ए०आय० आणि देशाचे भविष्य
ए०आय० आणि देशाचे भविष्य
===================
-राजीव उपाध्ये
काल माझ्या एका वृत्तपत्र संपादकांबरोबर फोनवर ए०आय० वर प्रदीर्घ गप्पा झाल्या. ए०आय० ने नोकर्यावर आणलेल्या संक्रातीमुळे ते पण हादरलेले वाटले. नोकर्यांच्या समस्येवर आणि त्या अनुषंगाने "मानवी श्रमप्रतिष्ठा" या वर आज थोडा (मार्केट बंद असल्यामुळे) विचार करायला वेळ मिळाला. या समस्या सोडवता येण्यासाठी अधिक खोलवर असलेले प्रश्न तपासून घेता आले पाहिजेत.
० कोणतीही अभूतपूर्व परिस्थिती निर्माण होते तेव्हा प्रत्येक व्यक्तीने, कुटुंबाने आणि समाजाने वेगळ्या पद्द्धतीने प्रश्न/समस्यांचे स्वरूप तपासून उत्तरे शोधणे आवश्यक ठरते. सध्या अशी उत्तरे शोधायचा प्रयत्न होतो तेव्हा ही उत्तरे धर्म, संस्कृती यांच्या चष्म्यातून बघितली जातात. त्यांना भावनिक प्रतिसाद कसा मिळतो हे आत्ता सोन्याच्या खरेदी संदर्भात मोदीनी केलेल्या आवाहनाला मिळालेल्या प्रतिसादात दिसले आहे. बहुतेक वेळा समाज जुने सांस्कृतिक फ्रेमवर्क वापरून नवीन संकटे समजावण्याचा प्रयत्न करतो. त्यामुळे काही काळ “भावनिक स्थैर्य” मिळते, पण मूळ प्रश्न सुटत नाहीत.
० पण ए०आय० च्या युगात उत्पादनक्षमता मशीनकडे सरकली, तर “मानवी प्रतिष्ठा” कोणत्या आधारावर उभी राहणार? हा खरा प्रश्न आहे. कारण अनेक लोकांच्या जीवनात “मी कोण?” याचे उत्तर त्यांच्या कामातूनच येत असते. जर मोठ्या प्रमाणावर कामांचे स्वरूप बदलले, तर फक्त उत्पन्नाचा नव्हे तर अस्तित्वाचा आणि आत्ममूल्याचा प्रश्न निर्माण होतो.
इथे धर्म आणि संस्कृती पुन्हा पुढे येतात. कारण ते व्यक्तीला “भूमिका” आणि “अर्थ” देतात. पण त्यातही दोन शक्यता असतात:
एक म्हणजे समाज नव्या वास्तवाशी जुळवून घेणारे नवे नैतिक तत्त्वज्ञान निर्माण करतो. दुसरी म्हणजे समाज भूतकाळातील प्रतीकांना अधिक घट्ट पकडून ठेवतो.
आज जगभर दुसरी प्रतिक्रिया जास्त दिसते आहे — ओळखींचे राजकारण, सांस्कृतिक राष्ट्रवाद, धार्मिक पुनरुज्जीवन, परंपरांचा आग्रह इत्यादी. कारण तांत्रिक बदलांची गती मानवी मानसिक अनुकूलनापेक्षा खूप वेगवान झाली आहे.
० जोपर्यंत समाज वेगळा विचार करणार्यांना, प्रश्न विचारणार्यांना नाऊमेद करतो तो पर्यंत फार काही साधले जाईल असे मला वाटत नाही.
त्यामुळे सध्या तरी माझे भारताच्या भविष्याविषयीचे मत फारसे चांगले नाही. आपण ए०आय०ची स्पर्धा हरलो आहोत...
सहमत आहे. नुकतेच मी क्लॉडचे…
सहमत आहे.
नुकतेच मी क्लॉडचे सशुल्क सभासदत्व घेतले. मला पुढच्य १० वर्षात ज्या कल्पना सुचल्या नसत्या त्या १० दिवसात इम्प्लीमेण्ट करून दिल्या.
मी "आर" मध्ये प्रोग्रामिंग करतो. आयुष्यात १४००० ओळींचे "आर कोड" ते पण १० दिवसात लिहीन असे वाटले नव्हते. लोकांचे जॉब गेले नाहीत तर नवल ते काय?
एक समान पॅटर्न
Ai वर मी अनेक प्लॅटफॉर्म जाऊन वाचतो ऐकतो.
Ai human work फोर्स कमी करेल काही तर human work फोर्स पूर्ण नष्ट करेल असे च सांगत असतात.
आणि हे सांगणारे सर्व 45 प्लस वय असणारे च असतात. अगदी 65 प्लस वय असणारे पण आहेत.
ह्यांचे स्वतः चे आयुष्य स्थिर नोकरीं मध्ये गेलेले असते. त्यांना भविष्यातील ai विषयी काही हि ज्ञान नसते कोडींग भोवती च हे फिरत असतात कारण त्यानं तेच माहित असते.
Ai चे परिणाम ह्या वर 20 ते 30 minus वय असणारे तरुण पिढी च एक पण लेख तुम्हाला शोधून सापडणार नाही. ना you tube वर video सापडेल. कारण त्यांना आधुनिक ai माहित आहे त्याचे परिणाम पण माहित आहेत.
ज्यांनी मार्गदर्शन करायचे ते फक्त भीती पसरवण्यात पुढे आहेत. त्यांच्या कडे उपाय नाहीत कारण त्यांना तितक आधुनिक ai समजलेले नाही.
Ai म्हणजे सर्व काही असते, ai सर्व च काम करणार असेल तर ज्या देशांची लोकसंख्या वेगाने कमी होत आहे आणि zero वाढ कडे त्यांची वाटचाल चालू. आहे त्यांना भीती ने ग्रासले नसते. अनेक प्रगत देश लोकसंख्या च्या घडत्या आकड्या नी चिंतीत आहेत..
एक च विषय आणि त्या वरील च उदाहरणं घेऊ
Ai वर ऐसी अक्षरे वर खूप धागे आहेत जास्त धागे तुमचेच आहेत. त्या वर खूप प्रतिक्रिया पण आहेत.
धागा लेखक आणि प्रतिक्रिया देणारे 45 प्लस नसले तरी 40 प्लस नक्कीच आहेत. त्याच क्षेत्रात काम करणारे आहेत..
फक्त कोडींग विषयी च बोलू कोडींग ai लिहीत आहे त्या मुळे त्या क्षेत्रातील नोकऱ्या जाणार हे त्या क्षेत्रात काम करणाऱ्या न माहित आहे हवा त्यांच्या पर्यंत पण पोचली आहे.
पण एक पण धागा इथे नाही एक पण प्रतिक्रिया इथे नाही जी कोडींग च पूर्ण automation झाल्या वर काय प्रश्न निर्माण होतील ह्या वर आहे
कोडींग गरजेचे च नाही तर पुढे कोणी शिकणार नाही.
माणसाला ती भाषा च येणार नाही तेव्हा काय उपाय असेल.
सिस्टिम क्रॅश झाली आणि माणसाला कोडींग च येत नाही तर काय?
व्यवसाय साठी काय structure हाव ते शेवटी माणूस च ठरवेल ते यंत्र ला automation कोडींग सिस्टिम सांगेल पण त्या order अयोग्य असतील तर काय?
अशा कोडींग च automation नंतर पुढच्या प्रश्न वर एक तरी प्रतिक्रिया दाखवा.. किंवा एक तरी धागा दाखवा
म्हणून मी लिहले आहे स्थिर नोकरीत आयुष्य गेलेल्या लोकांना पुढील प्रगत ai समजत नाही.
सणसणीत चपराक
परवा मी तुम्हाला क्लॉडचा मला आलेला अनुभव सांगितला. आज माझे काम विशिष्ट टप्प्यावर पोचल्यामुळे "आपण नक्की कुठवर पोचलो" किंवा "आपल्या कामाचा दर्जा काय?" याचे प्रामाणिक उत्तर मिळणे आवश्यक ठरते. मानवी तज्ञ या टप्प्यावर दगा देतात.
त्यामुळे मी आज क्लॉडला एक प्रश्न विचारला -
"Compare the model we have developed together with other directional models in the world. So that I get an idea where I stand in terms of originality etc"
त्यावर क्लॉडने आम्ही केलेल्या उद्योगाची विस्तृत चर्चा केली. त्याचा सारांश असा -
You are operating in a well-established academic space (regime detection + directional prediction) but with a combination of ideas, validation rigour, and tooling that is stronger than most published work in this area. The model is not claiming to discover new financial theory — it is implementing known methods in a particularly careful and integrated way. For a single-stock retail/semi-professional practitioner, this is sophisticated. For an institutional quant desk, the missing pieces are multi-asset, online updating, and transaction cost modelling.
मग मी त्याला अधिक नेमका पुढील प्रश्न विचारला. -
"Can this work get me a PhD?"
The one-sentence honest verdict - The current work is PhD-quality *engineering* but not yet PhD-quality *research* — what turns it into a PhD is picking one of the four questions above, testing it rigorously across many assets, and writing up what you found in a way that tells the world something it did not know before.
The foundation is genuinely strong. Most PhD students spend their first year building what you already have.
ए०आय० तुम्हाला खुष करणारी उत्तरे देतो या आक्षेपाला ही सणसणीत चपराक आहे. ए०आय० मुळे संशोधनाचा वेग कसा वाढतो याची छोटीशी झलक...
exploitation to irrelevance
Big Data algorithms might create digital dictatorships in which all power is concentrated in the hands of a tiny elite while most people suffer not from exploitation, but from something far worse – irrelevance.
It is much harder to struggle against irrelevance than against exploitation.
हा मुद्दा हरारीने त्याच्या २१ लेसन्स मध्ये मांडला होता... तरीही येणारा काळच ठरवेल नेमके किती जॉब्स जातील, त्याप्रमाणात नवीन किती तयार होतील? सध्यातरी कोडींग स्किल्स आउट्डेटेड होताना दिसत आहेत...