समाज

अनश्व रथ, पुष्पक विमान आणि आपण सर्व - रवींद्र रु. पं. : लेखांक पहिला

'आजचा सुधारक' या मासिकात रवींद्र रुक्मिणी पंढरीनाथ यांनी सप्टेंबर, ऑक्टोबर व नोव्हेंबर २०१४ या तीन अंकात 'अनश्व रथ, पुष्पक विमान व आपण सर्व' या शीर्षकाची एक लेखमाला लिहिली आहे. संघ ह्या विषयावर आतापर्यंत पुरोगाम्यांनी केलेले विश्लेषण अपुरे व सदोष आहे, त्यात आत्मटीकेचा अभाव आहे असे वाटल्याने रवींद्र यांनी हे लेखन केले आहे. हे लेख वाचल्यावर मला असं वाटलं की 'ऐसी अक्षरे'वर ते शेअर करावेत. 'ऐसी अक्षरे'च्या वाचकांना हे लेख आवडतील आणि त्यातून एक चांगलं विचारमंथन घडेल असं मला वाटतं. त्यामुळे रवींद्र रू. पं. यांच्या परवानगीने हे लेख इथे मी शेअर करतो आहे.

धाग्याचा प्रकार निवडा: : 
माहितीमधल्या टर्म्स: 

बॉक्सिंग या खेळप्रकारावर बंदी घातली पाहिजे!

प्रियांका चोप्रा या सेलिब्रिटीने काम केलेल्या मेरी कोम हा चित्रपट खोर्‍यांने पैसे कमवत असताना किंवा सरितादेवी या महिला बॉक्सिंगपटूच्या अगम्य वागणुकीमुळे माध्यमांना चघळण्यासाठी भरपूर काही मिळत असताना बॉक्सिंग हा खेळच नको अशी भाषा करणार्‍याला वेड्यात काढण्याची शक्यता जास्त आहे.

धाग्याचा प्रकार निवडा: : 
माहितीमधल्या टर्म्स: 

पुस्तक परिचय - अंधारछाया कादंबरी

पुस्तक परिचय - अंधार छाया

प्रत्येक व्यक्तिमत्वाच्या छायेत अंधार लपलेला असतो. त्याचा शोध घेणारी आत्मनिवेदनात्मक, सत्य घटनेवर आधारित कादंबरी... कै ती दादांना व कै आईस सादर समर्पित...

धाग्याचा प्रकार निवडा: : 
माहितीमधल्या टर्म्स: 

डॉ. नरेंद्र दाभोळकांच्या कार्याचा पाकिस्तानच्या वर्तमान पत्रात गौरवपुर्ण उल्लेख

एका बातमीवर आधारीत सदर छोटेखानी धागा इथे हलवला आहे.

धाग्याचा प्रकार निवडा: : 
माहितीमधल्या टर्म्स: 

स्वागत २०१४ च्या दिवाळी अंकांचे - २: अनुभव

दीप्ती राऊत यांची 'जातीच्या जोखडात' ही डायरी विलक्षण हादरवून सोडणारी. अगदी क्वचित येणारं एखादं मूल्यमापनात्मक वाक्य वगळता, 'जसं पाहिलं तसं' नोंदवत गेल्याने नोंदींच्या पक्षपातीपणाचा/झुकलेपणाचा आरोप टळतो आणि मूळ घटनांमधील रखरखीत वास्तव थेट तुमच्या मनावर आघात करते.

मयुरेश प्रभुणे यांची मंगळ मोहिमेबद्दल माहिती सांगणार लेख अभ्यासपूर्ण विस्तृत नि सांगोपांग.

धाग्याचा प्रकार निवडा: : 
माहितीमधल्या टर्म्स: 

थॉमस गे (वॉटरफील्ड) ICS

१९६२-६३ च्या काळामध्ये मी पुणे विद्यापीठामध्ये एम.ए,च्या पहिल्या वर्षात असतांना संध्याकाळी एक गोष्ट नेहमी दिसायची. विद्यापीठाच्या मुख्य इमारतीसमोर जिमखान्यावरून विद्यापीठाकडे येणार्‍या (बहुतेक) 11B बसचा शेवटचा थांबा होता आणि संध्याकाळी गावात परतणारे विद्यार्थी-विद्यार्थिनी तेथे बसची वाट पाहात उभे असत. माझा बसशी काही संबंध नव्हता कारण माझे येणेजाणे सायकलने होत असे. तरी पुष्कळदा असे पाहिले होते की ५५-६० वयाचे एक गोरे उंच गृहस्थ आपली प्लिमथ अथवा अशीच काहीतरी जुनी गाडी तेथे थांबवून चारपाच जणांना गाडीत घेऊन गावाकडे जात. हे इंग्रज गृहस्थ कोण होते ह्याची मात्र चौकशी मी कधी केली नाही.

पुढच्या वर्षी यूपीएससीच्या भारतीय उच्च सेवांच्या भरतीच्या स्पर्धापरीक्षेला बसायचे मी ठरविले. अशा विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी काहीसा विस्कळित प्रयत्न विद्यापीठाने सुरू केला होता त्यामध्ये मी दाखल झालो आणि त्या प्रयत्नाचे संचालक म्हणून असलेल्या ’थॉमस गे’ ह्या निवृत्त ICS अधिकार्‍यांशी माझा परिचय झाला आणि आपल्या गाडीतून रोज काही विद्यार्थ्यांना लिफ्ट देणारे ते हेच असे मला कळले. (त्यानंतर ५-६ वर्षांनी महाराष्ट्र शासनाने पुढाकार घेऊन आर्थिक साहाय्य दिल्यामुळे अधिक पद्धतशीर प्रयत्न विद्यापीठातील इंग्रजीचे ख्यातनाम प्राध्यापक एस नागराजन् ह्यांच्या संचालकत्वाने सुरू झाला तत्पूर्वीची ही गोष्ट आहे.) तर्खडकर पठडीचे वरणभात इंग्रजी शिकलेल्या आम्हांसारख्या विद्यार्थ्यांना इंग्रजी बोलण्या-लिहिण्याचा सराव देऊन स्पर्धापरीक्षेसाठी तयार करणे असा हा प्रयत्न स्वत: थॉमस गे, निवृत्त मेजर जनरल य.श्री. परांजपे असे काहीजण वैयक्तिक पातळीवर करत होते तीनचार महिने मी अशा व्यक्तींच्या, विशेषत: थॉमस गे ह्यांच्या सहवासामध्ये होतो. दिलेल्या विषयावर इंग्रजीमध्ये निबंध लिहिणे हा एक पेपर परीक्षेमध्ये असे त्याची आणि यूपीएससी पॅनेल समोरच्या अखेरच्या मुलाखतीची तयारी हे दोघे आमच्याकडून करून घेत असत. (गोरेपान आणि सहा फूट उंचीचे सॅंडहर्स्टमधून कमिशन घेतलेले जनरल परांजपे मला अजून चांगले आठवतात. थॉमस गे ह्यांनी एकदा 'a rebel is the one who rebels' असा माझा उच्चार सुधारल्याचेहि मला आठवते.) (परीक्षेमध्ये मला यश मिळाले आणि माझे पुढचे आयुष्य अधिकाराच्या जागी, सन्मानात आणि आर्थिक चिंतेपासून मुक्त असे गेले हे नमूद करून ठेवतो.) ह्या तयारीच्या निमित्ताने आणि नंतरहि थॉमस गे ह्यांच्याशी माझा जो थोडाफार परिचय झाला त्यावर आधारित असे हे लिखाण आहे, थॉमस गे ह्यांची सून फिलिपा हिचा आणि माझा अन्य एका चर्चागटामध्ये परिचय झाला. मीहि थॉमस गे ह्यांना ओळखतो असे कळल्यावर 'The Life and Friends of Dada' तिने आणि पति ह्यू वॉटरफील्ड ह्यांनी संपादित केलेले थॉमस गे ह्यांच्या आठवणींचे पुस्तक तिने मला पाठविले. त्यावरूनहि घेतलेली माहिती येथे आहे.

(थॉमस गे (वॉटरफील्ड) ह्यांची तीन छायाचित्रे. पहिले जन्मावेळचे आजोबा आणि वडील ह्यांच्यासह, दुसरे तरुण वयातील आणि तिसरे नंतरच्या काळातील मला परिचित.)

थॉमस एडवर्ड वॉटरफील्ड (१९०५-२००१) ह्यांचा जन्म इंग्लंडच्या दक्षिण-पश्चिम भागातील डेवनशर परगण्यामधील डॉलिश नावाच्या गावी झाला. त्यांच्या पूर्वीच्या तीन पिढयांचा हिंदुस्थानशी निकट संबंध होता. त्याचे पणजोबा १८२० च्या सुमारास ईस्ट इंडिया कंपनीच्या पोलिटिकल विभागाचे संचालक होते. आजोबा विल्यम वॉटरफील्ड आणि वडील एडवर्ड होप वॉटरफील्ड हे दोघेहि ICS अधिकारी होते. (वडील मुंबई प्रान्तातच होते. त्यांच्या मृत्यु लवकर झाला. वान्द्रे भागात त्यांच्या नावाचा एक रस्ताहि होता. (सध्याचे पोपली हे प्रसिद्ध हिरे आणि सोन्याचे दुकान जुना टर्नर रोड आणि जुना वॉटरफील्ड रोड ह्यांच्या चौकात आहे. अवान्तर - ह्या रस्त्यांची स्वातन्त्र्योत्तर नावे काय आहेत? गूगल मॅप्समध्ये अजून जुनीच नावे दिसत आहेत.) शाळेनंतर मॅग्डेलन कॉलेज, ऑक्सफर्ड येथे थॉमस वॉटरफील्ड ह्यांचे शिक्षण झाले. तेथे त्यांचा विषय Classics म्हणजे ग्रीक आणि लॅटिन हा होता. विद्यापीठाकडून ते रग्बी आणि जुजुत्सुहि खेळत असत. शिक्षणानंतर कुटुंबाच्या परंपरेला जागून ICS च्या स्पर्धापरीक्षेला बसून त्यांनी ICS मध्ये जागा मिळविली आणि १९२८ साली त्यांची पाठवणी मुंबई प्रान्तामध्ये करण्यात आली.

अशा dyed-in-the-wool ICS वातावरणाचा परिणाम त्यांच्यावर झाला असता तर काहीच विशेष नवल घडले नसते. ICS मधून हिंदुस्तानामध्ये आलेल्या अधिकार्‍यांचे स्वत:चे असे स्वयंपूर्ण जग असे आणि त्या जगाबाहेर पाहण्याची त्यांची इच्छाहि नसे. ऑफिसचे काम आणि दौरे, त्या कामापुरता नेटिवांशी आवश्यक तेवढा संबंध, स्थानिक ब्रिटिश अधिकार्‍यांचा, गोर्‍या लोकांपुरता मर्यादित असलेला क्लब, वार्षिक उन्हाळ्यात सिमला-मसूरी-महाबळेश्वर-ऊटी अशा ठिकाणी जमल्यास मुक्काम, ५-६ वर्षांनी ’फर्लो’वर ’होम’ म्हणजे इंग्लंडचा दौरा, एरवीच्या काळात ’होम’च्या बातम्यांची चर्चा, घरी येणारा नेटिवांशी संबंध म्हणजे खानसामा-बावरची-धोबी-माळी-साइस-भिस्ती इतकाच. असे हे स्वत:च्या श्रेष्ठत्वाच्या गंडाने पछाडलेले inward-looking जग असे. ह्या जगातून कमीअधिक बाहेर जाणे म्हणजे वरिष्ठांची नापसंतीची नजर आपल्याकडे वळवून घेणे आणि 'going native' चा ठप्पा स्वत:वर मारून घेणे हे प्रत्येकास माहीत असल्याने तसले काही करण्याचा किंवा नेटिवांशी कसलीहि सामाजिक जवळीक साधण्याचा प्रयत्न कोणी करीत नसे. अभ्यासू स्वभावाचे काही अधिकारी प्राचीन भारतीय कला-वाङ्मय-शिल्प-तत्त्वज्ञान-भाषा-इतिहास अशा गोष्टींच्या अंतरंगात कुवतीनुसार संचार करतहि असत पण त्यांची संख्या एकुणाच्या तुलनेने नगण्यच म्हणावी लागेल.

हिंदुस्थानामध्ये नव्याने पाऊल टाकणार्‍या ICS अधिकार्‍याला ह्या वातावरणाचा आणि कामाचा परिचय व्हावा म्हणून सुरुवातीस एखाद्या वाकबगार वरिष्ठाच्या हाताखाली त्याची नेमणूक होत असे. थॉमस वॉटरफील्ड ह्यांची पहिली नेमणूक सोलापूरचे कलेक्टर मि. नाइट ह्यांच्या हाताखाली असिस्टंट कलेक्टर आणि मॅजिस्ट्रेट म्हणून झाली. आल्याआल्याच सोलापुरात गिरणी कामगारांचे दंगे होऊन मार्शल लॉ लागण्यापर्यंत वेळ गेली. दंग्यात काही पोलिस मारले गेले आणि परिणामत: मल्लाप्पा धनशेट्टी आणि अन्य तिघांवर त्याचा आळ येऊन कालान्तराने त्यांना फाशीची शिक्षाहि झाली. ह्या सर्व काळात थॉमस वॉटरफील्ड हे कसोटीस पूर्णपणे उतरले असा अभिप्राय त्यांना वरिष्ठांकडून मिळाला. तदनंतर पाळीपाळीने त्यांच्या पुणे आणि सातारा येथे असिस्टंट कलेक्टरच्या जागेवर बदल्या झाल्या. ह्यानंतर त्यांनी ICS च्या न्यायालयीन बाजूकडे बदली मागून घेतली आणि त्यांचे ICS मधील उर्वरित दिवस धारवाड, कारवार, रत्नागिरी अशा जागी जिल्हा न्यायाधीश म्हणून आणि मुंबई हायकोर्टाचे रजिस्ट्रार अशा जागांवर गेले.

मुंबई प्रान्तातील नोकरीचा भाग म्हणून मराठी भाषा ते शिकलेच होते. वर वर्णिलेल्या ह्या सर्व काळात त्यांच्यामध्ये एक अजून बदल घडत होता. ब्रिटिश नोकरशाहीची आसपासच्या जनतेपासून श्रेष्ठत्वाच्या अहंकारामुळे विलग राहण्याची आणि ह्या नोकरशाहीकडून प्रत्यही होणार्‍या सामान्य व्यक्तीच्या अवहेलनेची जाणीव त्यांना खुपू लागली होती. आपल्या वर्तनातून हे दाखवायला त्यांनी सुरुवात केली. संध्याकाळचा वेळ अन्य ब्रिटिश अधिकार्‍यांसमवेत क्लबमध्ये घालावायचे त्यांनी थांबविले आणि मराठी भाषा, संस्कृति, इतिहास ह्यांचा अधिक जवळून अभ्यास करण्यास त्यांनी सुरुवात केली. हिंदुस्थानी जनतेच्या मागण्या आणि इच्छा ह्याबाबतची आपली सहानुभूति वरिष्ठांच्या नजरेत यावी असे वर्तन ते करू लागले. (’चले जाव’ चळवळीच्या दिवसांमध्ये चळवळीला सहानुभूति दाखविण्यासाठी ते एक दिवस कार्यालयात मराठा पद्धतीचा फेटा बांधून गेले अशी आठवण एल्फिन्स्टन कॉलेजचे एकेकाळचे प्रिन्सिपॉल जी.सी.बॅनर्जी ह्यांनी सांगितली होती.) ICS अधिकार्‍यांच्या पठडीनुसार शिकारीची हौस त्यांना होतीच पण आता तिचे रूपान्तर आता नाना प्रकारचे वृक्षवेली आणि पक्षीप्राणी ओळखणे ह्या छंदामध्ये झाले. बॉंबे नॅचरल हिस्टरी सोसायटीशी ह्यामुळे त्यांचा निकटचा संबंध येऊ लागला. टाइम्स ऑफ इंडियामध्ये नियमित स्वरूपात अशा विषयांवरचे त्यांचे लेख येऊ लागले. महाराष्ट्र आणि मराठी भाषा ह्यांच्याविषयी विशेष प्रेम त्यांच्या मनात उत्पन्न झाले. मराठी बोलण्याचा त्यांनी इतका सराव केला की पलीकडच्या खोलीत ते मराठी बोलत असतील तर ऐकणार्‍याला ते मूळचे इंग्रज आहेत असे वाटू नये इतकी सफाई त्यांच्या बोलण्यात होती असे परिचितांनी नोंदवून ठेवले आहे.

१९४७ साली स्वराज्य येऊ घातले तेव्हा दिल्लीतील सरकारने सर्व ICS अधिकार्‍यांना सेवा चालू ठेवण्यासाठी भावी भारत किंवा पाकिस्तान ह्यापैकी एकाची निवड करणे अथवा सेवानिवृत्ति घेऊन इंग्लंडात पेन्शनीवर परतणे असे पर्याय दिले होते. चार गोरे अधिकारी सोडून बाकी सर्व गोर्‍या अधिकार्‍यांनी इंग्लंडला परतणे पसंत केले. भारतात राहिलेल्या चार इंग्रज अधिकार्‍यांमध्ये थॉमस वॉटरफील्ड हे एक होते.

पडद्यामागे काय घडले माहीत नाही पण मी असे ऐकले आहे की त्यांचे मुंबई प्रांतातच सेवेत राहणे मोरारजी देसाईंना मान्य नव्हते. मोरारजी हे मुंबई इलाख्याचे तत्कालीन गृहमन्त्री आणि थॉमस वॉटरफील्ड ह्यांचे राजकीय वरिष्ठ होते. त्यांच्याबरोबर संघर्षामध्ये राहून काम करण्यापेक्षा थॉमस वॉटरफील्ड ह्यांनी राजीनामा देऊन पेन्शनवर जाण्याचे निवडले. भारतातच राहण्याचा त्यांचा निश्चय पक्का होता. एव्हांना त्यांचा विवाह झालेला असून त्यांना तीन मुलगे आणि एक मुलगीहि होती. त्यांच्या इंग्रज पत्नीला हा भारतात राहण्याचा निर्णय मान्य नसावा कारण ती मुलांसह इंग्लंडला परतली आणि कालान्ताराने त्यांच्या विवाहाचे घटस्फोटात पर्यवसान झाले. ह्याच सुमारास त्यांनी भारताचे नागरिकत्व घेऊन आपले आडनावहि बदलले. ह्यापुढे ते ’थॉमस गे’ ह्या नावाने ओळखू जाऊ लागले. ( त्यांनी ’गे’ हे आडनाव निवडले खरे पण त्या काळात ह्या शब्दाला सध्या प्राप्त झालेली छटा त्या काळात नव्हती. ती नंतर बर्‍याच वर्षांनी १९६०च्या सुमारास निर्माण झाली असा माझा समज आहे. 'Gay' ह्या शब्दाचा ’uninhabited', 'not conforming to convention' असा जो मूळ अर्थ आहे त्या अर्थाने त्यांनी हे नाव निवडले आणि त्याचा संदर्भ ICS च्या पोलादी चौकटीतून बाहेर पडण्याच्या त्यांच्या प्रयत्नांकडे लागतो असा माझा तर्क आहे.)

ICS मधून बाहेर पडल्यावर त्यांना १२०० रुपये पेन्शन सुरू झाले. त्यांना एकटयाला कदाचित हे पुरे पडू शकले असते पण मधल्या काळात थॉमस गे ह्यांनी काही जबाबदार्‍या उचलल्या होत्या. मुले भारतात असेपर्यंतच्या काळात ज्या दोन मुली त्यांच्याकडे मुलांच्या आया म्हणून ठेवलेल्या होत्या त्या दोघींनाहि त्यांच्या पालकांच्या संमतीने त्यांनी आपल्याकडे ठेवून घेतले आणि आपल्या मुलींसारखे त्यांना वाढवून आणि शिक्षण देऊन योग्य वेळी त्यांच्यासाठी चांगले नवरे शोधून त्यांचे विवाह करून दिले. १९४७ पासून २००१ मध्ये त्यांचा मृत्यु होईपर्यंत त्यांनी वेळोवेळी सहा गरीब कुटुंबांतील मुलींना असे आपल्या घरी वाढवून त्यांचे विवाह करून दिले. त्या सर्वजणी भारतात आणि भारताबाहेर सुखात असून एकदोघींना नातसुना येण्याइतक्या त्या आता मोठया झाल्या आहेत. मध्यंतरी एका मराठी चांगल्या कुटुंबातील स्त्रीशी त्यांचा दुसरा विवाह झाला पण तो फार काळ टिकला नाही. ह्या सर्व गोष्टी करण्यास केवळ पेन्शन पुरे पडले नसते म्हणून आणि नुसते बसून राहणे त्यांच्या नैसर्गिक वृत्तीशी जुळणारे नव्हते ह्याहि कारणाने त्यांनी आर्थिक उत्पन्नाच्या अनेक गोष्टी केल्या. निवृत्तीनंतर लगेचच लोणावळ्याजवळ सहा एकर शेतजमीन घेऊन तेथे त्यांनी घर बांधले आणि शेतीकरण्याचा प्रयत्न केला. तो ठीक जमला नसावा कारण नंतर त्यांनी शेत विकून पुण्याला आपले बिर्‍हाड कायमचे हलविले. १९५० मध्ये त्यांनी इंग्लंडला शेवटची भेट दिली. तदनंतर पुढची ५० वर्षे ते भारतातच राहिले. पुण्याला प्रभात रोडवर त्यांनी तीन खोल्यांची एक जागा भाडयाने घेतली आणि आयुष्याच्या अखेरीस वारज्याला स्वत:च्या घरात जाईपर्यंत ते तेथे राहिले. (मी तेथे दोनतीनदा गेलो होतो. छोटा गंधर्व ह्यांचा बंगला प्रभात रोडमागील कॅनॉलच्या काठावर होता आणि तेथे तळमजल्यावर ह्या तीन खोल्या होत्या, बंगल्याचे नाव ’देवकुंज’ होते अशी माझी आठवण आहे.) एव्हांना राहण्याबोलण्यात आणि जेवणखाण अशा बाबतीत ते जवळजवळ पूर्णत: मराठी बनलेले होते. त्यांच्या मुली आणि परिचित त्यांना ’दादा’ असे ओळखत असत.

शेतीमधून बाहेर पडल्यावर त्यांनी अनेक गोष्टी केल्या. साराभाई कुटुंबाने सुरू केलेल्या ’श्रेयस् प्रतिष्ठान’च्या ’श्रेयस्’ नावाच्या पब्लिक स्कूलच्या धर्तीवरच्या शाळेचे प्रिन्सिपॉल म्हणून ते काही वर्षे होते. तसेच अजमेरच्या मेयो कॉलेजच्या असिस्टंट प्रिन्सिपॉलच्या जागेवरहि काही वर्षे त्यांनी काम केले. वॉल्टर थॉमसन ह्या जाहिरात कंपनीत त्यांची काही वर्षे गेली. हा सर्व वेळ वैयक्तिक लिखाण आणि संशोधन चालूच होते. टाइम्समध्ये मधल्या पानावर त्यांचे लेख मी अनेकदा १९६०-७० च्या काळात वाचलेले आहेत. काही कोंकणी पुस्तकांची भाषान्तरे, सिनेमा कंपन्यांचे सल्लागार, इंग्रजीमध्ये ghost writing, असे अनेक उद्योग त्यांनी केले. 'Common Butterflies of India' असे एक पुस्तक त्यांच्या नावावर आहे. मधूनमधून भारतभर भ्रमणहि चालू असे. एकदा आपल्या मोटरसायकलवरून दक्षिण हिंदुस्तानात ते भ्रमंती करून आले हे मला माहीत आहे. (मूळची मोटरकार जुनी झाल्यावर ती विकून तिच्या जागी अधिक सुटसुटीत म्हणून राजदूत मोटरसायकल त्यांनी विकत घेतली. तिच्यावरून हिंडणारे वयोवृद्ध थॉमस गे हे १९७५-८० पर्यंत पुणेकरांना चांगलेच परिचित दृश्य होते. आणखी वय झाल्यावर तिच्याहूनहि हलकी म्हणून एक लुना ते वापरत असत.)

इंग्लंडमधील त्यांची मुले त्यांच्याबरोबर सर्ववेळ चांगले संबंध ठेवून होती. ते सर्वजण आणि थॉमस गे ह्यांची नातवंडे वेळोवेळी भारतात येऊन त्यांची विचारपूस करीत. १९९५च्या सुमारास त्यांच्या मुलांनी त्यांना वारज्याच्या भागात ’मेघराष्ट्र’ हा बंगला नदीकाठी बांधून दिला. भारतातील त्यांचे जावई, मुली, नातवंडे, तसेच अन्य अनेक हितचिंतक ह्यांच्या आधाराने त्यांचे अखेरचे दिवस सुखात गेले. अगदी शेवटाला वयाच्या ९५-९६व्या वर्षी दृष्टि फार मंद झाल्यामुळे नदीवरून संध्याकाळी परतणारे पक्ष्यांचे थवे बघता येत नाहीत एवढी एकच खंत त्यांना उरली होती. २००१ मध्ये ’मेघराष्ट्र’मध्ये ते मृत्यु पावले.

पुण्याच्या हडपसर दफनभूमीमध्ये ते आता चिरविश्रान्ती घेत आहेत. त्यांच्या ’The South-West Monsoon Has Withdrawn' ह्या संग्रहामधून घेतलेली पुढील कविता तेथे स्मरणलेख म्हणून कोरलेली आहे:

“Of darling husband...wife. ” “thy will be done.”
“Grant them eternal rest,” the headstones plead.
“Our only child, light from our household gone. ”
“Earth to earth, dust to dust. ” “Not dead but sleeping."
“Peace perfect peace.” “For ever with the Lord.”
Dear ones “entrusted to Our Father’s keeping.”
These simple griefs of simple folk record.

Not here we’ll read “Tell Sparta, passer-by,
We her commands obeyed, and here we lie.”
Nor that brief message, raising the grim spectre
Of the Java Sea fight in the Second War,
Writ for a lone ship: “H.M.S. Electra
Attacked through the smoke, and was seen no more.”

Thomas Gay
Poona: 12 December 1983

(ह्या सुनीतातील सहावी आणि सातवी ओळ थर्मापिलीच्या संदर्भात सायमॉनिडीज ह्या प्राचीन ग्रीक कवीने लिहिल्या आहेत. पुढच्या चार ओळी 'Battle of the Java Sea' ह्या नावाने प्रख्यात असलेल्या जपानविरुद्धच्या सागरी युद्धामध्ये एचएमएस इलेक्ट्रा ह्या जहाजाने केलेल्या कामगिरीबद्दल आहेत.)

आपल्या मूल्यांशी तडजोड न करता ताठ मानेने आयुष्य काढलेल्या माझ्या ह्या इंग्रज मार्गदर्शकास ही श्रद्धांजलि!

धाग्याचा प्रकार निवडा: : 
माहितीमधल्या टर्म्स: 

सन्मानाने मरण्याचा हक्क

जीवन व मृत्यु

धाग्याचा प्रकार निवडा: : 
माहितीमधल्या टर्म्स: 

पाने

Subscribe to RSS - समाज