Skip to main content

शालेय प्रयोग: एक्झिट पोल चुकतात का?

आजकाल पहाटे फिरायला गेल्यावर पार्कमध्ये आमच्यासारख्या ज्येष्ठ मंडळींची मैफिल जमते. बंगाल निवडणुकीच्या सर्वेक्षणावर चर्चा होत असताना सर्वांचे एकमत झाले — बहुतांश एक्जिट पोल चुकतात. आमच्यातले एकजण शाळेत शिक्षक होते. ते म्हणाले, "एक्जिट पोल का चुकतात, यावर मी एकदा वर्गात प्रयोग केला होता." हरियाणा निवडणुकीचे निकाल एक्झिट पोलच्या अंदाजाविपरीत लागले होते, तेव्हा विद्यार्थ्यांनी याबाबत प्रश्न विचारला होता. शिक्षकांनी प्रात्यक्षिक दाखवायचे ठरवले.

वर्गात ४२ विद्यार्थी चार रांगांत बसले होते. शिक्षकांनी दोन मुलांना जवळ बोलावले. एकाला फळ्यावर 'एक्झिट पोल', 'निवडणूक निकाल', 'अ पार्टी' आणि 'ब पार्टी' असा तक्ता बनवायला सांगितले. दुसऱ्याने शिक्षकांनी दिलेल्या कागदांच्या ४० मतपत्रिका बनवल्या, विद्यार्थ्यानी त्यावर त्यांचे मत नोंदवले, त्या घड्या घालून शिक्षकांकडे दिल्या.

त्यानंतर शिक्षकांनी एका विद्यार्थ्याला त्यांतून दहा मतपत्रिका निवडायला सांगितल्या- हा झाला एक्झिट पोल. एकूण मतांच्या तब्बल २०% नमुना यात होता. एका विद्थ्यर्थाने त्या मतपत्रिका उघडून आकडे फळ्यावर लिहले. 'अ'ला ४ मते आणि 'ब'ला ६ मते. म्हणजे एक्झिट पोलनुसार 'ब' दोन तृतीयांश मतांनी जिंकणार होता.

त्यानंतर सर्व मतपत्रिका मोजल्या. निकाल धक्कादायक होता॰ 'अ'ला २२ मते (५५%) आणि 'ब'ला १८ मते (४५%). २०% नमुना असूनही एक्झिट पोल पूर्णपणे चुकला!

आता विचार करा, आपल्या देशात अधिकान्श राज्यांत कोट्यवधी मतदार असतात, अधिकान्श राज्यांत 5 कोटीहून अधिक असतात. आता एक्जिट पोल करणार्‍या अजेंसीने ५० हजार ते २ लाख मतदारांचा डेटा घेतला, तर तो एकूण मतदानाच्या पाव टक्क्यांपेक्षाही कमी ठरतो. कितीही वैज्ञानिक पद्धतीने डेटा गोळा केला, तरी इतक्या कमी नमुन्यावर एक्झिट पोल खरा ठरण्याची शक्यता नगण्यच असते. खरे तर एक्झिट पोल करणारे केवळ 'हवा' ओळखण्याचा प्रयत्न करतात आणि त्याच आधारावर अंदाज मांडतात. त्यांना आपण पत्रिका पाहणारे ज्योतिषी म्हटले तरी चालेल!

वर्गातील विद्यार्थ्यांचे समाधान झाले. त्यांना कळले की एक्झिट पोल हे केवळ मनोरंजन आहे. एखाद्या वेळी एखाद्या संस्थेचा अंदाज योगायोगाने बरोबर निघू शकतो. पण त्यापलीकडे त्याला फारसे महत्त्व नाही.