Skip to main content

.

.

समीक्षेचा विषय निवडा

सागर Wed, 18/04/2012 - 19:24

अरे वा

गुरुजी, तुमच्या आवडीच्या ट्रॅकवर भाग ३ आल्यामुळे अंमळ आनंदच झाला. नेमक्या या विषयात मला गती जरा कमी आहे. आमची गाडी प्रभात चित्र च्या पुढे जातच नाही :(

एकेक शिकायला मिळते आहे हेच खूप आहे. :)
एकंदरित आस्वाद कसा घ्यावा हे आता कळू लागले आहे.
आपली (घाईघाईत) पुण्यात भेट झाली तेव्हा तुमच्या हातातील त्या गलेलठ्ठ पुस्तकाची महती आत्ता पटू लागली आहे.
आता तुमची पुढची भेट घाईघाईत घेण्याचा मूर्खपणा मी करणार नाही ;) त्यावेळी ते वजनदार पुस्तक नक्की घेऊन या अशी आग्रहाची विनंती

अकिरा कुरोसावा हा मनुष्य (आणि तुम्ही) याच भूतलावरचा आहे की कुठून आकाशातून खाली पडलाय अशी शंका मनात निर्माण होते आहे

धनंजय Thu, 19/04/2012 - 00:15

माझा आवडता चित्रपट आहे.

इथे पडद्यावर न्यायाधीश नाही. तो सरळ कॅमेर्‍याकडे पहात बोलतो आहे. एकप्रकारे हा प्रेक्षकांशीच संवाद आहे. न्यायाधीशांनी विचारलेले प्रश्न प्रेक्षकांना ऐकू येत नाहीत (जणू न्यायाधीशाच्या भूमिकेत प्रेक्षकच ते प्रश्न विचारताहेत), पण साक्ष देणार्‍याला ते ऐकू येतात.

प्रेक्षक म्हणून एक नवा दृष्टिकोन दिलात. धन्यवाद रमताराम. मी खुद्द आजवर न्यायाधीश-भूमिकेतून ती साक्ष बघितलेली नाही. न्यायाधिशापाशी मोक्याच्या ठिकाणी बसलेला व्यक्ती म्हणून साक्ष पाहिली. पण तुम्ही म्हणता तो दृष्टिकोन पटण्यासारखा आहे.

राजेश घासकडवी Sun, 22/04/2012 - 10:12

उत्कृष्ट दिग्दर्शनाचं एक व्यवच्छेदक लक्षण म्हणजे अनेक बारक्या बारक्या फ्रेम्सही एक छोटीशी कथा सांगतात, किंवा चालू कथेसाठी वातावरण निर्मिती करतात. काही वेळा त्यांतून शब्द मनात उमटतात, तर काही वेळा आपल्या आंतर्मनात मनात विचार निर्माण करतात.

यात काळे ढग पांढर्‍यांवर आक्रमण करताहेत की पांढरे काळ्यांचे साम्राज्य उलथण्याच्या निर्धाराने सामोरे जात आहेत हे सांगणे अवघड होऊन बसते.

त्याचे पुरे दर्शन कधीच घडत नाही, अधूमधून नि खंडशः दिसणार्‍या त्याच्या प्रकाशाच्या तुकड्यांवरून त्या विशाल वृक्षांच्या पर्णराजीपलिकडे वर त्याचे स्थान असावे इतके नक्की सांगता येते. त्यानंतर दिसतो तो एका व्यक्तीचा खांदा नि त्यावरील कुर्‍हाड, जिचे पाते एका चामड्याच्या तुकडयाने अवगुंठित केले आहे.

या व अशा इतर बारीक निरीक्षणांतून हे छान दाखवलेलं आहे.

या कथेने मनावर पकड घ्यावी यासाठी सादरीकरणातही लेखकाने/ दिग्दर्शकाने कष्ट घेतलेले दिसतात. सुरूवातीच्या प्रसंगात 'काहीतरी वेगळंच घडलंय' हे जाणवतं. आणि असं काय घडलं असावं ज्याने या लाकूडतोड्याचा आणि भिक्षूचा माणुसकीवरचा, माणसाच्या अंतरात्म्यावरचा विश्वास गमावला जावा? हा प्रश्न मनाची पकड घेतो. त्याचबरोबर दोघांच्या साक्षीतून प्रसंगाचा शेवट - दोरी, प्रेतं, मृत्यू आणि त्याआधीचे दोन उच्च घराण्यातले प्रवासी दिसतात. या दोन टोकांमध्ये काय बरं असेल? हाही पुढचा प्रश्न. हेच जे काही आहे ते इतकं भयंकर आहे की त्याने त्या दोघांना विमनस्क केलं ही उत्कंठा आहे.

लाकूडतोड्याला प्रथम तुकडे, तुकडे दिसतात. काहीतरी वेगळं आहे अशी शंका येत रहाते आणि मग प्रेत दिसतं. तसंच या कथेबद्दल चालू आहे.
मी चित्रपट बघितलेला नसल्यामुळे नक्की प्रेत काय दिसणार याची भीतीयुक्त उत्कंठा निर्माण झालेली आहे.