अभिवाचन - बरेच काही उगवून आलेले
ऋषिकेश
लेखक - नंदन
अभिवाचन - ऋषिकेश
विशेषांक प्रकार
आभार! खरंतर हा प्रयोग मी
आभार! खरंतर हा प्रयोग मी पहिल्यांदाच केला.
कशाचे अभिवाचन करायचे हा एक मोठा पेच होता. अत्रे, मिरासदार यांच्या एकेक कथा डोक्यात होत्या पण प्रताधिकाराचा प्रश्न येईल अश्या विचाराने तो वोचार रद्द केला.
मग आपल्याच मित्रमंडळींपैकी कोणीतरी लिहिलेलं वाचायचे ठरवले. तेव्हा विनाविलंब हाच लेख डोक्यात आला.
नंदननेही आनंदाने परवानगी दिली.
अवांतरः याच नावाचा धामणस्करांचा कवितासंग्रहसुद्धा अतिशय वाचनीय आहे.
चांगला प्रयत्न
चांगला प्रयत्न आहे.
शीर्षकावरून काहीच अंदाज येत नाहिये की काय ऐकायला मिळणार आहे. नंदन यांनी लिहिलेल्याचं वाचन असा समज झाला; त्यांनीच लिहिलेलं ऐकवलं पण त्यातला बराचसा भाग अनेक प्रसिद्ध कवि लेखकांनीच लिहिलेला होता. नंदन यांनी ते सर्व या स्वरूपात एकत्र मांडलं. थोडी दिशाभूल झाल्यासारखं वाटलं.
ऐकायला लागल्यावर सुरुवातीला पुढे काय ऐकायला मिळणार आहे याची थोडक्यात प्रस्तावना आवडली असती.
हे सर्व ऐकताना, ते सर्व लिहिलेलं पाहायची सोय होऊ शकल्यास अजून मजा आली असती असं वाटलं.
पहिल्या भागात एक खूपच मोठ वाक्य आहे...ज्यात ज्ञानेश्वरांपासून,....संदिप खरे येईपर्यंत ते कुठे सुरु झालं होतं ते विसरायला झालं.त्यामुळे समोर लिहिलेला मजकूर असता तर लक्षात ठेवायला मदत झाली असती.