वुडहाउसने नंतरनंतर आपले ब्रिटिश नागरिकत्व न त्यागता अमेरिकन नागरिकत्व स्वीकारले होतेनीत्.))

झिन४२ Tue, 16/04/2024 - 21:35

In reply to by 'न'वी बाजू

बॅ. महंमद अली जीना एका वेळेला Indian असतील अथवा नसतील. "कदाचित" म्हणायला ते काय श्रॉडिंजर नागरिकत्व आहे का?

आणि अस असेल तर तो प्रश्न बरोबर नाहिये.

(फ्रोम: https://en.wikipedia.org/wiki/Predicate_(mathematical_logic))

the meaning of a predicate is exactly a function from the domain of objects to the truth-values "true" and "false".

'न'वी बाजू Wed, 17/04/2024 - 04:27

In reply to by झिन४२

तुमच्याच दुव्यातून:

In fuzzy logic, the strict true/false valuation of the predicate is replaced by a quantity interpreted as the degree of truth.

परंतु, ते असू द्या.

जीनांचे नागरिकत्व श्रोडिंजर-पद्धतीचे (या गेमकरिता तरी) मानता यावे. बोले तो, ते एका वेळेला Indian (तांत्रिकदृष्ट्या: British Indian, अधिक अचूकपणे British subject domiciled in India) होते, म्हटल्यावर त्यांचे Indianत्व नाकारता येणार नाही. (फॉर्दॅट्मॅटर, याच कारणाकरिता त्यांचे Britishत्वही नाकारता येणार नाहीच, परंतु, जीनांच्या बाबतीत 'मनात धरलेली व्यक्ती British आहे का?' या प्रश्नाचे उत्तर 'Yes' किंवा 'Maybe' द्यायचे उत्तरकर्त्याच्या बापालासुद्धा सुचणार नाही, हा भाग अलाहिदा.)

जीनांचे सोडून द्या. या गेमकरिता:

- लोकमान्य टिळकांना Indian म्हणून categorize करता येईल की नाही? (त्यांच्या जीवनकाळात, आज ज्या entityला Republic of India म्हणतात, आणि आज ज्याला भारतीय नागरिकत्व म्हणून आपण ओळखतो ते ज्यावरून ठरते, ती entity अस्तित्वात नव्हती.)
- उपप्रश्न: लोकमान्य टिळकांना British म्हणून categorize करता येईल की नाही?
- (लोकमान्य टिळकांना जर Indian म्हणून categorize करता येत असेल, तर) छत्रपती शिवाजीमहाराजांना Indian म्हणून categorize करता येईल की नाही?
- (छत्रपती शिवाजीमहाराजांना जर Indian म्हणून categorize करता येत असेल, तर) पाणिनीला Indian म्हणून categorize करता येईल की नाही?
- (लोकमान्य टिळकांना जर Indian म्हणून categorize करता येत असेल, तर) पाणिनीला Pakistani म्हणून categorize करता येईल की नाही? (पाणिनी आजच्या पाकिस्तानाच्या प्रदेशातला होता.)
- काझी नझरुल इस्लाम यांना Indian म्हणून categorize करता येईल की नाही? (मरणाच्या काहीच महिने अगोदर, अत्यंत विकलांग अवस्थेत असताना, बांग्लादेश सरकारने त्यांना अत्यंत सन्मानपूर्वक बांग्लादेशात कायमचे बोलावून आणले आणि त्यांना नागरिकत्व प्रदान केले. अन्यथा, स्वातंत्र्यपूर्व काळात ते British subject domiciled in India होते, नि स्वातंत्र्यानंतर बहुतांश काळ भारतीय नागरिक.)
- मदर टेरेसा, सोनिया गांधी, झालेच तर हरगोबिंद खोराना Indian म्हणून categorize करता येईल की नाही?
- वरच्या लोकांचे जाऊ द्या. समजा उद्या 'न'वी बाजू या गेमकरिता मनात धरण्याइतके महत्त्वाचे झाले. ('न'वी बाजू वयाची ४२ वर्षे पूर्ण होईपर्यंत भारतीय नागरिक होते. आजमितीस त्यांचे वय ५८ वर्षे पूर्ण असून ते अमेरिकन नागरिक आहेत.) 'मनात धरलेली व्यक्ती Indian आहे का?' या प्रश्नाचे उत्तर तुम्ही काय द्याल?

(वुडहाउसच्या बाबतीत मी थोडा फरक करेन. वुडहाउस हा नंतरनंतर British/American dual citizen होता. त्यामुळे, 'मनात धरलेली व्यक्ती अमेरिकन आहे का?' या प्रश्नाचे उत्तर 'हो' असे नि:संदिग्धपणे द्यायला मी कचरणार नाही.)

('मनात धरलेली व्यक्ती Chinese आहे का?' या प्रश्नाचे उत्तर एखाद्या तैवानी व्यक्तीच्या संदर्भात कसे राहील? उदा., Chiang Kai-Shek यास Chinese म्हणून categorize न करण्याचे काहीच कारण निदान वरकरणी तरी मला दिसत नाही. परंतु तरीही, १९४८नंतर त्याचे वास्तव्य अधिक आधिपत्य केवळ तैवानच्या भागापुरते मर्यादित असताना त्याला Chinese म्हणून categorize करणे थोडे संदिग्धतेकडे झुकणारे वाटते. (भले त्यानंतरही अखेरपर्यंत तो स्वतःच्या सरकारास अखंड चीनचे एकमेव अधिकृत सरकार मानत असला, तरीही.) किंबहुना, आजमितीससुद्धा, आपणच तैवानसहित अखंड चीनचे अधिपती तथा एकमेव अधिकृत सरकार आहोत, हा मुख्यभूमी चीन तथा तैवान दोहोंच्याही सरकारांचा स्वतंत्रपणे दावा असताना, आजच्या तैवानी सोम्यागोम्याच्या संदर्भात, ‘मनात धरलेली व्यक्ती Chinese आहे काय?’ या प्रश्नाचे अचूक उत्तर काहीसे संदिग्धतेकडे झुकणारे (आणि कदाचित उत्तरदात्याच्या वैयक्तिक biasवर अवलंबून) राहणार नाही काय?

(मनात धरलेली व्यक्ती जर Chiang Kai-Shek असेल, आणि ‘मनात धरलेली व्यक्ती Chinese आहे काय?’ या मी विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर जर मला ‘नाही’ असे मिळाले, तर I would most certainly cry foul! परंतु, उत्तर देणाऱ्याच्या वैयक्तिक दृष्टिकोनातून ते बरोबर उत्तर असू शकते. आणि, सर्वात वाईट भाग म्हणजे, although (in my opinion) it is unfair to me, I can certainly appreciate (although not agree with) his viewpoint.)

तर, सांगण्याचा मतलब, श्रोडिंजरी नागरिकत्व असू शकते.

परंतु, तेही सोडा. (मनात धरलेल्या व्यक्तीच्या संदर्भातील) एखाद्या प्रश्नाचे उत्तर उत्तरदात्यास ठाऊक नसल्यास तो त्या प्रश्नाचे उत्तर ‘हो’ किंवा ‘नाही’ असे कसे देऊ शकेल? अशा परिस्थितीत त्याचा recourse काय?

झिन४२ Wed, 17/04/2024 - 05:06

In reply to by 'न'वी बाजू

श्रोडिंजर ची ऑब्जर्वेशन्स सुद्धा ती होइ पर्यंतच संदिग्ध असतात. एकदा झाल्यावर त्यांची ट्रुथ वॅल्यु फिक्स्ड असते.

मिसळपाव Tue, 16/04/2024 - 06:24

समजा मी त्या C333 ग्रहावरचा काम्या आहे. आणि मला आजच्या "सत्राशेसाठ प्रश्ण" च्या राउंडमधे झिन्४२ने विचारलं की;
"तू स्त्री किंवा पुरूष यातला कोणीच नाहीयेस का?"
तर त्याचं उत्तर मी कसं द्यावं?
१. नाही असं? (कारण की मी स्त्री किंवा पुरूष यातला कोणीच नाहीये)
का
२. होय असं? (कारण प्रश्ण जी स्थिती खरी आहे का विचारतोय ती - मी काम्या असल्यामुळे - खरी आहे)

उत्तर कसं द्यायचं सांगा मग अजून मेंदू शिणवतो!

झिन४२ Tue, 16/04/2024 - 19:34

In reply to by झिन४२

काही तरी सांगा की.

बाय द वे, हे लिहिल्यावर एक चुक सापडली जी तशीच ठेवत आहे. त्यानी ओवरॉल आर्ग्युमेंट ला फरक नाही पडत. बघु कुणाला सापडतीय का ते.

दोन चुका सापडल्या ज्या खड्यासारख्या लागत होत्या. त्या करेक्ट केल्या पण जुन्या लिन्क्स पण ठेवत आहे.

गवि Tue, 16/04/2024 - 19:39

रोचक आहे. संपूर्ण थियरी बेस्ड आहे अशी शंका आलीच होती.

सर्व काही तीन तीन असे मानायचे म्हणजे जरा जास्तच assumption. व्यक्ती जिवंत आहे की मृत? (अर्थात बायनरी उत्तरासाठी व्यक्ती जिवंत आहे का?) असा प्रश्न असेल तर जिवंत आणि मृत याखेरीज अर्धमेला (किंवा श्रोडिंजरचे मांजर) असा तिसरा पर्याय असेल का हा प्रश्न मनाला चाटून गेला. ;-)

गवि Tue, 16/04/2024 - 19:52

बायनरी ऐवजी टर्नरी ट्री असा जो उल्लेख आहे त्या आकृतीत एका नोड मधून तीन उत्तरांचे पर्याय दर्शविले आहेत. पण शक्यतांची संख्या तीन असली तरी उत्तर बायनरीच मिळणार असे नवी बाजू यांनी केलेल्या मूळ वर्णनात दिसते. त्यामुळे एका गोलातून दोनच रेषा बाहेर येणार असे वाटते. हो असेल तर एक फाटा , नाही असेल तर पुढच्या प्रश्नाचे हो नाही उत्तर काय आहे यावर दुसऱ्या बाजूचा एकस्ट्रा फाटा अशी रचना असेल. असा अंदाज.

झिन४२ Tue, 16/04/2024 - 19:54

In reply to by गवि

>> पण शक्यतांची संख्या तीन असली तरी उत्तर बायनरीच मिळणार असे नवी बाजू यांनी केलेल्या मूळ वर्णनात दिसते. त्यामुळे एका गोलातून दोनच रेषा बाहेर येणार असे वाटते. हो असेल तर एक फाटा , नाही असेल तर पुढच्या प्रश्नाचे हो नाही उत्तर काय आहे यावर दुसऱ्या बाजूचा एकस्ट्रा फाटा अशी रचना असेल. असा अंदाज.

अगदीच बरोबर.

'न'वी बाजू Wed, 17/04/2024 - 05:23

In reply to by झिन४२

...काहीही झाले तरी उत्तर बायनरी असणार आहे. (यात पृथ्वीवरच्या गेमहून वेगळे काहीही नाही.) बरोबर?

आता, शक्यतांची संख्या दोन असेल, तीन असेल, तीनशे असेल, किंवा चार हजार पाचशे सदुसष्ट असेल. (पृथ्वीवरसुद्धा ते होऊ शकतेच. शिवाय, शक्यता एकाहून अधिक असतील; अन्यथा प्रश्न विचारण्याची गरज उरणार नाही.) मात्र, एलियनमंडळींनी (त्यांचा धर्म काहीही म्हणत असो, परंतु) जगातल्या प्रत्येकच गोष्टीला तीनच शक्यता असतील अशा प्रकारे आख्खा निसर्ग मॅनिप्युलेट केलेला असल्याखेरीज, प्रत्येक प्रश्नास तीनच शक्यता असतील हे खात्रीने कसे म्हणता येईल? ('त्यांच्या'त लिंग टर्नरी आहे, म्हणून काय निसर्गातली प्रत्येक गोष्ट टर्नरी आहे?) विचारला जाणारा प्रत्येक प्रश्न हा त्याला तीनच उत्तरे असू शकतील अशा प्रकारे बेतण्याचा एलियनी प्राणायाम केलेला असल्याशिवाय? (आणि, मुद्दाम असे करणे हे गेम खेळण्याच्या नि जिंकण्याच्या दृष्टीने strategical आणि/किंवा फायद्याचे कसे? त्याने केवळ एक जास्तीचे बंधन येऊन विनाकारण complexity वाढत नाही काय, त्यातून कोठलाही जास्तीचा फायदा न मिळता? मग एलियन असे नक्की काय म्हणून करतील?)

या गेमचे नक्की स्वरूप कसे असेल, हे लक्षात येत नाही. (म्हणून डेमो गेम मागितला होता, शक्यतो खऱ्या प्रश्नांसहित. कदाचित तुम्ही तो दिलाही असेल; तुमची लेटेष्ट चित्रावली मी अद्याप वाचलेली नाही; उद्याकडे कदाचित सवड काढून वाचेन.)

हो असेल तर एक फाटा , नाही असेल तर पुढच्या प्रश्नाचे हो नाही उत्तर काय आहे यावर दुसऱ्या बाजूचा एकस्ट्रा फाटा अशी रचना असेल. असा अंदाज.

('कदाचित' किंवा 'माहीत नाही' या शक्यता जमेस न धरता) यात आणि सध्याच्या पृथ्वीवरल्या गेममध्ये निश्चित वेगळे असे काहीही दिसत नाही.

--------------------

(सांगण्याचा रोख: उत्तरे टर्नरी असणे समजू शकते. प्रश्न टर्नरी असणे does not, prima facie, make sense.)

झिन४२ Wed, 17/04/2024 - 07:28

In reply to by 'न'वी बाजू

>> अशा प्रकारे आख्खा निसर्ग मॅनिप्युलेट केलेला असल्याखेरीज, प्रत्येक प्रश्नास तीनच शक्यता असतील हे खात्रीने कसे म्हणता येईल?

मग हे तर गणितातील पुस्तकामधील सर्वच उदाहरणांबद्दल म्हणता येईल. अगदी पु.लं नी पण जे "एका हौदात तीन तोटया" ई. ई. त्या सर्वच गोष्टींबद्दल असे म्हणता येईल की.

झिन४२ Wed, 17/04/2024 - 06:22

>> म्हणून डेमो गेम मागितला होता, शक्यतो खऱ्या प्रश्नांसहित. कदाचित तुम्ही तो दिलाही असेल; तुमची लेटेष्ट चित्रावली मी अद्याप वाचलेली नाही; उद्याकडे कदाचित सवड काढून वाचेन.

ठीक आहे. वाचुन घ्या आरामात जेव्हा वेळ मिळेल तेव्हा मग बोलुयात. कदाचित त्यानी तुमच्या प्रश्नांची उत्तरे मिळतील.

झिन४२ Wed, 17/04/2024 - 09:16

In reply to by 'न'वी बाजू

माझ दुसर उदाहरण चुकल आहे. सर्च अल्गो अशाप्रकारे जनरलाईझ नाही करता येणार. धसास लाउन ठेवल्याबद्दल मंडळ आभारी आहे!

झिन४२ Wed, 17/04/2024 - 09:26

In reply to by झिन४२

तुम्ही बर्याच वेळेला बरेच मुद्दे रेझ करता. त्यात कमी-अधिक महत्वाचे मुद्दे एकाच ईंटेसिटीनी मांडता त्यांमुळे महत्वाचे मुद्दे अधोरेखित होत नाहीत.

या बाबतीत माझी चुक झाली कि मी टर्नरी ट्री वर गेल्यावर डेटा ऑर्गनाझेशन च ईन्वॅरियेंट तोडल गेल. पण धन्यु खूपच फॉर ईंडल्जिंग मी!

'न'वी बाजू Wed, 17/04/2024 - 10:42

In reply to by झिन४२

तुम्ही बर्याच वेळेला बरेच मुद्दे रेझ करता.

ओह! ते केवळ टाइमपाससाठी. :-)

त्यात कमी-अधिक महत्वाचे मुद्दे एकाच ईंटेसिटीनी मांडता

मी टाइमपाससुद्धा तितक्याच इंटेन्सिटीने करतो. But, that's just me, being myself. त्याला कोण काय करणार?