विज्ञान परिषदेत जुन्या विमानांचा विषय
अरेरे.. का तो जुन्या विमानांचा विषय काढला.. आता तर विज्ञान परिषदेतही मांडला.
:(
भळभळा वाहायला लागतो हो नळ आमचा लगेच.. टाळा ते. :(
(व्यवस्थापन : चर्चा लांबल्यामुळे मूळ धाग्यातून वेगळी काढली आहे.)
घ्या... या खाली दिलेल्या
घ्या...
या खाली दिलेल्या लिंकमधील लेखात म्हटल्याप्रमाणे तपशील खरा असला (जो व्हेरिफाय करणेबल संदर्भांसहित दिलेला आहे) तर या सध्या उल्लेखल्या जाणार्या पौराणिक विमानांचा विषयच संपला. खलास.
लोकसत्ता रविवार पुरवणीतला लेख. अत्यंत सरळपणे आणि मुद्द्याला धरुन लिहीलेला.
पूर्ण लेख सर्वांनीच वाचावा असा आग्रह. खालील अवतरण पाहिल्यास हा ग्रंथ मुळात जुनाबिनाच वगैरे नाहीच आहे आणि तो तुलनेत हल्लीच म्हणजे गेल्या शतकात एका "सिद्धी प्राप्त असलेल्या" आणि "समाधीअवस्थेत गेल्यावर श्लोक सुचणार्या" बाबामहाराज दर्जाच्या व्यक्तीच्या मेंदूतून आलेला आहे. आणि या बाबाजी स्वामींनी कुठून विद्या मिळवली तर त्यांच्या गुरुंकडून म्हणजे "गुरुजी महाराज" नावाच्या अन्य गूढ बाबामहाराजांकडून.
विषय संपला.
पंडितजींकडे विशिष्ट अतिंद्रिय शक्ती होत्या. ते जेव्हा समाधीत जात तेव्हा त्यांच्या मुखातून श्लोक बाहेर पडत. शर्माजी ते लिहून ठेवीत. शास्त्रीजींचा मृत्यू १९४१ मध्ये झाला. तत्पूर्वीच या श्लोकांची हस्तलिखिते तयार करण्यात आली होती. ती नंतर ठिकठिकाणी गेली. त्यातील एक बडोद्यातील ग्रंथालयात गेले. सुब्बराय शास्त्रींच्या चरित्रानुसार, त्यांना गुरुजी महाराज या थोर साधुपुरुषाने विमानविद्या शिकविली होती. ते मुंबईलाही येत असत आणि तेथेच विमानशास्त्राचे काही श्लोक त्यांनी सांगितले होते. १९०० ते १९१९ या काळात त्यांनी एल्लप्पा नामक एका ड्राफ्ट्समनकडून काही आकृत्याही काढून घेतल्या होत्या. शिवकर बापूजी तळपदे यांनी सुब्बराय शास्त्रींच्या मार्गदर्शनाखाली विमान तयार केले होते, पण ते उडू शकले नाही, असे मुकुंद यांनी नमूद केले आहे.
मुकुंद यांच्यासमोर आता सुब्बराय यांनी सांगितलेले श्लोक होते. त्यातले संस्कृत वैदिक वळणाचे नव्हते. श्लोकांचा छंद अनुष्टुभ होता, पण भाषा साधी आणि आधुनिक होती. त्यातील अंतर्गत आणि निगडित पुरावे लक्षात घेता ते प्राचीन असणे अशक्य असल्याचे मुकुंद यांनी म्हटले आहे. 'वैमानिकशास्त्र' हा ग्रंथ १९०० ते १९२२ या काळात पं. सुब्बराय शास्त्री यांनी रचला असून तो भारद्वाज ऋषींचा आहे याला कोणतेही पुरावे नाहीत. म्हणजे या ग्रंथाचे प्राचीनत्व उडाले. तो तर विसाव्या शतकातला निघाला. आता मुद्दा राहिला त्यातल्या आकृत्या आणि माहिती यांतील तथ्यांचा आणि त्यातल्या मांत्रिक, तांत्रिक आणि कृतक विमानांच्या खरेपणाचा. या ग्रंथात शकून, सुंदर, रुक्म आणि त्रिपूर अशा चार प्रकारची कृतक विमाने वर्णिली आहेत. आपल्या या शास्त्रज्ञ पंचकाने त्यांतील तत्त्वे, भूमिती, रसायने व अन्य सामग्री अशा विविध बाबींचे संशोधन केले आणि शेवटी थेटच सांगून टाकले की, यातले एकही विमान उडू शकत नाही. त्यात ते गुणधर्मही नाहीत आणि क्षमताही. त्यांची भौमितिक रचना भयंकर आहे आणि उड्डाणविषयक तत्त्वे उडण्याला साह्य़ करण्याऐवजी विरोधच करणारी आहेत.
http://cgpl.iisc.ernet.in/sit
http://cgpl.iisc.ernet.in/site/Portals/0/Publications/ReferedJournal/ACr...
हा तो रिपोर्ट. अ क्रिटिकल स्टडी ऑफ विमानिका शास्त्रा.
पुरोगामी ऐसीकर यातले निष्कर्ष वाचून आनंदाने उड्या मारू शकतात.
1.6 CONCLUSIONS
Thus the work “Vymanika
Shastra” was brought into
existence sometime between 1900
and 1922 by Pandit Subbaraya
Shastry by techniques unclear to us
at the moment. The only evidence
in favour of Maharshi Bhardwaja
being the author is the textual
statement and nothing more.आनंदाचे अजून खास कारण असू शकते - ते म्हणजे इतकं सगळं जे काय लिहिलं आहे ते मुळी प्राचीन आहेच का अशी मांडलेली शंका.
गवि, तुम्ही माझे प्रतिसाद वाचत नाही का? हे अगोदरच चर्चून झालंय.
आपल्याकडे प्रचंड न्यूनगंड
आपल्याकडे प्रचंड न्यूनगंड असल्यामुळे बाबा आणि महाराज यांचा उल्लेख प्रचंड अवमानकारक रित्या केला जातो. बाबाने किंवा महाराजाने म्हटले आहे म्हणून ते कमी गृहित धरावे याला काय लॉजिक आहे. लेखाचा सूर अति न्यूनगंडदर्शक आहे. साला खुद्द डार्विन पण बाबामहाराज होता, वर त्याचे सगळे संशोधन रिजेक्ट झाल्यामुळे त्याला अशी विशेषणे फिट बसतात आणि तरीही तुम्ही लावत नाही.
हे अवांतर आहे पण डार्विनचे उद्योग बाबामहाराजीय उद्योग आहेत. वाचा -
http://en.wikipedia.org/wiki/The_eclipse_of_Darwinism#Saltationism_and_…
आपल्या या शास्त्रज्ञ पंचकाने
आपल्या या शास्त्रज्ञ पंचकाने त्यांतील तत्त्वे, भूमिती, रसायने व अन्य सामग्री अशा विविध बाबींचे संशोधन केले आणि शेवटी थेटच सांगून टाकले की, यातले एकही विमान उडू शकत नाही. त्यात ते गुणधर्मही नाहीत आणि क्षमताही. त्यांची भौमितिक रचना भयंकर आहे आणि उड्डाणविषयक तत्त्वे उडण्याला साह्य़ करण्याऐवजी विरोधच करणारी आहेत.
या शास्त्रज्ञ पंचकांना उड्डाण कसे होते याचे आजचे ज्ञान आहे. त्याचा अर्थ असा होतो कि उड्डाणाची सारी तंत्रे आज माहित झाली आहेत आणि पुढे दुसरे कुठले असणारच नाही. आणि असे म्हणणे फारच धाडसाचे आहे.
या शास्त्रज्ञ पंचकांना उड्डाण
या शास्त्रज्ञ पंचकांना उड्डाण कसे होते याचे आजचे ज्ञान आहे. त्याचा अर्थ असा होतो कि उड्डाणाची सारी तंत्रे आज माहित झाली आहेत आणि पुढे दुसरे कुठले असणारच नाही. आणि असे म्हणणे फारच धाडसाचे आहे.
पुढे दुसरे कुठले असणारच नाही असं यात कुठे ध्वनित होतं ? आता आजरोजी दिलेल्या वर्णनाची आणि रचनेची विमानं उडू शकत नाहीत इतकंच ते विधान आहे.
आता पुराणकाळात हवाच वेगळी होती. पदार्थाचे गुणधर्मच अबाउट टर्न करुन वेगळे होते. धातूं डिके न झालेले किंवा जास्त झालेले होते त्यामुळे सर्वच गृहीतकं बदलू शकतात आणि कोणतीही गोष्ट खरी असू शकते, अश्या अप्रोचने सर्वच मान्य करावं लागेल. मग वादाला जागाच राहात नाही किंवा कोणत्याच वास्तविकतेला काही अर्थ राहात नाही. देव हवेत विहार करायचे, ज्ञानेश्वरांनी भिंत चालवली, रेडा वेद वदला, हनुमानाने पर्वत उचलून उड्डाण केलं आणि इतर कोणतीही गोष्ट मान्य करताना त्यावेळची "ग्रॅव्हिटीच वेगळी असेल", त्यावेळचे "प्राणीच वेगळे असतील" असं सर्वत्र म्हटल्यावर सगळीच विशिष्टता पुसली जाते. मग तत्वतः सगळंच मान्य करुन टाकावं..
पुराणकाळात नक्की काय होतं ते
पुराणकाळात नक्की काय होतं ते बिग बँग आणि इवोल्यूशन यांच्याशिवाय इतरत्र पाहायचंच नाही हे देखिल दुसरं अतिरेकी टोक आहे. निसर्ग सम्यक (चांगला, सुज्ञ, भला, सगळे करणारा, व्यवस्थित वागणारा) नाही आणि निर्जीव द्रव्यातून इतके बुद्धिमान आणि सार्वभौम असे आपण सजीव निर्माण झालो आहोत हे म्हणणं देखिल प्रचंड निरर्थक आहे. हे व्हायला इतके जास्त योगायोग व्हावे लागतात कि त्यांची शक्यता शून्याच्या पलिकडे आहे. पण हे सगळं बिनधास्त मान्य करायचं आणि मधल्या एका संस्कृतीला विज्ञानाचे प्रचंड ज्ञान असू शकते ज्याची संभाव्यता शून्याच्या खूप अलिकडची तेवढं मात्र मान्य करायचं नाही अशी मानसिक अढी का?
आणि बोडसाची टिंगल ही एकट्या बोडसाची टिंगल होत नाही. पर्सनली आय डोन्ट केअर अबाउट हिम. असे लोक सांस्कृतिक वा राजकीय दृष्ट्या मोटीवेट झालेले / केलेले तसेच स्वतः बुद्धीहिन असू शकतात. पण टिंगल करायचा जो एकंदर टोन आहे त्यात प्राचीन काळात विमानविषयक जे जे काही चिंतन झालं त्याची टिंगल होत आहे. मूळात विमानांबद्दल कवन झालं याबद्दलच आपल्याला भारताचा अभिमान असायला पाहिजे असं व्यक्तिशः वाटतं. पण त्यापुढेही जाऊन चिंतन झालंय. जे लोक प्राचीन काळातलं विमान खोटं कसं होतं हेच ठरवायला बसले होते त्यांचे रिपोर्ट आणि टोन पाहून सगळ्या संभावना नाकारणे, त्या सगळ्या चितकांचा आपल्या आजच्या ज्ञानाच्या आधारे अवमानजन्य उल्लेख करणे हे सिविल नाही.
आणि रेडा बोलणे आणि भिंत चालवणे याची उदाहरणे द्यायची गरज नाही. शास्त्रज्ञांच्या मानाने बाबा लोक रिजनेबली मूर्ख होते. निकोला टेस्ला, इतका महान शास्त्रज्ञ, म्हणायचा कि हा झालेला भूकंप माझ्या मशिनमुळे झाला. काय मूर्खपणा आहे हा? कोण कोणत्या समाधी अवस्थेत जातो, तिथे काय बरळतो, तिथे त्याची मति कशी कुंठते याचं काही नेमकं शास्त्र नाही. कितीतरी शास्त्रज्ञांची कितीतरी विधानं इतकी मूर्खपणाची, इल्लॉजिकल, अनरिजनेबल, इंप्रॅक्टकल आहेत कि एकतर त्यांच्यातून काही अर्थ निघत नाही किंवा ती कितीही पार्श्वभूमी समजावून घेतली तरी मानवी बुद्धीच्या पलिकडची वाटतात. तिथे त्यांच्यावर प्रश्नचिन्ह उभे केले कि मग लगेच ते आपल्याला "लिमिटेशन्स ऑफ क्षक्षक्ष थेरी" सेक्शनकडे नेतात. आणि एकूणातच आधुनिक विज्ञानाच्या सगळ्या ज्ञानांचे ईंटिग्रेशन करण्यात किती लोचे आहेत हा न संपणारा धडा चालू करतात. तिथे का आपला बुद्धिप्रामाण्यवाद उफाळून येत नाही? तिथे का उपहास आणि टिंगलीची भावना होते नाही (मला प्रचंड होते)?
प्रश्न ती विमाने होती का नाही हा नाही. प्रश्न जितक्या सिलेक्टिवली बोडसाला आणि प्राचीन भारतीय विमानशास्त्राला बडवले जात आहे आणि नको नको ते राजकीय, धर्माभिमानाचे अँगल जोडले जात आहेत त्याचा आहे. प्रश्न असा आहे कि भारतीय विज्ञान परिषदेत "विमाने होती" इतके म्हटल्यानेच शास्त्रीय दृष्टीकोन का उचंबळून यावा? यामागे कोणता न्यूनगंड तरी नाही. म्हणजे आजच भारतीयांना विमान बनवायची इतकी अक्कल नाही तर तेव्हा कशी असेल असा (अकलेचे फॉरवार्ड इवोल्यूशन डिफाय करणारा). हा दृष्टिकोन एरवी कुठे गेलेला असतो? युके सायन्स परिषदेत २०१४ मधे "टाईम ट्रॅवल मॉडर्न मॅनने अलरडी केली आहे" असे विधान केले गेले. तिथे सारे लोक सादर ऐकत होते. त्याचे डिटेल्स मागायला कोणी मागे का पडले नाही? ते गृहस्थ आजही सन्मानपूर्वक सर्नमधे काम करतात. He is not an object of ridicule in Europe. बोडस यांनी तर केवळ मागे होते असे विधान केले आहे, त्याला तुम्ही डिसअॅग्री करा, अगदी मूर्खातच काढायची काय गरज आहे?
------------------------------
गवि, व्यक्तिशः तुमचा अप्रोच सन्मानपूर्वक शंका असा आहे, सबब प्रतिसाद तुम्हाला असला तरी ...
युके सायन्स परिषदेत २०१४ मधे
युके सायन्स परिषदेत २०१४ मधे "टाईम ट्रॅवल मॉडर्न मॅनने अलरडी केली आहे" असे विधान केले गेले. तिथे सारे लोक सादर ऐकत होते. त्याचे डिटेल्स मागायला कोणी मागे का पडले नाही? ते गृहस्थ आजही सन्मानपूर्वक सर्नमधे काम करतात. He is not an object of ridicule in Europe. बोडस यांनी तर केवळ मागे होते असे विधान केले आहे, त्याला तुम्ही डिसअॅग्री करा, अगदी मूर्खातच काढायची काय गरज आहे?
टाईम ट्रॅव्हलच्या न्यूजमध्ये माणसाने अगोदरच टाईम ट्रॅव्हल केलीये याचा नेमका पुरावा द्या अगोदर. मग पुढचे बोलू.
मला आपणाशी चर्चा करण्यात रस
मला आपणाशी चर्चा करण्यात रस नाही. कारण मी मूर्खासारखं काहीही लिहितो हे तुम्हाला पक्कं माहित आहे. तेव्हा मी ते मान्य करून चालतो.
--------------
पण त्या निमित्ताने ते वाक्य सुधारतो - "modern man has experimented with time travel..." आता नक्की काय टाईम ट्रॅवल करून गेले, कधी, केव्हा, किती वेळ पुढे, इ इ ज्याला रस आहे त्याने शोधावे.
बर्डनचे प्रूफ वगैरे हे
बर्डनचे प्रूफ वगैरे हे कोर्टातल्या खटल्यांप्रमाणे झाले. आपला इथला उद्देश तो नसावा असं वाटतं.
मी आधीही म्हटलं आहे. तुमचा मुद्दा फक्त सन्मानपूर्वक ऐकून घेण्याचा असेल तर तो योग्य आहे.
पण एखाद्या विशिष्ट पुराणकालीन अथवा सध्या अतर्क्य वाटणार्या थिअरीविषयी तुमचा अप्रोच हा त्यातले किंवा त्याविरुद्ध काही विशिष्ट "सिद्ध करण्याचा" नसून केवळ शक्यतांच्या कक्षा विस्तारुन सर्वकाही त्या छत्रीत आणणे, अर्थात संशयाला जागा असल्याचं दाखवून किंवा सध्याच्या थियरीतली अपूर्णता दाखवून मग त्या कारणाने काहीही तिसरेसुद्धा मान्य केले पाहिजे किंवा शक्यता स्वीकारलीच पाहिजे अश्या अंगाने जाणारा आहे. अर्थातच हा जास्त तांत्रिक मुद्दा आहे. त्यात विशिष्टता नाही.
उत्क्रांती किंवा टेस्ला किंवा न्यूटन यांचे काही दोष दाखवून मग त्याच्या बदल्यात भविष्यकथन, होमिओपथी, भुतेखेते असे काहीतरी वेगळेच मान्य करावे हे (फक्त उदाहरणादाखल, तुम्ही असं म्हटलेलं नाही, पण याच चालीवर म्हणता आहात) ..काही सुसंगत रीझनिंग नाही. "लॉजिकल रीझनिंग" इज समथिंग अबोव्ह डार्विन, बोडस, न्यूटन ऑर सुब्बाराय राव.
http://www.dailymail.co.uk/sc
http://www.dailymail.co.uk/sciencetech/article-2420239/Professor-Brian-…
Time travel IS possible - but only if you want to go to the future and not come back, says Professor Brian Cox
Professor Cox made the claims at the British Science Festival
He explained time travel has already taken place, but on a very small scale
The closer someone travels to the speed of light, the more time slows
If time slows to a significant amount it could transport that person 'thousands of years into the future'
http://gadgets.ndtv.com/others/news/time-travel-possible-but-only-to-th…
According to a report by The Telegraph, Professor Brian Cox, a particle physicist from the University of Manchester, who spoke at the British Science Festival, confirmed that a time machine could be built.
He even claimed that time travel has already been done, on a small scale.
हे बोडसांपेक्षा फार स्पेसिफिक आहे. पण या माणसाची कोनी कुचेष्टा केली नाही.
बोन ऑफ कंटेंशन तेच नाही. टाईम
बोन ऑफ कंटेंशन तेच नाही. टाईम ट्रॅवल क्ष करो नैतर य, ( क्ष आणि य हे कायबी असू शकतं) हाऊ डज इट मॅटर. प्रकाशाच्या वेगाच्या किती फ्रॅक्शनने काय किती वेळ गेले आणि म्हणून ते काळात किती काळ पुढे गेले, हा प्रयोग कधी कुठे झाला, कोणी केला, इ इ म्हणून या बाबामहाराजांचा बोडस कोणीही केलेला नाही.
का? कारण ते युकेचे!!! मग हुशार असणारच. त्यांनी म्हटलेले ते सत्य असणारच. मूर्ख बाबामहाराज, शास्त्रीय दृष्टीकोन उफाळून आणणारे असे, भारतातच असतात. पश्चिमेकडे पाहताना आदरानेच पाहायचे असते.
अरे विसर ना तो स्वतः आला का
अरे विसर ना तो स्वतः आला का अजून काय ते? तेच का घेऊन बसला आहेस? अरुणजोशी म्हटलं कि क्षमा नाही अशी निती आहे का तुझी, मग तो टायपो का असेना?
-------------
साहेब, जो काही प्रयोग झाला असं तो म्हणतोय, त्याबद्दल तुमचं काहीच म्हणणं नाही? शास्त्रज्ञांनी टाईम ट्रॅवल करून दाखवणे ही एक प्रचंड मोठी उपलब्धी आहे. अर्थातच सगळं "शास्त्रीय पद्धतीने" झालं तर.
अरे विसर ना तो स्वतः आला का
अरे विसर ना तो स्वतः आला का अजून काय ते? तेच का घेऊन बसला आहेस? अरुणजोशी म्हटलं कि क्षमा नाही अशी निती आहे का तुझी, मग तो टायपो का असेना?
नवीन सायन्स म्हटले की क्षमा नाही ही तुमची नीती आहे तशातलाच प्रकार समजा.
तदुपरि- त्याचा दावा जो आहे तो पडताळून पाहिला आहे का कुणी? पडताळला असेल आणि चूक असेल तर शिव्या घालूच. या बोडसाचं सगळंच फेटाळल्या गेलंय तरीही तुम्ही त्याचीच आरती करत बसता.
मुळात सर्वच लोकांनी या
मुळात सर्वच लोकांनी या टाईममशीनवाल्या दावेकर्या पाश्चात्याला पाठिंबा दिलाय असं गृहीत धरुन प्र॑तिवाद चालू आहे. टाईम मशीनचा प्रवास स्वतः किंवा अन्य कोणी आगोदरच केला असल्याचा दावा करुन कोणी नॉन रीप्रोड्युसिबल किंवा तर्कदुष्ट एक्झिबिट्स पुरावे म्हणून दाखवली अथवा दाखवलीच नाहीत तर असे म्हणणारा मनुष्य ब्रिटिश असो की ऑस्ट्रेलियन अथवा कांगोवासी किंवा एस्किमो. त्याचे विधान बिनबुडाचे आहे आणि ते सायन्स काँग्रेसमधे टिकण्यासारखे किंबहुना उच्चारण्याइतकेही साधार नाही असेच मी तरी म्हणणार. हे विधान ज्या कोणी केलंय ते त्यावेळी माझ्या वाचनात न आल्याने आणि विषय न निघाल्याने मी त्याचा विरोध केला नसेलही, याचा अर्थ पुरातन भारतीय विमानांच्या सद्य वर्णनांना अमान्य करणे हे केवळ भारतीयांचे शास्त्र आहे म्हणून उडवून लावले पण पाश्चात्यांनी म्हटले असते तर ते उचलून धरले असते असा निष्कर्ष का काढायचा?
बहुतांश विज्ञानाचे फॉलोअर्स भारतीय असोत कि़ंवा पूर्व/पश्चिम अश्या कोणत्याही दिशांचे काळे गोरे कसेही असोत. ते अश्या विधानांना मान्यता देणार नाहीतच. त्यात भारतीय अभारतीय अँगल आणणं चूक वाटतं.
पडताळला असेल आणि चूक असेल तर
पडताळला असेल आणि चूक असेल तर शिव्या घालूच.
ज्या ज्ञानाच्या आधारे तुम्ही बोडसाचा प्रतिवाद करत आहात ते ज्ञान, चिकित्सा जरा तिकडे लावा ना.
या बोडसाचं सगळंच फेटाळल्या गेलंय तरीही तुम्ही त्याचीच आरती करत बसता.
मी बोडसाची आरती नै केली. फक्त न्यूनगंडातून भारतीय विधानांना जास्त हिन लेखू नये इतकेच म्हणतोय. विमाने होतीच वा नव्हतीच यापैकी माझे काही म्हणणे नाही. आजच्या ज्ञानानुसार दाव्यांत तथ्य नाही हे ही मला मान्य आहे. पण आजचे पुरावे आणि ज्ञान यांना मर्यादा असू शकते असेही मला वाटते. बोडसांचा काँफिडन्स थोडा जास्त आहे तेव्हा तुम्ही रिस्पेक्टफुली डिसअॅग्री करा. पण "रिस्पेक्टफुली" असं करायचं नसेल तर हा बोडसांना मूर्ख ठरवतानाचा उत्साह वैज्ञानिक वर्तुळांत जगभरात महान महान शास्त्रज्ञांकडून महान महान विधाने येतात तेव्हा कोठे गेलेला असतो हा मला पडलेला प्रश्न आहे.
स्टीफन हॉकिंगचे घ्या. हिग्ज बॉसोनच्या प्रयोगात एक व्हॅक्यूमची लाट निघून सारे ज्ञात जगत त्यात नष्ट होईल असे ते म्हणाले. त्यांची री ओढणारे तो बबल अलरडी निर्माण झाला आहे असे म्हणू शकतो आणि विश्व नष्ट होणार हे अटळ आहे पण इतक्यात घरदार विकू नका असंही म्हणत आहेत.
http://www.livescience.com/47737-stephen-hawking-higgs-boson-universe-d…
Stephen Hawking bet Gordon Kane $100 that physicists would not discover the Higgs boson. After losing that bet when physicists detected the particle in 2012, Hawking lamented the discovery, saying it made physics less interesting. Now, in the preface to a new collection of essays and lectures called "Starmus," the famous theoretical physicist is warning that the particle could one day be responsible for the destruction of the known universe.
Hawking is not the only scientist who thinks so. The theory of a Higgs boson doomsday, where a quantum fluctuation creates a vacuum "bubble" that expands through space and wipes out the universe, has existed for a while. However, scientists don't think it could happen anytime soon.
"Most likely it will take 10 to the 100 years [a 1 followed by 100 zeroes] for this to happen, so probably you shouldn't sell your house and you should continue to pay your taxes," Joseph Lykken, a theoretical physicist at the Fermi National Accelerator Laboratory in Batavia, Illinois, said during his lecture at the SETI Institute on Sept. 2. "On the other hand it may already happened, and the bubble might be on its way here now. And you won't know because it's going at the speed of light so there's not going to be any warning." [Doomsday: 9 Real Ways Earth Could End]
...
...
इ इ
---------------
हिग्ज बॉसॉनवर स्टिफन हॉकिंग काय म्हणतो हे देखिल तुम्ही फॉलो करत नाही आणि माझ्याशी निकराचा प्रतिवाद करता.
टिंगल करायची मस्ती यावेळेस कुठे गेली होती? या बबलवर अधिकृत विज्ञानाची काय पोझिशन आहे याबद्दल कल्पना?
यापुढे जाऊन सर्नच्या प्रयोगात सापडले ते हिग्ज बॉसॉनच होते का याबद्दलच्या बातम्या वाचल्यात?
हिग्ज बोसॉन सापडला नाही असे
हिग्ज बोसॉन सापडला नाही असे हॉकिंग म्हणतो का? तसे असेल तर ते विधान चूकच आहे. पण ते तितके सनसनीखेज़ नाहीये. त्यामुळे हॉकिंगला फार तर बॅड लक इतकेच म्हणू. त्याचा बोडस होणार नाही. सगळे शास्त्रज्ञ गंडू शकतात, बरेच गंडतातही. ब्लाँडलोसारखे काही वायझेडही असतात. त्यांचा बोडस केलाच पाहिजे आणि तसा तो केलाही आहे. पण सर्वज्ञ असूनही तुम्हांला ते दिसत नाही. डार्क मॅटरप्रमाणेच तुमचेही डार्क नॉलेज आहे की काय?
आम्ही जगातले एकमेव शहाणचोट नसून कैक बाबतींत अडाणचोट आहोत हे मान्यच आहे. पण तुम्ही सगळे काही वाचले आहे याचा पुरावा द्या की. मग तुमचे प्रत्येक विधान मान्य करतो. कधीपासून फेअरनेसच्या बाता मारणार्यांनी साधे पुरावे देऊ नयेत हे खास ऐसीस्टाईल रोचक आणि तितकंच उद्बोधक वगैरे वाटतं.
हिग्ज बोसॉन सापडला नाही असे
हिग्ज बोसॉन सापडला नाही असे हॉकिंग म्हणतो का?
मी काय लिहिलं आहे त्या प्रतलावर या ना. उगाच काहीही (अगदी एक अक्षरही) न वाचता, न समजून घेता असली ओपनिंग करून राहिले.
--------
आणि माझ्या ज्ञानाचा विषय कुठे आला मधे? मूळात माझा विषयच कुठे आला मधे? चढवून आले का?
फाईनर डीटेल्स हा प्रकार
फाईनर डीटेल्स हा प्रकार तुम्हांला कळत नाही हे उघडच आहे. तरीही जरा प्रयत्न करतो.
जोवर प्रयोगातून हिग्स बोसॉन आहे असे कळाले नव्हते तेव्हा हॉकिंगचे मत होते की तो कण असू शकत नाही. एकदाचा तो मिळाला तेव्हा तो गप्पच बसला, प्रयोगाला शिव्या घातल्या नाहीत.
बाकी, तुमच्या ज्ञानाचा विषय तर येणारच कारण त्याद अफाट ज्ञानाच्या आधारे तुम्ही सर्व ज्ञानशाखांमध्ये त्रुटी शोधता.
"एव्होल्यूशन इ. बकवास आहे. का? मी सगळं वाचलंय!" हे उद्गार आपलेच होते ना? तेव्हा माझ्या साध्या प्रश्नाचे उत्तर द्या महोदय. तुम्ही सगळं वाचलंय हे अगोदर सिद्ध करा की. उगाच विषय कशाला बदलता? की फेकूगिरी उघड होईल याची भीती आहे?
जोवर प्रयोगातून हिग्स बोसॉन
जोवर प्रयोगातून हिग्स बोसॉन आहे असे कळाले नव्हते तेव्हा हॉकिंगचे मत होते की तो कण असू शकत नाही. एकदाचा तो मिळाला तेव्हा तो गप्पच बसला, प्रयोगाला शिव्या घातल्या नाहीत.
साहेब, असं नाही असं मी कधी म्हणालो? हॉकिंगने अगोदर काय म्हटले नि नंतर काय मान्य केले याबद्दल मी बोललो नाही. अजूनही प्रतिसाद नीट वाचाल तर मेहेरबानी होईल. या प्रयोगामुळे काय होईल याबद्दलचे त्याचे काय मत आहे त्याबद्दल चर्चा आहे. त्यात किती तथ्य आहे त्यावर. प्रकाशाच्या गतीने ब्रह्मांड नष्ट होत सुटेल आणि आपल्याला बिना वार्निंगचे नष्ट व्हावे लागेल, इ इ .
आणि साहेब, हे त्यांचे सद्य मत आहे. अजूनही आहे.
हात जोडून विनंती करतो, प्रतिसादांची चेन नीट वाचा नि मग बोला.
बाकी, तुमच्या ज्ञानाचा विषय तर येणारच कारण त्याद अफाट ज्ञानाच्या आधारे तुम्ही सर्व ज्ञानशाखांमध्ये त्रुटी शोधता.
हे मात्र आहे. विज्ञानाला मी बाबामहाराज बनू देत नाही.
>>प्रश्न जितक्या सिलेक्टिवली
>>प्रश्न जितक्या सिलेक्टिवली बोडसाला आणि प्राचीन भारतीय विमानशास्त्राला बडवले जात आहे आणि नको नको ते राजकीय, धर्माभिमानाचे अँगल जोडले जात आहेत त्याचा आहे. प्रश्न असा आहे कि भारतीय विज्ञान परिषदेत "विमाने होती" इतके म्हटल्यानेच शास्त्रीय दृष्टीकोन का उचंबळून यावा?
विमाने होती या ऐवजी सर्जरी होती असे म्हटले तर असे होत नाही ते का? असा विचार करा. त्यातही गणपती हे प्लॅस्टिक सर्जरीचे उदाहरण म्हणून सांगितले तर टिंगल होते. इथेच कोठेतरी (बाह्य) नाक, कान यांची दुरुस्ती/पुनर्स्थापन केले जात होते असे बॅटमन यांनीसुद्धा दाखवले आहे. कारण त्याचा (रिझनेबल) एव्हिडन्स आहे.
विमाने होती या क्लेमला पूरक म्हणून इतर स्वयंचलित वाहनांचे उल्लेख किंवा तत्सम इतर यंत्रांचे उल्लेख असायला हवे इत्यादी सामान्य अपेक्षा आहेत.
विमानदाव्यांबरोबर जी काही आरेखने दाखवली जातात ती उघडच आधुनिक आहेत. त्या रेखाटनांमधील विमाने उडू शकणार नाहीत असे सामान्यपणे वाटते. तेव्हा उडणारी विमाने "हजारो" वर्षांपूर्वी अस्तित्वात होती असे म्हणायला खूप भक्कम पुरावे हवेत.
अवांतर: कुणी असे दावे करून करमणूक करत असेल तर काही हरकत असायचे कारण नाही. पण असे दावे करणारे लोक कोण आहेत हे लक्षात घेतले तर त्याला विरोध करणे भाग पडते. हे असे लोक आहेत जे "आमच्या पूर्वजांना सर्व ज्ञान होते" या दाव्याचे "म्हणजे अस्पृश्यता ही अशाच उच्च ज्ञानाच्या आधारेच पूर्वजांनी लागू केली असणार" असे एक्स्टेन्शन* करायची इच्छा धरतात. म्हणून त्यांना विरोध करणे भाग आहे.
*ही बाब मी कैच्याकै ताणतो आहे असे म्हणून सोडून देता येणार नाही. अस्पृश्यतेमागे "आपल्याला आज न कळणारे काहीतरी असणार" असे म्हणणारे लोक प्रत्यक्ष भेटले आहेत.
विमानदाव्यांबरोबर जी काही
विमानदाव्यांबरोबर जी काही आरेखने दाखवली जातात ती उघडच आधुनिक आहेत.
नक्की काय आहे? आधुनिक आहेत का नाहीत? नाईल तर म्हणतो आधुनिक अंडरस्टँडिंग प्रमाणे या आकृतीचा आणि उडण्याचा संबंध नाही. उलट हे डिझाईन विपरित आहे. ते रेखाटने आधुनिक असती तर नाईल म्हणतो तशी गंडलेली नसती.
'तेव्हाचे विमान असे असावे'
'तेव्हाचे विमान असे असावे' अशी कल्पना करून आधुनिक काळात काढलेली चित्रे आहेत.
तिच चित्रे प्राचीन आहेत असा क्लेम कोणी केलाय? ती प्राचीन विमानांची चित्रे आहेत असा क्लेम आहे. यात गैर काय आहे? त्रोटक माहिती असेल बाकीची माहिती कल्पना करून भरावी लागते. आणि बाकीच्या कल्पना नक्की किती संदर्भातून आलेल्या आहेत याची लंबीचौडी लिस्ट मी वर दिलेली आहे. अजूनही १९२२ साली त्याच्याकडे कोणकोणते ग्रंथ होते कोणास माहित.
-------------------
By the way I am quite amazed. Man has already done time travel and you are unaware. You have no questions. अस्पृश्यतेत काहीतरी दम आहे म्हणण्यात जर समाजाला धोका आहे तर "आम्ही टाईमट्रॅवल केली आहे (बॅट्या, असा प्रयोग मानवाने केला आहे असं म्हणायचं आहे मला. उगाच नवे बोन ऑफ कंटेंशन नको)" असल्या बढाया मारत महागडे प्रयोग करत सरकारच्या तिजोरीला लुटत राहण्यात धोका असू शकतो असा विचारही स्पर्शत नाही मनाला?
+१
आधुनिक पद्धतीने काढलेली रेखाटने आहेत. आधुनिक विमानाची नाहीत आणि उडणार्या विमानाची नाहीत.
+१. ज्याला 'यंत्रांची' माहिती थोडीफार आहे पण विमानाची फारशी माहिती नाही अशा माणसाने काढलेली रेखाटने असावीत असे पाहता वाटते. किंवा मुद्दाम काहीतरी अगम्य असे काढून त्याचे खंडन करणे सहज होऊ नये या उद्देशाने काढलेली.
अस्पृश्यतेमागे "आपल्याला आज न
अस्पृश्यतेमागे "आपल्याला आज न कळणारे काहीतरी असणार" असे म्हणणारे लोक प्रत्यक्ष भेटले आहेत.
ज्यांचे विधान आपल्याला पटत नाही त्या सार्यांना एकाच क्लबात घुसडणे चूक आहे. आपल्यापेक्षा भिन्न असलेली मते चूक वा बरोबर दोन्ही असू शकतात. तेव्हा अस्पृश्यतेला कारण आहे म्हणणारे लोक गाढव असले म्हणून पारंपारिक सार्याच गोष्टींना सर्मथिणारे गाढव असतात हे विचित्र लॉजिक आहे. वी शुड गो केस बाय केस.
-------------------
"आज न कळणारे" ही फ्रेज तितकीही अर्थहीन नसावी.
१. खरोखरच आज न कळणारे काही असू शकते. आज सगळ्या गोष्टीतले सगळे काही कळाले आहे आणि हे ज्ञान बाकी सगळ्यांना मूर्खात काढण्यासाठी पुरेसे आहे ही अतिरेकी विचारसरणी आहे.
२. काहीतरी असणार म्हणणारांनी ही फ्रेज इनहेरिट केलेली असू शकते. अगदी आपल्यासारखाच आपल्यासमोरचा अस्पृश्य माणूस अस्पृश्य कसा हा प्रश्न इतिहासात प्रत्येक काळात कितीतरी सर्वणांना पडला असणार. मग हे तत्त्वज्ञान पास ऑन झालेले असेल.
३. वेगवेगळ्या मानवी वंशांचे वेगवेगळ्या दिशांनी भ्रमण जेव्हा पृथ्वीवर झाले, त्याच्यात अभि:सरण झाले तेव्हा नक्की काय काय झाले याचा मॅप आजही क्लिअर नाही. संसर्गजन्य रोग प्रतिकार क्षमता, जेनेटिक कंपॅटिबिलिटी, साध्या साध्या सांस्कृतिक वा जीवनविषयक बाबती, किंवा आपल्यापेक्षा प्रबल लोकांपासून सेफ राहायची युक्ति, याबाबतीत काही मत होऊन लोकांनी भिन्न राहायचे ठरवले असेल. हू नोज?
----------------------
बाय द वे, हे अवांतर आहे पण मला "दरवेळी" अस्पृश्यतेत अन्याय पाहिलेले आवडत नाही. ब्राह्मण लोक तरी बाहेर बसलेल्या स्वतःच्या बायकोला शिवत नाहीत. पूजा करू देत नाही. ववळ्यात असलेल्या सख्ख्या भावाला, लेकराला शिऊ देत नाहीत. यात मला अन्यायापेक्षा गाढवपणा जास्त दिसतो.
लुप्त होऊ शकते ती विद्या कशी
लुप्त होऊ शकते ती विद्या कशी : राजीव साने
लेख चांगला आहे. शीर्षक
लेख चांगला आहे. शीर्षक चुकीचे आहे हेही शंभर टक्के मान्य.
शिवाय खालील विधानही जरा समजुतीत फसलेले वाटले:
हेलिकॉप्टर चक्क वरून खाली झोत मारून स्वत:ला तोलून धरते.
हेलिकॉप्टरही पंख हवेतून वेगाने पुढे जाताना त्यावर तयार होणार्या लिफ्टनेच (म्हणजेच विमानाच्याच तत्वाने) उडते. फक्त यात पंख स्थिर नसून फिरते असतात आणि विमानाला जसे खुद्द पळत पळत जाऊन स्थिर पंखाला हवेतून जोरात पुढे न्यावे लागते तसे न करता हेलिकॉप्टरचे शरीर जागीच राहून फक्त पंख गरगरा फिरवते. अर्थात इंधन जास्त लागते हे खरेच. पण वरुन खाली झोत मारुन स्वतःला तोलून धरणे हे रॉकेट टेक्नॉलॉजीला साजेसे वर्णन आहे रोटरब्लेड तत्वाला नव्हे.
अर्थात लेखाच्या मूळ विषयाशी याचा फारसा संबंध नसल्याने ते जाऊदे.
लोका सांगे
@ साने द ग्रेट -
सानेसाहेब, निसर्ग सम्यक नाही ना? तुम्हीच म्हणालात कि. मग काय बी लुप्त होऊ शकतं. हॉकिंग साहेब म्हणतात कि ब्रह्म्मांड लुप्त होणार आहे. समजा त्यांचे म्हणणे खरे निघाले ( निघायला पाहिजे नै का, ते कै प्राचीन भारतीय संस्कृतीचा अभिमान असलेले इ इ प्रकारातले व्यक्ति नाहीत, परंतु ज्यांचे तुम्ही गोडवे गाता असे "पडताळ-यंत्री" शास्त्रज्ञ आहेत.) तर आपल्या सगळ्या विद्या (या नावाच्या पोरी धरून) लुप्त नै का होणार? निसर्गानं कै गुत्तं घेतलंय का सगळं सांभाळत बसायचं,सगळं जीवंत ठेवायचं आणि सगळे पुरावे जीवंत ठेवायचं???
या खेपेला या जगात काहीच सम्यक नाही हे विसरलात वाटतं. निसर्गात रँडमली काहीतरी महान घडावं (जसे प्री-बिग बँग ते बिग बँग ते बुद्धिमान मनुष्यांचे प्रगत सिविलायझेशन हा प्रवास व्हावा) याची शक्यता खूप खूप खूप कमी आहे पण तरीही तसं आहे. याउलट काहीतरी होऊन हे सगळं नष्ट व्हावं याच्या अनंत संभावना आहेत. मग लुप्त होणे हेच जास्त नैसर्गिक आहे, ते काहीही असो. याची गणितं कधी वाचली आहेत का? असतीत तर असली फालतूपण पाजळले नसते.
-----------------
बाकी सानेसाहेब, कशाचा अभिमान असावा आणि कशाचा नाही याचे तुमचे फंडे गंडलेले आहे. 'जे जे उदात्त महन मंगल मधुर ते ते' चा अभिमान, मग आपला त्याचा संबंध असो वा नसो हे फक्त देवाबद्दल शक्य आहे. इतरत्र ममत्व, अभिमान, शरम वाटायला नाते लागते. सामान्य लोकांना तरी लागते. एखादी गोष्ट भारतीय असली कि मला साहजिक जास्त आनंद होतो. भारताच्या कृतींचं मी स्वामीत्व घेतो. पाकिस्तानच्या अतिरेक्यांनी लेकरे मारली तेव्हा मला माझी शरम नै वाटली. काय संबंध?
त्या विमानांमधून एका
त्या विमानांमधून एका ग्रहावरून दुसर्या ग्रहावर जाता येत असे असे ऐकले. तेव्हा मधल्या स्पेसमध्ये ऑक्सिजनच्या पुरवठ्याची काय सोय ? वगैरे प्रश्न मनात आले पण अजो मेथडने त्याची खालील उत्तरे मिळाली.
१. वेदांच्या काळी ग्रहांमधल्या स्पेसमध्ये वातावरण असूही शकेल. ते तसे नव्हते हे सिद्ध झालेले नाही.
२. वेदकालीन व्यक्तींना जिवंत राहण्यासाठी ऑक्सिजन लागत असे हेच मुळात सिद्ध झालेले नाही.
३. स्पेस म्हणजे काय हेच अजून सिद्ध झालेले नाही.
किंवा एकही विमान कधीही कोसळले
किंवा एकही विमान कधीही कोसळले नाही असाही.
(कारण ब्लॅकबॉक्स सापडला असता तर आजुबाजूला अवशेषही सापडले असते. प्रत्यक्षात सर्व विमाने सेफ उड्डाणे करुन आपापल्या भूमिगत अथवा अन्य ग्रहावरच्या सेंट्रल हँगरमधे परत आल्यानंतर जागतिक विमाननाशक* प्रलय झाला असेल.)
* हे होणे अशक्य नाही. दरवर्षी कोंकणात जातो तेव्हा आमच्या आवारातल्या कलमांचेच सर्वच्यासर्व आंबे तेवढे पाने ओरबाडल्याच्या खुणांसहित गायब असतात. आजुबाजूला सर्वांची झाडे आम्रफळांनी भरगच्च एकदम. इकडेतिकडे चौकशी केली तर वादळ येऊन गेल्याने आमचे आंबे नष्ट झाल्याचे कळते. म्हणजे अशी सिलेक्टिव्ह वादळे आजही अस्तित्वात आहेत.
हौस आणि सावधानता
१. वेदांच्या काळी ग्रहांमधल्या स्पेसमध्ये वातावरण असूही शकेल. ते तसे नव्हते हे सिद्ध झालेले नाही.
अगदी. स्पेसमधे अगदी अलिकडे पर्यंत इथर होतं. प्रकाशाला, इ प्रवास करायला माध्यम लागत नाही हे पाहून वैज्ञानिकांनी सगळं इथर नष्ट केलं. ;) आता हेच शास्त्रज्ञ पुन्हा म्हणत आहेत कि वेव प्रोपागेट व्हायला काहीतरी लागतं. तेव्हा स्पेसमधे शून्यातून विरुद्ध कण निर्माण होतात नि काम झाले कि लोप पावतात.
https://medium.com/starts-with-a-bang/everything-you-ever-wanted-to-kno…
मी नक्की म्हणतोय ते वरच्या लिंकमधे खूप छान विषद केलं आहे. एकूणातच हि लिंक सामान्य माणसालाही प्रचंड वाचनीय आहे. तिथलं हे वाक्य कोट करतो -
So we know, not just theoretically but experimentally, that the vacuum is not empty. It’s full with virtual particles that constantly bubble in and out of existence.
काय आहे, काय नाही आणि कशातून काय टॅप करता येते केवळ आजचाच माणूस जाणून आहे हा शुद्ध बौद्धिक माज आहे. माज शब्द यासाठी कि आपल्या इतिहासाचा अस्थानी अभिमान असणे (तुमच्यामते बोडसत्व असणे) हे जितके नैसर्गिक आहे तितकेच केवळ माझ्याच पद्धतीने मलाच असलेले ज्ञान परिपूर्ण आहे अशी विचारसरणी, वर्तमानकाळाचा अस्थानी अभिमान, नैसर्गिक आहे.
स्पेस, व्हॅक्यूम, नसणे, इ इ बद्दल लेखात काय काय विधाने आहेत हे पहा.
--------------------------------------
२. वेदकालीन व्यक्तींना जिवंत राहण्यासाठी ऑक्सिजन लागत असे हेच मुळात सिद्ध झालेले नाही.
संभव आहे.
-----------------------------------------------
३. स्पेस म्हणजे काय हेच अजून सिद्ध झालेले नाही.
नीट दिलेली लिंक अजून एकदा शेवटपर्यंत वाचा. शेवटी लेखक म्हणतो कि जगातलं द्रव्य काढा, मग क्वांटम स्पेस काढा, मग स्पेसटाईम काढा, साला तरीही काहीतरी उरतंच. ते काय उरतं ही एक अशी संकल्पना आहे कि मी "गणीतीय व्याख्येनुसार अस्तित्व काय आहे?" असा प्रश्न घेऊन मी तत्त्ववेत्त्याकडे जाईन. स्पेस म्हणजे काय ते विज्ञानाला खरोखरच माहित नाही. इतकेच काय काळ, द्रव्य, उर्जा, आणि जीव यांचं मूलभूत स्वरुप काय आहे हे विज्ञानाला काहीही उमगलं नाही.
बोडसाची टिंगल करायची हौस ठिक आहे, पण विज्ञानाबद्दलची फुशारकी मारताना जरा सावधानता बाळगा. खरोखरच स्पेस म्हणजे काय हेच अजून सिद्ध झालेले नाही.
उड्णारा सूपरमॅन सूद्धा भारतीय
https://www.youtube.com/watch?v=4GC_Q2YKNR0