cisco IP phone
पब्लिकचं लक्ष वेधून घेण्यासआथी हा मुद्दाम वेगळा धागा काढला आहे.
काम झाल्यावर हा इतर चौकशी धाग्यांत विलीन्/विसर्जित केला तरी चालेल.
मला सल्ला/मदत हवी आहे.
माझ्याकडे 1 mbps चे wired broadband आहे.
wired असल्यामुळे रेंज येणे - जाणे वगैरे त्रास होत नाही हा फायदा.
पण जितका वेळ वीज असते, तितकाच वेळ इंटरनेटही उपलब्ध असते हा तोटा.
तर मला सल्ला हवा आहे तो फोन संदर्भात.
मला ब्रॉडबॅण्ड वापरुन फोन कॉल्स करता येतील का ?
voip सारखं काहीतरी product कुणाला ठाउक असेल तर कृपया सुचवावं.
म्हणजे समजा एखादा लॅण्डलाइन सदृश फोनसेट माझ्या कम्प्युटर - इंटरनेट ह्याला जोडून वापरता येत असेल
तर किती बरं होइल ?
मी काम केलेल्या बहुतांश कंपन्यांत voipच वापरात होते. ते भलेथोरले हॅण्डसेट संगणकाला जोडलेले असत.
तर तसच एखादं प्रॉडक्ट retail पातळीवरही मिळू शकतं का ?
त्याला नेमकं काय म्हणतात ? कुठे मिळतं ?
.
.
माझ्या सध्याच्या हापिसात cisco ip phone नावाचं अजूनच भन्नाट प्रकरण वापरात आहे.
ते लैच भारी आहे.
माझ्या डेस्क्टॉपात फोनचे सॉफ्टवेअर आहे. ते उघडल्यावर आपल्या खर्या फोन सारखी स्क्रीन समोर येते.
आपण डेस्कटॉपला हा हेडफोन लावून वापरु हे फोन सॉफ्टवेअर शकतो; खर्अय फोनसारखेच.
तुम्ही कुणी काही सुचवू शकाल का ?
जीमेल, फेसबुक किंवा अगदि स्काइपही धड वापरता येत नाहित.
ते सारखे हँग होतात. काय भानगड आहे ठाउक नाही.
शिवाय स्काइप वगैरे वरून लॅपटॉपवाला दुसर्अय लॅपटॉपलाच कॉल करु शकतो.
मला तसे नको आहे.
मला "खरा" फोन हवा आहे.
म्हणजे मला अमुक एक मोबाइल नम्बरसुद्धा लावता यायला हवा.
थोडक्यात, मला bsnl लॅण्डलाइनला पर्याय म्हणून ip phone हवा आहे.
सुचवण्यांच्या प्रतीक्षेत.
--मनोबा
हापिसात कसे जमते ?
मी काही आघाडीच्या माह्तिई तंत्रज्ञान सेवा कंपन्यांत काम केले आहे.
तिथे ip phone होते. म्हणजे ते हॅण्डसेट्/हार्डवेअरच होते; पण त्यांना ip phone म्हणत.
सध्याच्या कंपनीत ip phone आहे. पण हा फोन म्हणजे एक सॉफ्टवेअर आहे डेस्कटॉपवरील.
इथून मी कोणत्याही मोबाइलवर कॉल करु शकतो.
हापिसवाल्यांना/इंडस्ट्रीवाल्यांना चालत असतील तर घरगुती वापराला का आक्षेप असावा ?
.
.
भारतात व्हॉइपवरुन पिएसटिएन कॉलिंग बहुदा कायदेशीर नाही त्यामुळे अशी सोय उपलब्ध नाही
अर्रे ???
कायदेशीर नाही म्हणजे ?
म्हणजे मी कोनते तंत्रर्ज्ञान वापरावे ह्याबद्दल कायदा असूच कसा शकतो ?
मी काय वाटेल ते वापरेन. जोवर इतरांना अडचण नाय तोवर मला थांबवणारे हे सरकार आणि सरकारचे कायदे कोण ?
माहिती
वाचिक/ऐकीव माहितीवरुन आयपी-टू-पिएसटिएन ट्रान्सलेशन/रिसोल्युशन करणारे सर्व्हर्स भारतातील टेलिफोन्ससाठी ठेवणे कायदेशीर नाही, पण भारताबाहेर असे सर्व्हर्स असल्यास ते कायदेशीर आहे त्यामुळे सिस्को फोन्स(व्हिनेट) वरुन परदेशात कॉल शक्य आहे.
असे कधी शक्य होईल किंवा सध्या का शक्य नाही ह्यासाठी हा दुवा पहावा - पान २.
हे तुमच्य शंक दूर करण्यास मदत करेल ...
http://exotel.in/blog/voip-voice-over-internet-protocol-in-india-altern…
वरिल दूवा पहा! तसेहि VoIP,EPABX किंवा Avaya, CISCO हे सर्व पर्याय व्यवसयिक पातळीवर आर्थिकद्रुश्टया सक्षम ठरतात.
मला कायदेशीर गोष्टींची माहिती
मला कायदेशीर गोष्टींची माहिती नाही, जाणकार सांगतीलच.. पण मी जे वापरतो ते येणेप्रमाणे..
माझ्या स्मार्टफोन वर निम्बझ, सुपरव्होईप, स्काईप, वगैरे वापरून जगातल्या सगळ्या फिक्स्ड लाईन व मोबाईलवर फोन करता येतात.
भारतातला रेट साधारण साठ पैसे ते दीड रुपया प्रतिमिनीट असा पडतो.
ईन्टरनेटचा वेग चांगला असेल तर अजिबात अडचण येत नाही,
हीच सॉफ्ट्वेअर अॅन्ड्रऑइड बरोबरच विन्डोज फोन व आयफोनवरही उपलब्ध आहेत
कॉर्पोरेट लेवलला भारतीय
कॉर्पोरेट लेवलला भारतीय टेलिकॉम कायद्यांच्या कचाट्यातून सुटण्यासाठी voip ची सेवा भारताबाहेर, भारतीय कंपनीची (परदेशस्थ) बाप/मुलगी/भाऊ कंपनी घेते आणि भारतात उपलब्ध करून देते.
सिंगापूर यासाठी प्रसिद्ध आहे, कारण तिथे सर्वर्स असतात (आणि सिंगापूरच्या टाळक्यावरच्या उपग्रहाच्या सॅटेलाईट फूटप्रिंटमध्ये भारतही येतो - सॅटफोन सारख्या सेवांसाठी)
(हे कसं काय चालतं बॉ? TRAI काही म्हणत नाही का? कायदा असा अडाणचोट कसा? या प्रश्नांची उत्तरं माझ्यापाशी नाहीत.)
बेकायदेशीर
भारतात व्हॉइपवरुन पिएसटिएन कॉलिंग बहुदा कायदेशीर नाही त्यामुळे अशी सोय उपलब्ध नाही, फोन मिळाला तरी आयपी-टू-आयपी कॉल शक्य असेल, आयपी-टू-पिएसटिएन शक्य नसावे.