Skip to main content

पत्रिकामेलन, बर्नार्ड सिल्वरमान यांचा प्रयोग आणि प्रा. य. ना. वालावलकरांची दिशाभूल

आजच्या मटा मध्ये प्रा. य. ना. वालावलकर यांनी पत्रिकामेलना संदर्भात एक स्फुट लिहीले आहे. त्यांनी बर्नार्ड सिल्वरमान नावाच्या एका प्राध्यापकाने केलेल्या प्रयोगाचा हवाला देऊन पत्रिकेच्या मदतीने विवाह स्थैर्य ठरवणे अयोग्य असल्याचे म्हटले आहे. बर्नार्ड सिल्वरमान यांच्या प्रयोगाची माहिती नेट्वर मिळवायचा प्रयत्न केला पण मला प्राथमिक अहवाल मिळाला नाही. जे संदर्भ मिळाले ते दुय्यम दर्जाचे आहेत (म्हणजे प्रयोगाकडे बोट दाखविणारे. त्यातून लक्षात आलेली महत्त्वाची गोष्ट म्हणजे बर्नार्ड सिल्वरमान यांनी फकत रविराशी त्यांच्या प्रयोगासाठी विचारात घेतल्या. प्रा. य. ना. वालावलकर या मर्यादेबद्दल ब्र ही काढत नाहीत आणि बर्नार्ड सिल्वरमान यांच्या प्रयोगाबद्दल दिशाभूल करणारी माहिती देतात (कारण पत्रिकामेलन फक्त रविराशींवर अवलंबून नसते)

सत्य जाणून घेण्यसाठी मला बर्नार्ड सिल्वरमान यांच्या प्रयोगाचा मूळ अहवाल मला हवा आहे. कुणी शोधायला मदत केली तर मी आभारी असेन.

तर्कतीर्थ Wed, 15/05/2013 - 14:21

श्री घाटपांडे,

त्यांच्याकडे रविराशीचक्र वापरले जात असले तरी वैवाहिकस्थैर्य फकत रविराशीवर बघितले जात नाही. ते बघण्यासाठी दोन्ही पत्रिकांमध्ये असलेले ग्रह एकमेकांशी काय योग करतात हे पाहिले जाते. नमुना म्हणून एक यादी खाली देत आहे.

या लेखात ही सर्व चर्चा केलेली आहे. मुळात चुकीच्या पद्धतीने चाचण्या घेण्याचा खोडसाळपणा आता थांबायलाच हवा.

बाकी दांडेकरानी त्यांच्या तपासण्याच्या मर्यादा त्यांच्याच लेखात स्पष्ट केल्या आहेत.

ऋषिकेश Wed, 15/05/2013 - 14:38

प्रा. वालावलकरांच्या लेखनात रविराशींचा उल्लेख नाही हे खरे असले आणि तुम्हाला दिसलेल्या सारांशाचा निर्देश तेथे(रविराशींकडे) असलेही, तरी मुळ सिल्वरमान यांच्या प्रयोगात हे पत्रिकामेलन कश्याप्रकारे झाले होते ते विस्ताराने समजल्याशिवाय / समजेपर्यंत खोडसाळपणाचा आरोप बिनबुडाचा वाटतो.