विज्ञान

करोना व्हायरस - शरीरात कसा वागतो?

करोना व्हायरस जनसमूहात कसा पसरतो हे आपण आतापर्यंत मोजलं आहे; आता वेळ आली आहे तो शरीरात गेल्यावर कसा वागतो, याचा अभ्यास करायची.

टीप : मूळ इंग्रजी लेखक आहेत अमेरिकास्थित सुप्रसिद्ध कॅन्सरतज्ज्ञ डॉ. सिद्धार्थ मुखर्जी. त्यांना २०११मध्ये “द एम्परर ऑफ ऑल मॅलडीज् – ए बायोग्राफी ऑफ कॅन्सर” या पुस्तकासाठी पुलिट्झर पुरस्कार मिळाला आहे. प्रस्तुत लेख ६ एप्रिल २०२० रोजी ‘द न्यूयॉर्कर’ मध्ये प्रसिद्ध झाला आहे. मूळ लेखाची शब्दसंख्या थोडी जास्त असल्याने आशयाला धक्का न लावता अनुवाद काहीसा संक्षिप्त केला आहे.

अनुवाद: डॉ. अजेय हर्डीकर

धाग्याचा प्रकार निवडा: : 
माहितीमधल्या टर्म्स: 

महासाथींचा इतिहास

कोव्हिड-१९ पॅन्डेमिकचे (महासाथ) आणि त्याच्या परिणामांचे पडसाद नेमके काय असतील हे आत्ता सांगणं कठीण आहे. हा लेख म्हणजे एक ऐतिहासिक संदर्भ देण्याचा प्रयत्न आहे.

-----------------
मूळ इंग्रजी लेख ‘द व्हिजुअल कॅपिटलिस्ट डॉटकॉम’वर १४ मार्च २०२० रोजी प्रथम प्रकाशित. यातील कोव्हिड-१९ची आकडेवारी सतत अपडेट केली जाते.
लेखक: निकोलस लपॅन.
मराठी अनुवाद : डॉ. अजेय हर्डीकर

-----------------

महासाथींचा इतिहास

धाग्याचा प्रकार निवडा: : 
माहितीमधल्या टर्म्स: 

करोनाव्हायरस नेमका किती धोकादायक आहे?

करोनाव्हायरस नेमका किती धोकादायक आहे? अजूनही हे निश्चितपणे सांगता येत नाही.
उपलब्ध माहितीचा अन्वयार्थ अन्य प्रकारे करायला वाव आहे.
‘द स्पेक्टेटर’, यू.के.च्या ताज्या अंकातील डॉ. जॉन ली यांच्या लेखाचा हा अनुवाद आहे. डॉ. ली पॅथॉलॉजी विषयातील निवृत्त प्राध्यापक, आणि माजी एन.एच.एस. कन्सल्टंट आहेत. या लेखातील विचार ‘बरोबर’ की ‘चूक’ अशा कप्प्यात बसविता येण्यासारखे नाहीत. तथापि, या समस्येची दुसरी बाजू ते दाखवितात. यामुळे, या विषाणूबद्दल वाटणारी भीती जरी थोडी कमी झाली, तरी पुरेसे आहे. याचा अर्थ सर्वसाधारणपणे घ्यावयाची काळजी आणि सरकारी बंधने धुडकावून लावायला हरकत नाही असे अजिबात नाही.

धाग्याचा प्रकार निवडा: : 
माहितीमधल्या टर्म्स: 

चंद्र आणि मंगळ यांची पिधान युती

चंद्र व ग्रह यांचे आकाशातील मार्ग तसे जवळून असतात मात्र त्यातील किरकोळ फरकांमुळे दोन्ही एकमेकांजवळ आले तरी त्यांमध्ये अंतर असते. मात्र कधीतरी भुमिती जुळून येते आणि चंद्राचा मार्ग बरोबर ग्रहावरून जातो. अशा घटनेला पिधानयुती असे म्हणतात (occultation).

आज सकाळी उत्तर अमेरिकेत मंगळ आणि चंद्राची पिधानयुती पहावयास मिळाली. चंद्रकोरीच्या मागे मंगळ अदृश्य होण्याच्या काही क्षणांपुर्वी घेतलेला फोटो खाली देत आहे. मंगळाला चंद्रामागून पुन्हा बाहेर यायला साधारण ६५ मिनीटे लागली.

धाग्याचा प्रकार निवडा: : 
माहितीमधल्या टर्म्स: 

रिव्हर ऑफ कॉन्शसनेस

Oliver Sacks

रिव्हर ऑफ कॉन्शसनेस - ऑलिव्हर सॅक काय सुंदर पुस्तक आहे.-
लेखक 'Principles of psychology - William James' यांच्या पुस्तकातील काही प्रयोग लिहीतो -

धाग्याचा प्रकार निवडा: : 
माहितीमधल्या टर्म्स: 

डिझायनर्स बेबी’चे (दुः)स्वप्न

xxx

धाग्याचा प्रकार निवडा: : 
माहितीमधल्या टर्म्स: 

रात्र उजळवणारा कृत्रिम "चंद्र"

रात्रीच्या वेळी निरभ्र आकाशाकडे आपण काही वेळ पहात राहिल्यास एखादा दुसरा उल्का आकाशातून जमिनीकडे झेप घेताना दिसल्याशिवाय राहणार नाही. आकाशातील तारेच तुटून पडतात की काय वा आकाशात कुणी तरी दिवाळीची आतिषबाजी करत आहेत की काय असे लहानपणी आपल्याला वाटायचे. परंतु आजकल शहरातील आकाशच नव्हे तर खेड्यातील आकाशसुद्धा तेवढे निरभ्र नसतात. त्यामुळे उल्कापाताच्या वा पिठूर चांदण्यात फिरण्याच्या आनंदाला आताची पिढी पूर्णपणे मुकत आहे.

धाग्याचा प्रकार निवडा: : 
माहितीमधल्या टर्म्स: 

बुद्धीवादाचा एक पंथ होउ नये- कै. मा.श्री. रिसबूड

सहज समजेल फलज्योतिष काय आहे व काय नाही? या कै. मा.श्री. रिसबूड यांच्या पुस्तकातील प्रकरण. हे प्रकरण टाकावे कि नाही? याबाबत रिसबूड साशंक होते. अंनिस यावर काय विचार करेल असाही मुद्दा होता. पण मी हे प्रकरण पुस्तकात असावे याबद्दल आग्रही होतो. त्यानुसार त्यांनी हे प्रकरण पुस्तकाच्या शेवटी समाविष्ट केले.

धाग्याचा प्रकार निवडा: : 
माहितीमधल्या टर्म्स: 

भाषा आणि स्मृती : सैद्धान्तिक व्यूह

Language and Memory
प्रस्तावना
भाषिक स्मृतीचा विचार या लेखात दोन पातळ्यांवर केलेला आहे. मेंदूतील भाषेची साठवण या अर्थाने भाषिक स्मृतीचा उलगडा पहिल्या भागात केला आहे. भाषिक स्मृती सामाजिक पातळीवर समजून घेताना, विशेषतः भाषेच्या संदर्भात, कोणते सैद्धान्तिक पेच आपल्या समोर उभे राहतात याचा विचार दुसऱ्या भागात केलेला आहे.

आता परमेश्वराचे काय करायचे- भाग 1

(1979 या वर्षामधील भौतिकीसाठी दिल्या गेलेल्या नोबल पुरस्काराचा विजेता स्टीव्हन वाइनबर्ग हा माझा अत्यंत आवडता असा लेखक आहे. सैद्धांतिक भौतिकी या विषयामध्ये त्याने केलेले संशोधन हे अत्यंत महत्त्वाचे आहेच, परंतु तो अतिशय उत्तम लेखक आहे. अतिशय गहन विषयसुद्धा सोप्या भाषेत समजावून सांगण्याची त्याची हातोटी विलक्षणच म्हणावी लागेल. विश्वातील मूलकण व त्यांच्यावर कार्य करणारी बले हा त्याचा आवडीचा विषय. या विषयावर लेखन करत असताना तत्वज्ञानातील सिद्धांत दृष्टीआड करून चालणार नाही याची जाणीव असल्याने लेखन करत असताना तो मधून मधून तत्वज्ञानाकडे वळत असतो. त्याचे या विषयांवरील लेख मला विशेष रुचतात.

धाग्याचा प्रकार निवडा: : 
माहितीमधल्या टर्म्स: 

पाने

Subscribe to RSS - विज्ञान