हि सांज धुंद ऐसी, उन्हात न्हात आहे,
तरी मनावर माझ्या, बरसात होत आहे..
स्वच्छंद ओढणी हि, वाऱ्यावरी उडाली..
श्वास माझा सये, ओढणीत गुंतत आहे..
का बकुळीचा हा, गंध नभी पसरला,
कि तुझ्या येण्याची, हि रुजुवात होत आहे...
उठला नदीकिनारी, हा रव पैंजणांचा..
नुसतीच कि तुझी, मला चाहूल होत आहे...
तू ये सये चुकवून, डोळा साऱ्या जगाचा..
प्रतीक्षेत माझे आता, मन अधीर होत आहे..
सांग सये मला तू, हसलीस ना जराशी..
उगाच का चांदण्यांचा, वर्षाव होत आहे..
आला का बघ तुला, आवाज ओळखीचा..
हि सांज ऐक सये, घालीत साद आहे..
उठली आसमंती, माझ्या प्रेमाची लाली..
उगाच का अजिंक्य, तुला बोलावत आहे...
बेस्ट्
बेस्ट्
धन्यवाद.
.
छान आहे कविता!
छान आहे कविता!
उन्हातली धुंद सांज आणि बकुळीचा गंध
हि सांज धुंद ऐसी, उन्हात न्हात आहे
इथंच उडालो.
बकुळीचा गंध: ही ऑलमोस्ट नष्ट झालेली गोष्ट आहे.
कवितेत गंध आणणाऱ्यांसाठी एक सूचना : नवीन गंधांचे शोध घ्या. तुम्हाला कधी सातविणीचा तीव्र आवाहक मादक गंध नाही का आला संध्याकाळी? कुणी कवितेत सातविण, बूच (मान्य, हा काव्यानुकूल शब्द नाही, पण), निलगिरी, कण्हेर यांचे गंध का आणत नाहीत? काय ते बकुळ आणि प्राजक्ताच्या मागे लागता?
हि सांज धुंद ऐसी, उन्हात
हि सांज धुंद ऐसी, उन्हात न्हात आहे =))
हसणारी
बाहुली
कारण कळू द्या
उडण्याचे, फक्त ऐसी शब्दावरील मला अनपेक्षित श्लेषासाठी उडाले असाल, तर तुम्ही फारच खाली आणि लवकर उडता बुवा!
आणि बकुळीचा गंध मला आवडतो, कोकणात अनुभवला आहे. बूच सुंदर असला तरी अतिपरिचयाने डोक्यात जातो. निलगिरी फक्त सर्दी झाल्यावर आठवतो, कण्हेर आणि सातवीण मला माहित नाही.
आणि आता मूळ मुद्दा, कवितेबद्दल काही असेल तर अभिप्राय कळवा. मी कोणते शब्द/ फुल हुंगावे हा सर्वस्वी माझा प्रश्न !
जे लिहिलं त्यासाठी धन्यवाद
बूचाला गगनमोगरा असा सुंदर
बूचाला गगनमोगरा असा सुंदर शब्द आहे.
link
http://www.aisiakshare.com/node/6382
I liked this stanza-
I liked this stanza-
धन्यवाद
धन्यवाद
कन्हेर???
कन्हेरीचा गंध??? उद्या सदाफुली, चांदिपाट वैगेरे. चांगल्याला चांगले म्हणायचा जमानाच नाही.