पनीर पराठा
मंडळी, हा माझी पहिलीच पाककृती आहे.
साहित्य:
किसलेले पनीर १ कप
मटर १/२ कप
आल ,लसूण,हिरवी मिरची पेस्ट
किसलेला कांदा १ कप
गरम मसाला
धना पावडर
जिरे
आमचूर पावडर
मीठ
तेल
कणिक
कृती :
फ्रोझन मटार गरम पाण्यात ५ मिनिटे उकडून घ्या.नंतर मिक्सर मध्ये थोड बारीक करा.
एका कढईत तेल तापवून घ्या. मग त्यात जिरे टाका.
जिरे तडतडले कि आल-लसुण,हिरवी मिरची पेस्ट टाकुन चांगल परतुन घ्याव.
नंतर किसलेला कांदा टाकून चांगला परतुन घ्या.
त्यात गरम मसाला, आमचूर पावडर , धना पावडर ,मीठ (चवीनुसार) टाका.
बारीक केलेले मटार टाकून नीट एकत्र करा.
थोड्यावेळाने किसलेले पनीर टाका.
झाकण ठेऊन एक वाफ काढा.
हे झाले तुमचे मिश्रण तयार ......
थोडे मिश्रण थंड झाले कि पुरणपोळी सारखे भरून घ्या व हलक्या हाताने, हळु हळु फिरवत चपाती प्रमाणे लाटुन घ्या.
मग पराठा अलगद उचलुन तव्यावर टाकुन, मध्यम आचेवर थोड लोणी सोडुन खमंग भाजुन घ्यावा.
गरमागरम पनीर पराठा ताज्या दह्या /लोणच्या बरोबर, किंवा चटणी,केचप सोबत खावा.
प्रतिक्रिया
अरे वा!
अरे वा!
-सविता
----------------------------
|| स्वतः मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही ||
छान!
पाकृ छान!
ऐसी अक्षरेवर स्वागत!
- ऋ
-------
लव्ह अॅड लेट लव्ह!
छान सोपी पाकृ
छान
सोपी पाकृ
.
धन्यवाद.....
धन्यवाद.....
सयुरी अफलातून पाकृ आहे. मस्तच
सयुरी अफलातून पाकृ आहे. मस्तच लागत असेल.
अरे वा, आमच्याकडेपण
अरे वा, आमच्याकडेपण तुमच्याकडच्या सारख्याच ताटल्या आहे. हेच नव्हे, आमच्याकडेपण असाच पनीर पराठा करतात. हेवी असतात पण हे पराठे. पाकृसाठी - चान चान!
-अनामिक
ताटल्या
या ताटल्या किती लोकांकडे बघितल्या आहेत याची गणती विसरलो. आमच्याकडेही आहेत हे वे सां न ल. पराठेदेखील साधारण असेच करतात. त्यामुळे अगदी घरच्यासारखं वाटलं.
तोंपासु
तै.
मटार मिक्षर मधून काढण्याची आयडीया उत्तम. मटार अन कांदा नीट शिजले नाही, तर पराठा नीट लाटला जात नाही ;;)
>बल्लवाचार्य<
आडकित्ता
-: आमचे येथे नट्स क्रॅक करून मिळतील :-
म्म्म्म्म
फोटो पाहून तोंडाला पाणी सुटले. फोटो मस्त आले आहेत. कणीक पुरण पोळीसारखीच सैल मळावी लागते का?
शेवटच्या फोटो मध्ये चटणी-लोणचे कोणते आहेत? डावीकडची सुकी दाण्याची चटणी आहे का?
लसणाची सुकी चटणी वाटते.
लसणाची सुकी चटणी वाटते.
हो,सुकी दाण्याची चटणी आहे
हो,सुकी दाण्याची चटणी आहे ती.
कणीक नेहमी सारखी च पण मऊ मळावी.
ते सॉस नको होतं
पराठा इतका झक्कास केलाय, की नुस्ता विरघळेल तोंडात. ते टोमॅटो सॉस कशाला वाढलंय? ;;)
-: आमचे येथे नट्स क्रॅक करून मिळतील :-