अमेरिकन राजकारणातील नवी उगवती तारका?
साउथ कॅरोलायनाच्या गवर्नर निकी हॅली ह्यांचा नवा तारा अमेरिकन अध्यक्षपदाच्या निवडणुकीच्या निमित्ताने उगवू लागला आहे काय?
काल ओबामांचे 'स्टेट ऑफ द यूनियन' भाषण झाल्यानंतर रिपब्लिकन पक्षाच्या वतीने त्याला उत्तर देण्यासाठी पक्षाने निकी हॅली ह्यांना नियुक्त केले होते. त्या संधीचा उपयोग करून ओबामांच्या भाषणातील कच्चे दुवे मांडण्याऐवजी हेली ह्यांनी रिपब्लिकन पक्षातील ट्रंप-निर्मित दुफळीकडे लक्ष केन्द्रित केले आणि अशी दुफळी निर्माण करण्याबद्दल आणि इमिग्रंट/मुस्लिम ह्यांच्यावर शाब्दिक हल्ले करून भेदभाव माजवण्याबद्दल ट्रंप ह्यांना दोष दिला.
ह्याबद्दल त्यांच्यावर रिपब्लिकन पक्षाच्या काही गटांतून टीका होत आहेच पण दुफळीविरोधात गटागटांमध्ये परस्पर सामंजस्य निर्माण करण्याच्या त्यांच्या हेतूबद्दल प्रशंसाहि होत आहे.
रिपब्लिकन उपाध्यक्षपदाच्या तिकिटाच्या दिशेने ही वाटचाल चालू आहे असे अनेक चर्चांमध्ये दिसून आले. तसे झाल्यास इमिग्रंट/अल्पसंख्याक/अन्य मार्जिनलाइज्ड गट रिपब्लिकन पक्षाला आपली मते देतील असे निकी हॅलीचाहत्यांना वाटत आहे.
ऐसीच्या सदस्यांना काय वाटत आहे? (निकी हॅली ह्या भारतातून १९७२ साली अमेरिकेत गेलेल्या रंधवा ह्या आडनावाच्या सिख घरात जन्मलेल्या आहेत हे आपल्या दृष्टीने लक्षणीय आहे. दुसरे भारतीय वंशाचे अध्यक्षपदाचे उमेदवार गवर्नर बॉबी जिंदल हे मात्र शर्यतीतून पूर्ण बाहेर टाकले गेले आहेत असे दिसते.)
Tulsi Gabbard
लेखाचे शीर्षक वाचून पहिले नाव माझ्या मनात आले ते श्रीमती तुलसी गबार्द (जन्म १९८१) यांचे. त्या सध्या US Congress मध्ये Democratic पक्ष्याच्या सदस्या आहेत. धर्माने स्वतःला त्या हिंदू म्हणवितात (हरे कृष्ण पंथाचा एक फुटीर [ उप ] गट असं काही म्हणतात ) आणि शपथ घेताना हात गीतेवर ठेवला होता. माझ्या मते Nikki Hailey पेक्षा अमेरिकन जनमानसात त्यांचा प्रभाव अधिक पडेल कारण Hillary Clinton यांचा अस्त झाल्यावर तुलसिताइंना अधिक मोका मिळण्याची शक्यता आहे.
कुत्ता बोले....
ऐसीच्या सदस्यांना काय वाटत आहे?
प्रेसिडेन्ट ओबामांचं संपूर्ण भाषण आणि त्यानंतरचं निकि हेली यांचं प्रत्युत्तर पाहिलं. काय करणार? आमचं, ऋषिच्या शब्दांत कुत्त्यांचं, भविष्य त्यावर अवलंबून आहे ना!
खरं सांगायचं तर निकी हेली प्रतिक्रिया पाहिल्यानंतर ओबामांचं भाषण जास्त सरस होतं असं प्रांजळपणे म्हणावं लागेल! (तो नंदन बघा तिथे आनंदाने खिदळ्तोय!!)
निकी हेली ह्या ओबामांच्या भाषणावर रिपब्लिकन प्रतिक्रिया व्यक्त करताहेत असं वाटलंच नाही. त्यांचा सगळा भर हा त्यांच्या एस्टॅब्लिश्ड रिपब्लिकन कोअरची री ओढण्यावर होता. त्यांच्या प्रतिक्रियेत ट्रंप आनि क्रूझ या रिपब्लिकन एस्टॅब्लिश्मेंटला न जुमानणार्या उमेदवारांवर इन्डायरेक्ट टीका जास्त होती. शेवटी धन्याच्या खात्या अन्नाला जागणारी जात असंच त्यांच्या भाषणाचं वर्णन करावं लागेल.
आज त्यांच्या स्वतःच्या राज्यातही ट्रंप आघाडीवर आहे. हे, राज्यातल्या सर्वात मोठी रिपब्लिकन लीडर म्हणून, आपलं अपयश लपवण्यासाठी त्यांनी ह्या दोन उमेदवारांवर आपल्या भाषणात, भाषणाचा मूळ हेतू बाजूला ठेवून, (विसरून असं मी म्हणणार नाही कारण इथे कोणीच अज्ञ नाहीत) त्यांनी आपल्या मालकां/मेन्टॉर्सची री ओढली इतकंच!
याचं फळ त्यांना ख्रिस्तसाक्ष जरूर मिळणार आहे. नुकत्याच बातमीनुसार लुईझियानामध्ये बॉबी जिंदाल आपल्यामागे रिपब्लिकन गव्हर्नर निवडून आणू देऊ शकलेला नाही, तिथे डेमोक्रॅट गव्हर्नर निवडून आला, बरं झालं! हेच साउथ कॅरोलायनामध्ये होणार आहे.
ह्यावेळचं भांडण हे डेमोक्रॅटसबरोबर नाहीच आहे, ते एस्टॅब्लिश्ड रिपब्लिकन सांडांबरोबर आहे. खूप वर्षे त्यांचा अन्याय आणि कर्तव्यशून्यता सहन केली, आता यापुढे नाही. मग त्यापायी पार्टी फुटली तरी चालेल...
तशीही हिलरी निवडून आली तरी फारसं काही करू शकत नाही, हाऊस आणि सिनेट रिपब्लिकन आहे!!! ;)
फ्रस्ट्रेटेड बट होपफुल मॉडरेट रिपब्लिकन,
पिवळा डांबिस
ओबामाचे भाषण अर्थातच त्याच्या
ओबामाचे भाषण अर्थातच त्याच्या कारकीर्दीचे हायलाइट अधोरेखीत करणारे एक्स्पेक्टेडच होते परंतु त्याच्या वल्गना फार वाटल्या मला. मॉस्कोने अंतराळयान अवकाशात सोडल्यानंतर आम्ही रुसून बसलो नाही तर ते चॅलेंज स्वीकारुन (खरं तर एम्ब्रेस याला हा चपखल शब्द नाही) चंद्रावर पाऊल टाकलं....... अरे तू तुझ्या कारकीर्दीबद्दल बोल नाउगाचच पूर्वजांचं श्रेय बडबडून काय टाळ्या मिळवतोस?>
.
अमेरीकेची इकॉनॉमी जगात सर्वाधिक प्रबळ आहे ..... मग तेलाच्या किंमती घसरुन तिथे वॉलस्ट्रीट काचळचळा कापतय. सामान्य माणसाला स्टॉक्स घसरल्याने रिटायरमेन्टची धास्ती का वाटते आहे?>
.
मध्येच मॉस्को आणि बीजींग च्या नेतृत्वाला कमी लेखणे की लोक नेता म्हणून आम्हाला प्रिफर करतात. मॉस्को व बिजिंगला नाही ...... हे बोलून चिरगुटांना (?) महत्त्व कशाला द्यायचे? का वरवरचा आवेश हे एक प्रकारचे कॉम्पेन्सेशन म्हणायचे?
.
कर्करोगावर औषध काढूच. ......... अरे काढा मग बोला. यात तुझ्या कारकीर्दीचे हायलाइट काय?> शिवाय तो कर्करोगाचा उल्लेख खरा होता की प्रतिकात्मक एक ओबामाच जाणे.
____
मला जर मतदानाचा हक्क असता तर मी व्हरमाँटच्या सँडर्स ला मत दिले असते. निदान त्याच्या अजेंड्यात कॉलेज फी कमी करण्याचा मानस आहे. स्टुडंटलोन कितीतरी १.१९ ट्रिलिअन पोचले आहे. काय हे! मुलांनी जीवनाची सुरुवातच अशा बेड्यांनी करायची?
ट्रंप माकड आहे. त्याला माकडचाळे करुन भडक बोलण्यातच रस आहे. स्त्रीद्वेष्टं यडं!!!
____
या आर्थिक विषमतेबद्दल तर विचारायलाच नको.
मग तेलाच्या किंमती घसरुन तिथे
मग तेलाच्या किंमती घसरुन तिथे वॉलस्ट्रीट काचळचळा कापतय. सामान्य माणसाला स्टॉक्स घसरल्याने रिटायरमेन्टची धास्ती का वाटते आहे?
तेलाच्या किंमती वाढल्या तरी सामान्य माणूस आरडाओरडा करणार अन तेलाच्या किंमती कमी झाल्या तरी आरडाओरडा करणार. किंमती वाढल्या की ऑफिस ला कम्युट परवडत नाही. किंमती कमी झाल्या की तेल कंपन्यांचे ष्टॉक्स घसरले म्हणून रिटायरमेंट वर परिणाम होणार म्हणून आरडाओरडा.
तेलाच्या किंमती वाढल्या की "कॉस्ट पुश इन्फ्लेशन" चा आरडाओरडा करणारी मंडळी आता तेलाच्या किंमती प्रचंड कमी झालेल्या असूनही "कॉस्ट पुश डिफ्लेशन" बद्दल कस्काय बोलत नैय्येत ??
------------------
व्हरमाँटच्या सँडर्स ला मत दिले असते. निदान त्याच्या अजेंड्यात कॉलेज फी कमी करण्याचा मानस आहे. स्टुडंटलोन कितीतरी १.१९ ट्रिलिअन पोचले आहे. काय हे! मुलांनी जीवनाची सुरुवातच अशा बेड्यांनी करायची?
The sanders plan just shifts the cost from the students to taxpayer.
पाताळविजयम्
खरं सांगायचं तर निकी हेली प्रतिक्रिया पाहिल्यानंतर ओबामांचं भाषण जास्त सरस होतं असं प्रांजळपणे म्हणावं लागेल! (तो नंदन बघा तिथे आनंदाने खिदळ्तोय!!)
छे छे, खिदळत नाहीय - पाताळविजयम् मोडमध्ये आहे ;). पण खरं सांगायचं तर, ही तुलना बरीचशी अन्याय्य आहे. अमेरिकन अध्यक्षपदासोबत येणारं bully pulpit, श्रोत्यांच्या वेळोवेळी मिळणार्या प्रतिक्रिया/मानवंदना यांच्या तुलनेत विरोधी पक्षाचं कॅमेर्याकडे पाहून केलेलं एकसुरी भाषण हे बव्हंशी फिकं पडतंच.
हे, राज्यातल्या सर्वात मोठी रिपब्लिकन लीडर म्हणून, आपलं अपयश लपवण्यासाठी त्यांनी ह्या दोन उमेदवारांवर आपल्या भाषणात, भाषणाचा मूळ हेतू बाजूला ठेवून...
आजचा डिबेटही त्याच राज्यात आहे, हा नक्कीच योगायोग नाही.
तशीही हिलरी निवडून आली तरी फारसं काही करू शकत नाही, हाऊस आणि सिनेट रिपब्लिकन आहे!!! (डोळा मारत)
सिनेटचं सांगता येत नाही, पण हाऊस २०१६ मध्येही रिपब्लिकनच राहण्याची शक्यता अधिक आहे. (हाऊसमध्ये साधे बहुमत मिळवण्यासाठी डेमोक्रॅट्सना एकूण मतांच्या ५७% मतं मिळवणं आवश्यक आहे). तेव्हा, मागे म्हटल्याप्रमाणे, व्होट रिपब्लिकन इन २०१६! :D
...यांच्या तुलनेत विरोधी
...यांच्या तुलनेत विरोधी पक्षाचं कॅमेर्याकडे पाहून केलेलं एकसुरी भाषण हे बव्हंशी फिकं पडतंच.
हो, पण त्या फिक्या निकीने आपल्या भाषणामागचा हेतू काय, विषय काय याचंतरी भान ठेवायला हरकत नव्हती ना!
आजचा डिबेटही त्याच राज्यात आहे,
पाह्यला का? न्यूयॉर्कच्या व्हॅल्यूज कशा झळाळून उठल्या!! क्रूझला टाळ्या वाजवण्यापलीकडे काही सुचलंच नाही!!!
:)
नो बिग डील
काहीही विशेष होणार नाही. (हेली काकूंनीच साऊथ कॅरोलायनाचा कन्फेडरेट फ्लॅग काढला होता हे विसरू नका. त्यांना "मेनस्ट्रीम रिपब्लिकनांचा" (मॉडरेट रिपब्लिकन पिडांकाका सोडले तर उरलेले सगळे रिपब्लिकन या कॅटेगिरीत मोडतात! ;-)) पाठिंबा मिळेल असे कोणी वाटून घेऊन नये. (आणि तसे वाटलेच तर एखादा आठवडा टेक्सासमध्ये राहून बघावे.)
पेग्गी नूनन काय म्हणत्ये बघा निक्की बद्दल....
पेग्गी नूनन काय म्हणत्ये बघा निक्की बद्दल....
Here’s why the criticisms are strange. Ms. Haley has every right to her reasonable and mildly stated views. Mr. Trump is no victim—he dishes it out, he can take it. And Ms. Haley is a popular, moderate-conservative woman who is a successful two-term governor. Do Republicans not realize they need more such women, who put up with a great deal and deserve respect, and that for years as a party they’ve had a woman problem? More immediately, do they not realize it is good to have a sunny, well-balanced woman as the momentary face of their party? The other faces, the presidential contenders, are running around like rabid squirrels throwing nuts at each other in the dark. It’s not a good look. In appearing to be and acting like a normal human being, Ms. Haley did more for the party in 20 minutes than they have in two months. So go Nikki!
With one caveat. She later revealed that, like an obedient person not quite in tune with the spirit of the times, she had cleared her remarks with Paul Ryan and Mitch McConnell. Ugh. Never clear your work with the guys in Washington, and if they tell you that’s the price of making the speech, don’t make it—and tell people why. Clear your thoughts with no one, like a classy independent woman.
She later revealed that, like
She later revealed that, like an obedient person not quite in tune with the spirit of the times, she had cleared her remarks with Paul Ryan and Mitch McConnell.
बघा, हेच तर आम्ही म्हंटलं होतं. तिने एखाद्या पाळीव प्राण्याप्रमाणे आपल्या मालकांचं मत टीव्हीवर सांगितलं.
फिकी निकी!!! (नंदनच्या सौजन्याने)
सगळे उमेदवार बंडल
ऐसीच्या सदस्यांना काय वाटत आहे? >>> यंदाचे सगळे उमेदवार (दोन्ही पार्टीचे) बंडल आहेत. या वर्षी मतदान करणार नाही.