Skip to main content

ICMR, लस, विज्ञान, वैज्ञानिक दृष्टिकोन, वगैरे

ICMR उर्फ Indian Council of Medical Research ही नामांकित भारतीय संस्था कोव्हिडसाठी पूर्णपणे भारतीय बनावटीची लस दि. १५ ऑगस्ट रोजी उपलब्ध करून देणार अशी बातमी नुकतीच प्रसिध्द होताच अनेक भारतीयांचा आनंद गगनात मावेनासा झाला. म्हणजे एक तर व्हायरसपासून मुक्ती मिळणार, तीही पूर्णपणे भारतीय बनावटीच्या लशीने आणि तेदेखील स्वातंत्र्यदिनी! मात्र काही लोकांनी या जलदगतीविषयी शंका उपस्थित केल्या खऱ्या, पण त्याकडे फारसं कुणाचं लक्ष नव्हतं.

पण लवकरच या आनंदाला तडा जाऊ लागला.

लस विकसित करण्याच्या प्रकल्पात सहभागी असलेल्यांना दि. २ जुलै रोजी ICMRने पाठवलेलं एक पत्र लवकरच लीक झालं -

त्यातला मजकूर पाहून अनेकांची त्या पत्राच्या सत्यतेविषयी खात्रीच पटेना, पण ते खरं निघालं. असं नक्की काय होतं त्यात? ७ जुलैपासून लशीच्या क्लिनिकल ट्रायल्स घेण्यासाठी लोकांची निवड करायची आहे आणि लस १५ ऑगस्ट रोजी उपलब्ध करायची आहे असा त्या पत्राचा आशय होता. त्यासाठी सर्वतोपरी साहाय्य करण्याचं फर्मानच त्या पत्रात सोडलं होतं. माणसाच्या वापरासाठी लस विकसित करण्यासाठी हे वेळापत्रक कोणत्याही प्रकारे व्यवहार्य नाही अशी त्या क्षेत्रातल्या तज्ज्ञांची एकंदर प्रतिक्रिया आली.

“१५ ऑगस्टपर्यंत करोनावर लस? शक्यच नाही”

लशीची घाई धोकादायक : शास्त्रज्ञांचा इशारा

दरम्यान लाल फितीमुळे होणारा विलंब टाळण्यासाठी हे पत्र होतं असं समर्थन ICMRकडून आलं.

आज अखेर कहर झाला आहे. Indian Academy of Sciences या बंगलोरस्थित (आणि सी व्ही रमण यांनी स्थापन केलेल्या संस्थेने) एका प्रेस रीलीजद्वारे झाल्या घटनाक्रमाचा जाहीर आणि अधिकृत निषेध व्यक्त केला आहे.

जाहीर केलेलं वेळापत्रक अतार्किक आणि अभूतपूर्व आहे, असं त्यात म्हटलं आहे. अशा प्रकारची घाई केली तर भारतीय नागरिकांवर त्याचे धोकादायक परिणाम होऊ शकतील अशी भीतीही त्यात व्यक्त केली आहे.

COVID vaccine by August 15: ICMR deadline unreasonable, says Indian Academy of Sciences

इंडियन अकॅडमी ऑफ सायन्सेस ही देशातली एक प्रतिष्ठित वैज्ञानिक संस्था आहे आणि देशभरातल्या अनेक संस्थांचे प्रतिनिधी तसेच अनेक क्षेत्रांतले वैज्ञानिक संस्थेच्या कौन्सिल आणि कमिटीत कार्यरत आहेत.

भारतातल्या वैज्ञानिकांसाठी आणि वैज्ञानिक दृष्टिकोन वाढीला लावण्याविषयीच्या भारतीय संविधानातल्या 51 A(h) कलमाकडे पाहता हे सर्व क्लेशदायक आहे.

[It shall be the duty of every citizen of India] To develop scientific temper, humanism and the spirit of inquiry and reform.

३_१४ विक्षिप्त अदिती Sun, 05/07/2020 - 22:52

उजव्या ट्रोलांनी ह्या शास्त्रज्ञांना डावं, मुस्लिमधार्जिणं आणि/किंवा पाश्चात्त्यांचं गुलाम म्हणून, नेहमीचं नाटकबिटक झालं का नाही?

अबापट Mon, 06/07/2020 - 07:15

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

सुदैवाने असे काही झाले नाही(अजून तरी)
दोन दिवसांपूर्वी भारत बायोटेकचे व्हीपी लस टोचून घेतानाचे फोटो आले 'बघा त्यांना आपल्या प्रॉडक्ट बद्दल किती खात्री आहे' वाले.पण तो फोटो इतका गलथान होता की फार व्हायरल झाला नाही.
आणि भारत बायोटेक ने काही तासातच तो फोटो आम्ही प्रसारित। केलेला नाही हा खुलासा केला. एवढेच.
बाकी काहीही वादळ नाही.