लाल दिव्याची गाडी
खूप वर्ष झाली या घटनेला पण आजही आठवली तरी पोटात दुखेपर्यंत हसतो सगळेजण. साधारणत: नि ८-९ वी ला होते. त्यावेळी आमच्या इथे शेजारी एक दादा राहत होता.तो माझ्यापेक्षा फारतर २-३ वर्षांनी मोठा असेल. त्या दादाची एक सवय म्हणजे जर कधी कुणी त्याला विचारलं कि आता पुढ काय शिकणार किंवा काय करणार तर त्याच ठरलेल उत्तर एकदा तरी मी लाल दिव्याच्या गाडीतून फिरणार त्याच्या या उत्तराच सर्वाना खूप कौतुक वाटायचं कि त्याची स्वप्न किती उच्च आहेत.मलाही फारस काही समजत नव्हत कि त्याच स्वप्न नेमक काय आहे ते पण एवड नक्की कळायचं लाल दिव्याची गाडी हि फक्त खूप मोठ्या अधिकार्याला मिळते.त्यालाही लाल दिव्याच्या गाडीशिवाय दुसर काहीच सुचत नसायचं.घरच्यानाही पोराचा लय अभिमान. अशीच १-२ वर्ष निघुन गेली, माझीही दहावी झाली आणि एक दिवस आमच्या गावात कुठल्यातरी गोष्टीवरून दोन गटात खूप भांडण झाल. नुसता हाणामारी आणि गलबलाच सगळीकडे.शेवटी पोलिसांना मध्ये पडून ते प्रकरण मिटवाव लागल. पोलीस मध्ये पडले म्हणजे भांडण करताना, हाणामारी करताना, सापडला कि पोलिसांचे रट्टे आणि कमीतकमी १ दिवसाचा तरी सरकारी पाहुणचार चुकत नाहीच. त्या दादाच हि तसच झाल. सापडला हाणामारी करताना पोलिसांनी लगावली कानफटीत आणि घातला त्यांच्या लाल दिव्याच्या गाडीत तरी पण तो आनंदातच दिसत होता सुटून आल्यानंतर बरेचजण जेंव्हा त्याला भेटले सहानभूती दाखवली पण त्याला मात्र या सगळ्याच काहीच सुख न दुख. जेंव्हा त्याला कुणीतरी विचारलं कि तुला पोलिसांनी मारलं, जेलात जाव लागल तुला वाईट वाटत नाही का त्या बद्दल तर त्या पठ्यान काय उत्तर द्यावं याच्यात वाईट काहीच झाल नाही तर उलट माझ लाल दिव्याच्या गाडीतून फिरायचं स्वप्न पूर्ण झाल.तेंव्हापासून पुन्हा काय त्याला कुणी सहानभूती दाखवायला गेल नाही. पण त्याच उत्तर एकूण मला मात्र आमच्या शेलार सरांनी मराठीच्या तासाला शिकवताना सांगितलेलं एक ओळ मात्र नक्की आठवली.
पुत्र व्हावा ऐसा गुंडा, त्याचा तिन्ही लोकी झेंडा.
आजही लाल दिव्याची गाडी दिसली तरी तो दादा आठवल्या शिवाय राहत नाही.
?
परी, मनोज गीत आणि निमिष सोनार हे एकाच व्यक्तीचे डुआयडी आहेत काय?