Skip to main content

.

.

समीक्षेचा विषय निवडा

ऋषिकेश Tue, 22/07/2014 - 16:13

उत्तम.
यावेळी तर अया प्रयोग होणारे याची माहितीही मिळालेली होती. पण सांसारिक जबाबदार्‍या नामक गनिमाने ऐनवेळी घात केला.
पुन्हा प्रयोग लागला तर नक्की पहावे अशी खुणगाठ बांधतो आहे. मी या मंडळीं विषयी आता इतके ऐकले आहे की अपेक्षा प्रचंड उंचावल्या आहेत!

बाकी, आभार!

अमृतवल्ली Tue, 22/07/2014 - 16:58

'मी ..गालिब' नाटकाचा प्रयोग मी दोनदा पहिला. एक साधारण एक-दीड वर्षापूर्वी आणि नंतर काही महिन्यांपूर्वी. दोन्ही प्रयोगाच्या सादरीकरणामध्ये प्रचंड तफावत आहे. आधीच्या प्रयोगात उर्दू-हिंदी मिश्रीत भाषेचा अप्रतिम वापर केला होता. सद्य स्थितीतील लेखकाचे पात्र मूळ गालिबच्या कथेत आणि व्यथेत मध्ये मध्ये येत नव्हते. संगीताचा वापरही मर्यादित आणि सुस्थळी होता. आणि नंतरचा प्रयोग तर तुम्ही जाणताच!!.. नंतर चौकशी केल्यावर कळाले की "फार हिंदी होत म्हणे!!" ,"गालिब जनतेत येणार कसा मग (??????)" वगैरे उत्तरे मिळाली.. असो...

मेघना भुस्कुटे Tue, 22/07/2014 - 17:31

विस्तृत आणि सखोल वृत्तान्त. प्रयोग पाहिल्याचे समाधान आणि न पाहिल्याची चुटपुट लावणारा. संधी मिळाल्यावर ताबडतोब पाहण्यात येईल. बाकी लेखकाच्या तीक्ष्ण चिकित्सक दृष्टीबद्दल काय बोलावे? आभार.

मन Tue, 22/07/2014 - 18:08

In reply to by मेघना भुस्कुटे

+१
अवांतर :-
ररांच्या लिखाणाची वाट पाहणारी बरीच पब्लिक आहे; त्यांनी मनावर घेतलं अजून लिहायचं तर बरं होइल.

राजेश घासकडवी Wed, 23/07/2014 - 20:56

In reply to by मेघना भुस्कुटे

विस्तृत आणि सखोल वृत्तान्त. प्रयोग पाहिल्याचे समाधान आणि न पाहिल्याची चुटपुट लावणारा. संधी मिळाल्यावर ताबडतोब पाहण्यात येईल. बाकी लेखकाच्या तीक्ष्ण चिकित्सक दृष्टीबद्दल काय बोलावे? आभार.

यातलं 'संधी मिळाल्यावर'चा भाग दिल को बहलाने के लिये खयाल (दिबख) म्हणून करत बाकी सर्वच बाबतीत मेघनाशी सहमत.

............सा… Wed, 23/07/2014 - 22:00

आपल्यासमोर आहे तो नाटककाराचा ग़ालिब, जो ऐतिहासिक ग़ालिबचा केवळ एक अवतार आहे. इथे दिसणारा ग़ालिब हा एका विशिष्ट दृष्टिकोनातून दिसणारा ग़ालिब आहे. या पलिकडे जाऊन ग़ालिबचे इतर रंग प्रेक्षकांना सापडू शकतील, कदाचित आधीच सापडले असतील परंतु ते इथेही दिसतील असा आग्रह आपण धरता कामा नये.

वा!!!

सातत्याने अप्रामाणिकतेला, तडजोडीला नकार देत व्यावहारिक अपयश पदरी पाडून घेणारा. समाजापासून, जगण्याच्या त्यांच्या रूढ चाकोरीपासून अलिप्त राहून एकाच वेळी त्यांच्या तिरस्काराचा, असूयेचा, अभिमानाचा, प्रेमाचा विषय होऊन राहिलेला. आज आर्थिक संपन्नतेच्या वाटे चालू इच्छिणार्‍या, त्यापुढे अन्य सारी जीवनमूल्ये, पैलू नगण्य मानण्याकडे कल होत चाललेल्या समाजाच्या मुख्य प्रवाहापासून थोडे बाजूला पडणार्‍या कलावंतांना ग़ालिबच्या आयुष्यात आपल्याच जगण्याचे प्रतिबिंब दिसले तर नवल नाही.

__/\__