इतर

https://121clicks.com/

स्पर्धा का इतर?: 

कायगाव टोका, प्रवरासंगम येथिल शिल्पे: भारतीय दृष्यकलेचा आगळा नमुना

कायगाव औरंगाबादपासून तीसेक किलोमिटर अंतरावर आहे. अजंठा आणि वेरूळच्या लेण्यांनी या मंदिराला फुटेज मिळण्याची संधिच दिली नसल्याने असेल. पण गोदावरी नदीच्या काठावरचे हे भलत्याच सुंदर लोकेशनवर असलेले हे मंदिर थोडेफार प्रसिद्ध व्हायला हरकत नाही. भारतभर मंदिरे पाहत हिंडणाऱ्या वास्तुविशारद मित्राने मला जवळजवळ ढकलत हे मंदिर दाखवायला नेले म्हणून अन्यथा माझ्या इनर्शियाला सीमा नाही. या मंदिराचा त्याने घेतलेला व्हिडिओ येथे: https://youtu.be/RZ06VNlpboM प्रथमतः पाहिले तेव्हाच ह्या मंदिरातल्या शिल्पांनी मन मोहून घेतले होते.

स्पर्धा का इतर?: 

करोना फोटोफीचर - अंत्यसंस्कार(२) - मंदार देशपांडे

इंटीरियर डिझायनर, कापड व्यावसायिक, कार डीलर, बांधकाम कंत्राटदार असे विविध व्यावसायिक लोक करोनाच्या काळात रुग्णांचे अंत्यसंस्कार करत आहेत. मंदार देशपांडे यांनी काढलेले त्यांचे काही फोटो.

स्पर्धा का इतर?: 

करोना फोटोफीचर - अंत्यसंस्कार - मंदार देशपांडे

करोनामुळे कमाई बंद झालेले काही रिक्षाचालक आणि रंगारी यांसारखे व्यावसायिक सध्या रुग्णांचे अंत्यसंस्कार करत आहेत. त्याची ही छायाचित्रे -

स्पर्धा का इतर?: 

करोना फोटोफीचर - लॉकडाऊन लग्न - मंदार देशपांडे

ऐन लॉकडाऊनमध्ये लग्न करायचं झालं तर? सोशल डिस्टन्सिंग पाळून एका जोडप्याचं पुण्यात लग्न झालं, आणि तेदेखील पोलिसांच्या आशीर्वादाने!

स्पर्धा का इतर?: 

करोना फोटोफीचर - आळंदी लॉकडाऊन - मंदार देशपांडे

दर वर्षी पालखीच्या वेळी आळंदी भक्तांनी फुलून जाते. या वर्षी मात्र करोनामुळे ज्ञानेश्वर महाराजांचं मंदिर आणि परिसर सील केला गेला होता. अनेक लोकांना त्यांच्या हयातीत प्रथमच आळंदी अशी दिसली. मंदार देशपांडे यांनी काढलेले या लॉकडाऊन आळंदीचे हे काही फोटो.

स्पर्धा का इतर?: 

करोना फोटोफीचर - स्वॉब सेंटर - मंदार देशपांडे

करोनाच्या काळात स्वॉब टेस्टिंग हा प्रकार आपल्या परिचयाचा झाला. जिथे स्वॉब घेतले जातात त्या केंद्रात काम करणाऱ्यांना सतत PPE घालून वावरावं लागतं नाही तर त्यांना संसर्ग होण्याचा धोका संभवतो. मंदार देशपांडे या पुण्यातील फोटोग्राफरने अशाच एका केंद्रात काढलेले हे फोटो आपल्याला बातम्यांच्या पलीकडचं वास्तव दाखवतात.

स्पर्धा का इतर?: 

करोनातील पुणे - एक फोटोफीचर - अभय कानविंदे

करोनामुळे जे लॉकडाऊन झालं त्यात आपलं सुपरिचित गाव वेगळंच दिसू लागलं. फोटोग्राफर अभय कानविंदे यांनी असं पुणं आपल्या कॅमेऱ्यात पकडलं. त्यातले काही निवडक फोटो. प्रतिमाच इतक्या बोलक्या आहेत की शीर्षक वगैरे देण्याची काही गरजच नाही...

Abhay Photo 01

Abhay Photo 04

स्पर्धा का इतर?: 

हम आपकी आँखों मे |

‘हम आपकी आँखोंमे’
गुरुदत्तच्या चित्रपटातल्या गाण्यांमध्ये शक्यतो आधी संगीत सुरु झालं आणि मग गाण्याचे बोल आले असं होत नाही पण प्यासा पिक्चरमधलं ‘हम आपकी आँखोंमे इस दिल को बसा दे तो’ गाण त्याला अपवाद आहे. असं म्हणतात की ‘ It does not happen by accident but it happens by design.’ हे गाणं, गाण्याच्या आधीचा आणि नंतरचा सीन पाहिला की या गाण्याची संपूर्ण रचना उलगडते. ज्यांनी प्यासा पाहिलाय त्यांच्या हे लगेच लक्षात येईल.

स्पर्धा का इतर?: 

पिफ ला हजर राहिल्या नंतर

'पिफ' आता संपत आले आहे. म्हणून त्याविषयी धागा सुरु करत आहे. समीक्षा करण्याची माझी कुवत नसल्याने, हा चर्चेचा धागा कलादालनात लिहित आहे. तिथले चित्रपट पाहून आलेल्या माझ्या सारख्या सामान्य प्रेक्षकांनी व बुजुर्गांनी यांत लिहावे, अशी विनंती आहे.
मला त्यातले विझलस टेल, टॉल टेल्स, मोसाद, पोर्ट्रेट ऑफ ए लेडी ऑन फायर, वन्स अपॉन अ टाईम इन अनातोलिया, केडी हे चित्रपट आवडले. तर मराठी विभागात, वाय, स्माईल प्लीज उल्लेखनीय वाटले.
स्वालोज ऑफ काबुल हा वॉटर कलर च्या माध्यमातून ॲनिमेशन केला असल्यामुळे अद्वितीय वाटला. गोष्टही छानच आहे.

स्पर्धा का इतर?: 

पाने

Subscribe to RSS - इतर