Skip to main content

<u><b>पुरावे </b></u>

पुरावे

कोणा खूप प्रिय व्यक्तीचा फोन
अचानकच येतो

आणि सवयीने ती म्हणून जाते
मी छान आहे

फोन ठेवते
बघत राहते त्या यंत्राकडे

आणि शोधत राहते त्यात
तिच्या 'छान' असण्याचे पुरावे

डोळ्यातून पाणी येईपर्यंत .

चन्द्रशेखर गोखले Fri, 06/04/2012 - 00:14

समर्पक भावार्थ.. रचना भावली...!!!

धनंजय Fri, 06/04/2012 - 01:15

चांगला अनुभव, पण...
(१) एक पर्याय असा आहे, की रचना खूप लांबली आहे, म्हणून परिणाम बोथट होतो,
किंवा
पर्याय (२) असा, की पुरेसे रंगवले नसल्यामुळे कथानक हवे तितके "कथा" बनत नाही.

*

फोनवर तिने
उत्तर दिले,
"छान आहे!"
दिले तर खरे.

ठेवल्या-ठेवल्या
खुपल्या खपल्या
अन् हुळहुळल्या
"छान? खरेच?"

*

स्मिता जोगळेकर Fri, 06/04/2012 - 10:17

In reply to by ............सा…

धन्यवाद सारिका :)
मी अजून या कट्ट्यावर नवीन आहे . मला गुणांकन चा फंडा अजून कळला नाहीये ...सध्या फक्त लिहीते बस :)