सावधान! मगरमच्छी अश्रू
विवेक पटाईत
सावधान मत्स्य पुत्रानों आयुष्यभर मासे मारणारा बगळा आता मगरीचे रूप घेऊन अश्रू ढाळण्यासाठी येत आहे, त्याला अचानक मत्स्य पुत्रांचा पुळका कसा आला, काही एक कळत नाही.
आयुष्यभर बगळ्याने
मासे सारे फस्त केले .
मासे सारे फस्त केले .
घेऊनी वेश मगराचा.
ढाळतो अश्रू आता.
ढाळतो अश्रू आता.
एका महानगरात एका मत्स्य पुत्राचा असाच जीव गेला:
भुलूनी मगर अश्रुना
जीव गेला मत्स्याचा.
अर्पिली गांधी "चित्रफुले"
ढाळूनी अश्रू मगरीने.
जीव गेला मत्स्याचा.
अर्पिली गांधी "चित्रफुले"
ढाळूनी अश्रू मगरीने.
सावधान! मत्स्य पुत्रानों
घेउनी वेश साधूचा
रावण हरतो सीतेला.
जाणीव ठेवा इतिहासाची
भुलू नका मगर अश्रुना.
रावण हरतो सीतेला.
जाणीव ठेवा इतिहासाची
भुलू नका मगर अश्रुना.
मला वाटले होते, एसीच्या
मला वाटले होते, एसीच्या सुज्ञ वाचकांना काही सांगायची गरज वाटणार नाही. मासे म्हणजे 'शेतकरी' ७० वर्षे त्यांचा कुठल्या बगळ्याने शिकार केला. आता अतीव दुख: झाल्याने 'मगरीचे' खारट अश्रू विदर्भात येऊन गाळीत आहे.
.... थाकथित शेतकर्याला १० लाख रुपये (गांधी चित्रे) दिल्लीत सरकारने दिले व शहीदचा दर्जा आणि त्याच्या नावाने कल्याणकारक योजना ही सुरु होणार आहे. आता आत्महत्या होती कि मगरीने .....
केवळ भुतदया
गेले तीन दिवस या धाग्यावर एकही प्रतिसाद न दिसल्यामुळे शाकाहारी प्राण्यांप्रती एक केवळ भूतदया म्हणुन हा प्रतिसाद देत आहे...
:)
पण पटाईतसाहेब, तुमच्या या कवितेचा एकूण संदर्भ तरी काय हे तर स्पष्ट करून सांगा ना आम्हा वाचकांना!!!!
अन्यथा मग तुमचा संध्याकाळचा ब्रांन्ड कोणता ते तरी सांगा...
जबरदस्त दिसतोय, आम्हीही ट्राय करून बघू!!!!