Skip to main content

उद्धटपणावर इलाज

अनेक कुटुंबात घरातील लहान मुले, टीनेजर्स, तरूण मुलेमुली ही काहीवेळा विचित्र वागतात...आईवडीलांचे ऐकत नाहीत, व्यसनाधिनतेकडे वाटचाल सुरु होते किंवा घरातलं वागणं विचित्र बनतं, उध्दटपणे उत्तरे देतात तेव्हा पालकांनी भगवतगीतेतील पुढील मंत्राचा उपयोग करुन पहावा...काही काळातच फरक नक्की दिसुन येईल ( उत्तम संस्कार,सुसंवाद आणि शिस्त यांच्या जोडीने हा प्रयोगही अवश्य करुन पहा)

१) दिलेल्या मंत्राचा जप संबंधित मुलामुलींनी स्वत: रोज किमान ११ वेळा जप करणे योग्य असेल. रोज सकाळी आंघोळीनंतर मंत्राचा जप पूर्वाभिमुख बसुन श्रध्देसहित ११ वेळा करावा आणि भगवान श्रीकृष्णांचे स्मरण करावे
२) मुलगा किंवा मुलगी हा मंत्रजप करायला तयार नसतील तर आईवडील किंवा पालकांनी मुलांच्या नावे संकल्प करुन "माझा मुलगा/मुलगी चि.XXX याला उत्तम बुध्दीप्राप्ती होऊन, त्याची/तिची सन्मार्गाकडे वाटचाल सुरु व्हावी, त्याला/तिला सदबुध्दी प्राप्त होऊन, वाईट/अशुभ/असंस्कृतिक/अनैतिक गोष्टींपासुन त्याचे संरक्षण व्हावे" असा संकल्प करुन रोज सकाळी आंघोळीनंतर ११ पेक्षा अधिक म्हणजे ३३ किंवा १०८ वेळा या मंत्राचा जप मनापासुन करावा व भगवान श्रीकृष्णांचे स्मरण प्रार्थना करावी.

३) या मंत्र सुवाच्च अक्षरात नीट लिहुन मुलांच्या अभ्यासिकेत किंवा जिथे त्यांची नजर जाईल अशा कुठल्याही ठिकाणी/भिंतीवर लॅमिनेशन करुन/फोटोफ्रेम करुन लावावा. जेणेकरुन त्या मंत्रावर लक्ष जाऊन आपोआप वाचन होऊ शकेल

मंत्र:- ॥ नष्टो मोह: स्मृतिर्लब्धा त्वत्प्रसादान्मयाच्युत ।
स्थितोsस्मि गतसन्देह: करिष्ये वचनं तव ॥ (अध्याय १८, श्लोक ७३)

( अर्थ:- हे अच्युत (भगवान श्रीकृष्ण) तुमच्या कृपेने माझा मोह नष्ट झालेला असुन मला उत्तम, सत्य अशी स्मृती प्राप्त झालेली आहे. मी संदेहरहित होऊन तुमच्या आज्ञेचे पालन करेन )

** . या मंत्राने विवेकजागृती होऊन, मुले सन्मार्गाकडे वळतात. बुध्दी-ज्ञान-स्मरणशक्तीतही वाढ होते. स्वभाव बदलतो, स्वभावातील अहंकार,माज,मुढता,अविवेक, उध्दटपणा हळुहळु नष्ट होऊ लागतो. मंत्रशक्तिवर ज्यांची पुर्ण निष्ठा आहे, त्यांनी संपुर्ण श्रध्देसहित भगवान श्रीकृष्णांना शरण जाऊन या मंत्राची उपासना करावी आणि फरक पड्ताळुन पहावा ही विनंती**

(((जपसंख्येच्या पेक्षा जास्त कितीही जप केला तरी चालेल. अधिकस्य अधिकं फलं या उक्तिनुसार जप जास्त करायला हरकत नाही)))

**लोककल्याणार्थ ही पोस्ट माझ्या नावासहित शेअर करावी ही नम्र विनंती***

-सचिन मधुकर परांजपे (पालघर)
ज्योतिष-भाग्यरत्न मार्गदर्शक

अजो१२३ Sun, 10/08/2014 - 20:05

In reply to by गब्बर सिंग

१. संस्कृत नि उर्दूमधे इतके अंतर का ठेवले आहे?
२. मी एडिट मोडमधे कितीही ओळींचे अंतर ठेवले तरी प्रकाशित होताना शेवटी एकच ओळीचे अंतर उरते. तुम्हास अधिकांतराची कला कशी सिद्ध झाली?
३. पाच वर्षांचा असताना लाड करावे, दहाचा असताना बदडावे, पण सहा, चार, नऊ , आठ, चौदा इ वयात काय करावे?
४. आणि हे सगळं तुमच्या सहित ते स्वातंत्र्य, इ जे लिहिलं आहे त्याच्याशी कसं मॅच होतं? स्वातंत्र्य कोणत्या वयात (द्यायला वा) असायला हवं?
---------------------
सहसा कोणत्याही व्यक्तिचा निष्कारण कोणाशी उद्धटपणे वागण्याचा हेतू नसतो. असलाच तर अशा व्यक्तिच्या मनात ममत्व निर्माण करण्याचे मार्ग नि कारणे वेगळी आहेत. कोणताही मंत्र कितीदाही म्हटला तर शष्प फरक पडू नये.

'न'वी बाजू Sun, 10/08/2014 - 20:11

In reply to by अजो१२३

पाच वर्षांचा असताना लाड करावे, दहाचा असताना बदडावे, पण सहा, चार, नऊ , आठ, चौदा इ वयात काय करावे?

(पहिली) पाच वर्षे लाड करावे, (पुढली) दहा वर्षे बदडावे, इ.इ.

नगरीनिरंजन Sun, 10/08/2014 - 20:19

In reply to by अजो१२३

२. मी एडिट मोडमधे कितीही ओळींचे अंतर ठेवले तरी प्रकाशित होताना शेवटी एकच ओळीचे अंतर उरते. तुम्हास अधिकांतराची कला कशी सिद्ध झाली?

.
.
.
असे पांढरे ठिपके देऊन.

३. पाच वर्षांचा असताना लाड करावे, दहाचा असताना बदडावे, पण सहा, चार, नऊ , आठ, चौदा इ वयात काय करावे?

पंचवर्षाणि म्हणजे पाच वर्षाचा असताना असे नसून पाच वर्षे असा अर्थ आहे (बहुवचन).
म्हणजे पाच वर्षे लाड करावेत, दहा वर्षे मारुन शिस्त लावावी आणि सोळावे लागले की पुत्राशी मित्राप्रमाणे आचरण करावे असा अर्थ आहे एवढे सांगून मी (सुद्धा न'व्या' फ्याशनप्रमाणे) खाली बसतो.

नगरीनिरंजन Mon, 11/08/2014 - 04:56

In reply to by मिसळपाव

अर्थातच. पण गब्बरसिंगांनी ती कला कशी साधली या प्रश्नाचे ते उत्तर होते.
अजोंना एचटीएमएल ट्याग्स बहुतेक माहित नसावेत फारसे असा अंदाज बांधतो.

अजो१२३ Sun, 10/08/2014 - 20:20

In reply to by अजो१२३

वर ४ मधे तुमच्या सहित असं जे लिहिलं आहे त्याचं स्पेलिंग चुकलं आहे. ते तुमच्या सहीत असं आहे.

............सा… Sun, 10/08/2014 - 18:15

उद्धटपणा हा संप्रेरक बदलावांमुळे मुळे देखील असू शकतो, पौगंडावस्थेत स्व (आयडेंटीटी) शोधण्याचा परीपाकही असू शकतो किंवा भवतालच्या परीस्थितीत आपण कसे फिट होतो त्याची चाचपणीही असू शकते - त्याला श्लोक पठन हा उपाय कसा असू शकेल?
एखाद्या श्लोकाच्या सततच्या पठनामुळे चित्त स्थिर होण्यास मदत होत असेल. पण मग ते कोणत्याही श्लोकाने व्हावे.

आडकित्ता Sun, 10/08/2014 - 22:36

मद्दडपणे पोस्ट ढकलण्यासाठी व्हॉट्सॅप अन फेसबुक उपलब्ध होतेच. ऐसीने हे पिन्याकल गाठल्याचे पाहून डोळे निवले.

यावर 'ऐसी'चे नेमके काय नियंत्रण, ते कळू शकले नाही.

प्रस्तुत लेख 'ऐसी'चालकांनी कमिशन करून, लिहवून घेतला असावा, याबद्दल प्रचंड साशंक आहे.

अजो१२३ Mon, 11/08/2014 - 11:30

In reply to by 'न'वी बाजू

महामार्मिक. यात ऐसीला मधे ओढायची काय गरज आहे?
--------------------------
माध्यमाचं उपयोजन करणाराचं स्वातंत्र्य हे माध्यमाचं सर्वोच्च मूल्य असावं, जे इथे आहे.

गब्बर सिंग Mon, 11/08/2014 - 05:30

मला नेहमी पडलेला हा प्रश्न हा आहे - की आईवडील उद्धट असूच शकत नाहीत का ? ... आईवडीलांचे मुलांप्रति वर्तन हे नेहमीच परफेक्ट च का मानले जाते ? उद्धटपणा हे विशेषण फक्त "वयाने मोठे असलेल्यांनी" "वयाने लहान असलेल्यांसाठीच" वापरायचे असते का ? बाय डेफिनिशन ??

'न'वी बाजू Mon, 11/08/2014 - 06:29

In reply to by गब्बर सिंग

उद्धटपणा हे विशेषण फक्त "वयाने मोठे असलेल्यांनी" "वयाने लहान असलेल्यांसाठीच" वापरायचे असते का ? बाय डेफिनिशन ??

थोडेसे "फडतूस" या विशेषणासारखेच आहे, नाही? As in, it goes one way. By definition, perhaps?

(बाकी, "उद्धटपणा" हे विशेषण नाही. भाववाचक नाम आहे बहुधा, असे वाटते. (चूभूद्याघ्या.) पण विशेषण निश्चितच नाही.)

............सा… Mon, 11/08/2014 - 18:02

In reply to by गब्बर सिंग

उद्धटपणाची व्याख्या ही असावी की लहानांनी मोठ्यांप्रति केलेले दुर्वर्तन. उलटून बोलणे, न ऐकणे, आगाउपणे वागणे आदि.
_____

आईवडील मुलाची हेळसांड करु शकतात. लहान मुलं आईवडीलांची हेळसांड करु शकत नाहीत कारण परत - व्याख्या.
____

'न'वी बाजू Mon, 11/08/2014 - 06:40

** ... या मंत्राने विवेकजागृती होऊन, ... स्वभाव बदलतो, स्वभावातील अहंकार,माज,मुढता,अविवेक, उध्दटपणा हळुहळु नष्ट होऊ लागतो. ... **

**लोककल्याणार्थ ही पोस्ट माझ्या नावासहित शेअर करावी ही नम्र विनंती***

का कोण जाणे, परंतु प्रस्तुत लेखकाने या मंत्रजपाचा लाभ स्वतः घेतला नसावा, अशी शंका येते.

मी Mon, 11/08/2014 - 13:52

In reply to by 'न'वी बाजू

लोककल्याण झालं नाही तर कोणाला पकडायचं हे कळण्यासाठी नाव पाहिजे की.

आदूबाळ Mon, 11/08/2014 - 14:08

In reply to by 'न'वी बाजू

लोककल्याणार्थ

विवेकजागृती १ - अहंकार ०

माझ्या नावासहित शेअर करावी

विवेकजागृती १ - अहंकार १

ही नम्र विनंती

विवेकजागृती २ - अहंकार १

इंज्युरी टैममध्ये काय होणार हे धागाकर्त्याचे प्रतिसाद वाचून ठरवले जाईल.

तिरशिंगराव Mon, 11/08/2014 - 13:21

उद्धट मुलाला/मुलीला संस्कृत येत नसेल तर त्यांना त्याचा अर्थ कसा समजणार ? आणि समजला तरी, भौतिक सुख हेच परमोच्च आहे, अशा आविर्भावात वावरणार्‍या
तरुण पिढीला मोहातून मुक्त होण्याआधीच, मी मोहमुक्त झालो आहे, असे खोटे बोलायला लावणार का ?

गवि Mon, 11/08/2014 - 13:50

मुलगा किंवा मुलगी हा मंत्रजप करायला तयार नसतील तर

इन रेअर केस, मुलगा किंवा मुलगी यांनी ते मंत्रजप करायला तयार नाहीत असं नम्रपणे सांगितलं तर ?

तरीही त्यांच्यावतीने पालकांनी पुढचे करावे का? अशी शंका आली.

कारण उपरोक्त नम्र नकारातून खालील महत्वाच्या गोष्टी आगोदरच साध्य झाल्याचे सिद्ध व्हावे:

माझा मुलगा/मुलगी चि.XXX याला उत्तम बुध्दीप्राप्ती होऊन, त्याची/तिची सन्मार्गाकडे वाटचाल सुरु व्हावी, त्याला/तिला सदबुध्दी प्राप्त होऊन,

बाकी उद्धट मुलांवर हा जालीम मंत्रोपाय करुन बघायला हरकत नाही.