.
.
समीक्षेचा विषय निवडा
पोच
एक नजर मारली तर खोल वाटला.. जरा निवांत वेळ काढून वाचावा लागेल!
तुर्तास पोच!
निवांतपणे लेख वाचला. भाग-१ व २ पाठोपाठही वाचले. हा भाग पहिल्याइतका विचार करायला लावत नाही, चित्रपट परिचयाकडे झुकतो.
मात्र एकूण लेखमाला अपेक्षेपेक्षा वेगळ्याच दिशेने जात आहे (अपेक्षेपेक्षा अधिक रोचक होत आहे). पुढील भाग वाचायला प्रचंड उत्सूक आहे
मस्त
गावस्करच्या बॅटिंगप्रमाणे संथ पण दमदार लेखमाला. पहिल्या लेखात नुसती पार्श्वभूमी - सत्य म्हणजे काय याचा उहापोह, दुसऱ्या भागात त्याचा कथेशी लावलेला संबंध आणि कथेची रूपरेखा आणि तिसऱ्या भागात प्रत्यक्ष कथा.... हा आकृतिबंध आवडला. पुढच्या भागाची वाट बघतो आहे.
घटित तेच असले तरी घटना भिन्न आहेत.
सत्य कितीही स्पष्ट असलं तरी व्यक्तिनिष्ठतेच्या भिंगांमुळे धुसर, वेडंवाकडं होण्यापासून टळत नाही. एखाद्या वैज्ञानिक प्रयोगात त्रुटी पूर्णपणे काढून टाकता येत नाहीत त्याप्रमाणे. दुर्दैवाने मनुष्य प्रत्येक घटनेकडे बघताना, ती अनुभवताना, आणि लक्षात ठेवून वर्णन करताना त्यावर सामाजिक अपेक्षांचा आणि स्वतःच्या न्यूनगंडांचा परिणाम होतो.
’जे सत्याचा शोध घेत आहेत त्यांच्यावर विश्वास ठेवा. पण सत्य सापडले आहे असा दावा करणार्यांवर - त्यांच्या दाव्यावर - संशय घ्या.’
हे सत्य सापडलेला माणूस या विधानाला अपवाद आहे. :)
भाग २ अगदी हटके
गुरुजी,
भाग २ अगदी हटके आहे. जीएंवरुन एकदम चित्रपट.. अं :)
क्या बात है...
भाग-३ कशावर असेल याचा अंदाज करुन थकलोय, कारण तुमची चतुरस्त्रता परिचयाची असल्यामुळे नेमके पुढचे कवडसे कशावर पडतील याचा अंदाज बांधणे अवघडच आहे ;)
लेख मनापासून आवडला. लेखात वापरलेल्या छायाचित्रांमुळे एक जिवंतपणा आलाय.
अवांतर : गुरुजी, र, श आणि म या अक्षरांचा तुमच्यावर विशेष प्रभाव आहे असं जाणवतंय - रमताराम.... रोश एन्ड अॅडम्स.... आता राशोमोन :P
वाचला
वाचला, पुन्हा वाचणार आहे. :)