आर. के. लक्ष्मण! आम्हांला माफ करा!!

निव्वळ मनातच खदखदणार्‍या गोष्टी कधीतरी स्फोट होऊन बाहेर येतातच.
व्यक्त करण्याशिवाय पर्यायच उरत नाही… अशा क्षणी!
एक वेगळ्या बुद्धीचा – हं, ‘बुद्धी’ हा शब्द अवतरणात लिहायला हवा! – संपादक आला आणि त्यानं ठरवलं की व्यंगचित्राची जागा पहिल्या पानावर नाही!
तोवरचा काळ असा होता… म्हणजे अगदी लहानपणापासून, जेव्हापासून वृत्तपत्रं वाचण्याची सुरुवात झाली तेव्हापासून म्हणूया, वृत्तपत्र आलं की आधी घडी पालटून हेडलाइनआधी व्यंगचित्र पाहण्या-वाचण्याची सवय लागली होती. हे असंच आहे आणि असंच असतं आणि असंच असणार आहे… असं तोवर वाटत होतं – जोवर हा संपादक इथं संपादक म्हणून निपजला नाही.
आज जिभेवर शिव्या येतात किंवा मनात हिंसा निपजते की असे सडके मेंदू एखादी लोखंडाची पातळ सळी घालून फोडायला पाहिजे होते. शिव्या का येतात जिभेवर किंवा हिंसक विचार का येतात मनात? कारण माणसांना व्यंगचित्रं समजेनाशी झालीत!
तर या भारतकुमार राऊत नावाच्या प्राण्यानं ‘महाराष्ट्र टाइम्स’ मधलं पहिल्या पानावरचं व्यंगचित्रं आतल्या कुठल्यातरी पानावर फेकलं. एरवी एकमेकांशी दुश्मनी निभवणारे संपादक नको तिथं अनुकरण करतातच! त्यानुसार इतरांनीही क्रमशः जागा बदलल्या!
याचं स्पष्टीकरण काय होतं?
तर : ज्यांना व्यंगचित्र हवंय ते लोक ते कुठेही असलं तरी पाहतीलच!
आणि आम्ही पाहतच राहिलो साले ते ‘कुठेही’ फेकलेलं व्यंगचित्रं!
व्यंगचित्रकारांच्या आयुष्यातला हा सगळ्यात मोठा विनोद होता… बदललेली जागा दाखवून देणारा!
हा माणूस… आर. के. लक्ष्मण!
यानं काम करायचं थांबवलं आणि त्यानंतरचे व्यंगचित्रकारांचे दिवस अधिकाधिक वाईट होत गेले. बाकीचे तर हयातीतच मेले आहेत आणि ज्या जागेचा तुकडा तो संपादक फेकेल त्यावर जगताहेत. ज्यांना हेही मान्य नाही, ते थांबताहेत गपगुमान.
राज्यकर्त्यांच्या सेन्सॉरशीपबाबत आपण बोंबा मारतो, पण मीडियातल्या या ‘घरा’तल्याच सेन्सॉरशीपविषयी कोण ब्र काढणार?
पहिल्या पानांना जाहिरातींनी कधीच व्यापलं. त्यानंतरची जी खर्‍या अर्थाने पहिली म्हणावीत अशी पानं असतात, तिथं इयत्ता दुसरीतल्या पोरांनी सांगितलेले ‘विनोद’ छापायला यांच्याकडे जागा आहे, पण व्यंगचित्रासाठी नाही! त्या विनोदांच्या शीर्षकांसाठीही यांना मराठी शब्द सापडत नाहीत; स्पष्ट सांगायचं तर ‘चालत’ नाहीत. ‘भाषा घडवणं’ हे काम वृत्तपत्रांचं राहिलं नाही, तो हेतू जुनाट झाला. बापलोक सांगायचे, ‘भाषेसाठी अग्रलेख वाचा!’ आता सांगत नाहीत. कारण आता ‘लोकांची भाषा’ वृत्तपत्रांना हवीशी झालीये पाचकळ ‘अनुनया’साठी! ती वापरणं सोपं! मग तमाम चुका माफ होतात, ‘ही बोली आहे’ म्हटलं की!
अग्रलेखही आता चिमुकले आणि चिमखड्या बोलांचे बनलेत. त्यातही छायाचित्रं पेरण्याची गरज भासू लागलीये. तीही रंगीत छायाचित्रं! का बौ? तुमच्या शब्दांतली ताकद कुठं पासली पडलीये?
वाईट… वाईट्ट आहे सगळं!
बरं झालं आर. के. लक्ष्मण, तुम्ही मेलात!
तुम्हांलाच काय, तुमच्या पुढच्या सात पिढ्यांना जागा राहिली नाहीये इथं!
आणि जी माध्यमं व्यंगचित्रांचा गळा घोटतात, त्यांना आमच्यासारख्या सामान्य वाचकांचा गळा घोटणं काय अवघड होतं. किती आक्षेपाची पत्रं त्या काळात कचराकुंड्यांनी गिळली! शेवटी सत्तेवर असतो तोच ठरवतो की काय नैतिक आणि काय अनैतिक!
ज्या समाजातली विनोदबुद्धी नष्ट होते, तो समाज ‘जिवंत’ नसतोच! मुर्दाड असतो तो!
माफी असावी आर. के. माफी असावी की आमची बोंब कमी पडली!

field_vote: 
2.75
Your rating: None Average: 2.8 (4 votes)

प्रतिक्रिया

अगदी अगदी.
=================
कसे ते पहा.
१. विषय प्रतलातच का तपासावा? बिंदूवर, रेषेवर किंवा ३-डी स्पेसमधे का नाही?
२. ३६० च का? सर्व मुद्दे एकदा, दोनदा, तीनदा, असे घुसळत गेले कि ३६०*n इतके डीग्री चर्चा होईल.
३. एकाच प्रतलाचे ३६० का? वेगवेगळ्या प्रतलांच्या वेगवेगळ्या डिग्रीज का नाही?
४. ती इक्लिप्सवाली जॉमेट्री असते तिच्यात का नाही?
...
...
...

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

तुम्हालाही मार्मिक दिली आहे. बहुतेकांना आपण संतुलित असण्याचा आनंद देणे हीच काहींची युटिलिटी होऊन जाते. Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ठ्ठो !!!!!!!!! ROFL ROFL

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

ROFL ROFL ननिंचा प्रतिसाद "प्रतिसाद ऑफ द इयर" म्हणून घोषित व्हावा Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मुळीच नाही. ऐसी फक्त एकाच बाजूचे आणि सर्वच बाजूचे विचार येतात असे दोन्ही गवि म्हणालेले नाहीत. त्यांनी संतुलित नव्हे तर व्यवस्थित एका दिशेला झुकलेला प्रतिसाद दिला आहे. (खाली देखिल ते तेच (निरंजनने संतुलित का म्हटले) आश्चर्य व्यक्त करत आहेत.)
-------------
आम्ही* ज्यूरीत असतो तर हा प्रतिसाद कँडीडेट म्हणून खारीज केला असता.
------------------
म्हणजे मी.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

ऐसीवरच अश्या प्रकारची चर्चा होऊ शकते (सर्वसमावेशक प्रतिसाद मिळू शकतात इ.) याला मार्मिक म्हणणे म्हणजे संतुलित असण्याची युटिलिटी?

असो.

म्हणजे एकंदरित "संतुलित" असणे हे काही शिवी अशा अर्थाने घेण्याचं कारण नसलं तरी इन धिस पर्टिक्युलर केस, वरील ऐसीबाबतच्या विधानाला मार्मिक श्रेणी देण्यात ते संतुलितत्व कसं रिफ्लेक्ट होतं ते लक्षात आलं नाही पण ठीकच.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

एकंदरित "संतुलित" असणे हे काही शिवी अशा अर्थाने घेण्याचं कारण नसलं तरी...

संतुलित लोक भांडणात जज म्हणून वापरले जाऊ शकतात. शिवाय संतुलित असल्याने (गेले चार दिवसांचा, तो प्रवृत्तीवाला धागा यायचा, अपवाद सोडला तर) त्यावर टिका देखिल होत नाही. उलट संतुलित माझीच बाजू कशी मांडतोय म्हणून त्याची तारीफ होते. या सगळ्या स्वार्थापायी स्वतःला संतुलित दाखवण्याचा प्रयत्न काही लोक करतात. ते संतुलित नसतात तर कुंपणावरचे असतात. काय जिंकायला हवे याचेशी त्यांना मतलब नसतो. ती एक स्टॅटेजी आहे.

ऐसीबाबतच्या विधानाला मार्मिक श्रेणी देण्यात ते संतुलितत्व कसं रिफ्लेक्ट होतं

एकदम जायज सवाल.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

संतुलित लोक भांडणात जज म्हणून वापरले जाऊ शकतात.

संतुलीत लोक जज म्हणुन वापरणे पूर्ण चुकीचे आहे. कोर्टाचा जज सुद्धा कायदा सुव्यवस्थेच्या बाजुनी बायस्ड असतो आणि तसा तो असणे जरूरीचे आहे. Victim च्या बाजुनी बायस्ड असणे हे पण जज साठी जरुरीचे आहे.
ऐसी वरचे "संतुलित" लोक जज म्हणुन आले तर गुन्हेगारांच्या हक्का बद्दल नको तितके जागरुक राहील्यामुळे गुन्हेगारांना कधी शिक्षा देणार नाहीत.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

mercy to the culprit is cruelty to the victim ____ टॉम सॉवेल

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

याला मार्मिक म्हणणे म्हणजे संतुलित असण्याची युटिलिटी?

यालाच असं नाही, इन जनरल. ३६० मधल्या समोरच्या "व्ही"मधे असणार्‍यांसाठी

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

@नगरीनिरंजन

सगळ्यांनाच पैसा कमवायचाय. स्वीमिंगपूलवालं घर आणि दारात अगदी ऑडी-बिडी नसली तरी एखादी सेडन असल्याशिवाय आजकाल साधी समुद्रसपाटीवरचीही प्रतिष्ठा मिळत नाही. अशा वेळी भारतकुमार राऊतांनी खादीचे कपडे घालून चौथ्या खांबाला टेकून ज्ञानेश्वरी लिहावी अशी अपेक्षा ठेवणे अवघड आहे

हे आपल्यासारख्यांसाठी लागू पडत असेल. अपेक्षा कविता महाजनांनी व्यक्त केलीय आणि मला त्यांच्या बद्द्ल जी माहिती आहे त्यानुसार त्या आपल्या मतांशी प्रामाणिक रहाणारं जीवन जगतात; त्या ही अपेक्षा करू शकतात.
नंतरचा भाग मात्र अगदी मान्य. १००%

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

तेव्हा केतकर लोकसत्ताचे संपादक होते; त्यांनी संबंधितांशी बोलणी / पाठपुरावा करून पुस्तकांच्या जाहिरातींचे दर कमी करून घेतले. आजही ते इतर वृत्तपत्रांच्या तुलनेत अत्यल्प आहेत. म्हणजे इच्छाशक्ती असेल, तर काही गोष्टी करता येऊ शकतात

कल्पनाताई - इथेच आपली वैचारीक फारकत आहे. कोणाच्या दुसर्‍या प्रॉडक्ट्च्या जहीरातींनी पुस्तकांच्या जहीराती का सबसीडाइझ्ड कराव्यात? पुन्हा ह्यात तुमचे पुस्तके म्हणजे काहीतरी "बरच्या दर्जाचे" आणि "केप्र मसाले*" म्हणजे खालच्या दर्जाचे असा अविर्भाव आहे. त्या पेक्षा लेखकांनी दर्जेदार पुस्तके लिहावीत आणि प्रिमियम घेउन विकावीत असे मत माझे आहे.

-----
नोट
* : केप्र मसाले हे फक्त उदाहरण आहे. त्यांना जास्त दर होता का? ते लोकसत्तात जहीरात देत होते का नव्हते ह्या बद्दल काही विदा माझ्या कडे नाही. केप्र ची चव चांगली का बेडेकर, किंवा प्रविण ची ह्या विषयावर चर्चा नेवु नये.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

चांगली कल्पना आहे अनुताई. मी नक्की विचार करेन याचा.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

काय करू आता धरूनियां भीड
नि:शंक हे तोंड वाजविलें
नव्हे जगीं कोणी मुकियाचा जाण
सार्थक लाजोनि नव्हे हित

लेखकांनी इतकी उत्कृष्ट पुस्तके लिहावीत की वाचकांना प्रसंगी ती प्रीमियम देऊन विकत घ्यावीशी वाटावीत, हा विचार खरोखरच रॅडिकल आहे. सहमत आहे.

..........

(पण हे मार्केटमध्ये व्हायेबल असावे काय? चांगल्या लेखनास एवढी डिमांड असावी काय?)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

(पण हे मार्केटमध्ये व्हायेबल असावे काय? चांगल्या लेखनास एवढी डिमांड असावी काय?)

माझ्या मते असावी. उलट माझ्या ओळखीत आता डिस्क्रेशनरी पैसा मध्यमवर्गीय लोकांकडे बर्‍यापैकी आल्यामुळे पुस्तकांवरचा खर्च बराच वाढला आहे.

माझा मुळ मुद्दा, लेखकांनी समाजाकडुन सबसीडी कींवा Special Treatment ( As if they are disabled ) ची अपेक्षा करण्यापेक्षा चांगले काहीतरी करावे. कल्पनाताईंच्याच आयन रँड च्या उदाहरणात दिसते की तिची कादंबरी कोणी घेत नव्हते छापायला, पण म्हणुन ती काहीतरी सुमार लिहायच्या मागे लागली नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

लोक पुस्तकं घेऊन वाचत नाहीत आणि जाहिराती स्टँडर्ड बाजारच्या दरात परवडत नाहीत म्हणून कमी दरात जाहिराती देऊन आणि अन्य मार्गाने छापील पुस्तकांना सीपीआर देण्याचा उद्देश काय? आपल्याला पुस्तकं वाचून खूप आनंद मिळाला. आता समजा बहुसंख्यांना ती तितकीशी हवीशी वाटत नाहीत याचा अर्थ त्यांचा आनंद मिळवण्याचा एक मार्ग मागे पडला.. म्हणून तो टिकूनच राहिला पाहिजे असे नव्हे. हलगीवादन ऐकण्यात एकेकाळी अनेकांना आनंद होत असेल, आता हलगीला मागणी नाही म्हणून सबसिडाईज्ड हलगीवादन चालवण्यापेक्षा ते मागे पडू द्यावे.\

उदा. "क्ष"च्या आयुष्यात त्याने अनेक आनंदाचे क्षण अनुभवले, म्हणून "य","झ" इत्यादिंनी "क्ष"चाच जन्म घेऊन त्याच्याच मोडॅलिटीज वापरुन तेच आनंद मिळवले पाहिजेत असे आहे का? तशी क्ष ची इच्छा असणे ठीक, पण तसं घडत राहिलं पाहिजे अशी अपेक्षा चूक वाटते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

हे एकदम सोपं आहे. केतकर संघद्वेष्टे आहेत म्हणून पुरोगाम्यांत प्रिय आहेत. आपल्या प्रिय व्यक्तिची प्रत्येक कृती समर्थनीय वाटते हा मनुष्यस्वभाव आहे. भारत कुमार राउत हे शिवसेनेचे. त्यातली त्यात हिंदीत आणि मराठीत भडक हिंदुत्ववादी लिहिणारे. मग त्यांचे वाणिज्यिक निर्णय का असेनात, झोडावे वाटणारच!!! It is simple as that.
---------------------
बाकी तुमच्या मताशी शतशः सहमत.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

बाकी तुमच्या मताशी शतशः सहमत.

@अजो - हे मला आहे का कल्पनाताईंना उद्देशुन?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माझा अख्खा प्रतिसाद तुम्हाला उद्देशून आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

यांना आर. के. लक्ष्मण यांनी अजून माफ केलं नाही?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

..."आर. के. लक्ष्मण! यांना माफ करा!! (कारण या काय लिहितात, ते यांचे यांनाच कळत नाही!!!)" अशा अर्थाने काय?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

खरोखरच. लक्ष्मण यांच्या मृत्यूदिनी इतके भडक लिहून त्यांच्या तत्त्वज्ञानाचा अवमान केला आहे. दु:ख आणि वैषम्य वाटावं अशा कितीतरी भयानक स्थितींना लक्ष्मण यांनी व्यंगाची झालर दिली. तेव्हा एका सामान्य प्रश्नासाठी (योग्य व अयोग्यही) त्यांना मधे ओढून असे लिहायला नको होते. लक्ष्मण म्हटले हा लेखही आठवावा असे होऊ नये म्हणजे झाले. लक्ष्मणा माफी (लक्ष्मणा धाव च्या चालीवर)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

लक्ष्मण म्हटले हा लेखही आठवावा असे होऊ नये म्हणजे झाले.

नो सच फिअर. पण भावना पोचल्या.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

अशाच अर्थाने असे नव्हे. पण चर्चेची गाडी जी १०-१२ स्टेशनं फिरून आली तेवढ्या वेळात कोणीपण कोणालापण माफ केला असता.

म्हणून तुम्हाला सांगतो आर. के. लक्ष्मण, की यांना आपलं म्हणा!!

असो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

लेखातील भावनेशी सहमत!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

पाने