Skip to main content

Consequences or randomness?

प्रस्तुत विषय श्रद्धा/विद्यान/अधात्म्य/मानासश्स्त्र यापैकी कोणत्या विषयाच्या कक्षेत येतो हे माहिती नाही.

माणूस जगात घडणार्या घटनांमध्ये कायम संगती शोधण्याचा प्रयत्न करतो. काहीवेळेस तो यशस्वी ठरतो काहीवेळेस कशाचा कशाला मेळ लागत नाही. नक्की अस का होत? मी ‘मी’ का आहे तू ‘तू’ का आहेस? अश्या अतिशय गहन प्रश्नाची उकल करता करता माणूस थकून जातो. माणसाच्या मेंदूची उत्तर शोधण्याची क्षमता अफाट आहे असे मानले तरी देखील माणूस जेव्हा स्वताचा मेंदू अश्या गोष्टींची उकल करण्यासाठी वापरु लागतो तेव्हा तो गोंधळून जातो.
जगात घटना दोन प्रकारे होऊ शकतात एक consequences किंवा दुसरी गोष्ट म्हणजे randomness.
व्यक्तीमध्ये दोन प्रकारच्या reality असतात. एक म्हणजे त्याच internal sphere त्याच/तीच स्वताच जग किंवा त्याला/तिला जग कस हव याचा एक ढाचा आणि खरखुर अस्तित्वात असणार जग.
मी सकाळी उठलो माझ्या जगात मी काही गोष्टी करायच्या ठरवल्या आहेत. सकाळी सहा वाजता उठून चहा पिऊन पोहायला जाणे , पोहून आलो कि नाश्ता करणे, कॉलेजला जाणे, जेवण , संध्याकाळी पुन्हा चहा पिणे , मित्रांसोबत काही वेळ टाईमपास करणे , थोडा वेळ टेबल टेनिस खेळणे, रात्री पुन्हा जेवण आणि झोप. हा असा एक ढाचा माझ्या हव्या असलेल्या आयडियल जगात तयार असतो.
हे झाल वरवरच माझ जग.
Subconsciously मला काहीतरी वेगळ करायचं असत. मला कशाची तरी urge असते. हि urge कधी superficial विचारामध्ये डोके वर काढत नाही. मला सैगलच कधीतरी रेडीओवर ऐकलेलं गाण पुन्हा ऐकायचं असत. Subconscious मध्ये मी ते गाण कुठे मिळेल याचा विचार करत असतो. कॉलेज संपल्यानंतर माझा एक मित्र येतो नंतरचे सगळे planning cancel करून आम्ही एका बारला बसायचा ठरवतो आणि बारमध्ये सैगलच तेच गाण सुरु असत. एकदम माझ्या Subconscious मधून मला जोरात सिग्नल मिळतो कि अरे सकाळपासून हे सेम गाण माझ्या डोक्यात होत.
आता इथे outer world चा randomness आपल्याला आपल्या Subconscious ब्रेन मधल्या इच्छित गोष्टीपाशी नेहून पोचवतो?
हा consequence असतो कि निव्वळ randomness?
याचा असा विचार केला तर.Peak hour ला आपण विसाव्या मजल्यावरून एखाद्या चौकाकडे , रस्त्याकडे पाहिलं तर एकदम random traffic दिसेल पण at the end सगळ्या गाड्या आपापल्या इच्छित स्थळी पोचत असतात.

हे झाल ढोबळ उदाहरण. एखाद्या particular व्यक्तीबाबत प्रत्येकाला अनुभव येतो. आपल्यला ज्या व्यक्तीला भेटायची खूप इच्छा आहे ती व्यक्ती रस्त्यात गाठ पडणे किंवा अगदी उलट ज्या व्यक्तीला आपण नेहमी टाळतो तीच व्यक्ती आपल्या समोर येऊन उभी राहते.
एखाद गाण आपल्या मनात असत आणि समोरची व्यक्ती तेच गाण मोठ्याने गुणगुणते. एखाद्या व्यक्तीबरोबर उदाहरणार्थ रूममेट किंवा नवरा /बायको खूप काळ व्यतीत केल्यानंतर एकमेकांच्या मेंदूत काय विचार चालले असावे याचा अंदाज लावता येतो. स्लोवाक जीजेक म्हणतो sex is not about body it is about mind . सेक्स करताना माणूस नेहमी fantasy करत असतो. जर सेक्स मधून fantasy बाजूला काढली तर एक reproduction साठीची प्रोसेस इतकच तीच महत्व उरेल.

आता सुरवातीच्या उदाहरणात मी कॉलेजमधून डायरेक्ट घरी गेलो असतो तर मला ते गाण ऐकायला मिळाल नसत. नक्की बारला जाण्याचा निर्णय घ्यायला काय कारणीभूत ठरल? माझा मित्र बर्याच दिवसांनी भेटणे आम्ही दोघे त्या बार मध्ये जाणे आणि तिथे तेच गाण सुरु असणे हे consequences आहेत कि randomness किंवा काहीही होतंय ज्याच्यावर आपला कंट्रोल नाही आहे आणि मनुष्य आपल्या कुवतीनुसार त्याचा मेळ लावायचा प्रयत्न करतोय?
मनुष्याच जे काही internal त्याच्या कल्पनेतले जग असेल ते outer world बरोबर संवाद करत का?नक्की काय होत असाव कि हे सगळ झुठ आहे आणि everything is random ?कारण जर हे सगळ consequences ने होत असेल तर त्याचा अर्थ विश्व मर्यादित आहे असा होतो का? कि हि सायाकलिक प्रोसेस आहे?
आपण जिथून सुरु करतो तिथेच येऊन थांबतो , म्हणजे आपल्या subconscious ब्रेन मध्ये एक विचार तयार होतो तो बाहेरच्या वास्तव जगासोबत संवाद साधतो आणि आपल्याला आपल्या नकळत/कळत त्या विचारातील इच्छित स्थळ/व्यक्ती/वस्तूपर्यंत पोचवतो?

गब्बर सिंग Tue, 25/03/2014 - 10:00

स्लोवाक जीजेक म्हणतो sex is not about body it is about mind. सेक्स करताना माणूस नेहमी fantasy करत असतो. जर सेक्स मधून fantasy बाजूला काढली तर एक reproduction साठीची प्रोसेस इतकच तीच महत्व उरेल.

एकदम सहमत. The key word is not "mind" .... the keyword is sex.

Because mind does not exist.

मुक्ता_आत्ता Tue, 25/03/2014 - 10:10

In reply to by गब्बर सिंग

माणूस सेक्स करताना त्या प्रक्रियेबद्दल, स्वतःबद्दल fantasies करतो हे पूर्णतः मान्य. पण त्या काढून टाकल्या कि ती फक्त पोरं काढण्याची प्रोसेस म्हणून उरत नाही. सेक्स मुळे मिळणारं मनोकायिक (psycho-somatic) सुख fantasies हे करा अथवा करू नका, मिळतच राहणार.

हो, मी हे मात्र म्हणू शकेन की सेक्स करण्याला फक्त reproduction पुरतं महत्त्व देणं आणि त्याच्या शृंगारिक, वैषयिक भागाकडे 'आम्ही त्या गावचे नाही' अशा थाटात दुर्लक्ष करणं हा सर्वच धर्माधारित संस्कृतींमध्ये व्यक्तीच्या होत आलेल्या जडणघडणीचा दुष्परिणाम आहे. reproduction चा उदोउदो करणारी ही sexual morality बेगडी तर आहेच पण घातकही आहे.

गब्बर सिंग Tue, 25/03/2014 - 11:09

In reply to by मुक्ता_आत्ता

हो, मी हे मात्र म्हणू शकेन की सेक्स करण्याला फक्त reproduction पुरतं महत्त्व देणं आणि त्याच्या शृंगारिक, वैषयिक भागाकडे 'आम्ही त्या गावचे नाही' अशा थाटात दुर्लक्ष करणं हा सर्वच धर्माधारित संस्कृतींमध्ये व्यक्तीच्या होत आलेल्या जडणघडणीचा दुष्परिणाम आहे. reproduction चा उदोउदो करणारी ही sexual morality बेगडी तर आहेच पण घातकही आहे

एकदम सहमत.

अधोरेखित भागाशी तर ५०००००% सहमत.

यापुढे जाऊन sexual morality should be abolished. Completely.

मुक्ता मन्दार फॅन क्लब चा सभासद व या क्लब चा उपाध्यक्ष होण्यास इच्छुक (गब्बर)

सुशेगाद Tue, 25/03/2014 - 11:38

In reply to by मुक्ता_आत्ता

एक शंका अशी आहे कि सेक्स करताना जो काही सायको सोमाटीक , वैषयिक आनंद मिळतो त्याच origin fantasies करण्यामध्ये असत का?
धर्माच्या नावाखाली मग त्याला 'इमोरल' ठरवण्याची पद्धत का सुरु झाली असावी?

बाकी माणूस नेहमी outer world मधून कुठेतरी escape करायचा प्रयत्न करत असतो. व्यसन किंवा सेक्स हे त्याच प्रातिनिधिक उदाहरण.
तर ते तस का होत असाव?

मुक्ता_आत्ता Tue, 25/03/2014 - 10:02

एक सरळ आणि थेट उत्तर म्हणजे परस्पेक्टीव्हीझम. जग आणि त्यातील सर्व प्रकारच्या घडामोडींचे जो कोणी निरीक्षण करेल त्या व्यक्ती अथवा समूहाच्या दृष्टीकोनाचा तो प्रश्न आहे. There is nothing out there - no inherent order in the cosmos'. कारणमुळात 'व्यवस्था, अव्यवस्था' ह्या सगळ्या संकल्पनाच मानवी विचारांची निर्मिती आहेत. परस्पेक्टीव्हीझम मधून विज्ञानही सुटत नाही.
बेसिकली सगळं काम अंदाज आणि (अभ्यासपूर्ण असले तरीही) अडाख्यांवर चाललेलं असतं. कोणतेही अंदाज आणि त्यातून लागलेले शोध किती उपयुक्त ठरतात किंवा संबंधित विषयात पूर्वी झालेल्या संशोधनाचा तर्कप्रवास कुठे नेतात यावर त्यांचं उपयुक्तता आणि सत्यता मूल्य ठरतं.
आपल्या संपूर्ण विचारप्रक्रियेचा पूर्वग्रहाधारित पाया डळमळीत करून टाकण्याची ताकद ह्या सिद्धांतात आहे. आणि दृष्टीकोनाचा प्रश्न असला तरी इतरांचे, विज्ञानाचे कोणते दृष्टीकोन स्वीकारायचे, कोणते नाही ह्याचं स्वातंत्र्य आपल्याला आहे. शिवाय ह्यामुळे मानवी विचार व मूल्यांची किंमत कमी होते किंवा नाही हे मानणं देखील ज्याचा-त्याचा प्रश्न आहे!

अजो१२३ Tue, 25/03/2014 - 17:43

In reply to by मुक्ता_आत्ता

There is nothing out there - no inherent order in the cosmos'. कारणमुळात 'व्यवस्था, अव्यवस्था' ह्या सगळ्या संकल्पनाच मानवी विचारांची निर्मिती आहेत. परस्पेक्टीव्हीझम मधून विज्ञानही सुटत नाही.

१. ' (काही) मनुष्यांच्या निरीक्षणानुसार'(१), 'हायड्रोजनचे दोन मोल नि ऑक्सिजनचा एक मोल मिळून पाण्याचा दोन मोल बनतात(२)' हे विधान यातल्या भाग १ मधील, २ मधील वा दोहोंमधील चूकींमूळे in absolute perspective चूक असू शकते. परंतु विश्वाची नियमबद्धता प्रश्नांकित करण्यापूर्वी, मानवाला बाजूला ठेऊन, विचार करणे गरजेचे नाही काय? उत्क्रांती चालू होण्यापूर्वी ब्रह्मांडात कोणताच भौतिक नियम नव्हता का? तेव्हा तरी perspective असायला कोणीच नव्हते.
२. वरील विधानात, परिपेक्ष्य (perspective) आवश्यक आहे का? कोणाच्या निरीक्षणानुसार वा कोणाच्या परिपेक्ष्याने हे न सांगता विधान करताच येत नाही का?
३. जगात अंतर्नियमन (inherent order) नाही असे म्हणणे धाडसाचे ठरेल. पक्षी मनुष्याची संरचना, बुद्धीमत्ता, आकार, इंद्रिये, पर्यावरण, क्षमता या विश्वाचे मूलभूत नियम जाणून घेण्यास पर्याप्त नाहीत असेही असू शकते. आज आपण १०^-३५ किलो वजनाची पार्टीकल्स जाणू शकतो. परंतु काही उपपार्टीकल्स १०^-३५०००००० वजनाची असतील ज्यांचा आज आपल्याला गंधही नसेल. कोणत्या स्तरावरून नियम लादले जात आहेत हे आज आपल्याला ठाउक नाही म्हणजे नियम नाहीत असे कसे?
४. परिपेक्ष्यवादातून विज्ञान सुटले नाही म्हणणे अजूनच विचित्र आहे. समजा अजून उत्क्रांती झाली नाही नि पहायला कोणी नाही. एक इलेक्ट्रोन आहे (समजा तेच मूलभूत पार्टीकल आहे.) त्याने स्वतःभोवती १ फेरी १०^-२५ सेकंदांत घेतली. आता दुसरी फेरी किती सेंकदांत घ्यावी? हे सांगायला कोण आहे (हे पाहायला कोणी नाही हे जाऊ द्या.)? त्याने ती तितक्याच, in the absence of disturbance, घ्यावी हा नियम नसावा काय? पहिली फेरी क्ष, दुसरी य, तिसरी झ हे काहीही रँडमली होणे कसे शक्य आहे?
५. नियम आणि नियमाचा संदर्भ मानवाला नीट मांडता येत नाही. जरी संदर्भ मांडला तरी मोजमापे शतशः अचूक करता येत नाहीत. Let me resay, as humanity we cannot establish absolute contexy of a scientific experiment. Assuming we do, we cannot take 100% correct measurements of the parameters of the experiment.
६. विज्ञानाचे नियम मांडून, पुढे जेव्हा नैतिकतेचे नियम मांडतो तेव्हा संदर्भाची अस्पष्टता इतकी वाढलेली असते कि तिथेही 'नियम' हाच शब्द वापरावा हे चूक ठरावे.
७. विश्व हे प्रचंड काटेकोर नियमांनी चालते हे निर्विवाद असावे. आपण जे काही करतो ते सगळे या नियमांअंतर्गत करतो. जगात एकही नियमबाह्य गोष्ट होऊ शकत नाही. Nothing against laws of nature can happen in the universe. If it does, it would collapse the whole model of universe.
८.अभिव्यक्तिस्वातंत्र्य, फ्री वील या संकल्पनांना वैज्ञानिक आधार नसावा. आपण कशाचे का बनलो असेनात, त्यांचे गुणधर्म म्हणजे आपले वागणे. सनातनी माणसाला भाषने देऊन देऊन पुरोगामी बनवणे ही अंततः (note - predetermined) भौतिक क्रिया असावी.
९. आता शेवटी तुम्ही म्हणाल कि हा आपला (म्हणजे माझा) perspective आहे. तर मी म्हणेन कि हा परिपेक्ष्य एका अंतर्नियमनाचा परिपाक आहे. असे म्हणण्याने एक सायक्लिकल वादावादी चालू होईल.

मी Tue, 25/03/2014 - 12:45

यादृच्छिक विचार आणि अनुभवाच्या योगायोगाची शक्यता जेवढी दूर्मिळ तेवढे त्याबद्दल वाटणारे गुढ अधिक असावे, 'मी सकाळापासून ते हनिसिंगचे रागिनी एमएमएस मधले गाणे कोणते हा विचार करत होतो, बाहेर पडून टपरीवर सिगारेट मारताना तेच 'चार बॉटल व्होडका' गाणे ऐकायला मिळाले' हा अनुभव तेवढा गुढ वाटत नाही. घडलेली गोष्ट योगायोगापलिकडे काहितरी आहे हे सिद्ध करण्यासाठी गोष्ट घडण्याची टक्केवारी यादृच्छिक टक्केवारीपेक्षा अधिक हवी. थोडेसे वेगळे पण थोडे समांतर असे एक उदाहरण- मर्फीच्या प्रसिद्ध नियमांमधील एक नियम - "राँग नंबर कधीही बिझी लागत नाही", वर वर पहाता हे वाक्य खरे, चमत्कारीक आणि थोडेफार अद्भुत वाटते पण थोडा विचार केल्यावर जाणवते कि बिझी लागलेला नंबर राँग नाही हे गृहितक किंवा हि लक्षातच न आलेली शक्यता त्या नियमाला गुढ बनवते, रॉंग नबर लागण्याचा योगायोग तो बिझी न लागण्याच्या विधानाला गुढ बनवतो.

सुशेगाद Tue, 25/03/2014 - 14:01

In reply to by मी

गाण्याच उदाहरण एक प्रातिनिधिक सोपी गोष्ट म्हणून दिल होत.
एक गोष्ट अशी आहे मागे वळून भूतकाळात बघितलं तर आपण आपल्या कृतीची आणि विचारांची नक्कीच सुसंगती लावू शकतो इवन त्यातल्या काही गोष्टी accidentally घडलेल्या असतात.

अशाप्रकारच आणखीन एक उदाहरण म्हणजे आपली प्रिय व्यक्ती आपल्यला नेहमीप्रमाणे भेटते at that particular time त्या क्षणाला आपल्यला तिच्याबद्दल आकर्षण वाटायचं बंद होत. तिचा सहवास नकोसा होता. तिच्यातले सगळे दुर्गुण दिसायला लागतात. दिव्य काहीतरी रीविलेशन होत म्हणा. हा फोर्स फिजिकली जाणवतो.
लग्न झालेल्या लोकांबद्दल पण अस होत असाव पण एकदा झक मारून लग्न केलेल असत त्यामुळे peer pressure खाली कोणी याची वाच्यता करत नसाव.

मी Tue, 25/03/2014 - 14:36

In reply to by सुशेगाद

अशाप्रकारच आणखीन एक उदाहरण म्हणजे आपली प्रिय व्यक्ती आपल्यला नेहमीप्रमाणे भेटते at that particular time त्या क्षणाला आपल्यला तिच्याबद्दल आकर्षण वाटायचं बंद होत. तिचा सहवास नकोसा होता. तिच्यातले सगळे दुर्गुण दिसायला लागतात. दिव्य काहीतरी रीविलेशन होत म्हणा. हा फोर्स फिजिकली जाणवतो.

ह्यात अ‍ॅक्सिडेंटल/दिव्य काही नाहि, ह्यालाच अर्थशास्त्रात 'घटत्या उपयोगितेचा सिद्धांत' असे म्हणतात.

लग्न झालेल्या लोकांबद्दल पण अस होत असाव पण एकदा झक मारून लग्न केलेल असत त्यामुळे peer pressure खाली कोणी याची वाच्यता करत नसाव.

लोकांना त्यांच्या विजार, सदरा, गाडी, घर आणि शरीर ह्याबद्दल आकर्षण वाटणे कधी बंद होईल असे तुम्हाला वाटते?

अजो१२३ Tue, 25/03/2014 - 13:39

“When you really want something to happen, the whole world conspires to help you achieve it.” हा पॉलो कोहेलो (उच्चार बरोबर आहे का?) चा कोट प्रेरणादायी आहे परंतु वैज्ञानिक दृष्ट्या निरर्थक आहे.

माझाही असाच एक अनुभव आहे. बार, पब मधले वातावरण, विशेषकरून आवाजाची लेवल मला आवडत नाही. चांगल्या हॉटेलमधे फार तर फार जुन्या काळातली मंजुळ हिंदी गाणी लागलेली असतात. मद्रासी खानावळींत छानपैकी शास्त्रीय संगीत लागलेले असते. पण कधी कुठे मराठी भावगीते वाजवतात का? त्यात ही ज्ञानेश्वरांच्या ओव्या? 'पांडुरंग कांती' हे प्रसिद्ध आणि माझे अतिशय प्रिय गीत आहे. पण दिल्लीत ऐकायला मिळत नाही.
एकदा महाराष्ट्रात दोन दिवसांसाठी आलेलो. म्हटले जाता जाता या गाण्याची सी डी घेऊ. पण जमले नाही. वाशीच्या एका हॉटेलात थांबलो होतो. तिथल्या बार कम डायनिंग मधे जेवत होतो. (मला सोडून)सगळे दारू पित होते. झिंगलेले. आणि अचानक तिथल्या गायकाने (पुरुषाने) हे गाणे गायला चालू केले.
I am still not able to digest what happened.

आता पब मधे सैगल ठिक आहे पण बार मधे ज्ञानेश्वर?

मन Tue, 25/03/2014 - 13:42

In reply to by अजो१२३

==))
बादवे, बार मध्ये गाणारे पिउन मगच गातात का ? बारला नियमित भेट देनारे कुणी सांगा बुवा.
कारण एकदा चढली असेल तर नक्की काय गातोय हे कळण्याच्या स्थितीत ते नसावेत.

प्रकाश घाटपांडे Wed, 26/03/2014 - 13:52

In reply to by अजो१२३

बिअर पिता पिता भीमसेन जोशींचे अभंग ऐकायला मला आवडायचे. एकदम ब्रह्मानंदी लागते. आता कोठे प्याऽवी रऽऽम हेच भक्ताने पांडुरंगाला विचारले असावे. अध्यात्म ही काही फक्त सात्विकांची मक्तेदारी नाही.

............सा… Wed, 26/03/2014 - 00:46

छान आहे लेख. मर्यादित अनुभवविश्वातून आपण गोष्टींची सांगड लावायचा प्रयत्न करत राहतो. असं समजा - माझा कल कार्तिकस्वामी या देवतेकडे आहे तर तो कल कशामुळे निर्माण झाला हे आपल्या मर्यादीत विचारांतून आपण अवलोकीतो - कदाचित शौर्य (देव सेनापती) आणि सौंदर्य (मुरुगन म्हणजे अतिशय सुस्वरुप) याचे प्रतीक असलेली ही देवता मला भावते. पण मग साक्षात मदन अर्थात कामदेव या देवतेकडे का ओढा नाही? किंवा शौर्यच वाखाणणायचं तर दुर्गा या देवतेकडे का कल नाही? अशा प्रश्नांना उत्तर सापडत नाही.
मग आपण "कर्म्/पुनर्जन्म" अशा संकल्पनांच्या (पुन्हा कुबड्याच) घेतो. कदाचित पूर्वी (पूर्वजन्मी)मी या देवतेची भक्ती केलेली असेल. कोणी ज्योतीषी म्हणेल तुमच्या पूर्वफलानुरुप हीच तुमची "इष्ट्देवता". कोणी शास्त्रज्ञ म्हणेल अशी ऑबसेसीव्ह भक्ती म्हणजे मेंदूतील रासायनिक बदल.
..... बॉटमलाइन काय - पण समाधानकारक उत्तर सापडत नाही.
________________

Peak hour ला आपण विसाव्या मजल्यावरून एखाद्या चौकाकडे , रस्त्याकडे पाहिलं तर एकदम random traffic दिसेल पण at the end सगळ्या गाड्या आपापल्या इच्छित स्थळी पोचत असतात.

अतिशय समर्पक उदाहरण.
_________________
>> सेक्स करताना माणूस नेहमी fantasy करत असतो.>>
I defer on this hypothesis. There is so much concentration involved in the act many times person may not even fantasize. त्यामुळे मला वरील वाक्य पटले नाही. असो.

धनंजय Wed, 26/03/2014 - 00:45

In reply to by गब्बर सिंग

फ्रॉम माय पर्स्पेक्टिव्ह, आय एक्झिस्ट ; व्हॉट डु यू से फ्रॉम युवर पर्स्पेक्टिव्ह ?
:-)
(सहज शब्दाला शब्द जोडून उत्तर सुचले, म्हणून हसून दिले. मला पर्स्पेक्टिव्हिझमबाबत विकिपीडियाबाहेर काही माहीत नाही. परंतु हा शून्यवाद nihilism किंवा एकोऽस्मिवाद solipsism नाही असे वाटते. )

गब्बर सिंग Wed, 26/03/2014 - 01:44

१) जगात घटना दोन प्रकारे होऊ शकतात एक consequences किंवा दुसरी गोष्ट म्हणजे randomness. - हे वाक्य विचार करण्याजोगे आहे.

२) फ्रँक नाईट (knight) यांनी - That which is measurable is risk and that which is un-measurable is uncertainty - अशी संकल्पना मांडली होती.

या दोघांमधे संबंध जोडायचा यत्न करत आहे.

अजो१२३ Wed, 26/03/2014 - 12:09

In reply to by गब्बर सिंग

१) जगात घटना दोन प्रकारे होऊ शकतात एक consequences किंवा दुसरी गोष्ट म्हणजे randomness. - हे वाक्य विचार करण्याजोगे आहे.

२) फ्रँक नाईट (knight) यांनी - That which is measurable is risk and that which is un-measurable is uncertainty - अशी संकल्पना मांडली होती.

१. नाणे वर फेकल्यावर खाली पडणार हे 'नियमबद्धपरिणाम (निरिणाम)' (consequence) झाला आणि छापा कि काटा (कि तुमचा शोले) वर आला हे 'अभाकथनीयपरिणाम (अरिणाम)' (random) असे सहसा मानले जाते.
२. नाणे वर फेकण्याच्या प्रयोगात प्रचंड गृहितके आहेत म्हणून प्रयोगाच्या काही निरीक्षणांना निरिणाम आणि काहींना अरिणाम मानले जाते. प्रत्येक प्रयोगाची एक प्रतिमा असते. तिच्यात ही विशिष्ट गृहितके आणि मर्यादा अभिप्रेत असतात.
३. नाणे छापा कि काटा हे १००% अचूकतेने सांगता येते. या करिता फेकणाराच्या फेकणाराची बायोलॉजी, हाता/तांची अनाटॉमी, तिथे नाणे कसे ठेवले आहे, ज्या मिलि वा मायक्रो सेंकंदात नाण्याला पुश मिळाली ती कुठे कुठे किती किती मिळाली, नाण्याची जिऑमेट्री,दोन्ही बाजूचे लिखित वेगळे असल्याने पडणारा फरक, मिळालेला टॉर्क, वस्तुमान, मोमेंट ऑफ इनर्शिया, रोटेशनचा अक्ष, त्या स्थानचे गुरुत्वाकर्षण, नाण्याचे वेट असंतुलन, त्याचा उभ्या नि आडव्या प्रतलात अक्षाला हालविण्याचा परिणाम, किती उंचीवरून ऊडवले आहे, किती गतीने उडवले, नाण्याचे सेंटर ऑफ मास, नॅचरल अक्सिस ऑफ सिमिट्री,हवेचे कंपोझिशन, गती, गतीतील बदल, हातापासून जमिन किती खाली आहे,तिचे कंपोझिशन, कोलिजिनचे सारे पॅरामीतर्स, जमिनीची इलास्टिसीटी, फ्रिक्शन, सरफेस फिनिश, स्लोप, वाटेतील इतर अवरोध, इ इ. शास्त्रज्ञ अजून काही सांगतील. हे सगळं कळायची सोपी पद्धत उपलब्ध झाली तर (आणि हे काही अवघड नसावे) हा नाणे फेकण्याचा प्रयोग रँडम प्रयोगांतून डीक्लासिफाय करण्यात येईल.
३.१ नाणे तरीही अरिणामाने पडू लागले तर एकतर प्रयोगात काहीतरी चूक आहे किंवा एखादा पॅरामीटर आपल्याला माहितच नाही. सगळ्या चूका दुरुस्त होतील आणि प्रयोगातल्या कामाच्या सगळ्या गोष्टी पक्क्या माहित असतील कोणताही प्रयोग non-randon म्हणून डिक्लासिफाय करता यावा.
४. माणूस जे बोलतो , लिहितो ते त्याला अभिप्रेत असलेल्या आशयाचं फार अब्रिज्ड व्हर्जन असतं. "नाणे खाली पडते" असे तुम्हास सांगणारास तुम्ही लगेच "मी वर महाप्रचंड चुंबक लावले नि तुला लोखंडाचे नाणे वर फेकायला सांगीतले तर?" असे म्हणून खोटे पाडू शकता. इथे जी certainty आहे तिच्यावरच युद्ध चालू होईल. सबब 'अभिप्रेत संदर्भाचे' भान असू द्यावे.
५. विज्ञानाचे नियम असतात. ते नियम कुठे, केव्हा लागू होतात याला एक संदर्भ असतो. असे असेल तर असे होईल असा नियम असतो. उदा. माध्यम हवा असेल तर, आणि ......तर, ध्वनीची गती ३४० मी. प्रतिसेकंद असते. इथे संदर्भाला प्रचंड महत्त्व आहे. कारण संदर्भाच्या प्रत्येक नियमात पुन्हा एक विज्ञानाचा दुसरा नियम दडलेला असतो. बरेचदा बरेच नियम दडलेले असतात. जसे, कोणते माध्यम? त्याचा दाब काय? तापमान काय? संरचना काय? इ.

तर जगात घटना दोन प्रकारे होतात - एक -ज्या आपण आपल्या स्रोतांनी अचूकपणे भाकू शकतो नि दोन -अजून खूप तिकडम करावे लागेल.
Knight साहेबांना काय म्हणायचे ते कळले. व्यवस्थापनात तरी अनिश्चिततेमुळे रिस्क असते म्हणतात. ज्या क्षणासाठी/कालखंडासाठी आपण अनिश्चितता व रिस्क मोजणार आहोत तो निघून गेला असेल तर ते मेजरेबल आणि भविष्यात असेल तर अनमेजरेबल.

अजो१२३ Wed, 26/03/2014 - 12:48

In reply to by अजो१२३

At times, the process of finding out impact i of event e, scientific or otherwise, could be so complicated that it may entail mapping of entire universe in all ways to ensure 100% certainty.

ऐसि पाहुणा Wed, 26/03/2014 - 05:05

भवतालातून स्वतःची ओळख हे पटण्यासारखे आहे. स्वतःमुळे भवतालावर काही भौतिक परिणाम घडणे मात्र समजण्यासारखे नाही. हजारो वेळा मनातल्यासारखे काहीच होत नसल्याने एखादा तुम्ही सांगितल्याप्रमाणे योगायोग लक्षात राहतो. तुमची विचारशृंखला अर्ध्यापर्यंत समजली त्यापुढे काही पत्ता सापडला नाही.

मन Wed, 26/03/2014 - 11:18

In reply to by ऋषिकेश

चर्चा लेखन दोन्ही रोचक आहे.

+१

या विषयात याहुन अधिक लिहायचा वकूब नाही.

ह्याऐवजी :-
या विषयात मी लिहीन ते समजून घ्यायचा अलम दुनियेचा वकूब नाही.

मन Tue, 01/04/2014 - 13:53

In reply to by सुशेगाद

दृष्टीभ्रम / optical illusions ह्यापूर्वी लै वेळा पाहिले होते.
पण काल हे सगळे इतके एकाच ठिकाणी मिळालेले पाहून बरे वाटले.

रुपाली जगदाळे Tue, 01/04/2014 - 20:47

CHANCE TRAVELER नावाची हारूकी मुराकामीची एक कथा आहे. त्यात अशा सारख्या बऱ्याच घटनांची नोंद केलेली आहे. कथा पूर्ण काल्पनिक आहे की त्यांच्या स्वतःच्या अनुभवावर आधारित आहे हे माहित नाही. पण ढोबळ कयास केला तर काही गोष्टी घडल्यासारख्या वाटतात. असो. सहज आठवले म्हणुन नमुद करावेसे वाटले.