संसद सत्र

संसद: हिवाळी अधिवेशन २०१३

याआधी:
२०१२: मान्सून सत्र | हिवाळी अधिवेशन
२०१३: बजेट सत्रः पूर्वार्ध | बजेट सत्रः उत्तरार्ध | मान्सून सत्र

२०१३ चे हिवाळी अधिवेशन येत्या गुरूवारी ५ डिसेंबर रोजी सुरू होत आहे व ते २० डिसेंबर रोजी संपणे प्रस्तावित अहे. या सत्रात मांडली जाण्याची शक्यता असलेली काही महत्त्वपूर्ण विधेयके अशी आहेतः
-- तेलंगाणा निर्मिती विधेयक.

संसद: मान्सून सत्र २०१३

ऐसीअक्षरे वर आपण २०१२च्या मान्सून सत्रापासून सुरवात करत २०१२ चे हिवाळी अधिवेशन२०१३ च्या बजेट अधिवेशनाशी संबंधित दैनैदिन कामकाज - काय प्रस्तावित होते, प्रत्यक्षात काय झाले - याचे वार्तांकन इथे वाचले व त्यावर चर्चाही केली. या उपक्रमाला येत्या मान्सून सत्राच्या निमित्ताने एक वर्ष पूर्ण होत आहे याचा आनंद आहे.

संसद: बजेट सत्र २०१३ (उत्तरार्ध)

याआधी आपण २०१२ चे मान्सून सत्र २०१२ च्या हिवाळी अधिवेशनात आणि यंदाच्या बजेट सत्राच्या पहिल्या भागात काय प्रस्तावित होते, काय झाले याचे वार्तांकन इथे वाचले. उद्या, २१ फेब्रुवारी २०१३ पासून बजेट सत्र सुरू झाले. त्याचा उत्तरार्ध आज २२ एप्रिलपासून झाला आहे. यापैकी सुट्ट्या व विकांत सोडले तर १३ दिवस संसदेचे कामकाज चालेल.

अर्थातच या सत्रात वित्तविषयक घडामोडींना प्राधान्य दिले जाते असा पायंडा आहे. यातील काही ठळक प्रस्तावित विधेयके अशी आहेतः
१. वित्त बिलात विरोधकांनी पास केलेल्या सुधारणा.

संसद: बजेट सत्र २०१३

याआधी आपण २०१२ चे मान्सून सत्र आणि २०१२ च्या हिवाळी अधिवेशनात काय प्रस्तावित होते, काय झाले याचे वार्तांकन इथे वाचले. उद्या, २१ फेब्रुवारी २०१३ पासून बजेट सत्र सुरू होत आहे.

अर्थातच या सत्रात वित्तविषयक घडामोडींना प्राधान्य दिले जाते असा पायंडा आहे. यातील काही ठळक प्रस्तावित विधेयके अशी आहेतः
१. रेल्वे बजेट २०१३-१४
२. सर्वसाधारण बजेट २०१३-१४
३. इन्शुरन्स आणि पेन्शन मध्ये थेट परकीय गुंतवणुकीच्या योजनेत बदल करणारी विधेयके
४. अन्न सुरक्षा बिल

संसद २०१२: हिवाळी अधिवेशन

संसदेचे २०१२चे हिवाळी अधिवेशन दिनांक २२ नोव्हेंबर रोजी सुरू होत आहे. त्या सत्रासंबंधीच्या माहितीचे आदान-प्रदान करण्यासाठी, एकूणच संबंधीत राजकारणावर चर्चा करण्यासाठी, मांडलेल्या बिलांवर ऐसीच्या सदस्यांची मते समजून घेऊन त्यावर साधकबाधक चर्चा करण्यासाठी हा धागा सुरू करत आहे.

यात शक्य तितके दररोज काल काय झाले आणि आज संसदेपुढे कोणता कार्यक्रम प्रस्तावित आहे याची माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहेच. शिवाय यावेळी या धाग्यावर या सत्राच्याशी निगडीत राजकारणावरही चर्चा व्हावी असे वाटते.

जेव्हा एखादे महत्त्वाचे विधेयक सादर होईल तेव्हा त्यावर आपापली मते जरूर द्यावीत अशी विनंतीही करतो

संसदेचे मान्सून सत्र २०१२

काल संसदेचे २०१२चे मान्सून सत्र सुरू झाले. त्या सत्रासंबंधी माहिती देण्यासाठी, चर्चा करण्यासाठी हा धागा सुरू करत आहे.
यात शक्य तितके दररोज काल काय झाले आणि आज संसदेपुढे कोणता कार्यक्रम प्रस्तावित आहे याची माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहे.

दररोज शक्य होईलच असे नाही मात्र प्रयत्न जरूर करणार आहे. सत्र संपल्यानंतर एकूण सत्राचा आढावा घेण्याचा प्रयत्न देखील वेगळ्या धाग्याद्वारे करण्याचा मानस आहे.

त्यातील महत्त्वाच्या प्रस्तावांवर ऐसीअक्षरेच्या सदस्यांकडून साधक-बाधक चर्चेची अपेक्षा आहे.

Subscribe to RSS - संसद सत्र