Skip to main content

लक्ष लोलक तोलत

लक्ष लोलक तोलत
उसळते निळी लाट
किनाऱ्याशी फुटताना
एक अतृप्ती उत्कट

मावळतीच्या दिशेला
फूल फुटे केशराचे
निळ्या घुमटाला पडे
कोडे कुण्या नक्षत्राचे

तोल ढळण्या आधीच
हस्तिदंती मनोऱ्याचा
कोष आवळून घेतो
मीच माझ्या भोवतीचा

अवडंबरशास्त्री हत्ती Tue, 02/12/2025 - 07:30

कविता आवडली. पण त्यात तो हस्तिदंती मनोऱ्याचा उल्लेख नसता तर बरे झाले असते. हस्तिदंतासाठी आमच्या जमातीतल्या हजारोंना माणसांनी मारले आहे :(