संकल्पनाविषयक

आरशात बघताना

बॉडीशेमिंगची कशाला म्हणतात, आणि त्याचा आपल्यावर परिणाम न होण्यासाठी काय कष्ट घ्यायला लागले? आपली प्रतिमा आपल्यासमोर कशी तयार होते? सईचा किकॅस ॲटिट्यूड वाचा ह्या लेखात.

पिंपळपान

तो नक्की कोण होता? कुठे पोहोचला होता? ते पिंपळाचं पान त्याच्यापासून लांब का पळत होतं? त्याच्या तोंडावर असलेला मास्क खराच होता का?

वाढता वाढता वाढे

जाडगेल्या माणसांच्या संपर्कात राहून आपण सुद्धा जाडे होतो का? मग पीळदार लोकांच्या सहवासात राहून आपणही फिट होतो का? हे जिवाणू-विषाणूंमुळे होतं का, कसं होतं? हाही एक प्रकारचा संसर्गच.

प्लॅन के मुताबिक…

'बटरफ्लाय इफेक्ट'चा परिणाम आणि इन्स्पेक्टर राण्यांच्या शिव्यांमुळे नक्की काय झालं?

बाधा

द 'कल्चर' मस्ट गो ऑन

'शेजारच्या काकूंकडून विरजण घेऊन ये, किंवा त्यांना विरजण देऊन ये' अशी 'विरजणाची देवाणघेवाण' हा आपल्या जडणघडणीचा, संस्कृतीचा भाग. पण हे करताना आपण चक्क लॅक्टोबॅसीलस किंवा स्ट्रेप्टोकोकस या गटातल्या 'बॅक्टेरियल कल्चर'ची देवाण-घेवाण करत असतो, हे आपल्यापैकी अनेकांच्या ध्यानातही येत नाही. 'विरजण' हा शब्द आलाय 'विरंजन' या शब्दापासून.

The Black Sheep - इतालो काल्व्हिनोच्या कथेचं स्वैर भाषांतर

एका देशात सगळेच चोर असतात. मग तिथे येतो एक प्रामाणिक माणूस. पुढे काय होतं?

भाषासंसर्ग: भूषण, दूषण, राजकारण

भाषांची सरमिसळ कधी अनिष्ट वाटते आणि कधी हवीहवीशी? वेगवेगळ्या भारतीय भाषांनी आधुनिक काळात कुठल्या 'पर'भाषांचा संसर्ग अवांछित मानला त्याची किंचित झलक दाखवून या प्रश्नांची उत्तरं शोधण्याचा प्रयत्न केला आहे.

ऐसी अक्षरे दिवाळी अंक २०१८ आवाहन

नमस्कार,

गेल्या सहा वर्षांची परंपरा पाळत यंदाही 'ऐसी अक्षरे'च्या दिवाळी अंकाबद्दल चर्चा सुरू झालेली आहे. त्यासाठी 'ऐसी अक्षरे'च्या सदस्यांकडून लेखन मागवण्यासाठी हे आवाहन.

Taxonomy upgrade extras: 

पाने

Subscribe to RSS - संकल्पनाविषयक