जोडीदाराचे फेसबुक किंवा इमेल खाते चोरुन वाचणे कितपत योग्य आहे?
ही बातमी वाचून प्रश्न डोक्यात आला- आपल्या जोडीदाराचे फेसबुक किंवा इमेल खाते चोरुन वाचणे कितपत योग्य आहे?
त्या मित्राने चीटींग (विश्वासघात किंवा व्यभिचार) केला हे योग्य की अयोग्य हा प्रश्न तूर्तास बाजूला ठेऊ. माझ्यामते ते अयोग्यच पण तूर्तास हा प्रश्न बाजूला ठेऊ.
पण खातं उघडं दिसलं म्हणून त्यात डोकावणे/मेसेजेस वाचणे कितपत योग्य आहे? त्याने केलेल्या गुन्ह्याइतकाच त्या मैत्रिणीचाही गुन्हा अक्षम्य नाही का? का आपला जोडीदार आहे म्हणून सगळे हक्क गृहीत धरायचे?
त्या मित्रावर अनेकजण टीका करायला सरसावतील पण तिच्या गुन्ह्याचे काय? हे म्हणजे दुसर्याच्या डोळ्यातलं कुसळ दिसतं पण स्वतःच्या डोळ्यातील मुसळ दिसत नाही असे मला तरी वाटते.
त्या स्त्रीने जी भूमिका घेतली आहे ती पाहता या गाण्याची आठवण झाल्याशिवाय रहात नाही.
एवढेच म्हणेन की तो फसवणारा मित्र अन ही चोरुन मेसेजेस वाचणारी स्त्री बोथ डिझर्व्ह ईच अदर!!!
फार थिल्लर वाटल्यास हा धागा उडवून लावावा. किंवा "ही बातमी वाचली का?" या धाग्यात प्रतिसाद म्हणून हलवावा. सॉरी उशीरा लक्षात आले.
+१
मध्यमवर्गीय, तरूण लोकांकडे माणशी एक कंप्यूटर/लॅपटॉप नाही हे मला अविश्वसनीय वाटतं. प्रगत देशांसाठी अधिकच. माझ्या घरी माणशी एक लॅपटॉप आहेच; पण एकमेकांचे इमेल पासवर्ड्स कंप्यूटरमधेही आहेत. कधीतरी दुसर्याचे इमेल्स दिसले तर वैताग येतो, जीमेल.कॉम उघडल्यावर स्वतःचं खातं दिसण्याची सवय असते. वेगळं काहीतरी दिसतं म्हणून हा क्षणिक वैताग. दुसर्याचे इमेल्स वाचण्याची इच्छा होत नाही आणि ते पटतही नाही.
चोरी करायला ना नाही, पण ती पकडली न जाण्याइतके हुशार असाल तरच करावी. नाहीतर "चोर" म्हणून जे परिणाम सहन करावे लागतील त्याची तयारी ठेवावी.
माझे इमेल्स कोणी वाचले तरी काही धोका नाही. सगळी 'लफडी' मी आवाजी करते.
वर "अजिबात योग्य नाही, चोरुन
वर "अजिबात योग्य नाही, चोरुन वाचणे तर अक्षम्यच" या संजोपरावांच्या प्रतिसादाला तू +१ अशी सहमती दिली आहेस.
नंतर माणशी वेगळा लॅपटॉप कसा नसतो असं आश्चर्य व्यक्त केलं आहेस. तरीही एकमेकांचे मेलबॉक्स नजरेला पडतात आणि वैताग येतो, पण ते वाचण्याची इच्छा नसते.
हे सर्व एकदम रास्त. पण शेवटाकडे एकदम काहीतरी पॅरेडॉक्स जाणवतो.
चोरी करायला ना नाही, पण ती पकडली न जाण्याइतके हुशार असाल तरच करावी. नाहीतर "चोर" म्हणून जे परिणाम सहन करावे लागतील त्याची तयारी ठेवावी.
हा देखील एक विचार म्हणून ठीकच, पण वरच्या सहमतीशी अजिबात सुसंगत नाही. जे करणे विशेषतः चोरुन तर अक्षम्यच, त्याला विरोध दर्शवल्यावर "चोरी करायला ना नाही, पण ती पकडली जाऊ न देता करावी" अशा आशयाचे वाक्य पूर्ण वेगळी विचारधारा दर्शवते.
-"ग"वि बाजू. ;)
:ड
श्री. "ग"वि बाजू, चोर जोपर्यंत पकडला जात नाही तोपर्यंत तो/ती साव असतात; ही म्हण तुम्हाला माहित नाही याचा अर्थ तुम्ही चौथीत स्कॉलरशिपच्या परीक्षेचा अभ्यास केला नव्हतात हे स्पष्ट आहे.
अवांतरः "ग"वि बाजू यापेक्षा गवि अमृतसागर अशी काही सही अधिक शोभली असती.
चोरी करायला ना नाही, पण ती
पकडली न जाण्याइतके हुशार असाल तरच करावी. ... +१
जर चोरी करायचीच असेल तर आपल्या ओ एस वर की लॉगर इन्स्टॉल करावे. नंतर आरामात कुणी नसताना अॅक्सेस करून वाचावे. ते करताना टॉर किंवा क्रोम (ईन-कॉग्निटो) मोड मध्ये वापरावे जेणे करून कुणी आल्यास, ब्राऊजर घाई गडबडीने बंद केल्यास सगळे सेशन्स आपोआप लॉग अऊट होतील.
पण अगदी खर खर म्हणजे अस सगळ कशाला कराव? हे सगळ करण्यात जो कीतीतरी वेळ वाया जाईल तो सेल्फ डेवलेपमेंट मध्ये लावता येईल.
+१
या गतीने, पुढेमागे 'जोडीदाराची अंतर्वस्त्रे चोरून घालून पाहणे कितपत योग्य आहे?' असाही धागा या संकेतस्थळास सुशोभित करून गेल्यास आश्चर्य वाटणार नाही. आणि प्रेरणेसाठी बातमीचा दुवा थोडेफार शोधल्यास कोठे ना कोठेतरी मिळेलच.
शिवाय, 'हा अक्षम्य गुन्हा नाही का?' पासून ते 'मुळात आपण कुटुंब हे एकक मानतो की व्यक्ती यावरून याच न्यायनिवाडा करता येईल.' (कोणी सांगितलेय?) पर्यंत किंवा 'जोडीदाराने आपली अंतर्वस्त्रे घालून पाहू नये अशी अपेक्षा असल्यास नात्यामध्ये विश्वासाची कमतरता आहे' पासून ते 'मध्यमवर्गीय, तरूण लोकांकडे माणशी किमान एक अंतर्वस्त्रांचा जोड नाही हे अविश्वसनीय वाटतं. प्रगत देशांसाठी अधिकच. आमच्या घरी माणशी भरपूर जोड आहेतच; शिवाय ते इतस्ततः पसरलेलेही असतात. कधीतरी दुसर्याचे दिसले तर वैताग येतो. दुसर्याचे घालण्याची इच्छा सहसा होत नाही, बरोबर वाटो वा ना वाटो. आणि माझी अंतर्वस्त्रे कोणी घालून बघितली तरी धोका नाही. तशीही खुल्लमखुल्ला उघ॑ड्यावर पडलेली असतात.' पर्यंत सगळे आयाम त्यात येऊ शकतील.
सांगण्याचा मुद्दा, धाग्याचा प्रेरणास्रोत टुकार आहे, आणि धागा दोन ओळींचा प्रतिसाद देण्याइतकाही वेळ घालवण्यायोग्य नाही. पण एवीतेवी या क्षणी मला उद्योग नाहीत, म्हणून हा प्रतिसादप्रपंच.
कलोअ.
उशीरा लक्षात आल्याने पुरवणी
उशीरा लक्षात आल्याने पुरवणी जोडली आहे की धागा बातमी सदरात हलवावा. अन गतीने वगैरे काही नाही. प्रत्येकाला आपल्या आवडीनुसार, इच्छेनुसार विषय निवडण्याचे स्वातंत्र्य आहे जसे संपादकांना धागा उडवण्याचे. सगळेजण थोडे "वैविध्य" (डायव्हर्सिटी) अॅप्रिशिएट करायला शिकले तर काही आभाळ कोसळणार नाहीये.
अर्थात आपला प्रतिसाद विनोदी आहे याबद्दल दुमत नाही. :)
या "समोर हजर" होण्यावरुन एक
या "समोर हजर" होण्यावरुन एक गोष्ट आठवली. एक लाकूड तोडणारी आज्जी नेहमी देवाचा धावा करायची. "देवा रे सोडव मला. कंटाळा आला या कष्टांचा" वगैरे. एकदा देव साक्षात उभा ठाकला व म्हणाला "बोल म्हातारे का बोलावलस?" त्यावर ती उत्तरते "काही नाही रे बाबा, एवढी मोळी उचलायला जरा मदत कर :D "
जोडिदाराचेच नव्हे तर कुणाचेही
जोडिदाराचेच नव्हे तर कुणाचेही इमेल किंवा कोणत्याही खात्यातील माहिती त्याव्यक्तीच्या परवानगीशिवाय म्हणजे अर्थातच चोरून बघणे गैरच!
इमेल्सचे तरी ठिक आहे, आपल्या चांगल्या सुशिक्षित जोडिदाराचे/ सज्ञान पाल्याचे/ पालकांचे / सज्ञान भावंडांचे बँकेचे व्यवहार सांभाळणारे जोडिदार/पालक/पाल्य/भावंडे इ. बघितले की (ज्याचे खाते इतरांना सांभाळावे लागते आहे त्याच्या) अडाणीपणाची (की आळशीपणाची?) चीड येते.
मल्ल्यांच्या पार्टीला मी
मल्ल्यांच्या पार्टीला मी येणार नाही हे त्यांना तूच पटवून सांग अशी गळ कॅट ने घातली तेव्हां तिला नाही म्हणणं शक्यच नव्हतं. मल्ल्या माझ्या शब्दाबाहेर नाहीत हे तिला चांगलंच ठाऊक आहे. मग इकडच्या तिकडच्या गप्पा झाल्यावर मी तिला म्हटलं फॅशन स्ट्रीलला शॉपिंगला जायची काय गरज होती ?
त्यावर खळखळून हसत तॉ ओह नो करत राहिली. म्हणजे तू पाहीलंस तर असं तिला म्हणायचं होतं. मग थोड्या वेळाने म्हणाली काय बिघडलं तिथं शॉपिंग केली तर ?
फॅशन स्ट्रीटचा माल स्पेनला नेला आणि पिक्चर्स लीक झाले तर ते फारच चीप दिसतं गं... मी काळजीने म्हणालो.
,
,
,
अस्दस्द ज्क्स्द सद अस्द्ल्क्ज्स
सद्ज्जस स्दस्द्क
अस्दस
-------------------------------------------------------------------------------------
मित्रांनो, फेबु स्टेटस असं लिहावं. वाचलं जातं..
लेव्हल ऑफ ट्रस्ट.
१. त्या बातमीतले ब्रेकप लेटर : वहीच्या पानावरचे गर्लिश हँडरायटिंग, हाताने लिहिलेल्या लिखाणात वापरलेले इमोटिकॉन्स, इ. पाहून हे सुमारे ११वी कॉमरस, तुकडी ड मधल्या मधल्या मंदीने तिच्या बीएफला लिहिलेले पत्र असावे असे वाटते. या वयातल्या जेलसीज अन केल्सी'ज मेसेजेस असल्या ब्रेकप्ससाठी पुरेसे असतात. पण ते असो.
२. या वयातली मुले मुली एकमेकांवरील प्रेमाचा पुरावा म्हणून त्यांच्या फेसबुक व ईमेल अकाऊंटांचे पासवर्ड एक्स्चेंज करीत असतात हे दुसरे सत्य आहे. (म्हणजे ऑफिशियली उघडून पहाता येण्याची परवानगी)
३. या पलिकडे जाऊन, संशयपिशाच्चाने पछाडले, की, ऑफिशियली ग्रांटेड अॅक्सेस असला तरीही, केल्सी कोण, तो निरोप नक्की कसला याची विश्वासाने चौकशी करणे, वा सरळ ब्रेकप करणे, किंवा त्याहीपुढे जाऊन मोठी भांडणे/शारिरीक इजा करणे इतपत लेव्हल्स तो वा ती या दोहोंकडून वापरले जाऊ शकतात.
शेवटी,
"एवढेच म्हणेन की तो फसवणारा मित्र अन ही चोरुन मेसेजेस वाचणारी स्त्री बोथ डिझर्व्ह ईच अदर!!!"
हे तुमचे कन्क्लूजन १००% योग्य आहे असेच म्हणावेसे वाटते.
????
मुळात आपण (सध्याच्या युगातील नवराबायकोपुरते न्युक्लीअर असे) कुटुंब हे एकक मानतो की व्यक्ती हे एकक मानतो यावर जोडीदाराच्या खात्याची (चोरून किंवा इतर अर्थाची) पाहणी या गोष्टीचा न्यायनिवाडा करता येईल. माझ्या मते तरी जोडीदाराने आपले खाते पाहू नये अशी अपेक्षा असल्यास नात्यामध्ये विश्वासाची कमतरता आहे असाच त्याचा अर्थ आहे.